अशी आमुची इंग्रजी मायबोली

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2012 - 22:50

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?

काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.

- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -

द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे

daily alarm = रोजचा गजर

'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'

नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या

दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी

चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित

गुलमोहर: 

झक्कीसाहेब,फार सुंदर विश्लेषण केलंत तुम्ही.
मराठी माणसात एक सद्गुण आहे...त्याला इतरांच्या भाषा शिकायला,आत्मसात करायला आवडतात....पण हा सद्गुण एके दिवशी दुर्गूण ठरतो..कधी, तर जेव्हा तो आपल्या मराठी भाषेत त्या दुसर्‍या भाषांची भेसळ करत असतो.
मराठी लिहितांना शुद्धलेखनाचे नियम न पाळणारे हेच लोक, इंग्लिश अथवा तत्सम भाषेतल्या शब्दांचे स्पेलिंग लिहिण्यात किती काटेकोर असतात.हेही पाहण्यासारखे आहे...
बाकी मराठीचं काय हो....आपली आई आहे ना...ती काय रागावणार नाही, समजून घेते आपल्या लेकरांना...ज्यांना जशी बोलायची/लिहायची आहे तशी मराठी बोलू/लिहू दे....जो वांछिल तो ते बोलो/लिहो.
जेव्हा एखादा इंग्रज,किंवा जर्मन अभ्यासक मराठीचे गोडवे गाईल तेव्हाच बहुदा आमच्या लोकांना मराठीचे महत्त्व पटेल.
तोवर चालू द्या ह्या लोकांचे...यास-फॅस.

बाकी छान चर्चा.

जेम्स बाँड यांना इतःपर कुणीही उत्तर देउ नये. चर्चा न करता धुडगूस घालण्याची इच्छा असलेल्या यासारख्या लोकांकडे दुर्लक्ष करावे.

मराठीत संभाषण करावं, अन्य भाषेतील शब्दांचा अनावश्यक वापर करू नये हे वादातीत.
“मी Temple मध्ये जाऊन God ची Worship केली”
किंवा “आमटीत Salt Excess झालं म्हणून पाणी घालून Dilute केली.”
असलं मराठी बोलणं हास्यास्पद, तिरस्करणीय आहे हे निर्विवाद सत्य.

परंतु, ज्या संकल्पना, यंत्रे, ज्ञान इ. परकीय भाषेतून आल्या आहेत त्यांना मराठीत शब्द शोधायचा अट्टाहास नसावा. कधी कधी तो हास्यास्पद ठरू शकतो.
उदा. Click .... टिचकी
Firefox .... अग्निकोल्हा
Mouse = मूषक/उंदीर
नशीब, अजून Mega, Giga, Tera, Peta यांच्यासाठी प्रतिशब्द शोधायचा कुणी प्रयत्न केलेला नाही. Wink

जी यंत्रे, ज्या व्यवस्था, ज्या संकल्पना परकीय भाषकांनी निर्माण केल्या, त्यांचा उल्लेख करताना परकीय भाषेतले शब्द वापरणं म्हणजे मराठी भाषा बिघडली असं मला तरी वाटत नाही.
Break, Accelerator, Clutch इ. साठी मराठी शब्द शोधण्याची गरज आहे का ?
ते जसे आहेत तसेच वापरले तर काय बिघडतं ?

"मित्र hospital मध्ये आहे असे त्याच्या बायकोने phone वर बोलताना सांगितले"
"मित्र रुग्णालयात आहे असे त्याच्या बायकोने दूरध्वनी वर बोलताना सांगितले"
या दोन वाक्यातील कुठलं वाक्य सहज वाटतं ? आणि का ? अशा प्रकारे विचार होणं गरजेचं आहे.

अर्थात, मराठीत दुसर्‍या भाषेतील शब्द वापरणं जर आवश्यक/स्वाभाविक असेल तर
आपल्या भाषेचं व्याकरण जपूनच ते शब्द वापरावेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------
’योग’, ’श्लोक’ इ. भारतीय संकल्पना/शास्त्र असल्याने
इंग्लिशमध्ये हे शब्द आहेत तसेच वापरले जातात.

