मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कंप्लिट कन्फ्युजले आहे.
कायम नोकिया वापरल्यावर सॅमसंग के संग रिश्ता निभता भी है या नही? Happy

Nokia E5 बेस्ट आहे. फक्त मराठी टायपिंगची सोय नाहीये त्यात. पण माबो वाचता येते. Happy

मोबाईल्स च्या ओपरेटिंग सिस्टीम तुमच्या व्यवसायाच्या क्षेत्राशी बर्‍याचदा सोईस्कर असतात. नोकिया चे हारडवेअर व सॉफ्टवेअर हे धावपळीच्या ,प्रवासाच्या,पडझडीच्या वापरास जास्त उपयोगी आहेत्.भरपूर कॉल्स व एस एम एस साठी व त्यापलिकडे दुसरा फार वापर नाही त्याना नोकिआ व त्याची सिम्बियन ओएस सोइस्कर आहे. एका हाताने देखील ऑपरेट करता येतो ....

टच स्रीन, मल्टीमेडिया, फोटो, कॅलेन्डर्स, नोट्स , मॅप्स, जीपीएस ,वेगवेगळे विगेट्स ज्याना वापरायला आवडते त्याना सॅमसंगचे मोठ्या स्क्रीनचे , अ‍ॅम्लॉईड्चे झळझळीत डिस्प्ले असणारे फोन सोइस्कर. मग कॉल आला तर 'अ‍ॅक्सेप्ट' चे बटण कधी कधी दाबता दाबत नाही. शिवाय कधी कधी स्क्रीन दाबला जाऊन आपोआप अ‍ॅप्लिकेशन अथवा कॉलच चालू होण्याचे प्रकारही सहन करावए लागतात.स्मार्टफोनमध्ये बॅटरी ड्रेनिंग ही मोठी डोकेदुखी असते. त्यामुळे खेड्यापाड्यात फिरनारांना फार त्रास होतो. ४ वाजेपर्यन्त फोन डिस्चार्ज होऊन जातात.२५ टक्के बॅटरी तर डिस्प्लेच खाऊन टाकतो.
थोडे जास्त कॉलझाले की फोन सम्प्लाच. दोन बॅटर्‍या ठेवण्याला स्मार्टफोनमध्ये पर्याय नाही.

ब्लॅकबेरी हे ऑफिस एक्झिक्युटिव्हज ज्याना मेसेज, ईमैल्स,डोक्युमेन्ट्स पाहणे महत्वाचे आहे , त्याना सोईचे आहे. मग बाकी किम्मत लूक्स यानुसार इकडे तिकडे चॉइस जाऊ शकतो...

माझ्याकडे कार्बन कम्पनीचा डबल सिमवाला एक फोन आहे. कॉल , एस एम एस च्या पलिकडे फारसे नखरे नसनारी सिम्बियन ओ एस त्यात आहे. त्यात बॅटरी ८ दिवस टिकते. प्रवासात भयंकर सुख्....किम्मत ३०००-३५००. मध्ये तर कुणी २८ दिवस बॅटरीचा फोन काढला होता. असे फोन लई विश्वासू मित्रासारखे वाटतात... Happy

>>Nokia E5 बेस्ट आहे. पण माबो वाचता येते.

Happy

>>फक्त मराठी टायपिंगची सोय नाहीये त्यात.

Sad

front camera आणि 3G must पण जमल्यास touch screen आणि android वाला फोन किती पासुन मिळेल..?

ब्लॅकबेरीचे काय अनुभव. २०१२ मध्ये घेणे झाल्यास कोणते मॉडेल घ्यावे? मुंबईत कोणते सर्विस प्रोवायडर सर्वात बेस्ट चालते?

बर आता काही फायनल प्रश्न हा..
१. नोकियाच्या कुठल्या डब्यात देवनागरी युनिकोड दिसते/ टायपता येते?
पर्याय
1. C5-03/04/05
2. E5
3. Nokia 500

२. कुठलाही टचस्क्रीन हा पर्समधे/ खिशात असताना उगाचच स्क्रीन दाबला जाऊन कुणालाही फोन लावत सुटणे, कुठलेही अ‍ॅप्लिकेशन चालवणे असले उद्योग करतो का?

