ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’ - प्रकरण 7

Submitted by शशिकांत ओक on 11 February, 2012 - 11:18

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - प्रकरण 7
ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’
ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे ब्लॉग वरून
बुद्धिवाद्यांच्या दृष्टीने कोणत्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा ठरते. पुराव्याशिवाय केले जाणारे सर्व व्यवहार हेही बुद्दिवाद्यांच्या दृष्टीने अंधश्रद्धेत मोडतात, हे अर्थातच निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. स्वाभाविकच बुद्धिवादी कोणताही व्यवहार पुराव्याशिवाय करीत नाहीत, असे मानणे चुकीचे ठरणार नाही.
या दृष्टीने पाहिले तर खरे बुद्धिवादी या जगात फक्त संन्यासी किंवा अध्यात्मवादी ठरतात. कारण प्रपंच दुखःदायक आहे याविषयी इतके पुरावे आहेत की त्याच्याकडे डोळेझाक करून प्रपंचात पडणे ही स्वतःच्या बुद्धिशी प्रतारणा आहे, हे ओळखून ते प्रपंचात पडत नाहीत. आणि पडले तरी ते प्रपंचाविषयी उदासीन राहून अनासक्त वृत्तीने जगतात. पण या लोकांना कोणी बुद्धिवादी म्हणत नाहीत आणि ज्यांना बुद्धिवादी म्हणतात, ते तर प्रपंचाचा त्याग करायला कधीच सांगत नाहीत, उलट प्रपंचात पडून त्यातील सुखांचा आंधळेपणाने ( म्हणजे प्रपंचातील दुःखाकडे डोळेझाक करून) उपभोग घ्यायला सांगतात. साहजिकच, ज्याला बुद्धिवाद म्हणून संबोधण्यात येते, तो खऱ्या अर्थाने बुद्धिवाद नाही, हे उघड आहे. तसेच ज्याला ‘डोळसपणा’ म्हणतात, तो खऱ्या अर्थाने अध्यात्मवाद्यांजवळ आहे, तथाकथित बुद्धिवाद्यांजवळ नाही हे ही उघड आहे[1].
कदाचित प्रपंचात पडून मर्यादित अर्थाने बुद्धिवादी बनून जगावे असे बुद्धिवाद्यांना म्हणायचे असावे. पण या मर्यादित अर्थाने तरी बुद्धिवादी बनून जगता येते का? म्हणजे पुराव्याशिवाय व्यवहार करायचा नाही, असे ठरवून प्रपंचात जगता येते काय? पुराव्याशिवाय कोणताही व्यवहार करणे हा धोका आहे, या दृष्टीकोनाला ‘संशयवाद’ म्हणतात. म्हणून प्रश्न असा आहे की संशयवादी बनून जीवन जगता येते काय?
याप्रश्नाच्या उत्तरासाठी प्रपंचात पडण्याचेच उदाहरण घेऊ. ज्या मुलीशी (किंवा मुलाशी) आपण लग्न करायचे ठरवतो, त्या मुलीमुळे (अगर मुलामुळे) आपण प्रपंचात सुखी होऊ काय, याविषयी आपण कधी पुरावे शोधतो काय? (पुरावे सापडतात काय हा प्रश्न बाजूला ठेवू) उलट या बाबतीत पुरावे शोधणे किंवा संशयीवृत्तीने (धोका आहे असे समजून) लग्न करणे हाच निर्बुद्धपणा आहे, असे आपण मानतो. कारण प्रेमात पडणे हे बुद्धिवादाचे (चिकित्सकपणाचे, संशयवृत्तीचे) काम नसून भावनेचे (आंधळेपणाचे) काम आहे असे आपण मानतो. प्रेम आंधळे असते (किंवा आंधळे प्रेम खरे असते) हा आपला याविषयीचा सिद्धांत प्रसिद्धच आहे! अशा रितीने मनुष्याला ज्याच्या शिवाय प्रपंचात जगताच येत नाही, त्या प्रेमासारख्या महत्वाच्या विषयातच बुद्धिवाद (संशयवाद) निरुपयोगीच नव्हे, तर अडचणीचा ठरतो.[2]
हीच गोष्ट नित्याच्या व्यवहाराच्या बाबतीतही खरी आहे. आपण आपले नेहमीचे जे जीवन जगतो, ते जवळ जवळ पुर्णपणे श्रद्धेने जगतो (या श्रद्धेचे समर्थन आपण 99टक्के अपघात होत नाहीत किंवा घटस्फोट घ्यावा लागत नाही, या आपल्या अनुभवाच्या आधारे केले तरी ती शेवटी श्रद्धाच असते) अशा रितीने पुराव्याशिवाय विश्वास ठेऊन चालण्याच्या या आपल्या वागणुकीला कोणी अंधश्रद्धा म्हटले तर मात्र आपण हा आरोप तात्काळ ठोकरून लावू. पण पुरावे नसताना जीवन जगण्याचे जीवनातील असंख्य गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे, हे आपले धोरण ईश्वरावर ‘पुरावे नसताना’ विश्वास ठेवण्याच्या धोरणाहून तात्विक दृष्ट्या यत्किंचितही भिन्न नाही.
पण ईश्वरावर पुरावे नसताना विश्वास ठेवण्याचे धोरण असे जे वर म्हटले आहे ते मुळात खरे नाही कारण ईश्वरांचा वा अनेक देव-देवतांचा आपापल्या परीने अनुभव आल्याशिवाय लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
आणि तरी त्यांच्या विश्वासाला अंधश्रद्धा म्हणून संबोधण्यात येते आणि वर उल्लेख केलेल्या पुराव्याशिवाय जीवनातील हरघडी असंख्य गोष्टींवर विश्वास ठेवण्याच्या प्रकाराला मात्र अंधश्रद्धा समजण्यात येत नाही हा कुठला न्याय?

