ओळखा पाहू : हे वाक्य / उतारा कुठल्या पुस्तकातला आहे ?

Submitted by विस्मया on 18 March, 2012 - 03:33

एक खेळ खेळूयात का ?
खेळाचा उद्देश हसत खेळत मराठी पुस्तकांची माहिती शेअर करणे हा आहे. इथं गाजलेल्या मराठी पुस्तकातील एखादं वाक्य / उतारा द्यायचा आणि तो इतरांनी ओळखून दाखवायचा. उत्तर देतानाच त्या पुस्तकाची थोडक्यात माहिती, त्या पुस्तकासंबंधी असलेली एखादी आठवण द्यायची.

लक्षात असू द्या.

१. आपण देणार असलेलं वाक्य / उतारा शक्यतो अगदीच अडगळीत गेलेल्या अपरिचित पुस्तकातून देऊ नये.
२. कुणालाच उत्तर न आल्यास प्रश्नकर्त्याने खूप ताणून न धरता उत्तर द्यावे.
३. इथं मराठी भाषेतल्याच पुस्तकांतील उतारे अपेक्षित आहेत.
४. पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या सिनेमा / नाटकातील उतारेही चालतील.
५. आपण जर एक दोन ओळी देणार असू तर त्या ओळखता येतील याची खात्री हवी. थोडक्यात त्या गाजलेल्या हव्यात, त्यातून लेखकाची शैली दिसून यायला हवी. अशी खात्री वाटत नसेल तर एक गंमतीदार क्ल्यु द्यावा. या क्ल्यु मुळे खेळाची रंगत वाढायला मदत होईल. थोडक्यात काय, वाक्य ओळखलं गेलं नाही तरी हा क्ल्यु लक्षात रहावा.
६. उतारे दिले तर ओळखायला सोपं जातं. याचाही विचार व्हावा.

उदा : आठवणी हत्तीच्या पायांनी येतात. खूप खोलवर आपला ठसा उमटवून जातात.

उत्तर - श्री शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या गाजलेल्या पुस्तकातील हे वाक्य. त्या वेळी घराघरातून हे पुस्तक रामायण-महाभारतच्या जोडीने असायचं. भारतातल्या अनेक भाषांमधे ही कादंबरी अनुवादित झाली. लहानपणी भाषा समृद्ध करणारी एक संस्कारक्षम कादंबरी म्हणून तिचं मराठी भाषिकांमधलं स्थान अबाधित राहणार असं वाटतं.

उत्तर आलंच पाहिजे हा खेळाचा हेतू नाही. खूप दिवसांपूर्वी वाचनात आलेल्या चांगल्या साहीत्यकॄती या निमित्ताने एकमेकांत शेअर केल्या जातील, कुणासाठी ती वाचायची राहून गेली असल्यास एक रिमांईडर म्हणूनही उपयोग होईल.. आणि खेळ तर आहेच !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पल्सपेक्षा इंपल्सवर चालणारी व्यक्ती असेल असं वाटलं.. - पार्टनर - व. पु. काळे

सांझुने दिलेला उतारा वपुर्झा मधला वाटतोय.

साजिरा...वपु आवडते लेखक आहेत वाटतं Happy

मी_चिऊ: श्रीमान योगी-रणजीत देसाई.

तुम्हा महारथींसाठी अजुन एक सोप्प वाक्य Happy

स्तुतिने हुर्ळुन जावुन उलट अंगावर मुठभर मास चढण्याचीच शक्यता जास्त.

बरोबर... सुमेधा...

स्तुतिने हुर्ळुन जावुन उलट अंगावर मुठभर मास चढण्याचीच शक्यता जास्त. >>> बट्ट्याची चाळ असाव अस वाट्त्य

'ह्या देशातले वृत्तपत्र-स्वातन्त्र्य वृत्तपत्र विकण्यापुरते आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढे लिहीण्याएवढे नाही'. ओळखा कशातले?

>>> मला वाटतं 'स्वामी' मधलं असावं.

चूक. कोणालाच आठवत नसेल तर सांगतो किंवा एखादा क्ल्यू देतो.