>>२. कुठलाही टचस्क्रीन हा पर्समधे/ खिशात असताना उगाचच स्क्रीन दाबला जाऊन कुणालाही फोन लावत सुटणे, कुठलेही अ‍ॅप्लिकेशन चालवणे असले उद्योग करतो का?

हो. बायकोकडे सॅमसंग कॉर्बी आहे. त्यात असले चमत्कार नित्यनेमाने नसले तरी बर्‍याच वेळा होतात.
बाकीच्या प्रश्नांच्या उत्तरांची मी ही वाट बघत आहे.

वर एका उत्तरात E5 मधे युनिकोड (मायबोली) दिसतो असे कुणीतरी म्हटले आहे. टायपता येत नाही म्हणे. इतरांच्या उत्तरांच्या प्रतीक्षेत.

असे चमत्कार माझा N73 पण करायचा. लॉक असताना. पर्समधे अति वस्तू होऊन विविध बटणे दाबली जाणे, लास्ट डायल्डमधल्यांना किंवा फोनबुकातल्या पहिल्या नावाला फोन जाणे हे अधूनमधून होईच. म्हणून ५ a टाकून स्वतःचाच नंबर पहिला स्टोर करून ठेवला होता. जेणेकरून स्वतःलाच फोन करत बसला गडी तर बसूदेत म्हणून Happy

तो नोकियाचा एक्स्प्रेस म्युझिक म्हणे देवनागरी टायपू पण देतो.

नोकियाच्या ज्या हँडसेटमधे लँग्वेज सेटींगमधे हिंदि/ मराठी हे पर्याय दिसतील त्या सगळ्या मोबाईलवरून देवनागरी टाईप करता येईल. क्वर्टी कीपॅड असलेल्या हँडसेटमध्ये हा पर्याय असण्याची शक्यता कमी आहे.

नोकिया एक्सप्रेस म्युझिक रोजच्या रोज चार्ज करावा लागतो, हा अपवाद वगळता तो सगळ्यात बेस्ट हँडसेट आहे माझ्या मते.

निदान अ‍ॅन्ड्रॉइडमध्ये टच स्क्रीन लॉक नावाचे अ‍ॅप फ्रीध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे लाईव्ह फोन तुम्ही सेट केलेया वेळेनन्तर म्हनजे ५-१०-१५ वगैरे सेकन्दानन्तर आपोआप लॉक मोडवर जाऊन स्क्रीन लॉक होतो . व तुम्ही बोटाने आयकॉन सरकवल्यावर फोन टच क्रीन ऑपरेशनला येतो. त्यामुळे तशी काळजी नसावी.

ही आयडिया छान आहे . आपले घरचे किंवा ऑफिसचे घडीघडी लागणारे नम्बर अल्फाबेटीकल ऑर्डरप्रमाणे कुठेतरी खालीवर जातात आणि घाईत ते सर्च करायला फार इरिटेशन होते. त्यासाठी त्यासाठी त्यांच्या नावाच्या मागे a किंवा aa टाकले की ते सर्वात आधी सर्वात वर येतात उदा ababan, aramesh, asushmita हे नम्बर सुरुवातीसच फोन्बूक्मध्ये दिसतात.

सर्व फोन्स मधे कीपॅड लॉक ची सुविधा असतेच. पण कीपॅड लॉक करता लागणारा अवधी जास्त ठेवला गेला आणि त्या अवधीत फोनने करामत केली तरच नी म्हणतेय तसं होऊ शकतं.
सतिश, Samsung Galaxy Y बघा. front camera नाही पण बाकी झक्कास! Happy

