मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्तेतील बातमी.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, January 6, 2011 - 21:00 to शनिवार, January 15, 2011 - 21:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक कमळी, होती वेगळी!

"स्मिता पाटील" या चतुरस्त्र अभिनेत्रीच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणी संस्थेतर्फे ‘मूर्तिमंत अस्मिता’ हा विशेष मल्टीमीडिया कार्यक्रम १३ डिसेंबर या दिवशी संध्याकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. ललिता ताम्हणे यांची संहिता असलेल्या या कार्यक्रमाला स्मिता पाटील यांचे आई-वडिलही उपस्थित रहाणार आहेत. स्मिताजींच्या सहकलाकारांकडून त्यांच्याविषयीच्या आठवणी या कार्यक्रमात रसिकांना प्रत्यक्ष ऐकायला मिळतील तसेच यावेळी दाखवण्यात येणाऱ्या एका विशेष चित्रफितीत अमिताभ बच्चन, नसिरूद्दीन शहा, शबाना आझमी, महेश भट, जब्बार पटेल, प्रतीक बब्बर, सुलभा देशपांडे, मोहन आगाशे आदी कलाकारांचा तिच्या अभिनयाविषयीचा अभिप्राय पहाण्यास मिळेल. यावेळी एक सांगीतिक कार्यक्रमही होणार असून त्यात स्मिताजींवर चित्रीत झालेली सुमारे १६ गाणी सोनाली कर्णिक, अर्चना गोरे, चिंतामणी सोहनी आणि मैथिली पानसे हे गायक सादर करणार असून तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. यावेळी ‘मुंबई ते शिकागो व्हाया दिल्ली’ हे ललिता ताम्हणे लिखीत पुस्तक स्मिताजींच्या आईवडिलांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.
— लोकसत्ता (११ डिसेंबर, २०११)

अधिक माहितीसाठी एक कमळी, होती वेगळी!

दहावा आशियाई चित्रपट महोत्सव

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सहकार्याने रवींद्र नाट्यमंदिर येथे २२ डिसेंबरपासून आशियाई चित्रपट महोत्सव सुरु होत असून रवींद्र नाट्यमंदिर तसेच प्लाझा चित्रपटगृह येथे दुपारी १ ते संध्याकाळी ७ या वेळेत प्रतिनिधी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

महोत्सवाचे उद्घाटन 'इलेव्हन फ्लॉवर्स' या चिनी चित्रपटाने होणार असून या चित्रपटाचा हा भारतीय प्रीमियर असेल, तर समारोप केतन मेहता दिग्दर्शित 'रंग रसिया' या चित्रकार राजा रविवर्मा यांच्यावरील चित्रपटाने होणार आहे.
नुकत्याच गोवा येथे झालेल्या भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक पटकाविणारा असगर फरहादी यांचा 'ए सेपरेशन' हा इराणी चित्रपट महोत्सवाचा सेंटरपीस असेल. आशिया खंडातील चित्रपटांबरोबरच 'युरोपियन कनेक्शन' विभागात तुर्कस्तानचे सहा चित्रपट दाखविले जातील. एफटीआयआय या पुणेस्थित संस्थेचा यंदा सुवर्णमहोत्सव असून त्यानिमित्त या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले गिरिश कासारवल्ली, विकास देसाई, जानू बारुआ, केतन मेहता, शाजी करुण, अदूर गोपालकृष्णन या दिग्दर्शकांचे चित्रपटही दाखवले जातील.

'गाईड' चित्रपट दाखवून यंदाचा आशियाई चित्रपट महोत्सव अभिनेते देव आनंद यांना समर्पित केला जाईल. पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन देव आनंद यांच्याच हस्ते झाले होते.

(सौजन्य- लोकसत्त्ता-मुंबई वृत्तान्त, १४ डिसें.११)

एक नविन कार्यक्रम-
कविवर्य विं.दा. करंदीकर यांच्या कवितांची मैफिल!
"तसेच घुमते शुभ्र कबुतर"
ता. १७ डिसें. २०११, शनिवार, सायं. ६ वा.
स्थळ- श्री. सावरकर यांचे निवासस्थान, २१, शांतिनेकेतन, मलयगिरी इमारतीच्या मागे, अणुशक्तीनगर, ट्रॉम्बे, चेंबुर, मुंबई.
सगळ्या काव्यरसिकांना आग्रहाचे आमंत्रण!

टेकफेस्ट २०१२

IIT मुंबईत शुक्रवार ६ जानेवारी ते रविवार ८ जानेवारी टेकफेस्ट आहे. अनेक इव्हेंट्स, एक्झिबिट्स इथे पहायला मिळतील.

