बे एरियातील खादाडी

Submitted by Admin-team on 12 June, 2009 - 00:28

बे एरियातील खादाडी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ते ईंडिया चाट ठिक आहे... दीदी पण चांगले आहे...मला वाटलेले असेल ऐखादे मराठी जेवनाचे...असो..काढावे कि काय नविन...;)

ते रेस्ट्रॉ नैये. ती माझ्या मैत्रीणीची वेब्साईट आहे. केटरींग करते + टीफीन्स + सणासुदीचे फराळ वै. करते. खूप मस्त असतं जेवण. नक्की ट्राय करा.

आज रेडवुड सिटी जवळ सॅफ्रॉन नावाचे भारतीय उपहारगृह ट्राय केले. डाउन टाउन सॅन कॅर्लॉस मधे आहे, भरपुर जागा, चांगली सर्व्हिस आणि बरेच वेगळे पदार्थ होते. एकदंर बरे वाटले.

विद्याक तुम्ही भारतीय दुकानांत पॅक मधे मिळतात त्या वापरून बघितल्या का? घरगुती कोणी असतील तर ती माहिती सिस्को वगैरे कंपन्यांत कोणी असेल तर त्यांच्याकडून मिळू शकेल. त्यांच्या अंतर्गत मेलिंग लिस्ट मधे कळू शकेल. पूवी कोकिलाज किचन नावाचे एक रेस्टॉ कुपर्टिनो मधे होते, ते द्यायचे बर्‍यापैकी चांगल्या. हे आता सॅन होजे मधे आहे असे कळाले. त्याबद्दल विचारा.

बहुतेक भारतीय किराणा दुकानात मिळणार्‍या चपत्या ह्या घरगुतीच असतात. गुजराथी किंवा तेलगु गृहीणी ह्या फावल्या वेळात चपात्या करतात आणि दुकानातुन त्या विकतात.

फारएन्ड्,महागुरु धन्यवाद! माझा भाचा तिथे आहे. त्याच्यासाठी मी विचारलेले. तो आणि त्याचे मित्र फ्रोजन चपात्या आणतात, पण त्या आवडत नाहीत. आमच्या ईथे मिशिगन मधे बर्‍याच जणी चपात्या करुन देतात. तशा तिथे पण कुणी असतीलच म्हणुन विचारले. पुन्हा एकदा धन्यवाद!

सनी व्हेल मधे Wang's Kitchen म्हणून आहे एक तिथे देशी स्टाईल चायनीज चांगल मिळत अस ऐकल आहे.

असे ऐकण्यात आले की सनीवेल आणि नुअर्क मधील उडूपी आणि फ्रीमांटातील पक्वान बंद पडले म्हणून? एक काळ गाजवला होता यांनी.. Sad

नुअर्क मधील उडपी कधीच बंद पडले. त्यांनी ते प्लेझंटन मधे चालु केले. तिथले पण बंद पडले. सनीवेल मधे असलेले पण बंद झाले असे ऐकले. सॅन फ्रॅन्सिस्को मधे उघडले आहे असे ऐकले.
फ्रिमाँट मधील पक्वान चालु आहे बहुतेक. पाकिस्तानी 'खाना'वळीतले त्यातल्यात्यात बरे असणारे ते एक आहे.

आज अमरीन थाई नावाच्या उपहारगृहात गेलो होतो. चांगले आणि वेगळे वाटले. बसण्याची व्यवस्था आणि पदार्थ पण वेगळे होते. सर्व्हिस जरा स्लो वाटली. सॅन होजे, माउंटन व्ह्यु आणि सांता क्लारा मधे त्यांची उपहारगृहे आहेत. त्यांचा शाकाहारी लोकांसाठी वेगळा मेनु आहे.

चॅट पॅराडाईस, फ्री माँट हे त्यांच्या माउंटन व्ह्यु मधील ठिकाणा पेक्षा बरेच चांगले आहे. फ्रिमाँट मधे असलेल्या ठिकाणी बसायला जागा आरामात मिळते, माउंटन व्ह्यु सारखे रांग लावावे लागत नाही. पदार्थ / सर्व्हिस (तुलनेने) चांगली आहे. मराठी पद्धतीचे बरेच पदार्थ आहेत. (ब. वडा, सा. वडे, मिसळ, दाबेली, बाजरीची भाकरी-कढी, वरण फळे/ डाल-ढोकळी)

ओहो, ते अमरीन थाई , माऊंटन व्ह्यू ला मी गेले आहे. आवडले होते मला, कारण व्हेज ऑप्शन्स खूप आहेत. शिवाय बरेच दिवस बाहेर ब्लांड खाऊन कंटाळा आल्यावर इथे जरा स्पाईसी वाटले जेवण, शिवाय आपण सांगितले तर आणखी स्पाईसी बनवतात. मुलींसाठी पण नॉन-स्पाईसी ऑप्शन बनवून दिले होते. बसायची व्यवस्था छान आहे.
माऊंटन व्ह्यू ला अमरीन थाई च्याच लाईन मधे कोपर्‍यात हुनान चिली आहे चायनीज ते पण आवडले होते, कारण तिथली चव आपल्या स्पाइसी जेवणाशी मिळतीजुळती वाटली.

