सुट्टीतील उद्योग "घर"

Submitted by विनार्च on 11 April, 2012 - 14:35

शाळेला सुट्टी पडून दोन दिवस नाही झाले तोपर्यंत "आई आता काय करू?" हा प्रश्न दिवसातुन हजारवेळा विचारुन, लेकीने माझा जीव नकोसा करुन सोडला. हिला कशात गुंतवता येईल याचा विचार करताना मला ज्योत्स्ना प्रकाशनचे "आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट" पुस्तक हाती लागलं. त्यात दिलेल्या वस्तू तिच्या वयाच्या (आठ वर्ष) मुलांना सहज जमण्याजोग्या वाटल्या म्हणुन प्रयत्न करुन पाहीला. हे घर करताना तिला इतकी मजा आली की तिने घरं बनवण्याचा सपाटाच लावला आणि मला थोडा मोकळा वेळ मिळाला.
मायबोलीवर माझ्या सारख्या बर्‍याच आया (आईच अनेक वचन Proud ) असतील म्हणुन इथे ते घर बनवण्याची कृती फोटोसहित देत आहे आवडली तर ऩक्की सांगा मग पुढच्या उद्योगांबद्द्लही लिहिन (कारण आमचा एकदिवसाआड नविन वस्तू बनवण्याचा करार झाला आहे)
साहित्य :

2012-04-11 13.10.32.jpg

कार्डपेपरचा ६ बाय ६ इंचाचा चौरस कापून घ्या.
2012-04-11 13.13.22.jpg

त्याच्या पुढील फोटोत दिल्या प्रमाणे घड्या घालून घ्या.
2012-04-11 13.14.39.jpg2012-04-11 13.15.37.jpg2012-04-11 13.16.26.jpg2012-04-11 13.17.07.jpg

पुढील फोटोत दाखवलेल्या तुटक रेषा कात्रीने कापाव्यात.
2012-04-11 13.19.30.jpg2012-04-11 13.23.05.jpg

आता आर्कीटेक्ट्ला बोलवून दारं खिडक्यांची पोझिशन ठरवून घ्या. Happy
2012-04-11 13.24.59.jpg

नंतर सुताराला सांगुन दारंखिडक्या बसवुन घ्या. Happy
2012-04-11 13.29.06.jpg

आता रंगवलेल्या भागावर गम लावा.
2012-04-11 13.31.23.jpg

आता शेजारचा चौकोन गम लावलेल्या भागावर चिटकवा.
2012-04-11 13.33.17.jpg

आता हे असे दिसेल. त्याच्या रंगवलेल्या भागावर परत गम लावा व शेजारचा चौकोन दाखवल्याप्रमाणे त्यावर चिटकवा.
2012-04-11 13.37.20.jpg2012-04-11 13.39.40.jpg

हे झालं बेसिक घर तयार.
2012-04-11 13.44.47.jpg

आता छपराचं काम चालू करा.
2012-04-11 13.45.38.jpg

हे आपल घर छप्पर लावून तयार.
2012-04-11 13.58.17.jpg

आणि हा माझ्या लेकीने वसवलेला गाव (हे काम तिने स्वत:च्या कल्पनेने मी ऑफीसला गेल्यावर केलं)
2012-04-11 14.03.16.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती मस्त आहे हे घर!

आमच्याकडे रिकाम्या शू बॉक्स मधे लेगो अन लाकडी ब्लॉक्स वापरुन स्टफ्ड प्राण्यांकरता अपार्टमेंट बनवायची फॅक्टरी आहे . आता अशा घरांची प्रॉडक्षन लाईन सुरु करायला हवी.

विनार्च,प्लिज "उद्योग" लिहा,आमच्याकडेही "काय करू" जप चालू असतो.माझ्या लेकीलाही क्राफ्ट आवडतं खूप.आज हे घर बनवून बघतो आम्ही पण.

विनार्च,

आधी तुला या गॄपचे सभासद व्हावे लागेल बहुतेक. त्यासाठी ग्रूप च्या मेन पेजवर जा आणि उजवीकडे 'सभासद व्हा' वर टिचकी मार. १५ सेकंदात सभासद होशिल.

मग या धाग्याच्या संपादनात जा आणि खाली ग्रूप लिहीले आहे तिथे 'सुट्टीतील उद्योग' सिलेक्ट कर Happy

मस्त!!

किती छान आहे हे घर !!

नक्की लिहित राहा. माझे डोकेही असेच उठवले आहे लेकीनी. Happy तिलाही आवडेल हे बनवायला.

सुंदर.

विनार्च, भारीच एकदम. आम्हाला शिकवल्याबद्दल धन्यवाद.
मी करून पण पाहिलं. मस्त दिसतय एकदम.

झाड, घरं, सूर्य, कोंबडी आणि मोर..गावात आणाखी काय लागतं? फर गोड!>> +१

एक छोटीशी सुधारणा.. ती छतावरून दरवाजाच्या मध्यात जी घडी येतेय तेवढी टाळली जावू शकते.

Pages