लॅपटॉपशी संबंधीत समस्या

Submitted by गजानन on 18 September, 2011 - 08:41

माझा लॅपटॉप मधल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत फारसा वापरात नव्हता. अधूनमधून वापरायचो तेव्हा नीट चालायचा.

पण हल्ली प्रत्येकवेळी सुरू होताना अखंड बीप-बीप असा आवाज करतो, पडद्यावर काहीच दिसत नाही. Esc key दाबल्यावर नेहमीसारखा चालू होतो. पासवर्ड टाकायच्या बॉक्समध्ये आधीच बर्‍याच फुल्या दिसतात. यावरून कोणती तरी कळ (key) दबलेली राहतेय असे वाटतेय. चालू झाल्यावर ० ते ९ या अंकापैकी २ आणि ८ या कळा चालत नाहीयत.

आताच असं आढळलं की k आणि i ही बटनं दाबल्यावर त्याबरोबर (लॉजिकली) शून्य हे बटन आपोआप दाबलं जातंय आणि जो पर्यंत Esc key दाबत नाही तोपर्यंत शून्य उमटत राहतोय. काय झाले असावे? दुरुस्तीला घेऊन जावे का? HP चा आहे. कृपया उपाय सुचवा. धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉरंटीत असेल तर एच पी सपोर्ट कडुन नीट करुन घ्या.

नसेल तर असे होण्याचे कारण कदाचित खालीलपैकी असु शकेल,
१ - व्हायरस
२ - की-बोर्ड बाद झाला आहे, शक्यतो बर्‍याच लॅपटॉपचा की-बोर्ड घरीच बदलता येतो. यु-ट्युबला सर्च करा. हा एक सँपल वीडीओ. मॉडेलनुसार सर्च द्या.
http://www.youtube.com/watch?v=RblDBWRFB7o

गजाभाऊ.. आरोहीनी वाट लावलीन काय लॅपटॉपची??? HP Support शक्य असेल तर पहिल्यांदा त्यांनाच पकडा... सुरु होताना आवाज येतो आहे म्हणजे कदाचित रॅम चा ही प्रॉब्लेम असू शकतो.. तसेच cmos ची बॅटरी पण बघावी लागेल..

HP/Compaq laptops are known to be mulfunctioning after some 1 and 1/2 or 2 years. Laptop keyboard will not be reparid. You have to buy new one. If in warranty ask HP to replace it.

अनेक धन्यवाद गौतम, हिम्स, अभिजित.

गौतम, दुवा खरंच उपयुक्त आहे.
लॅपटॉपला अडीच वर्षे होऊन गेलीत त्यामुळे वॉरंटी नाही. Sad

मला मिलिंदाने (भ्रमर) हवेतील दमटपणामुळे एखादी कळ अडकत असेल असे सांगितले होते. (त्याला हीच समस्या आली तेव्हा त्याचे कारण दमटपणा हे होते.) म्हणून मी लॅपटॉप बराच वेळ चालू ठेवून पाहिले म्हणजे त्याच्या स्वतःच्या तपमानाने दमटपणा नाहीसा होईल. शिवाय साधा विजेचा दिवा पेटवून कळफलकावर टांगून पाहिले. पण काही उपयोग झाला नाही.

१. व्हायरस आहे की नाही कसे कळावे? माझे नॉर्टनचे सबस्क्रिप्शन होते पण ते वर्षभरापूर्वी मुदतबाह्य झाले आहे. मी त्यानंतर रीन्यू केलेले नाही.

२. कळफलक बाद झाला आहे की रॅमचा प्रॉब्लेम आहे, हे निश्चित कसे करायचे?
दुसर्‍या नीट चालणार्‍या लॅपटॉपचा कळफलक आणून बसवून पहावे का? (मला ट्रायलसाठी आपला लॅपटॉप उघडून त्यातला कळफलक देऊ इच्छिणारा उदार मनाचा कोणीतरी मला आधी शोधावा लागेल :फिदी:)

३. HP Support चा अनुभव तुम्हापैकी कोणाला आहे का?

हिम्स, रॅमचा प्रॉब्लेम असता तर Esc key दाबल्यानंतर बीप बंद होऊन लॅपटॉप चालू होतोय, तो तसा होतो का? आरोहीने मागे डाव्या तळाची कंट्रोल की उचकटून काढली होती. पण मी ती खटपट करून बसवली होती. त्यानंतर तो चांगला चालत होता.

पुन्हा एकदा धन्यवाद.

गजानन,
व्हायरस चा प्रॉब्लेम वाटत नाही, हार्डवेअर चा वाटतोय, ते पण कीबोर्ड. जास्त धूळ साचल्यावर पण कीबोर्ड् च्या कीज जॅम होतात. पहिली गोष्ट म्हणजे व्यवस्थित कीबोर्ड बाहेरुन आणी आतून उघडून स्वच्छ करा.

