श्री. कल्पेश गोसावी यांची सुलेखनचित्रे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ब्राह्मणें बाळबोध अक्षर | घडसुनी करावे सुंदर |
जें देखताचि चतुर | समाधान पावती ||
वाटोळें सरळें मोकळें | वोतलें मसीचे काळे |
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे | मुक्तमाळा जैशा ||
अक्षरमात्र तितुकें नीट | आडव्या मात्रा त्या हि नीट |
आर्कुली वेलांड्या ||
पहिलें अक्षर जें काढिलें | ग्रंथ संपेतो पाहात गेलें |
येका टांकेंचि लिहिलें | ऐसें वाटे ||
अक्षराचें काळेपण | टांकाचे ठोसरपण |
तैसेचिं वळण वांकाण | सारिखेंचि ||

आधुनिक सुलेखनकलेचे भीष्माचार्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री. र. कृ. जोशी यांनी भारतीय सुलेखनकलेला जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून दिली. भारतीय भाषांतील टाइपफेस तयार करण्याचं श्रेय सर्वस्वी रकृंचं आहे. मात्र रकृंना अभिप्रेत असलेलं सुलेखन काही वेगळंच होतं. रकृंनी अक्षरांचा, शब्दांचा वापर करून अप्रतिम चित्रशिल्पे घडवली. रकृंची अक्षरं रसिकाशी थेट संवाद साधत. त्या अक्षरांतून, शब्दांतून उमटलेला भाव जाणून घ्यायला इतर कुठल्याही माध्यमाची आवश्यकता भासत नसे. रकृंनी अनेक धाडसी प्रयोग केले. त्यांची हॅपनिंग्ज, 'सत्यकथे'च्या मुखपृष्ठावर झळकलेला विसाचा पाढा ( २० x १ = २०, २० x २ = २०.... इंदिरा गांधींच्या वीस कलमी योजनेचा आणि एकाधिकारशाहीचा तो भन्नाट निषेध होता ) अशा अनेक गोष्टी त्याकाळी अनेकांना सहज पचवता आल्या नाहीत. मात्र आज रकृंनी करून ठेवलेल्या कामाची व्याप्ती आणि महती कळते.

रकृंचा वारसा आज समर्थपणे चालवणार्‍यांपैकी एक मनस्वी कलावंत म्हणजे श्री. अच्युत पालव. पालवांनी सुलेखनकलेला व्यावसायिक रूप दिलं. ही सुलेखनचित्रं केवळ कागद आणि कॅनव्हासापुरती मर्यादित राहिली नाहीत. भिंती, दारावरील पाट्या, घड्याळं, फॅशन शोमधील मॉडेलांची शरीरं अशा अनेक ठिकाणी पालवांची सुलेखनचित्रे दिमाखात विराजमान झाली. स्वयंपाकघरातील उपकरणे, सिरींज, टूथब्रश यांसारख्या साधनांचा वापर करत अक्षरं आणि शब्दांच्या माध्यमातून त्यांनी काढलेली सुलेखनचित्रे जगभरात तर गाजलीच, पण भारतीय सुलेखनकारांना त्यामुळे अनेकानेक व्यावसायिक संधीही उपलब्ध होत गेल्या.

श्री. कल्पेश गोसावी हे आधुनिक भारतीय सुलेखनकारांच्या तिसर्‍या पिढीतील एक कलावंत. सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टचा विद्यार्थी असलेल्या कल्पेशनं सुलेखनकलेच्या क्षेत्रात अल्पावधीतच नाव कमावलं आहे. असंख्य शिबिरे, प्रदर्शनं आणि स्पर्धांतून त्याच्या सुलेखनचित्रांचं कौतुक झालं आहे. FCB Ulka या जाहिरातसंस्थेने त्याला दोन वर्षांपूर्वी सर्वोत्कृष्ट सुलेखनकार म्हणून गौरवलं आहे. गेल्या वर्षी जेजेनं सर्वोत्कृष्ट सुलेखनकाराचं बक्षीसही त्याला दिलं आहे.

DSC_2267.jpg

रकृ, अच्युत पालव आणि कल्पेशची सुलेखनचित्रं म्हणजे चित्र आणि त्याच्या जोडीला सुलेखन असा प्रकार नाही. अक्षरं किंवा शब्दं यांचाच अनोख्या प्रकाराने वापर करून ही चित्रं साकार होतात. ही अक्षरं असं काही रूप घेतात की वेगळ्या चित्रांची आवश्यकताच भासत नाही.

