तो, ती आणि मैत्री...अंतीम

Submitted by प्रज्ञासा on 23 November, 2011 - 03:28

विचारांच्या गुरफट्यात अजय असताना ती आली.
" काही विशेष दिसतंय आज.. " अमू हसत हसत म्हणाली.
" काय - काय विशेष .. काहीच नाही.. तुला का असं वाटतंय..?"
" दोन तीन गोष्टी आहेत.. एक तर आज तू ह्या गाडीतल्या बाप्पाला फूल ठेवलंयस.. मला वाटतं पहिल्यांदाच देवाला खूष करायचा प्रयत्न आहे तुझा.."
" देवाला नाही ..देवीला खूष करायचंय.."
"म्हणजे..???" अमू बावरून बघायला लागली अजयकडे.
" म्हणजे वाघाचे पंजे.. काही नाही.. दुसरी गोष्ट काय वाटली तुला विशेष..?"
" तुझा पर्फ्यूम.. छान आहे.."
" अगं तूला त्रास नको म्हणून आपलं.."
" मला? मला काय त्रास..?"
" अगं कालच्यासारखं तुला जर पुन्हा माझ्या मिठीत यावसं वाटलं तर.. मी बिचारा कष्टकरी मराठी माणूस.. माझ्या घामाच्या वासाने तुझ्या नाकातले केस जळू नयेत म्हणून आपलं.. थोडसं.. यू नो.."

"........" काहीच नाही बोलली ती. मान खाली घालून बसून राहिली.

" अगं गंमत केली.. तू कधीपासून मला सिरीयसली घ्यायला लागलियस?" अजयने सारवून नेण्याचा प्रयत्न केला.

"अजय्..काल.. काल जे काही घडलं त्यासाठी मी.. मी फक्त माफीच मागू शकते... गेलेला क्षण पुन्हा नाही येत.. " अमू म्हणाली
" वेडी आहेस का.. ? .. बरं सांगा कुठे जायचंय आपण..?"

" तू म्हणशील तिकडे."

" बरं मग पहिले सीसीडीत जाऊ या.. एक कॉफी पिउन मग ठरवूया..? तुला काही शॉपिंग करायचिये का..?"

" हो.. तुळशीबाग.." अमू हसत हसत म्हणाली.

"आणि काय गं, आज काय तू लहानपणीचा ड्रेस घालून आलियेस की काय.."
" काकूने दिलाय ह टॉप.. चांगला तर आहे.. काय प्रॉब्लेम आहे ह्यात.." अमू वैतागत म्हणाली.
" काय चांगलं आहे गं.. एकदम बेकार आहे.. बदलून ये.."

" काय प्रॉब्लेम आहे अजय..?" अमू वैतागलीच होती.

" सांगितलं तर रागावशिल.. बॉईज् च्या भाषेत.."
" काय काय.. बोल ना"

" आमच्या भाषेत फार inviting आहे. एक तर ट्रांसपरंट आहे.. त्यात गळापण मोठा.. आणि तोकडा पण आहे.. रंग बराय पण बाकी.."

" अजय ह्याला लखनवी म्हणतात...!" ती चिडून म्हणाली.
" काही का असेना.. हे असले कपडे घालून तुळशीबागेच्या गर्दीत जायचं.. मला नाही पटत्...तू चेंज करून ये ना.."

" त्यापेक्षा तूच प्लान चेंज कर.. घरी जा... मी नाही येत तुझ्यासोबत.. बाय".. अमू चिडली होती.." आणि मैत्रीण आहे म्हणून अश्या भाषेत नाही बोलायचं माझ्याशी.. 'inviting'' वगेरे.. समजलं..?"

" o.k. sorry..! जाऊ दे.. मला त्यातलं काही समजत नाही.. चल जाऊ या.. " अजयने गाडी स्टार्ट केली." पण आज फार छान दिसतियेस तू.. फेसपॅकचा परिणाम आहे का मगासच्या..? " अजय म्हणाला.

"तुला हवाय का माकडा तो फेसपॅक? तुझ्या जिभेला काही हाड..? किती बोलशिल.."
"तुला आवडत नाही मी बोललेलं..?" अजय हिरमुसल्याची अॅाक्टिंग करत म्हणाला.."

"तसं नाही महाराज... पण थोडं कंट्रोल करा..मुलींशी जरा अदबीनं बोला.."