कीबोर्ड चेंज करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉपचाच कीबोर्ड ची गरज नाही, USB Port through Keyboard connect करु शकता. एक लक्षात घ्या की जेव्हा हा कीबोर्ड कनेक्ट कराल, तेव्हा लॅपी सुस्थितीत पाहिजे, म्हणजे तुमच्या लॅपटॉपवरील कोणतीही की दबलेली नसावी. मग एक्स्टर्नल कीबोर्ड च्या सगळ्या कीज प्रेस करुन पाहा नीट चालतात की नाही.

खारीक, धन्यवाद!
एकदा हाही विचार मनात आला होता, पण असे करता येते का हे नक्की माहीत नव्हते.

तुमचे पोस्ट वाचून डेस्कटॉपचा USB कीबोर्ड लॅपटॉपला जोडून पाहिला.

- लॅपटॉप सुरू होताना बीप आवाज येतोय तो हा USB कीबोर्डसोबतही आला. आणि लॅपटॉपच्या कळफलकावरची Esc key दाबल्यावरच बीप बंद होऊन लॅपटॉप चालू झाला. (USB कीबोर्डाच्या Esc key ने हे झाले नाही.)
<<म्हणजे तुमच्या लॅपटॉपवरील कोणतीही की दबलेली नसावी.>> तशी वरकरणी कोणतीही कळ दबलेली दिसत नाही.

- लॅपटॉप चालू झाल्यानंतर या USB कळफलकाची प्रत्येक कळ नोटपॅड मध्ये तपासून पाहिली, तर सगळी अक्षरं, चिन्हं व्यवस्थित लिहिली जातायत.

याचा अर्थ लॅपटॉपचा कळफलक स्वच्छ केल्यावर/बदलल्यावर सुरुवातीचा प्रॉब्लेमही सुटेल ना?

- लॅपटॉप सुरू होताना बीप आवाज येतोय तो हा USB कीबोर्डसोबतही आला. आणि लॅपटॉपच्या कळफलकावरची Esc key दाबल्यावरच बीप बंद होऊन लॅपटॉप चालू झाला. (USB कीबोर्डाच्या Esc key ने हे झाले नाही.)
<<म्हणजे तुमच्या लॅपटॉपवरील कोणतीही की दबलेली नसावी.>> तशी वरकरणी कोणतीही कळ दबलेली दिसत नाही.
>>>>
हा आवाज येणं अपेक्षित आहे, कारण USB keyboard Operating System Start झाल्यावरच डिटेक्ट होतो, तो पर्यंत तुमचा लॅपीचाच कीबोर्ड युज होतो.

- लॅपटॉप चालू झाल्यानंतर या USB कळफलकाची प्रत्येक कळ नोटपॅड मध्ये तपासून पाहिली, तर सगळी अक्षरे, चिन्ह व्यवस्थित लिहिली जातायत.

याचा अर्थ लॅपटॉपचा कळफलक स्वच्छ केल्यावर/बदलल्यावर सुरुवातीचा प्रॉब्लेमही सुटेल ना?
>>>>
माझ्या मते तरी हो! एकदा व्यवस्थित आतून बाहेरून स्वच्छ करा, किंवा अजून काही बिघडलं असेल तर रिप्लेस करा, पण ज्याअर्थी एक्स्टर्नल कीबोर्ड ला काही प्रॉब्लेम नाही, त्याअर्थी लॅपी कीबोर्ड चाच प्रॉब्लेम दिसतोय.
Happy

१ - कोणतेही ट्रायलवेअर अँटीव्हायरस टाकुन पहा किंवा "google pack" मधेही १-२ अँ.व्हा. मिळु शकतील.
http://pack.google.com/intl/en/pack_installer.html

२ - खारीकने सांगीतल्याप्रमाणे कीबोर्ड साफ करुन (लॅपटॉपच्या सर्व कीज निघतात) किंवा एक्सटर्नल कीबोर्ड जोडुन पहा. सहज गुगलल्यावर हे मिळाले,
http://www.passmark.com/products/keytest.htm

३ - आहे, पण वॉरंटीत असताना वापरलेला. लॅपटॉपचा ब्लु-रे रॉम बाद झाला होता तो त्यांनी बदलुन दिला

धन्यवाद खारीक, गौतम, मिलिंदा.

लॅपटॉपचा कळफलक स्वच्छ करायची वेळ येऊ नये असं वाटत होतं कारण मागे एक बटन मुलीनं काढलं होतं ते बसवताना नाकी नऊ आले होते. पण आता बदलावाच लागणार आहे तर आधी एकदा याच्यावरच हात साफ करून घेतो. मरे हुए को क्या डरना. Proud

गजा..... कीबोर्डची बटण काढून बघायच्या आधी जर असेल तर वॅक्यूम क्लीनर किंवा ब्लोअर ह्यांचा वापर करून बघ... अडकलेली घाण साफ व्हायला मदत होईल.. ह्याने जर नाहीच झाले तर मगच जेव्हढी बटणे त्रास देताहेत तेव्हढीच काढ... प्रेस फीट असतात त्यामुळे काढायला लावायला खरं तर फार त्रास होऊ नये.

