सावरकरांची क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव

Submitted by अक्षय जोग on 21 September, 2011 - 04:52

सावरकरांची क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव

सावरकर इंग्रजांची क्षमा मागून अंदमानातून सुटले! नुसती क्षमा मागून नाही तर "मी राजकारणात भाग घेणार नाही व माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे" अशी सपशेल शरणागती पत्करून सुटले व ह्याचे पुरावे नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' उपलब्ध आहेत. अशाप्रकारे सावरकरांवर सदैव आरोप केला जातो. (पहा: Far from heroism - The tale of 'Veer Savarkar by Krishnan Dubey and Venkitesh Ramakrishnan, 7 Apr 1996, Frontline)

ज्याव्यक्तीने सावरकर चरित्र अभ्यासले आहे किंवा निदान 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र वाचले आहे त्यांना ह्या आरोपातील फोलपणा त्वरीत लक्षात येईल. प्रथम सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या तुरूंगात खितपत पडणे ही काही सावरकरांची देशभक्तीची कल्पना नव्हती, ते त्यांचे ध्येयही नव्हते. “काराग्रुहात राहून जी करता येत आहे त्याहून काही तरी अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मात्रुभूमीची करता येईल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे तर समाजहिताचे द्रुष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे.” (माझी जन्मठेप: भाग २, लेखक: वि.दा. सावरकर, पृष्ठ क्रमांक: १६१, ह्यापुढे ‘कित्ता-२’ असा संक्षिप्त उल्लेख केला जाईल.) व तसेच “अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल; परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्र्घातकी मात्र होणारी होती.” (कित्ता-२, पृष्ठ: १०९) अशी त्यांची मनोभूमिका होती. म्हणजे सुटकेसाठी वाट्टेल त्या देशविघातक-देशद्रोही अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत.

तसेच हे केवळ सावरकरांचे मत नव्हते तर त्यांचा आंग्ल-मित्र डेव्हिड गार्नेटचेही हेच मत होते. “सावरकरांसारखी उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागारात जीवन कंठीत असलेली मी सहनच करू शकत नाही." (In the first volume of his autobiography, The Golden Echo, Harcourt, Brace and Company, New York, 1954)

सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. अफजलखानवधा आधी, सिद्दी जोहारच्या वेढ्याच्यावेळी त्यांनी अशीच शत्रूला बेसावध करणारी पत्रे पाठवली होती, तसेच पुरंदरच्या तहावेळी महाराजांनीही अशीच वेळप्रसंगी औरंगजेबापुढे शरणागती पत्करली, त्याच्या मानहानीकारक अटी मान्य केल्या व पुढे सामर्थ्य प्राप्त होताच मोगली सत्तेविरूद्ध संघर्ष चालू ठेवला. हा कूटनीतिचा एक भाग असतो.

पहिले महायुद्ध १९१४ ला सुरू झाल्यावर सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडले, ते पत्र मुळातूनच वाचावे, मी त्याचा मुख्य आशय उधृत करतो:“हिंदुस्थानाला औपनिवेशक स्वायत्तता (Colonial-Self Government) द्यावी, वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधीचे निरपवाद बहुमत व त्याबदल्यात क्रांतिकारक इंग्लंडला महायुद्धात सहाय्य देतील अशा मागण्या केल्या होत्या व ‘युरोपात बहुतेक राष्ट्रे आपआपले अंतर्गत राजबंदी सोडून देत होती, आयरिश 'राजद्रोही' बंदीही सुटले होते’ अशी उदाहरणेही दिली होती. तसेच मला सोडता येत नसेल तर सरकारने मला न सोडता अंदमानतल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अटकून पडलेल्या राजबंदीवानांस तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल." अशी निस्वार्थी मागणीही केली होती. म्हणजे सावरकरांची आवेदनपत्रे-मागण्या क्रांतिकारकांच्यावतीने होत्या केवळ स्वतः करिता नव्हत्या. (कित्ता-२, पृष्ठ:४५-४६)
सावरकरांना ह्याची जाणीव होती की काही झाल तरी ब्रिटीश आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत व राजकारणात भाग घेऊ देणार नाहीत, म्हणून मग ‘कारागारीय अन्वेक्षेक मंडळा’पुढे त्यांनी अशी भूमिका मांडली-- "राजकारण करू देत नसाल तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन, हित करण्यास झटेन. बरे मी ते वचन मोडले तर आपणास मला पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल.(कित्ता-२, पृष्ठ:१११). तसेच राज्यपालांशी झालेल्या सुटकेसंदर्भातील चर्चेतही त्यांनी ह्याचे सुतोवाच केले होते, त्याचा सारांश असा: "काही अवधीपर्यंत राजकारणात - प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कारागारातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही. परंतु बाहेर राजकारणव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाड्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. लढाईत पकडलेले सेनापती, युद्ध चालू आहेतो प्रत्यक्ष रणात उतरू नये, 'धरीना मी शस्त्रा कदनसमयीं या निजकरी' अशी यदुकुलवीराप्रमाणेच प्रतिज्ञा करवून घेतल्यावर त्या अभिवचनावर (on Parole), सोडण्यात येतच असतात. आणि त्या यदुकुलवीराप्रमाणेच ते राजनीतिज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसंन्यास तेवढा करावा लागला तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानीत नाहीत तर उलट तसे करणे हेच तत्कालीन कर्तव्य समजतात." (कित्ता-२, पृष्ठ:१६२) ह्यानुसार सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त शुद्धी, समाजसुधारणा, विज्ञाननिष्ठता, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड समाजकारण केले.

जे जे राजबंदीवान अंदमानातून सुटले त्यातील बहुतंशी जणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून सुटका करून घेतली होती. उदा. "मी यावर पुन्हा कधीही - किंवा अमुक वर्षे - राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर मी ही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरीन! (कित्ता-२,पृष्ठ:१२०)

सावरकरांचे जे पत्र 'क्षमापत्र' म्हणून दाखवतात ते पाहण्यासाठी नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जायची आवश्यकता नाही. ते पत्र 'अंदमानच्या अंधेरीतून' ह्या पुस्तकात ‘पत्र ८ वे- दिनांक ६-७-१९२०’ शीर्षकाखाली छापलेले आहे.(इंग्रजांना पाठविलेल्या आवेदनाचा मूळ दिनांक २-४-१९२०).हा पहा त्यातील मुख्य गाभा:

हिंदुस्थानातील वरिष्ठ कार्यकारी मंत्रिमंडळाच्या सभासदासारख्या प्रतिष्ठित अधिकाऱ्यांनी मला आणि इतरांना पुढील प्रश्न पुष्कळदा टाकला होता - "तुम्ही पूर्वीच्या हिंदी राज्याच्या विरूद्ध उठावणी केली असती तर तुमची स्थिती काय असती? ते विद्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवीत!" त्याला माझ्याकडून उत्तरही मिळाले होते. हिंदुस्थानातच काय, जगाच्या कोणत्याही देशात - प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये सुद्धा - विद्रोह्यांना कधी कधी असली भयंकर शिक्षा भोगण्याचे दैवी येई. पण मग इंग्रज लोकांनी युद्धाच्या वेळी जर्मन लोक आमच्या बंद्यांना वाईट रीतीने वागवतात आणि त्यांना रोटी आणि लोणी देत नाहीत अशा कोल्हेकुईने जगाच्या कानठळया का बसवाव्या? एक काळ असा होता की ज्या वेळी काराग्रुहातील बंद्यांची जिवंतपणी कातडी सोलीत आणि त्यांना मोलॉक, ठॉर किंवा असल्याच युरोपातील युद्ध देवतांना बळी देत असत" अशी आठवण दिली. खरी गोष्ट अशी आहे की, ही जी जगाच्या संस्कृतीत मनुष्यप्राण्याने सुधारणा घडवली आहे ती सर्व राष्ट्रांतील मनुष्याचे प्रयत्नांचे संकलित फळ आहे आणि म्हणून तिच्यावर सर्व मनुष्यजातीचा वारसा आहे व तिचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. त्या रानटी युगाच्या तुलनेनेच म्हणावयाचे तर माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे; आणि मनुष्यभक्षक जाती आपल्या बंद्यांना जी शिक्षा देत किंवा चौकशीचे जे नाटक करीत त्यापेक्षा अधिक चांगली पद्धती या सरकारची आहे या प्रशस्तीपत्राने सरकारचे समाधान होत असेल तर त्याला माझी ना नाही. पण त्यावेळीच हेही विसरता कामा नये की, पूर्वीच्या काळात राजे विद्रोह्यांना जसे जिवंत सोलीत त्याचप्रमाणे विद्रोहीही त्यांची भाग्यतारा जोरात आल्यावर या राज्यकर्त्यांना जिवंत जाळीत! आणि इंग्रजी जनतेने मला किंवा इतर विद्रोह्यांना अधिक न्यायाने म्हणजे थोड्या रानटीपणाने वागवले असेल तर त्यांनाही आश्वस्त असावे की परिस्थितीची उलटापालट होऊन हिंदी क्रांतिकारकांची तशी पाळी आली तर त्यांच्याकडून त्यांनाही असेच अत्यंत दयेच्या रीतीने वागविण्यात येईल!

सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशा प्रकारची राजकीय पत्रे वाचताना 'दोन ओळींमधील' (between the lines) वाचता आले पाहिजे, जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात ते एकतर 'दोन ओळींमधील' वाचण्यास सक्षम नसतात किंवा 'दोन ओळींमधील' वाचण्याची त्यांची तयारीच नसते.

अंदमानच्या कारावासात त्यांचे मनोधैर्य तर खचले नाहीच पण त्यांनी तशा अमानुष बंदिवासातही हाती साधी कागदपेन्सिल नसतानाही कारागृहातील भिंतींवर ५ हजार ओळींचे उत्कट काव्य लिहिले आणि ते सर्व मुखोद्गत केले! संपूर्ण जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण आहे. मनोधैर्य खचल्याचे हे लक्षण म्हणता येइल का?

तसेच असाही आरोप केला जातो की, सर्वांनी अमान्य केलेला माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा निर्बंध सावरकरांनी स्वीकारला. सावरकरांनी काही सुचना केल्या होत्या व त्या मान्य झाल्या तरच तो मान्य असेल असे सांगितले होते. पुरावा म्हणून सावरकरांनी माँटेग्यू आणि गव्हर्नर जनरलला लिहिलेले आवेदनपत्र वाचा: “सरकार खरोखरीच दायित्वपूर्ण शासनाधिकार म्हणजे कमीत कमी वरिष्ठ विधिमंडळात परिणामकारक बहुमत ज्यावर अर्थातच तो एखादा राज्य-समिती (Council od State) चा दगडोबा प्रत्येक वरात शाप मिसळविण्यासाठी स्थापिलेला नाही, असे लोकपक्षीय प्रतिनिधींचे बहुमत देणार असेल आणि या अधिकारदानासहच अशेष राजबंदीवानांस, युरोप आणि अमेरिका इत्यादी ठिकाणी अडकून पडलेल्या आमच्या निर्वासितांसह सर्व राजदंडितांस मुक्त करण्याचे औदार्य दाखवीत असेल तर निदान मी तरी - आणि मजप्रमाणेच इतर कित्येक - अशी राज्यघटना प्रामाणिकपणे स्वीकारीन आणि जर आमच्या लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून आम्हास निवडणे योग्य वाटले तर त्याच विधिमंडळाच्या सभांगणात आमच्या आयुष्याच्या परमध्येयासाठी आम्ही झटू की ज्या विधिमंडळांनी आजपर्यंत आमच्याविषयी केवळ द्वेषच काय तो धारण केला आणि त्यांच्या कार्याविषयी आणि धोरणाविषयी आमच्या मनात तिरस्कार उत्पन्न करून ठेवला.”(कित्ता-२, पृष्ठ:८२) ब्रिटिशांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला हे सांगावयाला नकोच!

सावरकरांच्या ह्या अटी, ही आवेदनपत्रे, ह्यामागील राजकीय खेळी, मनोभूमिका स्वत: सावरकरांनी कधीही लपवून ठेवली नाहीत. सावरकरांचे आत्मचरित्र 'माझी जन्मठेप' मध्ये ह्या सर्वाचा सांगोपांग उहापोह केलेला आहे. त्यामुळे आम्ही नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जाऊन संशोधन करून पत्र शोधून काढली किंवा र.चं. मुजुमदार (R.C. Mujumdar) ह्यांनी शोध लावला अशा फुशारक्या कोणी मारू नयेत.

