कंबोडियातील 'बान्ते सराई' - एक अपुर्व शिल्पकृती

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कंबोडियातील शहर 'सियाम रिप'पासून २०-२५ कि.मी. अंतरावर 'बान्ते सराई' नावाचे एक मंदिर आहे. लाल रंगाचा दगड ज्याला ईंग्रजीत 'रेड सॅन्डस्टोन' म्हणतात; हा दगड वापरुन हे प्राचीन मंदिर दहाव्या शतकात (सन ९६७) उभारले आहे. असे म्हणतात फक्त स्त्रिच्या नाजूक बोटातूनंच कठिण पाषाणावर इतके नाजूक कोरीव काम घडू शकते! म्हणून ह्या मंदिराचे नाव 'बान्ते सराई' अर्थात 'स्त्रियांचे गाव' असे आहे. ह्या मंदिराचे मुळ नाव 'त्रिभुवनेश्वर' असे आहे कारण मंदिराच्या आतमधे शिवलिंग आहे जे मात्र आता तिथे नाही. त्या शिवलिंगाचा उल्लेख 'त्रिभुवनेश्वर' असा केला जातो. हे मंदिर 'ईश्वरपुर' गावात वसलेले आहे. जे कोरीवकाम फक्त लाकडावरचं केले जाते किंवा सोनार ज्याप्रमाणे सोन्याचे अलंकार घडवतो तशा स्वरुपाचे शिल्पकाम ह्या मंदीरावर झाले आहे. मंदिराचा एक अन् एक दगड उरत नाही ज्यावर कोरीवकाम आढळत नाही. बघुया 'बान्ते सराई'ची काही चायाचित्रे आणि वाचुया त्यावरची थोडीशी माहिती:

१) रावणाचे एक नाव विराट असेही आहे हे मला कंबोडियात कळते. विराट सितेचे हरण करतो आहे.. तिला पळवून नेतो आहे हा प्रसंग ह्या शिल्पकामात चितारलेला आहे. बाजूला विष्णुचे वाहन गरुड दाखवले आहेत. (पण माझ्यामते विष्णुचे वाहन शेषनाग ना? मला तिथे जी माहिती मिळाली ती गरुड विष्णुचे वाहन अशी होती.)
227275_1957254821678_1551964083_2070770_7540376_n.jpg

२) हा प्रसंग महाभारतातला आहे. कृष्ण आणि अर्जुन. पण हा प्रसंग गीता सांगण्याचा नाही की कुरुक्षेत्रावरील रणभुमीतील कौरवा-पांडवा ह्यांच्यामधील युद्धाचाही नाही.
226995_1957226780977_1551964083_2070655_2223471_n.jpg

३) इथे बघा शिवशकंर उमेसोबत कैलास पर्वतावर बसलेले आहे. वानरांनी रावणाला कैलास पर्वतावर जाऊ दिले नाही म्हणून रावणानी कैलास पर्वताला उचलून धरलेले आहे. शिवा एक अलगद धक्का देऊन कैलास पर्वत रावणाच्या अंगावर पाडतो. शिवाच्या शक्तीची प्रचिती आल्यानंतर रावण १००० वर्ष शिवाची आराधना करतो. नंतर तांडवनृत्य रचतो. बघा ह्या चित्रात तुम्हाला काय काय दिसत. आपल्याला लहानपणी सांगितलेल्या आणि आपण वाचलेल्या पुराणकथांची इथे कित्ती कित्ती गरज भासते हे मला तिथे गेल्यानंतर कळले.
227198_1957207980507_1551964083_2070610_5582981_n.jpg

४) मंदिराच्या समोर बसलेला हा नंदी काळाच्या ओघात मोडून गेला आहे..!
227312_1957206860479_1551964083_2070606_5863003_n.jpg

५) रावणानी कैलाश पर्वत उचलला आहे...
227325_1957208620523_1551964083_2070612_4566850_n.jpg

६) मंदिराच्या चारी भिंतिवर सुंदर अप्सरा चितारलेल्या आहेत. बघा अधेमधे दगडांमधली रेघ दिसते आहे . हे दगड एकावर एक रचत नेत नेत मंदिर उभारले गेले आहेत. सिमेंट नाही.. खिळे नाहीत! आपण चित्र/ठोकळे जुळवण्याचा जिगसॉचा जसा खेळ खेळतो तसेच काहीसे हे काम वाटते.
228186_1957174219663_1551964083_2070565_1678028_n.jpg

७) ह्या शिल्पकृतीत इंद्र त्याचे वाहन त्रिमुखी हत्ती ऐरावतावर आरुढ झालेला आहे.