सॅन कॅर्लॉस मधी 'Red Hot Chilli Pepper' मधे खादाडी झाली. नावावरुन आणि आतील सजावटीवरुन थाई/चायनीज वाटत असले तरी इंडो-चायनीज आहे. मालक कलकत्याचा आहे म्हणे. मेनुवर खुप पदार्थ होते. चव पण बरीच चांगली होती. (भारतीय उपहारगृहातील buffet मधल्या indo-chinese नावाखाली खपवलेल्या नुडल्सच्या चवी सारखी घिसीपिटी नव्हती). किंमत थोडी जास्त आहे. अमेरीकेतील आम जनतेला लक्षात ठेउन थोडे कमी तिखट होते. चिकन्-फिश सोबत भरपुर शाकाहारी आणि वेगन पदार्थ मेनु कार्डावर आहेत.
एखादे गटग इथे करायला चांगली जागा आहे.

Foster City मधील Chula Thai >> नावाप्रमाणे टुकार.

काल ऑफिसमधल्या एकाने कामाक्षी नावाच्या उपहारगृहाबद्दल सांगितले. भारतातल्या मेस टाईप प्रमाणे घरगुती आहे म्हणे. पण चेन्नई स्टाईल जेवण आहे.

सॅन मॅटीओ डाउन टाउन मधील Kaz Teriyaki Grill
हे जपानिज टु गो साठी बरे आहे. फक्त कॅश घेतात. त्यांचे चिकन करी/ Katsu Curry ट्राय केले. चांगले वाटले.

बे एरिया मधे 'करि अप नाऊ' नावचे इंडियन स्ट्रिट फुड चे ठिकाण आहे. ट्राय करा मस्त आहे.नेहेमिचे पदार्थ वेगळ्या प्रकारे बनवलेले. ही वेबसाईट.

करी अप नाउ च्या मालकाचे अजुन एक डोसा रीप्लब्लिक. नावाचे फ्युजन रेस्टॉरंट आहे. (नोटः सोमवारी बंद असते)

त्या डो.री. च्या बाजुला एक चायनीज रेस्टॉरंट आहे. तिथल्या पदार्थांची किंमत $५.५ इतकी कमी होती, त्यामानाने क्वालिटी खुपच चांगली होती.

San Mateo मधील whole foods complex मधील Daphnes - California Greek बरे वाटले. खुप आवर्जुन जावे असे काही नाही पण कधीतरी जायला चांगले आहे.
त्याच्याच बाजुला हॅबीट बर्गर पण बरे आहे असे ऐकुन आहे.

डाफ्नीज् बरं आहे .. ग्रीक फास्ट फूड कधीतरी खायला ..

हॅबीट बर्गर चेन आहे .. एकदम गुड क्वालिटी आणि अफॉर्डेबल फूड ..

मॅक्स् मेन्यू इंटरेस्टींग वाटतोय .. त्यांच्याकडे सगळे बर्गर्स गार्डनबर्गर ने सब्स्टिट्युट करतात त्यामुळे व्हेज नक्कीच मिळेल .. (कॅलिफोर्नियात फार कमी ठिकाणी व्हेज अजिबात मिळत नाही .. :))

पण अस्सल बीफ बर्गर्स् खाणारे म्हणतील गार्डन बर्गरच खायचा तर जागा बरी आहे की नाही ह्याची चिकीत्सा कशाला? (आणि मनातल्या मनात छी थू करतील :हाहा:) Wink

मेन्यू खरंच बरा दिसतोय .. येल्प वरही बरे रिव्ह्यूज् दिसत आहेत .. जाऊन बघायला हवं एकदा .. Happy

२४ तारखेपासुन साउथ बे मधे 'थाली' नावाचे गुजराथी स्पेशल उपहारगृह चालु होत आहे. जैन आणि व्हेगन थाळी पण असणार आहे अशी जाहिरात केली आहे.

डब्लिन मध्ये टॅसाहारा वर कोको कबाना नावाचं लॅटिन अमेरिकन-अमेरिकन फ्युजन रेस्टॉरन्ट आहे .. थोडं प्राइसी आहे आणि बार/लाउंज वगैरे असल्या कारणाने म्युझिक चालू असेल तर लाऊड वाटण्याची शक्यता आहे पण जेवण अतिशय मस्त आहे .. (एखादं जीटीजी करायचं हवं इकडे ..)

डब्लिन मध्ये डब्लिन वरच थाई बेसिल नावाचं एक रेस्टॉरन्ट आहे तेही फार छान आहे .. मात्र जागा कमी आहे त्यामुळे जा, बसा, खा प्या, फुटा असं वाटू शकेल गर्दीच्या वेळी , मात्र जेवण फार छान आहे ..

फ्रिमाँट मधे जय भारत चालू झाले आये ( आर्तेशिया एलए फेम) चांगलं आहे
गुजराथी थाळी १४ ला..थोडी महाग वाटते पण फूड चांगलं आहे

जूनं नेवार्क मधल वूडलँड जाऊन तिथे हे आलं आहे

अम्माज मधे गेलात तर चायनीज चांगल आहे.

Pages