" बरं "मुली".. गाणी लावू आपली आज्ञा असेल तर??"

" मर्जी तुझी..!"

अजयने एफ एम लावला.

"छूपाना भी नही आता,
बताना भी नही आता
हमें तुमसे मोहब्बत है..
बताना भी नही आता"

झटका लागला अजयला.. ह्या एफ एम वाल्यांना बरं माझ्या मनातलं समजलं.. गाणं बंद करून तो तसाच गाडी चालवत राहिला.

सीसीडीमधे..अजय काहीच बोलत नाहिये बघून अम्रुता शेवटी म्हणाली.. " मगाशी राग आला वाटतं..?"

" नाही. अमू मला काही खूप महत्वाचं बोलायचंय.. खूप खूप महत्वाचं.. माझ्या उभ्या आयुश्याचा प्रश्न आहे.."

" काय अजयसाहेब प्रेमाबिमात पडलात की काय..!"

" कसं माहित तुला..?" अजय चपापलाच..

" तू आणि सिरीयस म्हणजे.. असलंच काहीतरी फालतू असणार , नाही का?" अमू हसली.

" अम्रुता..तू तू ह्याला मस्करी नको गं समजूस्..प्लिज."

" बरं ठीक. सांग" अमू गंभीरपणे म्हणाली.

" तू...तू प्रचंड आवडतेस मला.. कालनंतर तर असं वाटतय की नाहीच राहू शकणार तुझ्याशिवाय्..खूप आवडतेस मला.. " अजय आता गुढग्यांवर बसला होता चक्क..आणि डोळ्यांत पाणी.."

" अजय प्लिज... सगळे बघताहेत.. प्लिज.. नीट बस .. आणि माझ्यावर दया कर आता.. चल तुझी आईस्-टी संपव लवकर.. जाऊ यात आपण.."

" तू उत्तर देणार नसशिल तर मी हलणारही नाही इकडून."

"अजय पोरकटपणा पुरे आता.. प्लिज??" अमू काकुळतीला येऊन म्हणाली. " आपण बोलूयात, पण इकडे नको.. मला फार कसंतरीच वाटतंय.. सगळे बघताहेत.."

अम्रुताने चक्क हाताला धरून ओढलं अजयला.. " चल जाऊ यात.."

"तुला लोकांचा काय गं एवढा पुळका.. दरवेळेस आपलं 'लोक बघताहेत' म्हणून घाबरतेस.. इतका काय फरक पडतो...?"
" अजय आपण समाजात रहातो..त्या समाजाचा आदर करायला हवा..वाट्टेल तसे चाळे रस्त्यावर पाहिले की आपण नावं ठेवतोच ना दुसर्‍यांना..? मग आपण पण नीट वागलं पाहिजे.. चल घरी जाऊ या.."

" घरी..? वेड लागलंय तुला..? मी इथून हलणारही नाहीये मला उत्तर मिळेपर्यंत.."

" बरं मग.. एक काम करू या.. चल ते.. ते प्रतीबालाजी मंदीर आहे ना, तिथेपर्यंत जाऊ या..? वाटेत बोलता येईल.."

" तुळशीबाग कॅन्सल..? वा ! नशीब माझं.. चला मॅडम.. ड्रायवर तयार आहे.."

हायवेवर गाडी घातल्यावर अजयने तिच्याकडे पाहिलं.. गप्प बसून होती ती..
" काही बोलायचं पण आहे.. की मौनव्रत घेतलयंस.." तो चिडून म्हणाला.

" अजय, तुला असं का वाटतं की तुझं प्रेम आहे माझ्यावर.. आणि मी तुझी चांगली कंपॅनीयन बनू शकते असं.. ५ कारणं देऊ शकशिल..? हवा तेवढा वेळ घे.."

" वेळ नाही लागणार.. माझ्याजवळ पन्नास कारणं आहेत, सिरीयसली.."
" हं.. बोला.."
" एक तर तू मला खूप आवडतेस.. तुझा स्वभाव खूप समंजस आणि मनमिळाऊ आहे.. दुसरं म्हणजे.. तू हुशार आहेस.. मी आदर करतो कधी कधी.. ज्या पद्धतीने तू सगळ्या गोष्टी मॅनेज करतेस.. ऑफीसमधे आणि घरी.. तू आईलापण आवडतेस.. तिसरं म्हणजे.. तू सुंदर आहेस.. खूप खूप सुंदर आहेस..
फोर्थ थिंग इज, मला असं वाटतं.. की इतकं जास्ती मला कोणीच नाही समजून घेतलं..आई सोडली तर.. तुला माझ्या मनातलं समजतं.. मनकवडी आहेस..
आणि लास्टली, मनाला समजवता येत नाही.. मला तू भेटलीस त्या दिवसापासून आवडतेस.. आणि ह्या गोष्टीचं कारण नाही देता येणार.. तू रडलीस की काळजाचे तुकडे होतात माझ्या.. काल रात्री झोपलो नाहीये.. म्हणून ठरवलं आज सांगून टाकावं.