>>> Firefox .... अग्निकोल्हा

Rofl Biggrin Lol

>>> जी यंत्रे, ज्या व्यवस्था, ज्या संकल्पना परकीय भाषकांनी निर्माण केल्या, त्यांचा उल्लेख करताना परकीय भाषेतले शब्द वापरणं म्हणजे मराठी भाषा बिघडली असं मला तरी वाटत नाही.
Break, Accelerator, Clutch इ. साठी मराठी शब्द शोधण्याची गरज आहे का ?
ते जसे आहेत तसेच वापरले तर काय बिघडतं ?

+१

>>> Firefox ....
अग्निकोल्हा>>नमस्कार माढेकर साहेब कुठे गायब होतात?

>>तारिख ऐवजी दिनांक,तहसील ऐवजी प्रांत ई ई शब्द सावरकरांच्या संस्कृतकरणाची साक्ष देत आहेत.<<
शिवरायांनीच खूप आधी गतिमान केलेल्या कार्याला सावरकरांनीही यथाशक्ती हातभार लावला एवढाच याचा अर्थ!
सिनेमा, वर्तमानपत्रे, विज्ञान वगैरे भारतात आलेल्या नव्या क्षेत्रांमध्ये इंग्रजी शब्द वापरले जात. सावरकरांनी त्यासाठी मराठी प्रतिशब्द दिले. ते देतांना शब्दातून अर्थ आपोआप प्रकट व्हावा अशी काळजी घेतली.
माझे कांही सहकारी जुन्या निजामशाहीत उस्मानिया विद्यापिठातून अभियांत्रिकी पदवी परिक्षा उत्तीर्ण झाले होते. त्या काळात त्यांना अभियांत्रिकीसारखे विषयही उर्दूमधून शिकविले जात त्यामुळे नव्या परिस्थितीत इंग्रजी माध्यमातून अभियांत्रिकीचे विषय शिकविणे त्यांना जड जात असे. कौतुकास्पद गोष्ट ही की निजामाने ब्रिटिश सत्ताकाळातदेखील अभियांत्रिकीसारखा विषय उर्दूतून शिकविला जावा असा प्रयत्न केला होता. आता त्यांचे प्रतिशब्द जर अरेबी/फार्सीमधून आले असतील तर ते नैसर्गिक नव्हे काय?
युरोपियन भाषेतील नव्या शब्दांना जसा ग्रीक्/लॅटीनचा, उर्दूतील नव्या शब्दांना जसा अरेबी/फारसीचा तसा बहुतेक भारतीय भाषांना संस्कृतचा आधार हा नैसर्गिकच आहे.
काही जणांना फळांच्या राजाचीही अ‍ॅलर्जी असते असे म्हणतात. म्हणून फळांचा राजा हीन ठरत नाही. अ‍ॅलर्जी असणारा दुर्दैवी ! इतकेच!
भाषेचा विकास होण्यासाठी नवे नवे समर्पक शब्द शोधण्याची धडपड आजही चालू आहे. मायबोलीवर संगणक क्षेत्रातील शेकडो प्रतिशब्द आता आपल्या अंगवळणी पडलेलेच आहेत. मराठी शिकण्याची गरज इतरांना पडेल त्यावेळी ऐनवेळी नवे शब्द शोधायचे काय? आपण होऊन जर तसे कोणी शोधून ठेवीत असेल तर त्याला प्रोत्साहनच द्यायला हवे.

>>> काही जणांना फळांच्या राजाचीही अ‍ॅलर्जी असते असे म्हणतात. म्हणून फळांचा राजा हीन ठरत नाही. अ‍ॅलर्जी असणारा दुर्दैवी ! इतकेच!