228265_1957231821103_1551964083_2070676_6393123_n.jpg

८) इथे पुर्वी शिवलिंग होते. इथल्या मुर्तींची बर्‍याच प्रमाणात चोरी झालेली आहे.
228292_1957205060434_1551964083_2070600_7443130_n.jpg

९) ह्या शिल्पावर देवता लक्ष्मी दाखवली आहे. बाजूला दोन हत्ती तिच्या गळ्यात फुलांचे हार घालत आहेत. आपल्याकडे दिवाळीच्या दिवसात बाजारात जे पोष्टर्स विकायला येतात. त्यात एक पोष्टर असेच असते ज्यात धनदेवतेला हत्ती हार घालत आहे. 229130_1957206220463_1551964083_2070604_3006832_n.jpg

१०) मी वर कृष्ण आणि अर्जुनाचे एक शिल्पचित्र दिले आहे. पुर्ण प्रसंग खूपच रसभरीत आहे तो असा: अर ऐरावतावर आरुढ इंद्र आहे. इंद्र ही पर्जन्यदेवता आहे. अग्निला स्वतःची शक्ती परत मिळवायची असते म्हाणून ती खांडव वनाला आग लावू पहाते पण इंद्र मात्र दरवेळी पाऊस पाडून ती अग्नि विझवून टाकतो. कारण खांडव वनात इंद्राचा मित्र नाग तक्षक राहत असतो. म्हनून अन्गि कृष्ण आणि अर्जुनाची मदत घेतो. बाणाच्या सहाय्यानी अर्जुन पाऊस अडवतो. खांडववनाला आग लागून नाग तक्षक आणि त्याचे इतर मित्र लगेच खांडव वन सोडून पळून जातात. (प्रश्न पडतो मग लाक्षग्रहाला जेंव्हा आग लागते तेंव्हा खांडव वन त्यात नष्ट होते. ती कथा नि ही कथा दोन्ही वेगळ्या.)

229545_1957231141086_1551964083_2070672_4070504_n.jpg

१०) कृष्ण क्रुर कंसाचा वध करतो आहे...
230355_1957236101210_1551964083_2070692_6432338_n.jpg

११) हे चित्र राजवाड्यातील आहे. इथे कृष्ण क्रुर कसांचा वध करतो आहे.
230470_1957235261189_1551964083_2070689_4957118_n.jpg

१२) हा मंदिराचा काही भाग. डाव्या नि उजव्या बाजुला यक्ष हे द्वारपाल आहेत. तसेच वानेर, सिंह, गरुड हेही काही ठिकाणी द्वारपाल म्हणून दाखवले आहेत.
230680_1957248901530_8158129_n.jpg

१३) हा प्रसंग किशकिंधमधील वालि आणि सुग्रीव ह्यांच्या लढाईतील आहे. वालि सुग्रीवाचे राज्य लुटतो आणि त्याची पत्नी तारा बळकावतो. सुग्रीव श्रीरामाची मदत मागतो. खालि बघा वालि नि सुग्रीव ह्यांचे युद्ध सुरु आहे. बाजूला राम धनुष्य घेऊन बाण सोडतो आहे. श्रीरामाच्या बाजूला लक्ष्मण आहे. दुसर्‍या बाजुला सुग्रीवाची बायको तारा भयभीत झालेली दिसते आहे. दगडांमधील रेघा पण स्पष्ट दिसत आहेत.
230860_1957252901630_1551964083_2070762_8323064_n.jpg

१४) ही आणखी एक अप्सरा:
246695_1957238301265_1551964083_2070702_4563360_n.jpg

१४) इथे मयुरावर आरुढ कुबेर आहे (पण कुबेराचे डोके मात्र चोरीला गेलेले आहे).
246820_1957255101685_1551964083_2070772_7812777_n.jpg

१५) काळाच्या ओघात मंदिरे कसेबसे असे टिकून आहे. सबंध मंदिर जंगलानी वेढलेले आहे. जेंव्हा सापडले तेंव्हा मंदिराच्या अंगावर झुडपे झाडे वेली सगळे काही होते. बहुतेक त्यांनीच मंदिराचे जतन केले असावे.
246877_1957178139761_1551964083_2070575_4423338_n.jpg

१६) जवळून घेतलेले एक छायाचित्र. बहुतेक प्रत्येक शिल्पकृतीत झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी, माणसे, अलंकार दाखवलेले आहेत.
246975_1957225020933_1551964083_2070649_4246491_n.jpg

१७) इथे अगदी ठळकपणे दिसत आहे की कृष्णानी कंसाचा शेवटी वध केला..(लहानपणी वाईटांचे असे वध वगैरे झाले की फार मजा यायची महाभारत रामायण ऐकताना नि बघताना.)
247175_1957237101235_1551964083_2070696_7850119_n.jpg

१८) इंद्र आणि ऐरावताचा जवळून घेतलेला फोटू:
247294_1957176819728_1551964083_2070572_1318026_n.jpg

१९) वालि-सुग्रीव युद्ध..
248485_1957254101660_1551964083_2070766_3410191_n.jpg

२०) कुबेर ... मयुर त्याचे वाहन...
248495_1957239341291_1551964083_2070707_7429042_n.jpg

२१) नंदीवर बसलेले आहेत शिव आणि पार्वती. पण कंबोडियामधे पार्वतीला उमा हेच नाव आहे.
248832_1957177659749_1551964083_2070574_1476178_n.jpg

२२) इथे बघा कोण कोण द्वारपाल आहेत. सिंह, वानेर आणि यक्ष हे द्वारपालाचे काम करत आहेत.
248873_1957207420493_1551964083_2070608_8303432_n.jpg

२३) जमा झालेले पर्यटक..
248896_1957175619698_1551964083_2070569_163862_n.jpg

२४) मंदिर आणि द्वारपाल..
250005_1957233981157_1551964083_2070683_5250410_n.jpg

जर हे चित्र आवडले असतील तर मग 'बान्ते सराईवरची' ही सात भागांची सर्वाधिक छान चित्रफित बघा: http://www.youtube.com/watch?v=Cb99mpJytsw&feature=related

बी:
भारीच रे! सुरेख फोटो आणि माहिती ही खूप छान दिली आहेस. मी अगदी आतुरतेने वाट बघते तुझ्या लेखांची.

सुरेख. (आता मला पण तिथे जावेसे वाटतेय..)
हे अखंड पाषाणात कोरलेले दिसत नाही. आणि ही शैलीच वेगळी आहे.

८) इथे पुर्वी शिवलिंग होते. इथल्या मुर्तींची बर्‍याच प्रमाणात चोरी झालेली आहे
>>>
अरे वा , आपली ही ही भारतीय संस्कृती तिथे पोचली म्हणायची.... Proud

बी, खूप छान. Happy
पण एक सूचना/विनंती आहे - जर तुम्ही प्रचि चा वेगळा बाफ उघडणार असाल तर 'पुरातन अवशेष -ओळख आणि चर्चा' या बाफवर परत हेच कॉपी पेस्ट न करता याचा फक्त दुवा देऊ शकाल का? आपल्या मायबोलीत शक्यतो अनावश्यक डुप्लिकेशन होऊन सर्व्हरवरील ताण वाढू नये असे प्रामाणिकपणे वाटते म्हणून ही विनंती. कृपया गैरसमज नसावा....

फोटो एकदाच अपलोड होतात. नंतर आपण फक्त लिंक देत असतो.. त्यामुळे सर्वरवर ताण येणार नाही असे वाटते.. चु भु दे घे. ( दोन्ही फोटोंची यु आर एल एकच आहे.. )

हो, पण पेज लोड व्हायला वेळ लागतो.
नवीन लेखन उघडायला वेळ लागला तरी मला खूप नवीन प्रचि आल्याचा संशय येतो . Proud

सर्वांचे आभार.

वरदा, बरोबर आहे तुझे म्हणणे. पुढील वेळी फक्त थोडासाच .. फक्त एकच चित्राचा भाग देईन आणि मग लिंक देईन. लिंक दिली की लोक त्यावर टिचकी मारुन बघतातच असे नाही. म्हणून सगळे काही तिथेच चिकटवले जेणेकरुन लोकांना तिथली माहिती मिळेल. खूप कमी भारतिय हा प्रांत बघायला जातात असे तिथल्या जाणत्या लोकांचे म्हणणे आहे. शेवटी आमचा देशपण गरीबच आहे की आणि आमच्या देशात बघण्यासारखे काय कमी आहे! तेच तर आम्ही नाही बघत तर दुसरे देश बघणे दुरची बाब आहे. तुमचे लोक आमच्या देशात येतात का बुद्धगया वगैरे बघायला? अशी प्रतिक्रिया माझ्या मनातल्या मनात तेंव्हा उमटली होती.

नरेंद्र, मलाही तो जरासंधाचाच वध वाटतो. पण तो कंसाचा वध आहे अशीच माहिती मला तिथे मिळाली. तुमचे निरिक्षण मला आवडले.

दिनेशदा, ही 'ख्मेर' शैली आहे. उच्चार खमेर असाची करतात. पण स्थानिक जसा ख्म चा उच्चार करतात तसा उच्चार इतरांना जमत नाही.

फारच छान.

