जाफ्फा मिनी केक्स (फोटोसहित)

Submitted by लाजो on 27 February, 2012 - 22:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जाफ्फा केक :

२ कप सेल्फ रेसिंग फ्लार (२ कप मैदा + दीड टीस्पून बेकिंग पावडर)
७० ग्रॅम बटर
२ अंडी (हलकी फेटुन)
१/२ कप साखर
१/२ कप चॉकलेट चिप्स (डार्क किंवा मिल्क चॉकलेट)
१/२ कप संत्र्याचा ज्युस/रस
३/४ कप दूध
१टी स्पून संत्र्याची साल किसुन (झेस्ट) / संत्रा इसेन्स

चॉकसॉस (ऐच्छिक):

१/२ कप चॉक चिप्स,
१/४ कप क्रिम,
संत्र्याची साल किसुन (झेस्ट) / संत्रा इसेन्स (ऐच्छिक).

क्रमवार पाककृती: 

IMG_1319.JPG

१. सर्वप्रथम ओव्हन २०० डि सेंटीग्रेडला तापत ठेवा. मफिन/कपकेक ट्रे मधे पेपर केसेस ठेवा. किंवा छोट्या केक टीन्स ला बटर आणि मैदा लावुन तयार ठेवा.

२. मोठ्या बोल मधे से रे फ्लार किंवा मैदा+बेपा मिश्रण २ वेळा चाळून घ्या. यात बटर घालुन हाताने चोळून घ्या.

३. यात साखर, फेटलेली अंडी, संत्र्याचा रस, दूध, चॉक चिप्स, किसलेली संत्र्याची साल/इसेन्स एक एक करुन घाला आणि स्पॅच्युला/स्पॅट्युला किंवा लाकडी चमच्याने नीट मिक्स करुन घ्या. खुप जास्त फेटायची गरज नाही.

४. हे मिश्रण तयार केक तीन्स्/पेपर कप मधे घाला आणि १५-२० मिनीटे बेक करा.

IMG_1309.JPG

५. केक तयार आहेत का हे लोकरीची सुई, स्क्युअर टोचुन खात्री करुन घ्या आणि ओव्हन मधुन बाहेर काढुन थंड
व्ह्यायला ठेवा.

IMG_1311.JPG

६. आता एकीकडे चॉक सॉस बनवा. हिटप्रुफ बोल मधे चॉक चिप्स काढुन घ्या. क्रिम एका पातेल्यात ओतुन गरम करायला ठेवा. जस्त वरती हलके बुदबुदे दिसायला लागले की आच बंद करा आणि हे गरम क्रिम चॉक चिप्स वर ओता. चमच्याने ढवळत रहा. गरम क्रिमच्या हीट मुळे चॉक चिप्स वितळतील आणि चॉक सॉस तयार होइइल. यात आवडत असेल तर किसलेली संत्र्याची साल / इसेन्स घाला.

IMG_1314.JPG

७. थंड झालेल्या केक्सच्या टॉप्स ना एक एक करुन या सॉस मधे बुडवा आणि बाजुला ठेवा. थोड्याच वेळात चॉक सॉस सेट होइल. आणि मग जाफ्फा मिनी केक्स खायला तय्यार Happy

IMG_1315.JPG

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात छोटे २४ केक्स होतात किंवा मफिन साईझचे १२ केक्स होतात.
अधिक टिपा: 

१. चॉक सॉस करण्यापूर्वी केक पूर्ण थंड झाले आहेत ना याची खात्री करुन घ्या.
२. चॉक सॉस न करता नुसतेच मेल्टेड चॉकलेट वापरले तरी चालेल.
२. सजावटीसाठी जाफ्फा बॉल्स/चॉक बॉल्स / किंवा नुसती आयसिंग शुगर आणि किसलेली संत्र्याची साल वापरता येइल.
४. मुळ रेसिपी मधे ६० ग्रॅम बटर आणि १/२ कप दूध वापरले आहे परंतु या प्रमाणाने पहिल्यांदा केलेले केक जरा कोरडे वाटले म्हणुन या वेळेस मी बटर थोडे जास्त आणि दूध ३/४ कप वापरले. केक टॉप्स मस्त क्रिस्पी आणि केक्स आतुन चांगले सॉफ्ट झालेत.

माहितीचा स्रोत: 
पाकृ मासिकातिल ओरिजीनल केक रेसिपी. त्यात थोडे बदल आणि चॉक सॉसची अ‍ॅडिशन.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, तुझी रेसिपी वाचल्यावर आज मला इथल्या सुपरमार्केटमध्ये पहिल्यांदाच जाफ्फा केक्स आणि जाफ्फा मिनिकेक्स दिसले. आधी लक्षच गेले नव्हते. पण तू बनवलेले केक्स त्या पाकीटावरच्या केकच्या चित्रांपेक्षा खूपच जास्त छान दिसत आहेत Happy

धन्स परत एकदा Happy

अगो,

तु म्हणत्येय्स ते जफ्फा केक्स हे अ‍ॅक्च्युअली बिस्किटासारखे असतात... हे बघ हे असे...

jaffas 2.jpg

अगं ही रेसिपी वाचल्यापासून आता मला जिथेतिथे जाफ्फा केक्स दिसत आहेत Happy तू म्हणतेस ते बरोबर आहे दुसर्‍या दुकानात मी तू वर चित्र दाखवले आहेस तशीच बिस्किटं पाहिली. पहिल्यात मला नक्की आठवत नाही पण ती बिस्किट्सच असणार. मफिन्सच्या सेक्शनमध्ये नव्हते एवढंच आत्ता आठवतंय.

लाजो,

यात वापरायचा संत्रा ज्यूस हा रेडिमेड ज्यूस चालेल का ?

मी कुठेतरी वाचले कि बेकिंग रेसिपीमधे नेहमी ताजा ज्यूसच वापरावा कारण रेडिमेड ज्यूसने कडवट चव येते.

तुझ्या बेकिंगच्या रेसिपीज मस्त असतात. वाचून करायचा मोह होतो आणि जशीच्या तशी रेसिपी फॉलो केली तर मोहाला बळी पडल्याचा अज्जिबात पश्चात्ताप होत नाही. Happy

Pages