सुलेखनकलेतील नवीन प्रयोगांची आणि कल्पेशच्या सृजनशीलतेची मायबोलीकरांना ओळख व्हावी, म्हणून कल्पेशने रेखाटलेली ही काही सुलेखनचित्रे..

१. मेघाक्षरे

meghakshare.jpg

२. केतकीच्या बनी..

ketakeechyaa_banee.jpg

३. देवनागरी अक्षरे

2.jpg

४. तुका म्हणे

5.jpg

५. रोमन सुलेखन

9.jpg

६. पांडुरंग

12.jpg

७. अक्षर

14.jpg

८. दिवाळी शुभेच्छापत्र

15.jpg

९. पाऊस

16.jpg

१०. सावन आयो रे

30.jpg

११. मोडी लिपी

31.jpg

१२. चल पंढरीसी जाऊ

32.jpg

१३. अक्षरगणेश

33.jpg

प्रकार: 

चिनूक्स, खासच आहे हे... मस्त एकदम.

यंदाचे मायबोली टी-शर्ट अशी सुलेखनचित्रं वापरून करता येतील का?

चिन्मय, सुरेख लेख! कल्पेशचे अभिनंदन आणि त्याला शुभेच्छा.
मंजूच्या कल्पनेला अनुमोदन.

सुरेख... खुपच आवडली. माझ्या मुलीलाही खुप रस आहे याच्यात.. तिला हा लेख नक्की दाखवणार..

चिनुक्स खुप खुप आभार, कल्पेशची ओळख करुन दिल्याबद्दल...

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

मायबोली दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ आवडले होत म्हणुन नेट वर या कलाकाराचा आणि कलाकृतींचा शोध घेतला होता. बहुतेक भारतीय कलाकारांप्रमाणे त्यांचाहि वेब प्रेझेंस फारसा नाही आणि त्यांच्या ब्लॉग वरही फार्से अपडेट नव्हते , त्यानंतर येक दिवस orkut वर येका calligraphy कम्युनिटी मधुन त्यांच्या प्रोफाईल ची लिंक मिळाली आणि सुलेखनाचा खजिनाच सापडला.
chinoox- नव्याने ओळख करुन दिल्याबद्दल आभार

सुंदर, वेगळ्या विषयावरचा लेख. जगातला पहिला युनिकोडमधला देवनागरी फाँट, मंगल, र.कृं. चा. नंतर तो Microsoft ने वितरीत केला. आज आपल्याला मायबोलीवर युनिकोडमधे वाचता येतंय त्याची सुरुवात र. कृं च्या प्रयत्नामुळे झाली असे म्हणता येईल.
र. कृं नी केलेले मराठी कवितांवरचे प्रयोग पाहण्यासारखे आहेत. मुद्दाम पाहण्यासारखे म्हटलं कारण कविता ही दृष्य स्वरूपातही कसा भाव निर्माण करू शकते याबद्दलचे ते प्रयोग आहेत. आय. आय. टीत एकदा "चव्हाटा" किंवा "तंत्र" चा अंक काढण्याच्या संदर्भात त्यांची भेट झाल्याचे अंधूक आठवतेय. पण त्यावेळेस Caligraphy ला मराठीत काय म्हणतात हे ही माहिती नव्हते आणि सुलेखन हा शब्दही प्रचलित नव्हता. (Font, Unicode तर त्याहून दूर)

एका वेगळ्या क्षेत्रात मिळालेल्या यशाबद्दल कल्पेशचे अभिनंदन.

पणती, सावन आयो रे ने मनात घर केलं.
चांगला परिचय. कल्पेशच्या वाटचालीस शुभेच्छा.

अ प्र ती म !

कल्पेशला अनेकानेक शुभेच्छा !
**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

खुप छान माहीती !!
अ प्र ती म !
**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

अत्यंत देखणी आहेत हि चित्रे. कल्पेशची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

सुरेखच आहेत सुलेखन चित्रं. केतकीच्या बनी, अक्षरगणेश, रोमन सुलेखन खास करुन आवडले.

चिनूक्स, जबरदस्त........ आहे हे... मस्त एकदम.

यंदाचे मायबोली टी-शर्ट अशी सुलेखनचित्रं वापरून करता येतील का?
मंजू चा मुद्दा मलाही उचलून घ्यावासा वाटतोय...........

----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

सुरेख सुलेखन, कल्पेशची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!
-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

पणती चांगली आली आहे.
एकूणच मस्त आहे सुलेखन.