सौजन्य : सकाळ, नवी मुंबई टुडे, ५ जानेवारी २०१२

मला मित्राकडून आलेली एक ई-मेल... )
हे सर्व कार्यक्रम जोशी फौंडेशन, राजवाडे सभागृह, भारत नात्य मंदिर अश्या ठिकाणी म्हणजे पुणे - ३० ह्या भागात होणार आहेत... Happy
**********************************************************************************
प्रिय मित्र-मैत्रिणिनो,

दर वर्षी २६ ते ३० जानेवारी दरम्यान आपण 'लोकशाही उत्सव' साजरा करतो, हे आपणास माहिती आहेच. या वर्षीच्या दहाव्या 'लोकशाही उत्सवा'त ध्वजवंदन, चर्चा, परिसंवाद, चित्रपट, नाटक, एकपात्री प्रयोग यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यायी जीवनशैलीचा आग्रह धरणारे 'जीवनोत्सव' प्रदर्शनही असणार आहेच. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन लोकशाहीच्या संरक्षण व संवर्धनात सामील व्हावे, ही विनंती.

या उत्सवामागील भूमिका व कार्यक्रमांचा सविस्तर तपशील सोबत जोडलेल्या पत्रकात आहे. चित्रपट व नाटकासाठी अनुक्रमे प्रवेशिका व तिकीट घेणे आवश्यक असून बाकी सर्व कार्यक्रमांना मुक्त प्रवेश आहे.

आपल्या माहितीतील इतरांनाही ही मेल कृपया forward करावी.

या उत्सवामध्ये अतुल पेठे दिग्दर्शित नवे नाटक `सत्यशोधक' आणि पुणे फेस्टीवलमध्ये नुकताच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा `संत तुकाराम' पुरस्कार प्राप्त `हा भारत माझा' हा सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर निर्मित व दिग्दर्शित चित्रपट पाहता येणार आहे. याची तिकिटे आणि प्रवेशिका उपलब्ध आहेत. त्यासाठी त्वरीत संपर्क साधावा.

रश्मी- ९७६३०५९१८६, मिनाक्षी- ९८२३६२४२९१, मिलिंद - ९८९००२५५६५, योगेश- ९४२३१६२३९६, अलका - ९६८९९०७८३०, प्रेरणा- ९४२२०७२५९८

भेटूच,

मिलिंद व सहकारी,
लोकशाही उत्सव समिती ..

एक महत्त्वाची बातमी :

बटरफ्लाय बुक्स २३ मार्चला सुंदराबाई हॉलला पुस्तकांचं प्रदर्शन भरवणार आहे. हे जरा आगळं वेगळं प्रदर्शन आहे. जगभरातून ज्या ज्या पुस्तकांच्या शेवटच्या काही कॉपीज राहिल्या आहेत अशी पुस्तकं ते सोर्स करत आहेत आणि ती पुस्तकं या प्रदर्शनात उपलब्ध असतील. पुस्तकांची किंमत केवळ रू. ५० ते रू. २५० या रेंजमध्ये असेल.

संधी हुकवू नका.

मामी किती दिवस असणार आहे हे प्रदर्शन? आणि वेळ काय असणार आहे?

सेनापती सुंदराभाई हॉल मरीन लाईन्सला आहे. SNDT समोर, खाऊगल्लीच्या बाजूला (पण आता तिचे फक्त नाव उरलय. खाण्याच्या लायकीचे फारसे काही मिळत नाही तिथे)

सुंदराबाई हॉल न्यु मरीन लाइन्सला आहे. इन्कम टॅक्स ऑफिसच्या समोर चर्चगेट स्टेशनवरून जवळ पडेल. .

पार्ल्यात लोकमान्य सेवा संघात संध्या ६वा, उद्या श शेयर बाजाराचा ह्या कार्यक्रमा आहे, शेयर बाजारावर उपयुक्त माहिती मिळेल, Admission on First come First Serve basis असं काहीतरी आहे.

A workshop about Sanskrit related sciences like Lexicography, Manuscriptology, Archaeology, Comparative Mythology et al has been organized by the department of Sanskrit, Ruia College, Mumbai & the Maharshi Vyaas Vidya Pratishthan, Mumbai.

Date - Sunday, Feb 12, 2012.

Time - 10:00 am to 05:00 pm.

Venue - Ramnarain Ruia College, Matunga, Mumbai.

Registration fees - Rs 250=00 ( Rupees Two hundred fifty only )

prior registration is essential to attend this workshop.

for further details, pls chk with - Smt Tarangini Khot - cell # 9969279359,
Dr. Manjusha Gokhale - cell # 9867920300 at the earliest convenience.