E5 घेतला. धर्म बदलण्याची हिंमत झाली नाही. Happy
माझा यूज रफ आणि ट्रॅव्हलिंग इत्यादी भरपूर त्यामुळे मी व माझ्यासकट फोन धडपडणे हे होतेच. तर नाजूक साजूक फोन मला उपयोगाचे नाहीत हा साक्षात्कार होऊन मी टचस्क्रीन ह्या प्रकारावरच फुली मारली. माझ्या गरजेला E5 करेक्ट आहे.
देवनागरी आत्ता उलटीपालटी दिसते ते वरच्या काय त्या युक्तीने नीट करेन. इमेलने लॉगिन करता यायला लागल्यापासून मायबोलीवर फोनमधून विहार शक्य आहे. फारतर काय मी विंग्रजीतून पोस्टी टाकेन तेव्हा इतकंच. उत्ना तो चलता है. तसंही फिरत असताना एवढा वेळ पडीक रहायला मिळतही नाही.

भ्रमर..Samsung Galaxy Y पाहीला पण व्हिडिओ कॉल मस्ट आहे.. त्यामुळे आरश्यासमोर उभे राहुन बोलावे लागणार..:)

व्हिडिऑ कॉल फक्त ३ जी वर चालतात. एक चूष म्हणून ठीक आहे पण त्यापलिकडे त्याचा फार उपयोग वाटला नाही. ब्याट्ट्री लै जळते म्हाराज्या....

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

१. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
२. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
३. जीटॉक वगैरे मिळालं तर सोनेपे सुहागा.
४. देवनागरी लिखाणाची सोय हवी.
५. कॉर्पोरेट / सोबर लुक

आत्ता धागा वर काढण्यासाठी पोस्ट एडिट केलं आहे Wink

थँक्स मंजू धागा वर काढल्याबद्दल.
मला पण मदत करा.
१. टच स्क्रिन नसावा.
२. शक्यतो नोकियाचाच. घरात सोनी, एलजी, मोटोरोला, ब्लॅकबेरी, सॅमसंग इ. ना बर्‍याचदा नीट रेंज मिळत नाही.
३. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
४.कॉर्पोरेट / सोबर लुक
५. किंमत ६-८ हजारांमध्ये.

E5 हा एक पर्याय आहे. अजून काही पर्याय सुचवा.

samsung galaxy R कसा आहे ? S 2 पेक्षा स्वस्त आणि एस टू ची बरीच फिचर्स आहेत असं वाटतंय

लोक्स, आधीच फोन संदर्भात हा धागा अस्तित्वात असल्याने वर आणत आहे.
मला ३g, पुर्ण टच स्क्रीन, अ‍ॅण्ड्रॉईड आणि विडिओ कॉलिन्ग अशा,चार गोष्टी असलेला फोन घ्यायचा आहे.
आधी असे वाटले की सॅमसन्ग गॅलॅक्सी वाय तसा आहे, ७ ह. पर्यंत असा फोन आहे म्हणुन खुष होतो,
पण प्रत्यक्ष मॉडेल पाहिल्यावर कळाले की त्यामधे विडिओ कॉलिन्गची सुविधा नाहीये.
अशी सर्व मॉडेल्स बहुतेक १८ ह. च्या पुढेच आहेत. Sad
जर कोणाला १० ह. च्या आत असा एखादा फोन माहित असेल तर कृपया कळविणे.

व्हिडिओ कॉलिंगचा काय उपयोग? माझ्याकडे आहे. त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण दुसर्‍यांकडे नसतो. शिवाय कानाला फोन लावल्यावर बघणार कसे. ? स्पीकरफोन लावायला लागतो...

बाजो, माझ्याकडे आधीच एक नोकिया आहे विडिओ कॉलिन्गची सुविधा असलेला, त्यामुळे दुसरा घ्यायचा आहे घरी देऊन ठेवायला. आणि तसेही आजकाल बहुतेक सर्वच फोन्समधे स्पिकरची सुविधा असते.

अल्पना, माझा ऑफिस फोन नोकिया ई५ आहे. वापरायला बरा आहे. इमेल वगैरे पटापट बघता/ लिहिता येतात. बाकी इंटरनेट बघणे / स्क्रोल करणे थोडे जिकीरीचे आहे टच स्क्रीन नसल्याने. दरेक आठवड्याला सॉफ्टवेअर अपडेट्स येत असतात. थोडे विन्डोज़ ओएस सारखे आहे. Happy

रेन्जचा प्रश्न ई५ला पण येतोच. मुळात तुमच्या भागात किती लोक आहेत, किती बेसस्टेशने / रिपीटर आहेत आणि किती बांधकामे आहेत यावर रेन्जचे गणित ठरते.