व्हिएतनामच्या कम्युनिस्ट 'हो-चि-मिन्ह'नेसुद्धा चीनच्या कोमिंग्टांग कारागृहातून अशाच प्रकारचे पत्र व सहकार्याची अट मान्य करून सुटका करून घेतली होती. मार्शल चांगला त्याने कोमिंग्टांग शासनाच्या आधाराने इंडोचायनात स्थापन झालेल्या 'डाँग-मिन्ह-होई' (जी 'हो-चि-मिन्ह'च्या 'व्हिएत-मिन्ह'ला शह देण्यासाठी स्थापिली होती) या संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली व सुटका करून घेतली. (व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ, लेखक: वि. ग.कानिटकर, मनोरमा प्रकाशन १९९८, पृष्ठ क्रमांक ५३) तसेच रशियाने जर्मनीशी केलेला अनाक्रमणाचा करार संपुष्टात आल्यावर मित्र राष्ट्रांशी हातमिळवणी केली, तेव्हा एका रात्रीत कम्युनिस्टांनी आपली निष्ठा बदलली. म्हणजे कम्युनिस्ट करतील ती राजकीय खेळी व सावरकर करतील तो द्रोह? तात्पर्य हेच की ‘झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग करणाऱ्याला उठवता येत नाही.’

लेखक: अक्षय जोग

(सर्वांना लेखातील संदर्भशोध सहज घेता यावा यासाठी 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक' प्रकाशित 'माझी जन्मठेप भाग १ व २' पुस्तकाचा आधार घेतला आहे; हे पुस्तक खालील संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहे. http://www.savarkarsmarak.com/downloadbooks.php)

गुलमोहर: 

ह्या लेखाबद्दल मनापासुन धन्यवाद

सावरकरांवर कांग्रेसी जन (आणि त्यांची चिल्लीपिल्ली) नेहेमी चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत असतात, लायकी नसतांनाही.

सरकार सुद्दा असली कागदपत्रे मुद्दामहुन प्रसिद्द होऊ देत नाही

Far from heroism - The tale of 'Veer Savarkar by Krishnan Dubey and Venkitesh Ramakrishnan, 7 Apr 1996, Frontline
हा लेख प्रकाशित झाल्यावर अभ्यासक 'ज द जोगळेकरां'नी त्या लेखाला प्रतिवाद करणारा लेख तरूण भारत मध्ये लिहिला होता, खालील दुव्यावर तो वाचू शकता
http://www.hvk.org/Publications/veer.html

चान्गली माहिती दिलीत! Happy
(नैतरी कम्युनिस्टान्च्या चावीने महाराष्ट्रदेशी बरेच विद्रोहीजन गेली काही वर्षे हे बिनबुडाचे पण निरर्गल/निर्लज्य आक्षेप घेत आहेत अन स्वतःस राष्ट्रवादी म्हणवणारे त्यान्ची तळी उचलुन धरीत आहेत हे चित्र खरेतर नुस्तेच भयावह नव्हे तर सावरकरप्रेमी सामान्यजनांस हतबल करणारे आहे, अशावेळी योग्य युक्तिवाद्/दाखल्याद्वारे मजसारख्या सामान्यजनाचे मनात रुजू घालत असलेला आक्षेपी बुद्धिभेद व त्याद्वारे निर्माण होऊ पहाणारा न्युनगण्ड या दोन्हीचे परिमार्जन वरील लेखाने होत आहे, सबब धन्यवाद)
लिन्क बद्दलही धन्यवाद