तू नाही म्हणालीस तरी.. मला माहित आहे आपली मैत्री तशीच राहील.. तितके मॅच्युअर आपण दोघंही आहोतच.."

"ठीकयं.. "

"म्हणजे..? काहीतरी बोल गं.. नुसतं ठीक म्हणजे काय..?"
"विचार करतिये.."

" कसला विचार करतियेस आता...?"
" अम्म् .. तुला नाही सांगू शकत.."
" ?? काय आहे अमू.. किती त्रास देशील.. बोल ना, कसला विचार करतियेस..??"
" अजय, don't mind, मी काहीतरी विचारतिये तुला, पण मला फक्त खरं उत्तर अपेक्षीत आहे.. चावटपणा केलास तर बघ.."
"माझी काय अवस्था आहे.. कसलीच मस्करी नाही करू शकणारे आत्ता.. बोल.."
" काल .. काल जेव्हा मी तुझ्याजवळ होते.. तुला काही 'तसलं' feeling आलं का..? मला माहित आहे उत्तर कठीण आहे.. पण पहिल्यांदा मी उत्तर देते..

मी तुझ्या मिठीत शिरले.. आणि जाणीव झाली.. की तू किती काहिही झालं तरी एक पुरुष आहेस.. आणि वाटलं की दूर व्हावं.. पण नाही झाले.. आई जवळ घेते ना आपल्या रडणार्‍या मुलीला, तसं जवळ घेतलंस तू मला..म्हणून नाही गेले दूर.."

" तेव्हा तुझी काळजी वाटत होती.. तू म्हणतेस 'तसलं' काही नाही वाटलं त्यावेळी.. पण नंतर.. नंतर त्या काकूंना दार उघडलं तेव्हा वाटलं.. कध्धी कध्धी.. कधीच जाऊ नयेस तू दूर असं.." तो कमालीचा सिरीयस वाटला बोलताना.

" o.k. मान्य आहे तुझं प्रेम आहे माझ्यावर.. पुढे काय..?"
" वेड पांघरू नकोस... तू हो म्हणालीस तर उद्याच लग्न करू.."

"उद्या नको.. Happy आजच करू या.. घरच्यांना सरप्राईज.."

" वॉव.. म्हणजे तुझा होकार आहे..? नशीब माझं...."

अजय, तू माझा माधवन आहेस.. Happy तुझ्यासाठी खास हे गाणं.. "

अमूने मोबाईलवर गाणं लावलं..

पेहली नजर मे, हमने तो अपना दिल दे दिया था तुमको..
पर तुमने देर लगाई, रुक, रुक के बात बढाई.."

समाप्त.

गुलमोहर: 

मस्तय खुपच आवडली...
आणि अभी सरखी माणसे या जगात आहेत अजुनही याच खुप वाईट वाटते.
अमु न अजय खुपच छान, अमु खुप लकी ठरली अव्हड सगळ होऊनही खुप प्रेम करणारा अजय मिळाला. त्याने कसलाही विचार न करता अमु ला स्वीकारल.. समाज्याचा सुध्दा विचार न करता. त्याने तिचा भुतकाळ नाही बघीतला व्यक्तीमत्व बघीतले . वा छान !! खुप चांगले वाटले. हल्ली मुले समाज्याचा खुप विचार करतात. अजय सारख असेल कोणी???
<<<<<<<<<<<<
"छूपाना भी नही आता,
बताना भी नही आता
हमें तुमसे मोहब्बत है..
बताना भी नही आता">>>>>>>>>>>>>>>>
खुप आवडीचे गाण माझ. Happy
खरच खुप छान आहे कथा.

धन्यवाद सगळ्यांना -

नवीन गोष्ट सुरु करतीये - तडजोड vs काडीमोड -

पण मी सीता संपायची वाट बघतीये - Happy