याशिवाय आणखी काही महत्वाच्या बाबी –
v ‘अंधश्रद्धा निर्मूलनवादी’ न्याय
v आमचे भांडण बुद्धिवाद्यांशी नाही तर बुद्धिवादाशी आहे.
v जीवनात बुद्धिनिष्ठ जीवन जगावे असे म्हटले जाते, त्याचा नेमका अर्थ काय?
v काहीजण अतींद्रिय विज्ञानाचे पुरावे नाकारणे आडमुठेपणाचे आहे हे ओळखून ते स्वीकारतात
v ईश्वराचा रोग होऊ नये म्हणून ज्यांनी बुद्धिवादाची लस टोचून घेतली आहे, त्यांना तो रोग होणारच नाही.
v तार्किक दृष्ट्या ईश्वर सिद्ध होत नाही.
संपुर्ण प्रकरण इथे वाचा.

टीप - प्रा. गळतगे कर्नाटक राज्यात निपाणी पासून २३ किमी दूर त्यांच्या शेतात - भोज नामक खेड्य़ात राहातात. त्यांचा संगणकाशी थेट संपर्क नाही. त्यांना संगणकावरील लेखन इतरांकडून समजून घ्यावे लागते. तसे असले तरी प्रा. गळतगे यांनी इथे मांडलेल्या विचारांवर लेखन करून प्रकाश टाकला तर तो मी जरूर सादर करेन. त्यांचे वय (८१) व तब्बेत यामुळे ते केंव्हा घडेल त्याबद्दल मी सध्या काही आश्वासन देऊ शकत नाही मात्र त्यांच्यापर्यंत विचार पोहोचण्यासाठी जरूर प्रयत्न करीन. याची खात्री बाळगा.

[1] . सुखाकडे (मग ते कितीही अल्प असेना का) डोळेझाक करणे हाच आंधळेपणा आहे, मिळेल त्या सुखाचा उपभोग घेणे हाच डोळसपणा आहे, असे बुद्धिवादी म्हणतील. पण (भौतिक) सुख आणि बुद्धिवाद यात विरोध आहे ते कसे ते पुढे दाखवून दिले आहे.
[2] पति पत्नी मधील प्रेम जितके आंधळे(दोषांकडे जितका कानाडोळा) तितका प्रपंच सुखाचा, जितकी संशयी वृत्ती(दोषांची चिकित्सा) अधिक तितका तो दुःखाचा. अशा रितीने बुद्धिवादाचे (संशयवादाचे) आणि प्रापंचिक सुखाचे प्रमाण व्यस्त आहे.

गुलमोहर: 

प्रश्न भानामती कोण करते याचा आहे.
---- मुख्य प्रश्न भानामती असा काही प्रकारच अस्तित्वात नाही आहे. सर्व मनाचे खेळ आहेत किंवा काल्पनीक रम्य कल्पना आहेत.

भानामती असा प्रकार अस्तित्वातच नाही आहे तर तो प्रकार कोण करतो याला महत्वच रहात नाही. तुम्ही मान्य करा अथवा करु नका.... त्याने सत्य बदलत नाही. ४ - २ कमी शिकलेल्या लोकांना "बघा डोळ्यातुन खडे निघत आहेत" असे सांगुन दोन दिवस बनवता येते.... पण सुदैवाने संपुर्ण समाजाने डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही आहे.

