कांदा भजी / खेकडा भजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 February, 2012 - 02:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ ते ४ मोठे कांदे
बेसन पाव किलो
२-३ मिरच्या चिरुन किंवा मिरची पुड
थोडी कोथिंबीर चिरुन
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
अर्धा चमचा धणे घसपटून किंवा पाव चमचा ओवा किंवा पाव चमचा जिरे (ऑप्शनल)
मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम कांदे उभे चिरुन घ्या. चिरलेल्या कांद्याला थोडे मिठ मिसळा. ५-६ मिनीटांत मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल.

आता कांदा चांगला चुरा व त्यात हिंग, हळद, मिरची किंवा मिरची पुड, कोथिंबीर, ओवा/धणे/जिरे ह्यापैकी एक हवे असल्यास, टाकावे. नंतर त्यात थोडे थोडे बेसन टाकत रहावे.

पाणी आजीबात टाकू नये. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच मिश्रण घटासर होईपर्यंत बेसन टाकावे. अगदी घट्टही करू नये. अंदाजे किंवा पिठाची चव पाहून जर मिठ अजुन हवे असेल तर टाकावे.

एका कढईत तेल चांगले गरम करावे व त्यात चमच्याचे किंवा हाताने खेकडे म्हणजे भजी सोडावी Happy गॅस मंद ठेवावा. म्हणजे खेकडे म्हणजे भजी कुरकुरीत होते व आतुन चांगली शिजते.

मंद गॅसवर उलथापालथ करून भजी कुरकुरीत तळून झाली की ४-५ हिरव्यागार आख्या मिरच्यांना मधुन चिर पाडावी व कढईत टाकून जरा परतून लगेच बाहेर काढावीत. मिरच्यांवर थोडे मिठ चोळायचे आणि कुरकुरीत भजी सोबत ह्या मिरच्या मटकवायच्या.

वाढणी/प्रमाण: 
एकाला एक डिश.
अधिक टिपा: 

धणे, जिर, ओवा ऑप्शनल आहे आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालते. पण टाकल्यास स्वाद येतो. काहीतरी एकच टाकावे.

मला एका हॉटेलवाल्याकडून माहीती मिळाली की तेल थंड असतानाच भजी टाकली की ती चांगली कुरकुरीत होते पण मी अशी रिस्क कधी घेतली नाही. वरील पद्धतीने चांगली कुरकुरीत होते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता जर अल्लाद्दिनचा जीनी मिळाला तर त्याला ते गरमागरम भजीचे ताट माझ्यासमोर आणून ठेवायला सांगेन Proud

जागुटले, अन्याय आहे हा डोळ्यांवर आणि तोंडावर पण Lol णिषेढ तुझा. आता घरी येवुन खाल्ल्याशिवाय काही खर नाही.

हा धागा मी उघडलाच नाहीये.. मी काही पाहिलेलेच नाहीये... Lol

शेवटच्या फोटोने कट्यार काळजात घुसली... Wink
हे खाण्यासाठी अजून १४ दिवस थांबणे क्रमप्राप्त आहे... Sad

आता जर अल्लाद्दिनचा जीनी मिळाला तर त्याला ते गरमागरम भजीचे ताट माझ्यासमोर आणून ठेवायला सांगेन >> नंदिनी Lol सोबत चहा मस्ट Happy

जागुतै - या भज्यांना तरी सोडायचे होते, त्यांना पण खेकडा नाव Biggrin

जागू, मस्त.
सुदैवाने आमच्या ऑफिसात अशी भजी दर शनिवारी मिळतात !
(आम्ही वांद्राला हि भजी, "बिनपाण्याची भजी" या नावाने खाल्ली.)

बिनपाण्याची भजी Lol

सेनापती मला तर भजी लिहवतच नव्हत, खेकडाच लिहावा अस वाटत होत. Lol

सगळ्या खवय्यांचे धन्यवाद.

अरे हो सेनापती खेकडाभजीच ती पण जागुने खेकडा लिहील्यावर त्या भज्यांना वजन प्राप्त होते व अर्थ बदलतो. Happy

बायदवे दिनेशदा तुमच ऑफिस कुठेय, या शनिवारी मी फ्रीच आहे, विचार करत होतो तुमची भेट पण होईल आणि .... Lol

जागू मी कधी कधी यात बडिशेप टाकते, कधी लसून उभा चिरून टाकते, कधी मिरच्या उभ्या चिरून टाकते Happy पण हे असे फोटो टाकून जळवत नाही कोणाला Wink
ईनमिन तीन > पण जागुने खेकडा लिहील्यावर त्या भज्यांना वजन प्राप्त होते व अर्थ बदलतो. < अगदी , अगदी Happy

इनमिनतिन वजन वाढवल्याबद्दल धन्स (भजीच) Happy

अवल Lol

सेनापती तुमच्या जहाजावर खेकडे मिळतात ना.

अरुंधती आजच घरी भजी करून झालेला अन्याय दुर कर.

जागुतै - या भज्यांना तरी सोडायचे होते, त्यांना पण खेकडा ना>> हेच लिहायला आलेले. जागूला प्राणीसंग्रहालयातच सोडली पाहिजे .

वर ती खेकडा भजी कशी झाली हे फोटो दाखवायची गरज होती काय? :रागः

नशिब "कांदा भजी" पण लिहलय.. नाहीतर लोकांना खेकडे पीठात बुडवुन तळले असे वाटले असते Wink

पण ही भजी मात्र झक्कास.. तुला १००/१०० मार्क Happy

हिमस्कुल तुमच्या नावातच एवढा थंडावा आहे की गडावर जायची गरजच नाही Happy
चिउ अपेक्षा भंग झाला म्हणजे तुझा.

मामी Happy

चिउ अपेक्षा भंग झाला म्हणजे तुझा. >> हो तर काय.
मी विचार केला मासे संपवुन जागुतै आता खेकड्यांवर मेहेर्बान झाल्यात. Proud

Pages