म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३३ (विजय पाटील)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 19:28
MMGG.jpg

चित्रसंच ३


मायबोली आयडी - विजय पाटील
पाल्याचे नाव - चिराग पाटील
वय - १२ वर्षे
गोष्टीचे नाव- अमितची गोष्ट




अमितची गोष्ट

माझे नाव चिराग पाटील आहे. मी अमितची कथा सांगणार आहे.

एक छोटेसे गाव होते. त्या गावाचे नाव रामपूर होते. तेथे एक आठ वर्षाचा मुलगा राहत होता. त्याचे नाव अमित होते. एके दिवशी तो शाळेमधून घरी आल्यानंतर आईला म्हणाला, " मी बाहेर खेळायला जाऊ का?". आकाशात खूप काळे ढग आले होते म्हणून आई म्हणाली," पाउस केव्हाही येईल तर तू घरीच अभ्यास करत बस." पण अमित साईकल घेऊन बाहेर गेला.

त्याचे मित्र जवळच राहत होते. अमितने त्यांना बाहेर खेळण्यासाठी बोलाविले , पण मित्रांच्या पालकांनी नकार दिला. त्याला वाटले की सगळे आई-बाबा सारखेच असतात. आम्हा लहान मुलांना खेळायला देत नाहीत. ते सारखे अभ्यास करायला सांगतात. असा विचार करत तो साईकलवर बसला आणि रस्त्या वरून निघून गेला. तो त्याच्या घरापासून खूप ढूर गेला होता. आकाशात वीज चमकली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो दाट जंगला जवळ आला आहे.

तो खूप घाबरला आणि रडूलागला. पाउस पण पडू लागला. थोड्या वेळाने त्याला एक आजी भेटली. आजीला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. आजी त्याला तिच्या घरी घेऊन गेली. त्याला आई-बाबांची फारच आठवण येत होती.

इकडे रामपूर मध्ये त्याचे आई, बाबा, आणि त्याचा भाऊ त्याला शोधात होते. दुसरया दिवसाची पहाट झाली. आई तर रडतच होती. सर्व शेजारी जमा झाले होते. सर्वांनी आजू-बाजूच्या गावामध्ये जावून शोध घेण्याचे ठरवले. एकाने तर आजू-बाजूच्या गाव मध्ये दवंडी देण्याची सूचना केली ती सर्वांनाच आवडली. सर्वजन अमितला शोधायला निघाले.

अमितने रडत रडतच चहा घेतला. आजी त्याला धीर देत होती. तोपर्यंत गावामध्ये काहीतरी आवाज आला. खरोखरच ती दवंडी अमित साठीच होती. ती ऐकून ते त्या दिशेने गेले. अमितने त्याच्या काकांना पाहीले आणि मिठी मारली.

काका अमितला घेवून रामापुरला पोहचले. आई-बाबांनी अमितला मिठी मारली.. अमितने आईची माफी मागितली. त्या दिवसापासून अमित आई-बाबांची आज्ञा पाळत गेला.
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy