चीनबद्दलच्या गप्पा

Submitted by webmaster on 21 May, 2009 - 23:38

चीनबद्द्लच्या गप्पा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाफचं नाव खरं तर 'चीन मधल्या प्राचीन गप्पा' असं ठेवा. कोण्णी कोण्णी फिरकत नाही इथे.

रैना, तिथे गटग करायचा विचार दिसतोय. Happy

मामी Lol
इथे राहून आम्ही खरच प्राचीन झालोय गं.. आमच्या इकडे येऊन गप्पा मारू शकता ..
अजून कुणी नाही तर ज्जा.. मी आणी रैना दोघीच गटग करू, हाकानाका !!!

ते कुठलं गाणं ते मलाही ठाऊक नाही! Wink चिनी भाषेतलं आहे ना! मला फक्त पहिली ओळ पाठ आहे. त्यावर तूनळीवर धुंडाळता येते! Happy

ह्या बाफचा प्राचीनपणा फार वाढलाय म्हणून थोडं आधुनिक बनवतोय! Lol

मी आणी रैना दोघीच गटग करू, हाकानाका >> हो ना वर्षुताई.
मामी Lol तेचकी काय प्राचीन बाफ आहे.
ऋयाम- तुझे पोस्ट अजून दोन वर्ष तसेच राहिले नाही म्हणजे मिळवली.
गापै Lol

आज इथे सुरेख हवा (फारा दिवसांनी कोंभ उदयाला आले).

अरे प्राचीन बाफ परत जागा झाला वाटतं. Proud
रैना खरेदी करायची असल्यास शेंजन ला जा , हाँगकाँग मध्ये जाम अव्वाच्या सव्वा रेट असतात.

श्री.. शेंझेन ही आता हाँगकाँग ची कॉपी करू लागलंय.. तोर्‍याची,किमतीची,भावखाऊपणाची,उध्धटपणाची..अजून काय काय...
अब बेस्ट खरेदी क्वांग चौ ला Happy

इथला चकचक फील कधीकधी बोर होतो. सगळी शहरे चकचकीत चमचमती असली पाहीजे असे कुठे लिहीलेय. रात्री आकाश किंवा तारे दिसत नाहीत. भक्कं उजेड सगळीकडे.

क्वांग चौ कुठे आहे वर्षू? तुम्ही लिहीले होते ना एकदा त्याबद्दल?

व्हय की आडो, शैतै.
जळमटं झाडतेय. जरा साफसुफ करुन हारतुरेतोरणं लावली की येईल पब्लिक पायधूळ झाडायला हळू हळू. Lol

आता कितपत थंडी आहे हाँगकाँगमधे? आम्ही फेब मधे आलो होतो तेव्हा १८-२३डीग्री होते.
भरपुर वारा आणि धुके होते. मे मधे पिक सीझन असतो ना?

यस्स्स... रैना.. कालपासून इथे ही खूप पाऊस आहे...
हाँगकाँग ला येत असतात मध्न मध्न लहानशी वादळं.. तिथे आत्ता सुट्ट्या आहेत ना भरपूर???
आमचं हाँगकाँग ऑफिस सोमवार पर्यन्त बन्द आहे..
तुझी लेक काय म्हणतीये... एन्जॉयिन्ग???!!!!

रोहन.. हा बाफ उघडून बराच वेळ (वर्षं) झाली...रैना मुळे बिचार्‍याला जीवनदान मिळालंय परत.. Happy

महेश, समझ गये ना Proud
(कसले मस्त गाणं आहे ते.)

वर्षु-सुट्ट्या नाहीयेत (मला). हापिसात झक मारते आहे. आमच्या कंपनीत काम आलय. असो.
इथे सगळा सुट्टी मुड आहे. Happy

रोहन येत जा इथे.

ऑर्किड- तुम्ही नुसते पहायला आला होता की इथे रहात होता? Happy सध्या सकाळी उन, दुपारी थंडी, संध्याकाळी पाऊस असे काहीही सुरु आहे.

रैना, आम्ही हाँगकाँग मधे भटकायला आलो होतो. २ दिवस
डिस्नेलँड आणि २ दिवस सिटी बघणे असा प्रोग्रॅम होता.
शॉपिंग साठी वेळच मिळाला नाही. तिथे जेडचे दागिने छान
मिळतात असे ऐकुन आहे. तिथल्या
लोकांना मात्र फारसं ईंग्लिश येत नाही अस जाणवलं. ईथे
सिंगापुरमधे सिंग्लिश का होईना थोडफार बोलतात.
१ प्रश्न आहे, तिथे आपल्यासरखे चाकरमानी कोणत्या भागात रहातात?
आयलंडवर महाग असतिल ना जागा?

हाँगहाँग हेरिटेज म्युझियम मध्ये पिकासोच्या कलाकृतींचे मोठे प्रदर्शन आहे (२२ जुलै पर्यंत. तारीख चेक करा नक्की.).
चुकवू नये असे काही.