चान्गली माहिती दिलीत! Happy
(नैतरी कम्युनिस्टान्च्या चावीने महाराष्ट्रदेशी बरेच विद्रोहीजन गेली काही वर्षे हे बिनबुडाचे पण निरर्गल/निर्लज्य आक्षेप घेत आहेत अन स्वतःस राष्ट्रवादी म्हणवणारे त्यान्ची तळी उचलुन धरीत आहेत हे चित्र खरेतर नुस्तेच भयावह नव्हे तर सावरकरप्रेमी सामान्यजनांस हतबल करणारे आहे, अशावेळी योग्य युक्तिवाद्/दाखल्याद्वारे मजसारख्या सामान्यजनाचे मनात रुजू घालत असलेला आक्षेपी बुद्धिभेद व त्याद्वारे निर्माण होऊ पहाणारा न्युनगण्ड या दोन्हीचे परिमार्जन वरील लेखाने होत आहे, सबब धन्यवाद)
लिन्क बद्दलही धन्यवाद

सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशा प्रकारची राजकीय पत्रे वाचताना 'दोन ओळींमधील' (between the lines) वाचता आले पाहिजे, जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात ते एकतर 'दोन ओळींमधील' वाचण्यास सक्षम नसतात किंवा 'दोन ओळींमधील' वाचण्याची त्यांची तयारीच नसते.

प्रचंड सहमत

अतिशय चांगली माहीती...

उत्तम लेख.

सावरकरांनी तेव्हा दाखवलेली दूरदृष्टी बर्‍याच लोकांना कळालीच नाही आणि ती कळूही नये म्हणून तेव्हाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी प्रयत्न केले आहेत. सावरकरांच्या नखाचीही सर नसणारे सध्याचे काही नेते (?) जेव्हा त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप करतात आणि त्यांना धर्मद्वेशी वगैरे म्हणतात तेव्हा फार वाईट वाटत. गांधीजींच्या वर्चस्वाला आणि प्रभावाला आव्हान देणारा नेताजींसारखा हा अजून तेजस्वी नेता. पण राजकारणाने त्याला मागे खेचले.

>>सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशा प्रकारची राजकीय पत्रे वाचताना 'दोन ओळींमधील' (between the lines) वाचता आले पाहिजे, जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात ते एकतर 'दोन ओळींमधील' वाचण्यास सक्षम नसतात किंवा 'दोन ओळींमधील' वाचण्याची त्यांची तयारीच नसते.

अगदी. अगदी. प्रचंड सहमत. खरंच उत्तम लेख.
खरं सांगायचं तर अनेक निस्सिम सावरकर भक्तांनाही सावरकर नीटसे समजले नाहीत, तर मुद्दामून सावरकरनालस्ती करणार्‍या काँग्रेसवाल्यांना काय डोंबल समजणारेत.

फार पुर्वी 'लेटर्स फ्रॉम बिस्मार्क' वाचले होते. जर्मनीचे एकीकरण करताना फ्रान्सचा विरोध मोडुन काढण्यासाठी इतकी कारस्थान या माणसाने केली. त्याचा या पत्रातील लाळघोटेपणा म्हणजे महान मुत्सद्देगिरी आणि सावरकरांनी काय उगाच तुरुंगात टाइमपास करायचा.
ज्यावेळी ही बातमी वर्तमानपत्रात आली तेव्हा मी म्हणाले मग काय करायला हवे होते सावरकरांनी?
आणि ही निंदा असेल तर मग तुरुंगात पण इंग्रजांकडुन स्पेशल ट्रीटमेंट घेणार्यांना तरी देशभक्त का म्हणावे?
नेहरु देशभक्त होते (मग त्यांची काळजी घेणारे काही ब्रिटीश मित्र का असेना) याबाबत कोणी शंका घेणे जसे मुर्खपणाचे आहे. तसेच सावरकरांच्या देशभक्तीबाबत प्रश्ण काढणारे पण शतमुर्ख होत.

अक्षय - आपण छान माहिती दिलीत.

असे हजार पत्रे दिली असती तरी मला सावरकरांच्या देशाप्रती असलेल्या जाज्वल्य भक्ती बद्दल तिळमात्र शंका नाही. आदिलशहाने शहाजीराजे यांना कैद केल्यावर, त्यांना सोडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी शहाला काही पत्रे लिहीली होती. त्यात मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होत आहे, हे सर्व काही तुमचेच आहे असा सुर होता. आग्रा मधे कैदेत असतांना मला राजकारणातुन निवृत्त व्हायचे असे आलमगीर औरंगजेबाला पत्र लिहीले होते. या सर्व प्रकरणांत अत्यंत उच्च दर्जाचा मुत्सद्दीपणा दिसतो. त्यात गैर असे काहीच नाही आहे.

