पोह्याचे थालीपीठ

Submitted by निंबुडा on 13 March, 2012 - 05:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जाडे पोहे
कांदा
हिरव्या मिरच्या
बारीक चिरलेली कोथिंबीर
दाण्याचे कूट
मीठ

क्रमवार पाककृती: 

१) जाडे पोहे पाण्याने धुवून थोडे पाणी त्यात राहू द्यावे. १० मिनिटांत भिजून मऊ होऊ द्यावे.
२) हिरव्या मिरच्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात.
३) भिजवलेले पोहे + बारीक चिरलेला कांदा + मिरचीचे वाटण + मीठ + दाण्याचे कूट + बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून थालीपीठासाठी गोळा मळून घ्यावा.
४) तेल सोडून मस्त पातळ व खरपूस थालीपीठे भाजावीत.
५) उलटताना मोडण्याचा संभव असल्याने खूप मोठी थालीपीठे लावू नयेत.

गरम गरम थालीपीठावर तूप घालावे. लिंबाचे गोड लोणचे /चुंदा/ दही वा टोमॅटो केचप बरोबर छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
मी साधारण पाव किलो जाडे पोहे घेतले होते. ४ मीडीयम साईझची थालीपीठे झाली.
अधिक टिपा: 

पुढच्या वेळी उकडलेला बटाटा पण अ‍ॅड करून बघणार आहे. त्याने पीठाला एकजिनसीपणा येईल असे वाटतेय.
फोटु नाहीत Sad त्याआधीच थालीपीठे गट्टम झाली होती. Happy

माहितीचा स्रोत: 
"वाढत्या वयाच्या मुलांसाठी पौष्टीक पदार्थ" नावाचे पुस्तक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निंबुडा, चिऊशी सहमत. फोटो हवाच! काय मस्त आयडियाची कल्पना! भाजणीचे पिठ नसल्याने थालिपिठ करु शकत नव्हते. आता करु शकेन.

मात्र आमच्या इथे फक्त पातळ पोहेच मिळतात. काही विशेष फरक नाही ना पडणार त्याने? की पडेल?

१० मिनिट भिजवण्याऐवजी नुसतेच एकदा झटकन पाण्यातून धुवून त्यातले सगळे पाणी नीट काढले तर जमेल ना? Uhoh

मी पातळ पोहे वापरुन आपले नेहमीचे पोहे बनवते, वरील पद्धतीने धुवून. सुटे सुटे होतात. गिचका होत नाही. थालिपिठही जमावे, ही आशा!

१० मिनिट भिजवण्याऐवजी नुसतेच एकदा झटकन पाण्यातून धुवून त्यातले सगळे पाणी नीट काढले तर जमेल ना? >> ट्राय करून बघ ना. मला काही आयडीया नाही. मी पातळ पोह्याचे नेहमीचे पोहे कधी बनवले नाहीत.

गरज ही शोधाची जननी असते, निंबे. Proud

बरं, तुझं हे थालिपिठ करुन पाहिलं आणि जमलं/ नाही जमलं, तरी तुला कळवेन मी नक्की. Happy

तयार पोह्यांचे - उरलेल्या सुध्दा झकास थापि होईल. Happy सानी, तू पोहे व अन्य सामुग्री परातीत घेऊन जरूरीपुरते पाणी शिंपडत (२) भिजव. नक्की चांगले होतील. Happy

पोह्यात उकडलेला बटाटा घालण्यापेक्षा कच्चाच बटाटा किसून घातला तर चांगले.
किसलेल्या बटाट्याला जे पाणी सूटेल त्यातच पोहे भिजवायचे, म्हणजे त्यातल्या
स्टार्चने आवश्यक तो चिकटपणा येईल. व तूकडे पडणार नाहीत.

छान आहे हे थालिपीठ Happy

सानी, कांद्याच्या रसात पातळ पोहे भिजतील.. वाटलच तर पाण्याचा एक हबका मारायचा, किंवा थोडम ताक शिंपडायचं Happy

किसलेल्या बटाट्याला जे पाणी सूटेल त्यातच पोहे भिजवायचे, म्हणजे त्यातल्या
स्टार्चने आवश्यक तो चिकटपणा येईल. व तूकडे पडणार नाहीत.
>>
आयडीया काही वाईट नाही. तसे पण उपासाच्या भाजणीच्या थालीपीठाच्या बाबतीत आपण हेच करतो.

अश्याच पद्धतीने पोह्याचे कटलेट्स होतात. पोहे जास्त भिजवून त्यात कोबी, सिमला मिरची, कोथिंबीर वगरे बारीक चिरून घालायची. breadcrumbs मध्ये घोळवून shallow fry करायचे..

मध्यंतरी ही थालीपीठे परत केली. तेव्हा निम्मे पोहे आणि निम्मे ओट्स घातले. तसेच मटारचे फ्रेश दाणे मिक्सर मध्ये वाटून घातले. हिरव्या रंगाची खरपूस मस्त थालीपीठे झाली.

काय ग हे निंबुडा आता देखील फोटो टाकला नाहीस, फोटो बघितल्यावर पदार्थ बनवायचा उत्साह वाढतो व तो पदार्थ बनवुन झाल्यावर नक्की कसा दिसेल याचा देखील अंदाज येतो....... बाकी मस्त आहे पाकृ..... मी नक्की करुन बघेन व फोटोही टाकायचा प्रयत्न करेन.... धन्स Happy