भारतातून ब्रिटनला खाण्याचे कोणते पदार्थ नेता येतात

Submitted by सुचरिता on 1 April, 2012 - 11:54

कोणते खाण्याचे कोरडे पदार्थ नेता येतात?
क्रुपया माहिती द्यावी हि विनंती. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फराळाचे / उपहाराचे जसे चिवडा, लाडु, चकली, शंकरपाळे असे तयार खाद्य पदार्थ आणु शकता.
जर रॉ मटेरिअल आणायचे असतील तर डाळी-तांदुळ-कणिक-भाजणीचे आणि तत्सम पिठं, पापड, कडधान्य ही आणु शकता. तस हे सगळ इथे पण मिळतं!!

तुम्ही शिफ्ट होत आहात का? कुठल्या भागात आणि किती दिवसांसाठी येत आहात? सुरुवातीला जरुरी पुरतं तुम्ही हे भारतातुन आणु शकता पण आजकाल हे सगळे पदार्थ इथे मिळतात अगदी मोहरी, जिरे, हळद, तिखट ह्या पासुन ते सगळ्या डाळी, तांदुळ, कणिक, बरिचशी पिठं वगैरे..

एखादं ईंडीयन ग्रोसरी स्टोअर्स तर बहुतेक ठिकाणी असतचं.. काही काही भागात तर बरेच आहेत Happy

तुम्ही जर पर्यटक म्हणुन येत असाल तर आपले नेहमीचे तहानलाडु- भुकलाडु सोबत ठेवु शकता.
अजुन काही मदत पाहिजे असेल तर नक्की विचारा. Happy

लगेच खराब होणारे, नासणारे, शिवाय ज्यावर जंतू पोसले जाऊ शकतील असे कोणतेही पदार्थ आणता येत नाहीत. बीबियाणे (फळातील बिया देखील!) नेता येत नाहीत.
मसाले, पिठे वगैरे नेता येतात. त्यातल्या त्यात पांढरी पिठे नेऊ नका असा सल्ला. Happy

मध्यंतरी बरीच तपासणी होत असे, पण आता तितकी होत नाही. मुख्य म्हणजे हे खाद्य सामान चेकइन करा. हातात्ल्या बॅगेत नेले तर जप्त होऊ शकते.