शेपु-सुरती पापडी च्या दाण्यांची भाजी.

Submitted by सुलेखा on 24 March, 2012 - 03:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गुढीपाडव्यानिमित्त कालचा विशेष मेनु होता--शेपु व सुरती पापडीच्या दाण्यांची भाजी,शेवग्याच्या शेंगा-आमसुलं घालुन आंबटगोड आमटी,"प्रविण"चा कोल्हापुरी ठेचा,चितळ्यांचे केशरयुक्त श्रीखंड आणि पुरी.या मेनुत भाजी विशेष होती.सणाचा दिवस त्यामुळे कांदा-लसुण विरहीत भाजी केली होती.सुरती पापडी उंधियु मधे घालतात ती ३ दाण्याची वालपापडी याच दिवसात मिळते.शेपु ची चव छान लागली ..तेव्हा या भाजीची पद्धत पहा.
१ वाटी शेपु ची भाजी स्वच्छ धुवुन चिरुन घ्यावी..
१ वाटी सुरती पापडीचे दाणे.
२ मोठे बटाटे.
अर्धी वाटी ओले खोबरे+२ हिरव्या मिरच्या+अर्धा इंच आले+अर्धा चमचा जिरे हा मसाला थोडेसे पाणी घालुन वाटुन वाटुन घ्यावा.
फोडणी साठी अर्धी वाटी तेल्,मोहोरी,जिरे,हिंग व हळद.
तिखट व मीठ चवीनुसार्,गरम मसाला १ चमचा.
शेपु असल्याने मी कोथिंबीर घातलेली नाही.

क्रमवार पाककृती: 

सुरती पापडीचे दाणे थोड्या पाण्यात बोटानी दाबले जातील इतकेच उकडुन घ्यायचे.अगदी नरम करायचे नाहीत.
बटाटे उकडुन साले काढुन मध्यम आकाराच्या फोडी कराव्या.
तेलाची फोडणी करुन त्यात जिरे-मोहोरी-हिंग्-हळद घालावे लगेचच वाटण घालुन परतावे.
मसाला परतला गेला कि त्यात शेपुची भाजी,पापडी दाणे व बटाटा फोडी घालुन परतावे.
तिखट्-मीठ्-मसाला घालुन पुन्हा एकदा परतावे.
कढईवर झाकण ठेवुन त्यात थोडेसे पाणी घालुन मध्यम आचेवर एक वाफ येवु द्यावी.
एक छान वेगळ्या चवीची भाजी तयार झाली.
आणि हा तयार भाजीचा फोटो प्रतिसाद मधे पहा.ही तयार भाजी..
222222222222222.JPG

अधिक टिपा: 

भाजी चा आस्वाद घेताना असे वाटले कि शेपु चे प्रमाण वाढवले असते तर भाजी जास्त छान लागली असती.
जेवणाच्या वेळेस ही भाजी मावे.त गरम केली तेव्हा शेपु चा स्वाद आणि वास वाढतो असे जाणवले..

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळंच काँबिनेशन.
सुलेखा, परत पहिली पाककृती संपादीत करुन जर त्यात फोटोची लिंक दिली (जी प्रतिसाद संपादीत करता मिळेल.) तर ती कायम दिसेल. नाहीतर प्रतिसादाचे दुसरे पान सुरु झाले, कि हा फोटो दिसणे बंद होईल.

फोटो मस्त दिसतोय. ह्या भाजीत शेपू नाही घातला तर चालेल का? Wink

सुलेखा, तुमच्या प्रतिसादातील फोटोचा HTML टॅग संपूर्ण सिलेक्ट करून कट करा, पाककृती संपादित करा, लिखाणात जिथे फोटो हवा आहे तिथे पेस्ट करा, पाककृती सेव करा. फोटो पाककृतीत येईल.

दिनेशदा,तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले ..आत्ता कुठे जमले.धन्यवाद.
मंजुडी,या फोटोसाठी किती तत्परतेने कळविले..खरेच खुप खुप धन्यवाद्..या दाण्यांना मुळ चव खुप छान आहे त्यामुळे शेपु,मेथी,पालक्,लोथिंबीर,वांगी,हिरवे टोमॅटो असे काहीही घालुन तर मस्त होईलच .मला हे उकडलेले दाणे वरुन तुप्-जिरे-हिंग्-हिरव्या मिरचीचे तुकडे घालुन फोडणी [असल्यास खोबरे पेरुन्-लिंबु पिळुन्]नुसते खायला खुप आवडतात.

सुलेखा, आजच केली होती ही भाजी! घरात शेपु, सु पा दाणे (फ्रोजन) होतेच.
खुप मस्त चव आली होती. थोडी रस्सेदार केली होती आणि शेपु जास्त घातला होता.562628_408545445826465_100000130401974_88714974_201420250_n[1].jpg

धन्यवाद सुलेखा!