खूप कमी भारतिय हा प्रांत बघायला जातात असे तिथल्या जाणत्या लोकांचे म्हणणे आहे. >>> ह्म्म! गेल्या वर्षी पुण्यातली माझी एक मैत्रीण गेली होती कंबोडियाला. (आय.टी.तली नोकरी करता करता ती सध्या हौसेखातर पुरातत्त्वशास्त्रात एम.ए. करते आहे. त्या अंतर्गत त्यांचा अभ्यास दौरा होता.) तेव्हा तिचे फोटो पाहूनही मला असंच वाटलं की युरोप-अमेरिका-फार ईस्ट इ.च्या पलिकडेही बघण्यासारखं किती काय काय आहे! फक्त त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने म्हणावा तसा प्रचार-प्रसार होत नाही. त्याच चालीवर मग आपल्या देशातही किती काय काय बघण्यासारखं आहे!

बी, सुंदर फोटो आणि माहिती.

बाजूला विष्णुचे वाहन गरुड दाखवले आहेत. >> सिताहरण होताना जटायू (गिधाड) रावणाची वाट(?) अडवतो. त्या शिल्पात तो नक्की गरुडच आहे का?

नंतर तांडवनृत्य रचतो.>> तांडव हे शिवाचेच नृत्य. त्याची रचना रावणाने केल्याचे कुठे वाचलेले नाही. हो पण शिवाच्या तांडवाचे वर्णन करणारे एक सुंदर स्तोत्र रावणाने रचले असे म्हणतात. (स्तोत्रांच्या बाफवर आहे ते) ते रावणाचे शिल्प मात्र खूपच सुंदर आहे. २० हात असलेले शिल्प सहसा पहायला मिळत नाही. त्याच्या दहा तोंडांची रचना पण वेगळीच आहे.

तू फोटोत दाखवलेली शिवलींग असलेली वेदी उन्हात वाटतेय. म्हणजे ते शिवलिंग मंदिराच्या बाहेर होते का?

सर्वच फोटो सुंदर आले आहेत.

ललिता-प्रिती, हो गरीब देशात देखील खूप काही काही बघण्यासारखे आहे. मला वाटत प्रेत्येक श्रीमंत गरीब देशाची आपली अशी एक आगळीवेगळी असते. उलट गरीब देशांमधे तिचे दर्शन जास्त गडद प्रमाणात होते!

माधवजी - हो ते वाहन गरुडच आहे. वरदाच्या बाफवर विशाल म्हणतो आहे की विष्णुचे वाहन गरुड आणि आसन शेषनाग आहे.

वेदीबद्दल असे की पुर्वी बहुतेक शिवलिंग मंदिराच्या आतचं असावे. मग पडझड झाली त्यात सगळेच अवशेष नीट रचल्या गेले असे नाही. जेंव्हा मंदिर सापडले तेंव्हा ते एक प्रकारचे दगडांचे ढिगारेचं होते. कुणाची तरी आंतरीक उर्मी र्मी की त्यांनी हे मंदिर परत उभारले. माझ्यामते मंदिराच्या आतमधे जिथे पुर्वी शिवलिंग होते तिथे जाण्यास बंदी आहे. आपण तो भाग बाहेरुनच न्याहाळू शकतो. लोकांना लिंग कसे असते हे कळावे म्हणून ते बाहेर उघड्यावर ठेवले आहे. खरे तर ते आतमधे ठेवायला हवे जपवणूनीच्या दृष्टीने.

बरं.. वेदी म्हणजे नक्की काय? मी तिथे योनि शिवलिंगही पाहिले आहे. शिवलिंगाचे अनेक अनेक प्रकार पाहून थक्क झाले. हुबेहुब पुरुषाच्या लिंगाप्रमाणे दिसणारे शिवलिंग देखील तिथल्या संग्रहालयात ठेवलेले आहे. नदीच्या पात्रात देखील - एक हजार शिवलिंग आहेत.

<< हुबेहुब पुरुषाच्या लिंगाप्रमाणे दिसणारे शिवलिंग>>

बी, शिवलिंग हे मानवी लिंगाचंच अंकन असतं रे. आणि त्याच्या खालच्या भागाला वेदी नाही, योनीपीठ म्हणतात. मुळातच शिवलिंगाची पूजा म्हणजे स्त्रीपुरुषसमागम अवस्थेची पूजा आहे.

वरदा, माहितीबद्दल धन्यवाद.

मला असे म्हणायचे होते की आपण ज्या शिवलिंगाची पुजा करतो त्याचा आकार पुरुषलिंगासारखा नसतो. पण संग्रहालयात मी जे शिवलिंग पाहिले ते आपण पुजा करतो तसे शिवलिंग नव्हते तर लिंगासारखे दिसणारे शिवलिंग होते.

अरे, तो आता स्टायलाईज्ड होत होत आत्ताच्या रूपात आलाय. प्राचीन भारतातली शिवलिंगं मानवी लिंगाशी साधर्म्य दाखवणारीच असत. Happy

Pages