माझे चित्रकलेचे प्रयोग

Submitted by कंसराज on 20 February, 2012 - 11:33

मी काढलेली दोन चित्र येथे देत आहे. आवडल्यास जरुर कळवा

१.

Houston Zoo Jan 8-1.JPG

२.

Houston Zoo Jan 8-1-3.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!!

वॉव, क्युट आहेत.

पहिल्या चित्रातला तो छोटा पपी जास्त आवडला. आई बाहेर गेली आहे, तेव्हा मोठा दादा आणि दु:खी चेहर्‍याने आईची वाट बघणारा छोटा भाऊ असे दिसताहेत ते दोघं. मोठा शिष्ठ आणि छोटा गरीबड्या चेहर्‍याचा.

माऊ एकुणच मस्त, पण डोळे सह्हीच ! फर पण छान जमली आहे. फार ढालगज वाटते आहे. Happy

अरे वा, एकेक नवीन कलाकार मिळताहेत मायबोलीला.
चित्रे छानच आणि मनिमाऊच्या प्रतिक्रिया पण.

शापित गंधर्व , मनिमाऊ, विनार्च , दिनेशदा, तोषवी, आर्च , श्री, महागुरु, जागोमोहनप्यारे, डॅफोडिल्स, अभिप्रा आणी लाजो प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

मस्त्.पहिल्या चित्रात मोठा जवाबदार दादाला बिलगुन "आपल्या आई"ची वाट पहाणारा छोटा,डोळ्यातले भाव एकदम मस्त जमले आहेत तर दुसर्‍या चित्रातली ढालगज दादा-छाप माऊ" हम भी कुछ कम नही" असे म्हणतेय ..

छानच जमलीयेत की! "प्रयोग" काय म्हणताय? Happy
डोळे उत्कृष्ट जमलेत. डोळ्यान्सहित सर्वान्गातुन भावदर्शन पुरेपुर साधलय.

त्या कंसाने इतकी सुंदर चित्रं काढली असती तर श्रीकृष्ण त्याला मारायचे विसरून चित्र बघण्यातच दंग झाला असता. माजरीचे डोळे एकदम भारी आलेत. एकदम काचेच्या गोट्या - लबाडपणाने भरलेल्या.

दोन्ही चित्रे केवळ अप्रतिम.
पण भू भू जरा जास्तच गोड.
अजून येउद्यात.

Pages