एव्हरेस्टवीर पीटर हेब्लर मुंबई भेटीवर !
रवींद्र नाटय़ मंदिरात १८ व १९ फेब्रुवारीला होणार कार्यक्रम..

कृत्रिम प्राणवायूशिवाय एव्हरेस्टवर यशस्वी आरोहण करणारे साहसी व जिद्दी गिर्यारोहक पीटर हेब्लर यांना भेटण्याचा दुर्मिळ योग मुंबईकरांसाठी १८ व १९ फेब्रुवारी रोजी जुळून आला आहे. हिमालयन क्लबच्या ८४ व्या वार्षिक कार्यक्रमानिमित्ताने ते मुंबईत येत आहेत. गिर्यारोहणात जिवंत दंतकथा बनून राहिलेल्या रेनॉल्ड मेसनर यांचे १९५९ सालापासून ते गिर्यारोहणातील साथीदार असून दोघांनी मिळून जगभारतील अनेक अवघड हिमशिखरांवर साहसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. पीटर हेब्लर आपल्या दोन दिवसाच्या वास्तव्यात मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत. हेब्लर यांनी एव्हरेस्टवर कृत्रिम प्राणवायू शिवाय आरोहण तर केलेच पण त्याही पुढे जावून एव्हरेस्ट समिटवरून साउथ कोल येथे ते फक्त एका
तासात उतरले होते. त्याबरोबरच हिडन पिकवर त्यांनी सर्वप्रथम अल्पाईन पद्धतीने आरोहण केले होते. तसेच चोयु, नंगा पर्बत, कांगचेनजुंगा ही ८००० मीटरपेक्षा अधिक उंचीची शिखरे त्यांनी सर केली आहेत. त्यांच्या संस्मरणीय अशा साहसी कारकिर्दीतील थरारक अनुभव या निमित्ताने मुंबईकरांना ऐकायला मिळतील. त्याच बरोबर त्यांचे घर-अंगण म्हणजेच ऑस्ट्रीयन आल्प्सची आकर्षक सफर देखील ते आपल्या सादरीकरणातून करविणार आहेत. रवींद्र नाटय मंदिर येथील पु. ल. देशपांडे सभागृहात होणा-या या दोन दिवसाच्या कार्यक्रमात गिर्यारोहकांच्या अदभूत, साहसी आणि रोमहर्षक दुनियेतील अनेक सादरीकरणांचा लाभ सर्वाना घेता येणार आहे.

अधिक माहितीसाठी:
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=210...

पु.ल.देशपांडे अकादमीतल्या खाद्यमहोत्सवात शुक्रवारी संध्याकाळी गेले होते. पण निदान माझा तरी भ्रमनिरास झाला. आम्ही ८ च्या सुमारास तिथे पोचलो. नाशिक आणि औरंगाबाद हे विभाग रिकामे होते. एक विभाग पूर्णपणे सीफूडचा होता. कोल्हापूर विभागात बिर्यानी, चिकन थाळी, मटण थाळी वगैरे मेन्यू दिसत होता. चिक्कार गर्दी होती. लाईनीत उभे रहाणे वगैरे प्रकार नव्हताच (नंतर पुण्याच्या विभागाबाहेर शिस्तीत क्यू दिसला). एक बाई आणि एक पुरुष ऑर्डर घेणे आणि प्लेटी भरून देणे हे काम करत होते. तसंच पार्सल घेऊन जाणार्‍यांनाही तेच पार्सल करून देत होते. त्यामुळे कमीत कमी १५-२० मिनिटं थांबायला लागत होतं. आम्ही तिथे गेलो तेव्हा मटण संपलं असल्याचं त्यांनी सांगितलं. बर्‍याच प्रतिक्षेनंतर चिकन थाळी मिळाली. किंमत १२० रुपये. थाळीत दोन भाकर्‍या, भाताचा ढिग, एका वाटीत तांबडा तर दुसरीत पांढरा रस्सा. आणि मध्ये चिकन ग्रेव्ही. भाकर्‍या चांगल्या होत्या. चिकन ग्रेव्हीला ग्रेव्ही कमी होती. तांबडा आणि पांढरा रस्सा म्हणजे पुळकवणी पाणी होतं. कोल्हापूरला हा असाच रस्सा मिळतो का? भरीस भर म्हणजे पांढर्‍या रश्श्यात मीठ नव्हतं. अन्नाविषयी वाईट बोलू नये म्हणतात पण ए़कूणात ५० रुपये देण्याचीही लायकी नसलेल्या थाळीला १२० रुपये लावले होते हे खरं आहे.