उदयजी,
आज आपला व्यक्तिपरिचय वाचनात आला. गामापैलवानांबरोवरचा आपला संवाद वाचला. आपण विज्ञानाच्या महत्वाच्या शाखेचे तज्ज्ञ आणि शोधकर्ते आहात असे लक्षात आले. त्यामुळे विज्ञानाची विटंबना होऊ नये म्हणून वाटणारी आपली कळकळ समजली.
प्रा. गळतगेही प्रखर सत्यशोधक विज्ञानवादी आहेत. त्यांना ही असेच वाटते. या विचारातून त्यांची लेखणी उचलली जाते. असो.

त्यांनी प्रात्यक्षिके करुन दाखवली नाहीत ह्याला कारण काय असावे याचा शोध तुम्ही वा ज्ञानतपस्वींनी कधी केला आहे कां? तुम्ही लोकांनी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला आहे का?

....ज्यांनी अशा घटनांचा शोध घ्यायला पुढाकार घेतला होता. नव्हे त्यांच्यावर ती जबाबदारी कर्नाटक सरकारने टाकली होती त्यांनी ती टाळली असे म्हटले तर त्यात वावगे काय. यात गळतगे वा ओकांनी समितीने ती प्रात्यक्षिके का करून दाखवली नाहीत याचा शोध घ्यायची घंटा गळ्यात अडकवून घ्यायची गरज काय...

---- काही तरी चुकते आहे... तुम्ही त्यांच्यात विश्वास निर्माण केला तर कार्यकर्ते सटकणार नाहीत आणि धैर्याने ते तुमच्या समोर प्रयोग करतील आणि भानामती अस्तित्वातच नाही हे सिद्ध करुन दाखवतील.

त्यांच्याशी म्हणजे त्यांच्यासारख्या विचारांच्या अन्य लोकांशी असे अपेक्षित असेल तर तसा संवाद साधायला अंनिसच्याविचाराचे लोक तर कधी पत्रकार (जे फक्त अंनिसची बाजू पेपरमधे मांडण्यात धन्यता मानत )गळतगे यांना भेटून खाजगीत (अंनिसवाले काही म्हणोत) काय हो, ताटात अचानक विष्ठा कशी पडली, कडीकुलुपात घडी करून ठेवलेल्या कपड्यातील फक्त मधलेच कपडे वा साड्या कशा जळल्या जातात आदि हे कसे घडत असेल? असे विचारत.
अंनिसने ओकांच्या आणि गळतगेंच्या समोर प्रात्यक्षिके करावीत असा आग्रह नाही त्यांनी त्या त्या गावकऱ्यांसमोर व संबंधितांसमोर ती करावीत अशी माफक अपेक्षा करणे चुक आहे काय?
आता कोणी असे प्रात्यक्षिक आम्हासाठी वेगळे, खास करून दाखवू इच्छित असेल तर आम्हाला ते पहायला काही प्रत्यावाद नसावा. पण ते तसे करत नाहीत. असा अगदी डॉ. नारळीकरांसारख्यांपासून ते अनेकांना विनंती पत्रे व प्रत्यक्ष भेट घेऊन ही ते अनुभव घ्यायला यायला तयार होत नाहीत असे अन्य क्षेत्रात अनुभवास आले आहे.

अंनिसने त्यांच्या पुस्तकात भानामतीचे बिंग फोडल्याचे दावे केले असले तरी प्रत्यक्षात किरकोळ कार्यकर्ते नव्हे पदाधिकारी अंनिसवाले अशा भानामतीच्या केसेसमधे त्या पीडित व्यक्तिंना, 'आम्हाला काही सांगता येत नाही. यापुढे काही मदत करता येत नाही' असे म्हणून अंग काढून घेतात असा असा अनुभव गळतगेंनी उधृत केला आहे. आता यात काही तरी कोणाचे चुकते आहे त्याचा विचार व्हावा.
आधीच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे श्री. गुली नामक व्यक्तिने कर्नाटक सरकारच्या अहवालाच्या संदर्भात 'काहीएक' रसायन वापरून गाईंच्या आचळातून दुधाऐवजी रक्त येणारे एखादे रसायन वापरले असावे, असा तर्काचा निष्कर्ष काढला पण त्या रसायनाचे साधे नाव त्यांना, पर्यायाने समितीला सांगता काय येऊ नये? याचा विचार व्हावा.
काही तरी सनसनाटी पसरवून गळतगे अंनिसच्या कार्यात आडकाठी करत आहेत असा सरळ सोट निष्र्कर्ष काढायची घाई करू नये. पुर्वग्रह सोडून त्यांचे लेखन आपण वाचावे. ही विनंती....

छान

Pages