दीड वर्षाच्या मुलाच्या activities

Submitted by तनू on 29 February, 2012 - 01:32

माझा मुलगा आता दीड वर्षाचा आहे. त्याला पुढचे ४ दात वर- खालि आनि दाढा येन्याची सुरवात झालि आहे. पण तो अजुन ही काही चावुन खात नाहि. चपाती, भात सर्व त्याला बारीक करुन भरवावे लागते. मध्ये एखादा घास जरि असाच भरवला कि लगेच उलटी करतो. मागे वरदा ने सान्गितल्या प्रमाणी कि त्याला बिस्किट चे तुकडे करुन दिले, तर त्याने ते उचलुन मलाच भरवले. त्याला काहीही दिल कि तो समोरच्या व्यक्तिलाच भरवतो, त्याने चावुन खान्यासाठी काय करु?

आणी अजुन एक, तो पकडुन उभा राहतो, आणि आपण बोलवल कि ५-६ पावल चालत पन येतो. पण अजुन आधाराशिवाय उभा राहत नाहि. तर त्यासाठी काय करत येइल?

मि doc ला पण विचारल या दोन्ही साठी, तर ते हेच सांगतात, कि त्याला वाटेल तेव्ह तो करेल, त्याला वाटेल तेव्ह तो खाइल, त्यात आपण काहि करु शकत नाही. Sad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी अजुन एक, तो पकडुन उभा राहतो, आणि आपण बोलवल कि ५-६ पावल चालत पन येतो. पण अजुन आधाराशिवाय उभा राहत नाहि. तर त्यासाठी काय करत येइल?>>>>

therapy ball exercises चा body balance करण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे आधाराशिवाय चालणे सोपे होईल. माझ्या मुलासाठी मी therapy ball वापरलाय. चांगले परिणाम मिळलेत. तुम्हाला TBall exercises बद्दल अधिक माहिती हवी असेल तर मी देऊ शकेन किंवा उट्युब वर चलितचित्रेही आहेत.

माझ्या मैत्रिणीची मुलगी आता २० महिन्यांची आहे. ती अजून जेमतेम ५-६ शब्दच नियमितपणे म्हणते. या वयाच्या मुलाने जास्त शब्द बोलणे अपेक्षित आहे ना? मी मैत्रिणीजवळ शंका व्यक्त केली तर ती म्हणाली की तिची मोठी मुलगीही दोन वर्षापर्यंत काही बोलत नव्हती तशीच ही ही तेव्हाच बोलायला लागेल. माझा दुसरा एक मित्र speech language pathologist आहे तो म्हणाला की तिला चेक करून घ्यायला सांग. पण मी द्विधा मनस्थितीत आहे. मैत्रिणीला सांगू का अजून काही महिने वाट पाहू?

चीकू, प्रत्येक बाळ वेगळे असते. माझी मोठी मुलगीपण २२-२३ महिन्याची असतांना काही ठराविक शब्दच बोलायची आणि २ वर्षांची झाल्या-झाल्या वाक्य बोलायला लागली.(नुकतीच झालेली भारतवारी पण याला कारण असू शकते.) आता माझी लहान मुलगी २२ महिन्याची आहे आणि ती छोटे-छोटे वाक्य, छोट्या-छोट्या कवितासुद्धा म्हणते. त्यामुळे माझ्यामते तरी काळजीचे कारण नाही, पण इथले जाणकार सांगतीलच.

प्राजक्ता डिट्टॊ....
चिकु, तुम्ही त्यांना एकदा भारतवारी करायला सांगा...आणि घरात/पाळणाघरात दोन वेगळ्या भाषा बोलल्या गेल्या असतील तर मूल थोडं उशीरा बोलायला लागतं पण एकदा बोलायला लागलं की दोन्ही भाषा/अ‍ॅक्सेंटचा कीस पाडतं.....सो वरी नॉट...

काल माझ्या बाळाचे कानातले परत हरवले , लळत नाही मला कोणत्य प्रकारचे घालु आता नाहे तर ते होल मुजायचे भिती!! Sad

सर्वात आधी तारा होत्या त्या शर्ट, बनीयान मधे अडकायच्या.... खुप रडायची ती अन मी पण , ठोठो करायची अगदी !
त्या नंतर छोट्या रिण्गा टाईप होते ते एक हरवले
आता लटकन सारखे घेतले तर तेही एक हरवले Sad

रिंगा, तारा अडकायची भिती असतेच. छोटे खडे घालता येतात का बघ. माझ्या लेकीच्या कानात छोटीशी फुलं आहेत. त्याआधी एक एक खडा होता गनशॉट पियर्सिंग करताना घालतात तसा. नाही अडकत कशात.छोट्या मुलींना दिसतंही छान.

रिंगा, तारा अडकायची भिती असतेच. छोटे खडे घालता येतात का बघ. माझ्या लेकीच्या कानात छोटीशी फुलं आहेत. त्याआधी एक एक खडा होता गनशॉट पियर्सिंग करताना घालतात तसा. नाही अडकत कशात.छोट्या मुलींना दिसतंही छान.

>>व्हेरी गुड. स्मित लवकरच पळायला लागेल बघ. स्मित
आता तुम्ही धागा काढाल, मुलगा फार बोलतो आणि पळतो, काय करु? Proud
गंमत करतोय.

प्रगती आहे छानच, काळजी करु नका Happy

गनशॉट पियर्सिंगमुळे माझ्या मुलाचं कान टोचणंच राहिलं...ते बघून मलाच भिती वाटली त्याला कानात काही घालायची.....

Pages