दुध
पोहे
चवीपुरती साखर
आंतरजालावर "दुधपोहे" (किंवा "दुध पोहे" ) असे शोधले असल्यास काहीच मिळाले नसल्याने ही पाककृती देत आहे.
तसे "दही पोहे" बनवतात पण त्यासाठी लागणारे जिन्नस जसे- दही, मसाला, कोथंबीर आदी बॅचलर असलेल्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही.
झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे.
(लहाणपणी 'मला काहीतरी खायला दे' असली माझी भुणभुण ऐकून माझी आई मला 'दुधपोहे' झटकन बनवून देत असे हे लख्ख आठवतेय! असो.)
जेव्हा तुम्ही घरी एकटे असतात व नाश्टा बनविण्याचा कंटाळा येतो तेव्हा दुधपोहे करणे फारच सोपे असते.
पाककृती:
१) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या.
२) मुठभर पातळ पोहे त्यात टाका.
३) वरील दुधपोह्यांत चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात.
दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत.
(फोटो आंतरजालावरून साभार)
पुर्वप्रकाशीत
साखरेएवजी गुळ वापरूनही छान
साखरेएवजी गुळ वापरूनही छान लागतात हे पोहे.
साखर कशात घालायची? पोहे खाऊन
साखर कशात घालायची? पोहे खाऊन मग वर दूध प्यायचे का?
माझा आवडीचा पदार्थ. आता खायचे
माझा आवडीचा पदार्थ. आता खायचे काय हे सुचत नसेल तर हमखास मला दूध पोहे आठवतात
फोटो मध्ये जाड पोहे वाटताहेत
फोटो मध्ये जाड पोहे वाटताहेत
काय राव दगडफोडे! मला वाटलं
काय राव दगडफोडे! मला वाटलं एखादं फर्मास खट्याळ गाणं वगैरे असेल.
माझ्या एका मैत्रिणीला चहा
माझ्या एका मैत्रिणीला चहा पोहे आवडतात.
सिम्पल आणि स्वीट !
सिम्पल आणि स्वीट !
लहानपणापासून दूधपोहे हे
लहानपणापासून दूधपोहे हे माझेही आवडते खाद्य आहे...आजही मी तेवढ्याच आवडीने ते खातो.
साखरेऐवजी गूळ घालण्याबद्दल charcha ह्यांनी म्हटलंय...त्याला माझंही अनुमोदन आहे.
मस्त, खुप आवडीचा पदार्थ..
मस्त, खुप आवडीचा पदार्थ..
बरेच दिवसात केले नाहीत. बरी
बरेच दिवसात केले नाहीत. बरी आठवण झाली.
अहाहा ...लहानपणाची याद करुन
अहाहा ...लहानपणाची याद करुन दिलीत राव
माझ्या लहानपणी आई साखर-दुधात
माझ्या लहानपणी आई साखर-दुधात पोहे कालवुन त्यांना फक्त जि-याची फोडणी देऊन जो प्रकार करायची त्याची आठवण झाली. मस्त लागतात हे दुधपोहे.
मला पण अजुनही आवडतात दुध पोहे
मला पण अजुनही आवडतात दुध पोहे
लहानपणी आजी द्यायची
लहानपणी आजी द्यायची मधल्यावेळी खायला. गूळ घातलेले जास्त आवडतात.
Mast.. Saadhana ne mhanTlya
Mast..
Saadhana ne mhanTlya pramane jiryachi phoDani devun chaan lagat asatil..
PhoDanisaathi tup vaaparave kaa ?
(No subject)
जाडे पोहे चहात घालून चहा-पोहे
जाडे पोहे चहात घालून चहा-पोहे खायचो लहानपणी!