सुंदर !!! अप्रतिम !!
केतकीच्या बनी, पणती, पाऊस आणि अक्षर गणेश फारच सुंदर. Happy

****************
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान! Happy

आहा मस्तच.. मला हा प्रकार फार आवडतो. अच्युत पालवांच्या साईटला नेहेमी भेट दिली जातेच. कल्पेश गोसावींची साईट आहे का रे ?
~~~~~~~~~

कल्पेशची साईट नाही, पण त्याने काढलेली काही सुलेखनचित्रे या दुव्यावर पाहता येतील..

http://www.orkut.co.in/Album.aspx?uid=5780557922435707975&aid=1209688031

तसंच महाराष्ट्र टाईम्सच्या संकेतस्थळावरही कल्पेशने काढलेली सुलेखनचित्रे wallpapers म्हणून वापरली आहेत.

वा वा ग्रेट ग्रेट्.चिन्मय तू नॅनो वॅनो सोडून सरळ सरळ लेखक बन.कल्पेशची अक्षरचित्रे अप्रतिमच.एक से बढकर एक! फार फार ग्रेट ! त्यांना आनंदवनला आण कधी तरी.दादा पण हे करीत असे कधीकाळी.त्याला आवडेल खूप.

महान! आशयवेधी आणि आकर्षक सुलेखन!
इतकी छान सुलेखनचित्रं दाखवल्याबद्दल कल्पेशाला आणि तुला मनःपूर्वक धन्यवाद!
बरं, चिनूक्सा, र.कृ. जोश्यांबद्दल थोडी अधिक माहिती लिही रे; वाटलं तर एखादा स्वतंत्र लेख म्हणून लिही.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

सुंदर! अफाट कल्पनाशक्ती आणि कौशल्य!
कल्पेशना शुभेच्छा!

जबरीच.. चिनूक्ष कल्पेशची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद..
अतिशय मनमोहक आणि चित्तवेधक कलाकृती.. खूप्पच आवडल्या..
र. कॄं. जोशी आणि पालवांबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल...

चिन्मय, मस्त लेख. सुलेखनचित्रे अप्रतिम आहेत.

र. कृ. जोशींबद्दलही अजून माहिती वाचायला नक्कीच आवडेल. तेव्हा नवीन लेखाचं मनावर घेच. Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

अफाटच आहेत ही सुलेखन चित्रे!!
चिन्मय तुझे लाख लाख धन्यवाद, उभरत्या कलावंताची ओळख तू आम्हाला करुन देतोयस!!

केतकीच्या बनी, अक्षर, पणती आवडले. तसेच सावन आयो रे ची कलर स्किम खूपच मस्तय!!

ऑर्कूटवरची पण सुलेखन चित्रे अवश्य पहा. तिथे तर इतर भाषांमधले पण सुलेखन केलय!! मान गये कल्पेश!!

------------------------------------------
क्यूं इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू
दुनिया सजी तेरे लिये, खुदको जरा पेहचान तू!

सुंदर. दिवाळी अंकाच्यावेळी पहिल्यांदा या कलाकाराचे काम बघण्यात आले होते. एकदम भन्नाट कल्पना आहेत. ही सुलेखनचित्रे मायबोलीवर विक्रीकरता ठेवता येतील का?
मंजु, विनय दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ बघितल्यापासुन अगदी तुमच्या सारखेच मायबोली टीशर्टचे माझ्या डोक्यात आले होते. तस अ‍ॅडमिनना सुचवावे असे पण वाटले होते पण ते झाले नाही. आता सगळे मिळून सुचवुयात. Happy
खरच यावर्षीचा माबो टीशर्ट कॅलीग्राफीवाला बनवला गेला तर छान होईल.

'पा ऊ स' हे चित्र नितांत सुंदर आहे. सगळीच चित्र इतकी भावपुर्ण आहे की अक्षरांच भावपुर्ण दर्शन घडलं.

सर्वच चित्रे खूप छान आहेत. या कलाकाराबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल.
--------------
नंदिनी
--------------

सुरेख. उच्च . शब्द जिवंत होतात अस आतापर्यंत ऐकलेल. हेच असाव बहुदा ते अस वाटल.

अतिव सुंदर!!
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

ओह गॉड.. असं जमू शकतं!???
किती किती सुंदर आहेत ही अक्षरं? केतकीच्या बनी तर जे बसलंय ना डोक्यात!
अफाट आवडलं!!

मायबोलीने जर यांच्या सुलेखनाचा टीशर्ट केला.. पांढरा शुभ्र टीशर्ट आणि सावन आयो रे किंवा केतकीच्या बनी , किंवा सगळेच.. तर मी नक्की घेणारच, पण माझ्या माहीतीतल्या सगळ्यांना घ्यायला लावेन!
प्लीज विचार करा या सुचनेचा!

Pages