मुख्य म्हणजे सावरकरांनी पत्र भारतिय जनतेला उद्देशुन लिहीले नाही आहे.

या व्यक्तीवर ब्रिटिशांनी अन्याय करणे समजतो, पण स्वातंत्र भारतानेही त्यांना (वा त्यांच्या कार्याचा) न्याय दिलेला नाही.

लिंम्बुजी यांच्या मताशी सहमत.

अक्षय्,चांगला लेख. सावरकरांबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आपण महाराष्ट्रियन समाजानेही केला नाही ,ना सरकारांनी.उलट राज्यकर्त्यांनी त्यांची उपेक्षाच केली. तरूण पिढीला सावरकर कोण होते ,आणी त्यांनी स्वातंत्र्यासाठी काय काय भोगले हेही माहीत नसेल .

ब्रिटिशांची बॅरिस्टर पदवी मिळवतांना राणिशी तसेच ब्रिटनशी एकनिष्ठ राहिल असे काही लिहुन द्यावे लागते मगच अशी पदवी मिळते असे मी एकले आहे. हे खरे आहे कां?

सावरकरांना बॅरिस्टर पदवी मिळाली होती का?

<<<ब्रिटिशांची बॅरिस्टर पदवी मिळवतांना राणिशी तसेच ब्रिटनशी एकनिष्ठ राहिल असे काही लिहुन द्यावे लागते मगच अशी पदवी मिळते असे मी एकले आहे. हे खरे आहे कां?
सावरकरांना बॅरिस्टर पदवी मिळाली होती का?>>>

नाही, त्यांना हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात सहभागी झाल्यामुळे बॅरिस्टर पदवी नाकारण्यात आली होती.
जरी त्यांनी तसे लिहून दिले असते तरी त्यामुळे त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह नक्कीच उभे राहिले नसते, कारण त्यांनी ब्रिटीशांचे निर्बंध (कायदे) समजून घेण्यासाठी बॅरिस्टरला प्रवेश घेतला होता व त्याचा उपयोग त्यांना क्रांतिकारक चळवळीसाठी व पकडले गेल्यास त्यातून सुटण्यासाठी करायचा होता म्हणूनच हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यातील बहुतंशी नेते विधिज्ञ अथवा बॅरिस्टर होते.

ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याचा प्रसंगच उद्भवला नाही पण तशी वेळ आली असतीच तर सावरकरांनी बिनदिक्कतपणे तशी शपथ घेतली असती आणि वेळ येताच ती मोडली असती. दीर्घ काळ हिंदू – मुस्लीम आणि ब्रिटिशांनी दिलेल्या वचनांना जागले आणि त्यापायी त्यांनी अपरिमित हानी सोसली. आता हिंदूंनीही व्यवहारी होण्याची गरज आहे असेच सावरकरांचे मत होते.

for more info read
http://www.savarkar.org/mr/%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4...

अत्यंत माहितीपूर्ण लेख... प्रचंड आवडला.

सावरकरांबद्दल जेवढी माहिती मिळते ती सर्वांनीच पसरवली पाहिजे. भारत स्वतंत्र झाला याचं कारण नेहरू आणि गांधी एवढंच नाही.... किंवा भारतात फक्त नेहरू-गांधीं पलीकडे जणू कोणी स्वातंत्र्यसेनानीच नव्हते...हा राजकीय गैरहेतुने पसरवलेला समज दूर होण्यास मदत होईल....

ब्रिटिशांना एकामागोमाग एक असे ६ माफीनामे देवुन शेवटी सुटका करुन घेणारे सावरकर...माफीच काय एक रुपयाचाही दंड देणार नाही असे म्हणणारे गांधीजी...

स्वता: एकदाही शस्त्र हाती न घेता भोळ्या-भाबड्या तरुणांना खुनी बनवत फासावर जायला लावणारा माणुस सावरकर....स्वत: लाठ्या खात शेकडो आंदोलने करणारा महापुरुष गांधीजी.

द्विराश्ट्र्वादाचे खुळ ब्रिटिशांचा हस्तक बनत काढणारे सावरकर...त्या सिद्धांताचा शेवट्च्या क्षणापर्यंत विरोध करणारे गांधीजी...

दुसरे महायुद्ध...सावर्कर म्हणत इंग्रजाच्या नोकर्या सोडु नका...गांधीजी म्हणत "असहकार"

सावरकरांना महारश्ट्रातले काही त्यांचे जातबंधु सोडले तर कोणी विचारत नाही...आजही गांधीजी जागतीक आदर्श.

सावरकरांचे संबंधी शिष्य नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली...

या नथुरामाचे जेही वंशज आजही आहेत आणि त्याची भलवण करतात त्यांचा निषेध कोणत्या शब्दात करावा? हा देश गांधीजींमुळे आहे...नथुराम वा सावरकरामुळे नाही.

संदर्भ.. संजय सोनावणी.. http://pandit-hindudharmraksh.blogspot.com/2011/09/blog-post_8454.html

>>ब्रिटिशांना एकामागोमाग एक असे ६ माफीनामे देवुन शेवटी सुटका करुन घेणारे सावरकर...माफीच काय एक रुपयाचाही दंड देणार नाही असे म्हणणारे गांधीजी...

माफीनामा शिवाजी महाराजांनीही लिहीला होता, कृष्णाला तर रणछोडदास म्हणतात. बाकी लेखात लिहीलेलेच आहे.

स्वता: एकदाही शस्त्र हाती न घेता भोळ्या-भाबड्या तरुणांना खुनी बनवत फासावर जायला लावणारा माणुस सावरकर....स्वत: लाठ्या खात शेकडो आंदोलने करणारा महापुरुष गांधीजी.

अंदमानात कैदेत मानवी मैला (human excreta) अंगात साखळदंड घातलेले असताना वाहून नेणारे विनायक दामोदर सावरकर >>> आगाखान पॅलेसमधे गाद्यागिर्द्यांवर लोडाला टेकून बसून सूत काढणारे मोहनदास करमचंद गांधी.

द्विराश्ट्र्वादाचे खुळ ब्रिटिशांचा हस्तक बनत काढणारे सावरकर...त्या सिद्धांताचा शेवट्च्या क्षणापर्यंत विरोध करणारे गांधीजी...

द्विराश्ट्र्वादाचे खुळ सावरकरांनी काढलेले नव्हते. मोहम्मद अली जीना हे नाव आठवतं का?
पाकिस्तानने हल्ला केल्यानंतरही त्यांचे काही कोटी त्यांना द्या असे म्हणणारे मोहनदास करमचंद गांधीच होते.

दुसरे महायुद्ध...सावर्कर म्हणत इंग्रजाच्या नोकर्या सोडु नका...गांधीजी म्हणत "असहकार"

आधी इंग्रजांची नोकरी करणारे आपले अधिकारी स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाच्या सेवेत तोच अनुभव घेऊन रुजून होणार हे ठाऊक असलेले सावरकर >>> नोकर्‍या सोडायला लाऊन असंख्य लोकांना देशोधडीला लावणारे मोहनदास करमचंद गांधी

सावरकरांना महारश्ट्रातले काही त्यांचे जातबंधु सोडले तर कोणी विचारत नाही...आजही गांधीजी जागतीक आदर्श.

मार्केटींग केलं तर काहीही खपतं. परमवीरचक्र विजेत्यांपेक्षा आज सलमान खान ला अधिक लोकं ओळखतात. Light 1

सावरकरांचे संबंधी शिष्य नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली...
हे काँग्रेसप्रणित कोर्टात सुद्धा सिद्ध झालेलं नाही की गोडसे सावरकरांचे शिष्य होते.

या नथुरामाचे जेही वंशज आजही आहेत आणि त्याची भलवण करतात त्यांचा निषेध कोणत्या शब्दात करावा? हा देश गांधीजींमुळे आहे...नथुराम वा सावरकरामुळे नाही.