एक गोष्ट आठवली. मिर्झा गालिब एकदा घरात आंबे खात बसला होता. आंबे खाऊन तो साली दाराबाहेर फेकत होता. बाहेर एक गाढव चरत होते. पण ते आंब्याच्या सालीला तोंड न लावता इतर कचरा खात होते.

ते पाहून मिर्झा गालिबवर जळणारा एक मत्सरी त्याला म्हणाला,
"देखो, गधे भी आम नही खाते"

त्यावर गालिब म्हणाला,
"गधे है जो आम नही खाते"

वरील काही मत्सरी प्रतिसाद बघितल्यावर ही गोष्ट आठवली.

युरोपियन भाषेतील
नव्या शब्दांना जसा ग्रीक्/
लॅटीनचा, उर्दूतील
नव्या शब्दांना जसा अरेबी/
फारसीचा तसा बहुतेक
भारतीय
भाषांना संस्कृतचा आधार
हा नैसर्गिकच आहे.>>अगदी योग्य मुद्दा. प्रश्न संस्कृतकरणाचा नाही, त्या दुर्बोध भाषेचा मराठीवर पगडा बसवण्याचा आहे. सोपा इंग्रजी शब्द जनतेला मान्य असेल(उदा: रुग्णालय ऐवजी hospital) तर त्याऐवजी संस्कृत प्रतिशब्द देऊन लोकांना द्राविडी प्राणायाम करायला लावण्यात काय अर्थ आहे.?

रुग्णालय किंवा इस्पितळ हा सर्वमान्य शब्द आहे. जरा आपल्या भाषेचा काडीचा तरी अभिमान बाळगायला शिका.

एक गोष्ट आठवली.
मिर्झा गालिब
एकदा घरात आंबे खात
बसला होता. आंबे खाऊन
तो साली दाराबाहेर
फेकत होता. बाहेर एक
गाढव चरत होते. पण ते
आंब्याच्या सालीला तोंड
न लावता इतर
कचरा खात होते.>>>सतीश माढेकर अगदी अनुमोदन.जनतेने सहज स्विकारलेले आंब्यासारखे रसाळ शब्द मोडीत काढून दुर्बोध भाषेचा कचरा खाण्यातच काही गाढवे धन्यता मानत असतात.

रुग्णालय किंवा इस्पितळ
हा सर्वमान्य शब्द आहे.
जरा आपल्या भाषेचा काडीचा तरी अभिमान
बाळगायला शिका. >>> मराठीचा अभिमान आहेच. संस्कृतचा दुराभिमान मात्र नाही. Lol

जरा आपल्या भाषेचा काडीचा तरी अभिमान बाळगायला शिका.

आयला घाबरलो.... ! मला वाटलं चुकुन सनातनचा पेपर उघडला की काय!!! Proud

इस्पितळ हे हॉस्पिटलचे निर्बुद्ध भाषांतर आहे... मूळ हॉस्पिट प्रत्ययातून सुश्रुषा हा अर्थ प्रकट होतो.. तसा इस्पि या प्रत्ययातून कसला अर्थ बाहेर पडतो?

जे.बाँ.,

महापौर हा शब्द आचार्य अत्र्यांनी मेयरला प्रतिशब्द म्हणून शोधला. तेव्हा त्यांची अशीच हेटाळणी करण्यात आली. काय हा पोरकट शब्द, इत्यादि, इत्यादि.

मात्र आज हा शब्द सर्वतोमुखी झालाच ना? अंगवळणी पडल्यावर दुर्बोध शब्द सुबोध होतात. प्रश्न केवळ सरावाचा आहे. इच्छाशक्तीला पर्याय नाही.

आ.न.,
-गा.पै.

तसेच Bureaucracy या शब्दाला लो.टिळकांनी नोकरशाही हा सोपा सुटसुटीत शब्द शोधला होता. Happy

>>प्रश्न केवळ सरावाचा आहे. इच्छाशक्तीला पर्याय नाही.
यातच सगळं आलं. इच्छाशक्ती नसेल तर असेच इंग्रजी शब्द घुसत राहतील.

इस्पितळ हे हॉस्पिटलचे
निर्बुद्ध भाषांतर आहे...
मूळ हॉस्पिट प्रत्ययातून
सुश्रुषा हा अर्थ प्रकट
होतो..
तसा इस्पि या प्रत्ययातून
कसला अर्थ बाहेर पडतो?>>>जिथे वैद्याचे अर्थकारणाचे 'इस्पि'त साध्य होते ते इस्पितळ Proud

अंगवळणी पडल्यावर
दुर्बोध शब्द सुबोध
होतात. प्रश्न केवळ
सरावाचा आहे.
इच्छाशक्तीला पर्याय
नाही.>>>अरे हो, मग संस्कृत भाषा का मरणासन्न झाली असावी बरे?

>>अरे हो, मग संस्कृत भाषा का मरणासन्न झाली असावी बरे?
त्यासाठी वेगळा बाफ उघडा. तुमची नेहमीची भंकस इतरत्र करा कृपया.

अंगवळणी पडल्यावर दुर्बोध शब्द सुबोध होतात.

उलट बोलताय.. सुबोध असेल ते अंगवळणी पडते... महापौर शब्द सोपा असल्याने रुळला.. प्रथमनगरनिवासीमहाजन ... असा संस्व्कृत प्रचुर शब्द असता तर चालला असता का?

प्रथमनगरनिवासीमहाजन ...
असा संस्व्कृत प्रचुर शब्द
असता तर
चालला असता का?>>>कित्ती कित्ती सोपा शब्द आहे, जीभेचा व्यायाम होतोय त्याने.

पोस्टमास्तर
हाही धेडगुजरी शब्द.>>त्याऐवजी डाकाधिकारी असा संस्कृत शब्द हवा होता.

>>> त्यासाठी वेगळा बाफ उघडा. तुमची नेहमीची भंकस इतरत्र करा कृपया.

अरे मंदार,

तू इथे एखादी नवीन पाककृती लिहिलीस किंवा अमेरिकेतल्या डिझ्नी लँडवर एखादा लेख टाकलास, तरी इथले काही यडबंबू त्याचा संबंध सावरकर किंवा हिंदुत्वाशी जोडून नेहमीचीच भंकस करत बसतील. तेव्हा असल्यांच्या बरळण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष कर.

@ रानडुक्कर

"पोस्टमास्तर" बद्दल तुम्ही जे म्हणता ते योग्यच आहे, तरीपण मास्तर हे "मास्टर" चे हिंदुस्थानी रूप झाल्याने तेच नाम सर्वत्र (किमान उच्चारासाठी तरी) रुजले. मात्र 'पोस्टमन' हा पोस्टमनच राहिला. ड्रायव्हरचे 'डायवर', क्लिनरचे किन्नर, पंक्चरचे 'पंग्चर', बल्बचे 'बल' आदी या संदर्भातील काही रुळलेली रुजलेली नामे. अत्यंत काटेकोरपणाचे नियम लावल्यास हे उच्चार चुकीचे असतील पण त्यामुळे ते धेडगुजरी वाटत नाहीत.

मात्र पास च्या विरुद्धार्थी म्हणून "नापास" हे मात्र भ्रष्ट रूप. पण तेही आता घट्ट रुजले आहे.

प्रश्न केवळ
सरावाचा आहे.
इच्छाशक्तीला पर्याय
नाही.
यातच सगळं आलं.
इच्छाशक्ती नसेल तर असेच
इंग्रजी शब्द घुसत
राहतील.>>>इथे पोपटपंची करणार्यांना एक प्रश्न ,तुमच्यापैकी किती जणांचे पुत्र, पुत्री मराठी शाळेत शिकतात?.नाहीतर मुले कॉन्व्हेंटमधे आणि बाप इथे मराठीच्या गमजा मारतोय असे व्हायला नको.
वि.सु:- बाप हा शब्द अस्सल मराठी आहे.

Pages