अचानक भेटलेली कला, कल्पकता, सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28

आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.

तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्‍यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला, माझे अर्काईव्ह्ज शोधायला वेळ मिळत नाहिय्ये. पण इथले फोटो बघून, त्या
कलाकारांचे ते टिपणार्‍या तूम्हा रसिकांचेही, कौतुक करावेसे वाटते आहे.

बेफिकीर, आधी धाग्याचं नाव 'मला भेटलेली कला' एवढंच होतं. त्यावेळी तुम्ही या शीर्षकावरून माझ्यावर कॉपीराईटचा गुन्हा दाखल कराल अशी भिती वाटत होती. >>>>>

आपणही माझ्यावर विनोद करता? Sad

सेलिंग कमोडिटी झालोय असे दिसते आता Proud

करा करा, जियो Lol

@ काया : कातकरी लोक मधाची पोळी काढताना एका विशिष्ट झाडपाल्याचा रस अंगाला चोळतात असं ऐकलं आहे.

धन्यवाद मामी, मंजूडी....

या धाग्यावरच्या सगळ्याच कलाकृती सुन्दर आहेत...
माझ्याकडे ही काही कलाकृतींचे प्रचि आहेत , पण image size मोठी असल्याने upload करता येत नाहीत... जरा R&D करावा लागेल काहितरी...

सर्वच कलाकृती अतिशय सुरेख आहेत. इथे शेअर केल्याबद्दल धन्स तुम्हा सर्वांनाच Happy

आश्चिग चे फोटो दिसत नाहीयेत मला Uhoh

सगळ्याच कलाकृती छन आहेत.
सुलेखा हे सगळं महाशिवरात्रीनिमित्त देवळात केलं होतं का?

गोव्यातल्या एका हेरीटेज घरातल्या या मेरी आणि बाळ येशूच्या तसबिरी. यातच आई-बाळाच्या काही तसबिरी आहे. मस्त थीम घेऊन एक भिंत छान सजलीये. डावीकडे वरून दुसरं जामिनी रॉयचं पेंटिंग ओळखू येतंय.

आर्च्,महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या देवळासमोर हा सुंदर देखावा मांडला होता .बर्फाची मोठी पिंडी व भाज्यांचे डेकोरेशन केले होते .संस्कारभारतीची सुरेख रांगोळी मांडली होती.भांग विरहीत दुध,फळे व उपवासाच्या पदार्थांचा भंडाराही दिवसभर चालु होता.जोडीला भजनी मंडळांची सुंदर भजन प्रस्तुती...एकुण शिवमय वातावरण होते.

व्हॉट अ धागा..... झक्कास कल्पना, मामी.
सग़ळ्यांनीच काय एकेक सुरेख फोटो टाकलेत...
मजा आया.

अश्चिगच्या फोटोतलं पाऊल पाहून आधी मी दचकलेच Happy

दुधी भोपळ्याची मगर अक्राळ विक्राळ न दिसता गोड दिसतेय आणि जीभ काढून दाखवतेय Lol

मीरा, परत एकदा धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल Happy

इन्ना, काय काय वस्तु वापरून या क्यूट क्लिप्स बनवल्यात! पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांची बुचं, बटणं, मेंथॉस, शंखशिंपले ..... एकदम वॉव!!! Happy

तु केल्यात का?

ती नथ ब्राह्मणी वाटत नाहिये. ब्राह्मणी नथ आडवी असते.<<
अंजली, अश्विनी...
ती ब्राह्मणी नथच आहे. ती ज्या प्रकारे पहुडलीये त्यामुळे ती नथ नाकालगत झालीये. किंवा मॉडेलने चापाची नथ घातली असावी. Happy
बाकी ऑथेंटिक मराठा नथ म्हणायची झाली तर ती सोन्याची असते. सोन्याची नक्षी आणि एक लाल खडा. सोवनींच्या पुस्तकात चित्र आहे.

हो पण साडीला ब्राह्मणी ओचा मात्र नाहीये.
बाकी चंद्रकोर, साडीचा रंग इत्यादी सगळं ब्राह्मणीच आहे.

शपथ्थ काय सही बाफ आहे!! एकसे बढकर एक कला!! Happy
जिप्सी तु टाकलेल्या चित्राचे चित्रकार बहुतेक मुळगावकर म्हणून आहेत. खामकरांचे चित्र तर भन्नाटच.
मामी तुमच्या खुर्च्या कसल्या गोड आहेत.

माथेरानहून छोट्या झुकझुकगाडीतून येताना अचानक मध्येच गणपतीबाप्पांनी असं दर्शन दिलं. Happy

धागा फार सुरेख आहे! आणि सगळ्यांनीच मस्त प्रचि टाकलेत! आता गडबडीट बघितलेत, परत सावकाशीने बघून लिहीन. जमल्यास माझ्याकडे काही असेल तर तेही इथे डकवेन.

आमच्या कॉलेजात दरवर्षा दोन वर्षांनी अंडरग्रॅड स्टूडंट्स भिंती रंगवायचे. आम्ही तिथे असताना आम्ही पण भाग घेतला होता. सापडलेच तर त्याचे फोटो टाकते. आत्ता लगेच शोधायला पळतेय.

DSC00277.JPG

ही एक भिंत. माझ्याकडे सगळे आम्चे ग्रूप फोटोच आहेत. बॅकग्राउंडला कॉलेजतल्या भिंती, पुतळे, डोम असं सगळं. त्यामूळे फोटोतल्या माणसांकडे दुर्लक्ष्य करा. Happy

ही पिवळ्या रंगातली भिंत रंगवायला आम्ही पण मदत केली होती. Happy

.

Pages