भ्रष्टाचार

Submitted by खमंग चिवडा on 18 February, 2012 - 06:07

भ्रष्टाचार संपणार कधी?
याला जबाबदार कोण?
विरोधी बोलणारे नुसते बोलतात वेळ आली की तेच भ्रष्टाचार करतात.
याला अंत नाही असेच म्हणावे का?
प्रत्येकाला जर भ्रष्टाचार संपावा असे वाटते तर तो संपत का नाही उलट वाढतोच आहे, लोक भ्रष्टाचाराला सरावले आहे, निर्ढावले आहे. अशात एखादा जोरात आवाज करतो तेव्हा त्याचा आवाज केव्हा, कसा, कुठे दाबला जातो कळत पण नाही. पुन्हा जैसे थे.
आळी मीळी गुप चिळी आहे का?.
असल्यास शासनानेच भ्रष्टाचार कायदेशीर करावा का.

तुम्हाला काय वाटते?

गुलमोहर: 

अर्थात मला भ्रष्टाचार नकोच आहे परंतु आता तो सर्व मान्य झाल्यासारखाच आहे तर शासनाने कायदेशीर करावा.

यावर एक गोष्ट - एकाला काहीतरी बारीक सारीक कारणावरून पोलीसने पकडला. सायकल इथे ठेवावी लागेल म्हणाला. तो माणूस म्हणाला, अहो जरा बघा ना, शंभर रुपयात काम झाले तर, कशाला उगाच तुम्हाला त्रास नि मला त्रास. तर तो पोलीस म्हणाला, हे माझ्या अधिकारात नाही, तुम्ही आमच्या साहेबांकडे चला. साहेब म्हणाले, मला करता येण्याजोगे आहे, पण हजार रुपये लागतील. तो माणूस म्हणाला, अहो पण हजार? , त्यापेक्षा सरळ सरळ चारशे रुपये दंड करा कायदेशीरपणे, नि मला जाउ द्या सायकल घेऊन. साहेब म्हणाले अहो, तुम्ही आता एकच कायदा मोडला नसून लाच देण्याचा प्रयत्न करणे हा आणखी एक गुन्हा केला आहे, नसेल मिटवायचे हजार रुपयात, तर माझ्या साहेबाकडे चला!!

त्त्याने मुकाट्याने हजार रुपये दिले, नि पुनः कानाला खडा, लाच लुचपत करायची नाही, भ्रष्टाचार करायचा नाही!!

मी_मराठी,

भ्रष्टाचार म्हणजे पैसे खाणे असं धरून चालतोय मी. जर पैसे घेणे शासनसंमत झाले तर शासकीय कर्मचारी नेमून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे मागतील. त्यामुळे जुनाच प्रश्न नव्याने उभा राहील.

आ.न.,
-गा.पै.

भ्रष्टाचार म्हणजे पैसे खाणे असं धरून चालतोय मी. जर पैसे घेणे शासनसंमत झाले तर शासकीय कर्मचारी नेमून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे मागतील. त्यामुळे जुनाच प्रश्न नव्याने उभा राहील.
>>>
हा धोका आहेच याचा अर्थ नो ऑप्शन का?