लवकर बरे व्हा. एवढंच सांगतो. सैन्याने बंड केलं तेव्हा इंग्रजांची तंतरली. मो.क.गांधीला आणखी २५ वर्ष भीक घातली नसती कोणी Biggrin

It was none other than Lord Clement Atlee, the British Prime Minster responsible for conceding independence to India, who shattered the myth that Gandhi and his movement gave India freedom. Chief Justice P.B. Chakrabarty of Calcutta High Court, who had also served as the acting Governor of West Bengal in India, disclosed the following in a letter addressed to the publisher of Dr. R.C. Majumdar's book ‘A History of Bengal’. The CJ wrote: “My direct question to him was that since Gandhi's "Quit India" movement had tapered off quite some time ago and in 1947 no such new compelling situation had arisen that would necessitate a hasty British departure, why did they have to leave?

In his reply Atlee cited several reasons, the principal among them being the erosion of loyalty to the British Crown among the Indian army and navy personnel as a result of the military activities of Netaji.
Toward the end of our discussion I asked Atlee what was the extent of Gandhi's influence upon the British decision to quit India. Hearing this question, Atlee's lips became twisted in a sarcastic smile as he slowly chewed out the word, "m-i-n-i-m-a-l!” ((Subhas Chandra Bose, the Indian National Army, and the War of India's Liberation-Ranjan Borra, Journal of Historical Review, no. 3, 4 (Winter 1982)).

>>> सैन्याने बंड केलं तेव्हा इंग्रजांची तंतरली.

सहमत

अहिंसक आंदोलनाने स्वातंत्र्य मिळालं असतं किंवा मिळत असतं तर हैद्राबाद, जुनागढ, गोवा, दादरा, नगर, हवेली इ. ठिकाणे स्वतंत्र करण्यासाठी सैन्य पाठविण्याची गरज भासली नसती. सैन्य पाठविण्याच्या ऐवजी सूत कातून, मौन पाळून किंवा उपोषण करून हे प्रदेश स्वतंत्र झाले असते.

Now turn to Savarkar whom Guha portrays as a violent revolutionary and nothing more. In reality, Veer Savarkar was a strategic thinker, author, social reformer and rationalist.

It was Savarkar who, during World War II, encouraged Indians to join the army, firmly convinced that Indians must be strong in military terms. In a manner of speaking, he was the forerunner of Bose.

It was he, not Gandhi, who first lit the swadeshi bonfire of foreign clothes in Pune on 7th October 1905. (Ironically, Gandhi criticized that action from far away in Phoenix, South Africa although he himself did precisely that 16 years later.)

To pull down the steel walls of orthodoxy, Savarkar brought untouchables into the hall of the Vithoba temple in Ratnagiri district. Being a rationalist he asked Indians to test the knowledge of their ancient books on the touchstone of science. If modernists love him, as Guha concedes, it is not because of Savarkar’s violent defiance of the British rulers but because he suffered unimaginable mental and physical torture as their prisoner in the cellular jail in the Andaman Islands; it was suffering of the kind that Gandhi never had to undergo. Even after the British left, Nehru was grossly allergic to the man and falsely implicated him in the Gandhi assassination case without even prima facie evidence.

It is because Indians admire courage and bravery that Savarkar, Bose and Bhagat Singh continue to be revered. Our failure to admire them would mean disowning the legacy of Chandragupta Maurya (a Jain), Maharana Pratap, Shivaji, and Guru Gobind Singh!

Guha makes it out that leaders like Savarkar and Bose had narrow views on democracy or economics. Excerpts from Savarkar’s writings on independent India show that he was a realist and democrat, “In India, all citizens would have equal rights and obligations irrespective of caste, creed, race or religion provided they avow and owe an exclusive and devoted allegiance to the State. The key industries or manufactures and such other items would be altogether nationalized if the National Government could afford to do so and could conduct them more efficiently than private enterprise”. Veer Savarkar by Dhananjay Keer.

Atlee’s thoughts were echoed by Mr. Fenner Brockway, political secretary of the Independent Labor Party of England, “There were three reasons why India became free.
One, the Indian people were determined to gain independence.
Two, was the revolt by the Indian Navy.
Three, three Britain did not want to estrange India, which was a market and source of foodstuffs for her”.

एका अमेरिकन विचारवंताची ओळ आठवली:
For me, peace means having a bigger stick than the other guy.

तुम्ही सामर्थ्यशाली आहात हे दाखवायला दणका द्यावाच लागतो. अहिंसा फारशी उपयोगाची नाही.

Pages