Android OS असलेला फोन कमीत कमी किती किंमतीला मिळेल आणि कोणत्या कंपनीचा मिळेल. ?.टचस्क्रीन फोन लवकर खराब होतात का.

टचस्क्रीन फोन लवकर खराब होतात का. >>>>>. चायना चा घेतलात तरच होतात........चांगल्या कंपनीचा घ्या.. मी गेली ५ वर्षे एच टी सी चा टचस्क्रिन वापरत आहे ........एकही स्च्रॅक्च नाही आला अजुन... Happy
.
.
Android OS असलेला फोन कमीत कमी किती किंमतीला मिळेल आणि कोणत्या कंपनीचा मिळेल. >>>.. गॅलक्सी वाय हा सॅमसंग चा ६५००/- पर्यंत मिळतो........

मला Samsung ACE किंवा Samsung Wave 2 यापैकी कुठला घ्यावा ते कृपया सांगा. पहिल्यात OS Android आहे तर दुसर्‍यात BADA?
दुसर्‍याचा रीव्ह्यु कुणी सांगु शकाल का?

जिप्स्या बाडापेक्षा Android वालाच घे. Happy Galaxy Ace Plus घे त्यात Android 2.3 (Gingerbread) वर्जन आहे.
उदय, एलजीचे Android OS असलेले फोन पण ६००० पासून मिळतात. ऑप्टिमस सिरिज वाले.

मला Samsung ACE किंवा Samsung Wave 2 यापैकी कुठला घ्यावा ते कृपया सांगा. पहिल्यात OS Android आहे तर दुसर्‍यात BADA?
दुसर्‍याचा रीव्ह्यु कुणी सांगु शकाल का?
>>>Android

ऋयाम, नीलू, सुन्या धन्यवाद Happy

खरंतर मला दुसरा जास्त आवडला होता (lookwise ;-)) Happy पण आता Samusung ACE किंवा ACE Plus चा विचार करतो. Happy

जिप्सी............सॅमसंग्च्या मागे का लागला आहेस अँड्रोईड घ्यायचा असेल तर एचटीसी नाहीतर सोनी चा घे ...... मुख्य म्हणजे रॅम आणि मेमरी बघ त्यात प्रोसेसर महत्वाचा आहे...... कारण अ‍ॅप्लिकेशन फोन मेमरी मधेच डाउनलोड होतात.....आणि फार थोडे मेमरी कार्ड मधे ट्रान्स्फर करता येतात.....

>>>एलजी चा चुकुन सुध्दा घेउ नका>>:P मी घेतलाय. मला अद्यापि तरी तसा प्रॉब्लेम आला नाहीय.
एचटीसी चे मस्तयत.
सुन्या Happy

जिप्सी htc चा पण नविन त्याच रेंज मधे model आले आहे ते पण बघ....
सॅमसंग्च्या मागे का लागला आहेस अँड्रोईड घ्यायचा असेल तर एचटीसी नाहीतर सोनी चा घे
>>>>>काल HTC वाला पण हेच सांगत होता. HTC Explorer 310 दाखवला. आता थोडा कन्फ्युज झालोय Sad HTC आणि सॅमसंगमध्ये.
सोनी, नक्क्कोच Happy सध्याचा सोनीच आहे. Wink

नेट नसेल तरी चालेल (अ‍ॅडिक्ट व्हायचे नाही, घरी झालोय तेच पुरेसे आहे), गेम जास्त नसले तरी चालेल. मुख्य म्हणजे बोलण्यासाठीच पाहिजे Proud

HTC CHACHA, HTC RADAR, SAMSUNG GALAXY Y, SAMSUNG ACE, SONY XPERIA, हे आहेत बघ तुझ्या रेंज मधे............

Pages