राजा हा जगाचा उपभोगशून्य स्वामी असतो

राम गणेश गडकरी - राजसंन्यास
मास्तुरे आपणाला हे उत्तर अपेक्षित आहे का ?
-----------------------------------------------

खरं तर हे प्राचीन वाक्य आहे आणि अनेक ग्रंथात दिसून येतं. धर्माचे सार नावाचा एक ग्रंथ आहे त्यातही आहे. छत्रपती शाहू महाराजांवर एक पुस्तक आहे त्यातही हे वाक्य आहे. छोटी वाक्य गोंधळ करतील असं वाटतंय. उतारे दिले तर मजा येईल असं वाटतं.

एकतर आपल्या आवडता लेखकाची शैली त्यातून इतरांपर्यंत पोहोचवता येईल आणि चांगलं चांगलं वाचायला मिळेल.

ही सूचना आहे बरं का.. वै.म.

.

>>> राम गणेश गडकरी - राजसंन्यास
मास्तुरे आपणाला हे उत्तर अपेक्षित आहे का ?
-----------------------------------------------

बरोबर

>>> खरं तर हे प्राचीन वाक्य आहे आणि अनेक ग्रंथात दिसून येतं. धर्माचे सार नावाचा एक ग्रंथ आहे त्यातही आहे. छत्रपती शाहू महाराजांवर एक पुस्तक आहे त्यातही हे वाक्य आहे. छोटी वाक्य गोंधळ करतील असं वाटतंय. उतारे दिले तर मजा येईल असं वाटतं.

हे वाक्य इतर ठिकाणी आहे याची मला कल्पना नव्हती. माहितीबद्दल धन्यवाद!

फिरणार्‍या वाशा बरोबर तुम्हीही फिरलात तर..
विपर्यास होतोय राणीसरकार, आम्ही सदैव आपल्याच पाठीशी उभे राहू. आपली इच्छा डावलायची आमच्यात कुवत नाही. पण त्याच बरोबर महाराजांशी बेईमान होणे आम्हाला जमणार नाही. ते असेतोवर सर्वांच्याच निष्ठा त्यांच्या पायाना बांधल्या गेल्यात त्यातून कुणाचीच सुटका होणार नाही.

ओळखा?

एकदम सोप्पं...

""ए ! चल, उठतोस की येऊ मीच तिकडे ?"" मोझेस बाबांची

दमबाज हाक ऐकून ते काळं, बारकं पोर दचकून उठलं. अजून पुरतं

उजाडलंही नव्हतं. पण मोझेसबाबाला कुठला तेवढा धीर ?

""तुझ्याएवढी पोरं बघ कशी धारा काढतात,गुरं राखतात. कोंबडया-

डुकरांची देखभाल करतात. पण तुझे असले हे काडयामुड्याचे

हातपाय आणि हे असलं मुकं तोंड ? काय होणार तुझं ते देवास

ठाऊक !""

""नका हो असं करवादू!"" सुसानबाई आपल्या नवऱ्याला -

मोझेसला-चुचकारत म्हणाली,""केवढंसं पोर ते. काल दिवसभर

काम करून थकलंय.""

""पण मला आता शेतात कोण मदत करील ? खिशात ना पेसा ना

अडका. लागवडही नीट झालेली नाही. अशा आळसानं उभ्या पिकाची

नासाडी व्हायची."" मोझेसबाबा कुरकरले.

""काही काळजी करू नका. ईश्वरकृपेने सारं ठीक होईल. अहो ! हा

दुबळा पोरसुध्दा बघा. काही दिवसांनी कसा ठणठणीत होईल तो !""

""हो ! होईल !एक घोडा होता तोही या पोरापायी गमावला.""

फिरली मर्जी, फिरला वारा !
फिरल्या नजरा, फिरल्या धारा !!

उत्तर :
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....
....

बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या शिवचरित्रात या ओळी आहेत. विजापुरी दरबारात जिजाऊंचे वडील लखुजी जाधवराव आणि त्यांच्या (तीन?चार?) मुलांचा घात केला जातो. त्या प्रसंगीच्या चित्राखाली या ओळी आहेत. मात्र त्या पुस्तकाच्या मजकुरात आढळत नाहीत.

वाचकांचे आभार! Happy

आ.न.,
-गा.पै.

>>विजापुरी दरबारात जिजाऊंचे वडील लखुजी जाधवराव आणि त्यांच्या (तीन?चार?) मुलांचा घात केला जातो. त्या प्रसंगीच्या चित्राखाली या ओळी आहेत. मात्र त्या पुस्तकाच्या मजकुरात आढळत नाहीत.<<

@गापै
ते विजापूरच्या दरबारात नसून, निजामाच्या दरबारात असे असायला पाहीजे आहे.

Pages