मिसरा असा सुचतो मला.....

Submitted by वैवकु on 19 April, 2012 - 10:21

मिसरा असा सुचतो मला
ज्याचा कुठे नसतो उला

मातीतल्या गर्भात मी
माझी खुपसतो चंचला

बरबाद आनंदात मी
दुःखात का असतो भला

गझला कशा करतात ती
मी आजही शिकतो कला

रे वैभवा गझलेत ह्या
आवाज भर तो आतला
______________________________
मी रंगलो कुठला जरी
काळाच दिसतो विठ्ठला

काळाच दिसतो विठ्ठला ...........!!!

______________________________

गुलमोहर: 

दोन काफिये असलेल्या गझलेस जुल्काफिया गझल असेच नाव आहे ना??

मी तशी रचना करण्याचा एक प्रयत्न इथे केला आहे .

गझला कशा करतात ती
मी आजही शिकतो कला

>>> हा तुमचा विनय झाला!....
आणि तो तुम्हाला शोभून दिसतो . मस्त

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद
जामोप्या : धन्यवाद ही गझल वर आणल्याबद्दल ..........
आपली आजची गझल वाचली होती तीही जुल्काफिया असल्याचे एका प्रतिसादात वाचलेही होते .............पुन्हा एकदा पाहून प्रतिसाद देण्यासाठी तिकडे येतोच आहे..........!!