दरम्यान मी लॅपटॉपाचा कळफलक एकदा काढून साफ करून बसवला होता, पण काही उपयोग झाला नव्हता. बसवल्यावर उजव्या बाजूच्या कडांच्या बारीक खोबणीत तो बहुदा नीट बसला नव्हता, कारण उजवीकडून किंचित उचलल्यासारखा वाटत होता. त्यानंतर बाहेरून जोडलेल्या यू. एस्. बी. कळफलकावर काम भागत होते म्हणून लॅपटॉपाकरता नवा आणायचे राहून जात होते. पण आज आता नवाच ऑर्डर करावा पण त्यापूर्वी तो आणल्यावर आपल्याला घरीच नीट बसवण्याचा सराव म्हणून हाच दोन-तीनदा काढून बसवला आणि आश्चर्य म्हणजे तो आता नीट काम करू लागलाय. सुरू होताना बीप-बीप आवाज नाही की कळ अडकणे नाही. सगळ्या कळा तपासून पाहिल्या - सध्या तरी टकाटक चालतोय.

तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.

लोकहो... माझ्या भावाचा डेलचा लॅपटॉप आहे. त्याच्या किबोर्डला प्रॉब्लेम आहे.. किबोर्ड लावून चालू केला की बीप आवाज येतच रहातो.. पण जर किबोर्ड काढून चालू केला तर व्यवस्थित चालू होतो..

डेल सर्व्हिस सेंटर मध्ये दिल्यावर त्यांनी मदरबोर्ड बदलावा लागेल असे सांगितले होते.. म्हणून त्यांच्या कडून परत घेउन आलो आणि चालू केला तर चालू झाला.. म्हणून काय केले ते बघायला उघडला तर किबोर्डचे कनेक्शन काढून ठेवलेले होते.. ह्याचा अर्थ प्रॉब्लेम मदर बोर्ड मध्ये नसून किबोर्ड मध्येच आहे हे नक्की झालेले आहे. तर आता किबोर्ड बाहेर विकत मिळतो का? मिळत असल्यास किम्मत काय आणि ओरिगिनल डेलचा मिळतो का?

परत डेल सर्व्हिसवाल्यांकडे जायची इच्छा अजिबात नाही...

कोणतेही केबल कनेक्शन (डिश, टाटास्काय, इ.) लॅपटॉपला जोडून त्यावर सर्व चॅनेल्स टि.व्ही.प्रमाणे पहाता यावेत हा उद्देश आहे.

HP Pavillion DV5 laptop मधे TV Tuner Card installed आहे की नाही हे कसे चेक करता येईल ? Device Manager मधे पाहिले पण दिसत नाहीये. जर नसेल तर External TV Tuner घ्यायचा आहे, कोणते मॉडेल चांगले आहे ? RF Modulator चा काय उपयोग असतो ? जर TV Tuner असेल तर RF Modulator पण आवश्यक आहे का ?

लोकहो!!!!!!!!!एक मदत हवी आहे.

माझ्या लॅपटॉपमधे ब्लुटुथ आहे का नाही हे कस शोधायच????

धन्यवाद

हाहाहा!!!!!!!!!!!!ते केल पण एकाच मॉडेलमधे २ ऑप्शन्स आहेत.एक ब्लुटुथसकट आणि एक ब्लुटुथशिवाय.त्यामुळे विचारल.

मग MY COMPUTER वर RIGHT CLICK करुन PROPERTIES सेलेक्ट करा मग DEVICE MANAGER मधे बघा...... निळादात दिसतोय् का............. Happy

वाह मोबाईलला कसा सापडेल लॅपटॉप जर का ब्लुटुथ ऑनच नसेल तर???

MY COMPUTER वर RIGHT CLICK करुन बघितल तिथे काही ब्लुटुथ दिसत नाहीये.काय लिहीलेल असत???

स्क्रीनशॉट टाकायला कुठल सॉफ्टवेअर लागेल्???माझ्ह्याकडे अ‍ॅडॉब आणि पिकासा आहे.त्यातुन स्क्रीनशॉट घेता येइल का??

की बोर्डवर प्रिंट स्क्रीन नावाचे बटन आहे.. जो हवा तो स्क्रीन घेऊन ते बटन दाबा मग पेंट उघडून त्यात पेस्ट करा... नंतर पिकासा वगैरे वापरा.... मायबोलीवर चित्र द्यायला बिटमॅप चित्र चालत नाही. जे पी इ जी लागते, तेही पेंटातुन करु शकाल.

200 रूपयात बाजारात निळ्यादातांचा युएसबी डिवाईस मिळतो.... लावा तो.... Happy

म्हणजे लॅपटॉपवर निळादात नाहिये?????पण निळ्यादाताच एक चिन्ह असत ना ,म्हणजे एक टॉवर आणि त्यातुन वेव्ज निघत आहेत ते चिन्ह आहे लॅपटोपवर.ते चिन्ह निळ्यादाताचच अस्त ना???

Pages