ती बाई चिकन बिर्याणी करताना मी पाहिलं. चिकन ग्रेव्हीचा जो रस्सा होता तो आणि फोडी प्लेटीत तळाला घालून त्यावर भात आणि तळलेला कांदा पसरून ती देत होती. Sad

नेहमीप्रमाणे बसायला जागा अतिशय कमी होती. उत्पादनांचा स्टॉल होता त्यावर मसाले, लोणची, थोडे पापड आणि तांदूळ एव्हढ्याच गोष्टी होत्या. पेपरमध्ये जाहिरात आली होती तेव्हा वर्‍हाडी पुरणपोळ्या आणि हुरड्याचं थालीपीठ वगैरे असणार असं छापून आलं होतं. ते काही कुठे दिसलं नाही. कदाचित आम्ही थोडे उशीर गेलो म्हणून संपले असतील.

एकूणात बरीच निराशा झाली. आणखी कोणाचे काय अनुभव?

The Welfare Of Stray Dogs (WSD) NGO is holding a charity sale of collected second-hand books, CDs, DVDs, clothes, cutlery and glassware. The proceeds will be used to sterilize and immunize stray dogs in Mumbai.

10am-7pm
Laxmi Baug Hall
Avantikabai Gokhale Road
Auto Spare Parts Market Lane
Off Lamington Road
Near Opera House, Girgaum

मी सुपरक्रॅक आहे. आधी टाकायचं का सुचलं नाही देवजाणे. सॉरी.

In Commune with Nature - “Over night Camping in SGNP, Borivali”
The Sanjay Gandhi National Park (SGNP) is a unique National park with a rich biodiversity of plants animals and birds. It is an ideal place to experience the tranquillity and biodiversity of nature. As city dwellers, we are blessed to have such a pristine forest in the midst of our teeming metropolis.
In mid-March, we had held a nature camp ‘In Commune with Nature’ at SGNP – Yeur Hills. A sizeable number of nature enthusiasts participated in it and made it a grand success. Encouraged by this enthusiastic response and obliging eager participants who are clamouring for more such camps, we are happy to announce another nature camp at SGNP – Borivali on 31st March – 1st April 2012.

The highlights of this camp are:
• Camping in Tents in the jungle
• Slide show on biodiversity, Insights and challenges of (SGNP)
• Lion-Tiger Safari, Boating, Mini Train ride
• Trekking to the highest point of Mumbai (1500 feet)

The programme will kick off at Nature Information Centre (NIC) with a presentation on the Park’s flora & fauna, followed by lunch/refreshments. The afternoon will be spent taking in the delights of the park through Lion-Tiger Safari, boating in the calm lake and a mini train ride.
This is the best way to spot varied animal species living in the park such as spotted deer, black napped hare, barking deer, palm civet, mouse deer, rhesus macaque, bonnet macaque, Hanuman langur, Indian flying fox, sambhar and leopards etc.

Day’s activities will wind up with a tranquil ‘Evening walk through the jungle’, where you can watch the flora-fauna and enjoy the serenity of the jungle. At night, there will be a slideshow on Herpetofauna and a Wildlife documentary concluding with a capping of the day’s activities.
An entirely new experience awaits you, as you spend a night in the forest, camping under the open sky in tents. It would be an ideal place to watch and experience the jungle come alive at night with its diverse nocturnal denizens such as palm civet, leopards, etc.

The following day post refreshments, participants will trek to the highest point of Mumbai in SGNP Jambul mall. This will be an exhilarating trek as you climb and pass through a World Heritage Site of the Buddhist Caves, termed as Kanheri Caves dating back to the 2nd-9th century.
The programme ends in the afternoon with a discussion on the experiences had by the group and listing of wildlife sightings during the programme.
Grab this opportunity and book your seats in advance! By participating in this unique programme you are also contributing towards the conservation of Sanjay Gandhi National Park, as a part of the proceeds will be utilized for day-to-day conservation activities of SGNP.

Cost of the programme is Rs 2,100/- per head
Cost includes
- Pick and drop from Borivali Station to Camp site and back
- Accommodation
- Food
- Resource person
- Programme fees.

Interested participants kindly Contact - Krishna Tiwari - 9870785006 or Jagdish Vakale - 9322870324 and the last date of registration is 29th March 2012.

१४ एप्रिल-१ मे, मुंबईत सुंदरबाई हॉल, न्यू मरिन लाईन्स, इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे, आशिष बुक सेन्टरचं पुस्तक प्रदर्शन भरलंय. सकाळी ९:३० ते रात्री ८:३०

Pages