मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कंपनीच्या पिकनिकला पाचगणीला गेले होते बर्‍याच वर्षांपुर्वी तेव्हा अमिषा पटेल आणि अजय देवगणचे शुटींग सुरू होते. दोघेही अत्यंत सामान्य दिसतात. (मेकप करून सुद्धा) ती अमिषा तर इतकी बुटकी आहे, जवळ जवळ ६ ईंचाची चप्पल घालून सुद्धा ती माझ्यापेक्षा बुटकी दिसत होती. Uhoh

या धाग्याच्या निमित्ताने माझ्या आठवणीचा बांध वहायला लागला. ज्या आठवणी मी पूर्ण पणे विसरून गेले होते त्या पटापट आठवायला लागल्या . त्यातलीच एक आठवण .
मी आधी सांगितले तसे माझे सासरे " गोवा हिंदू असोसिएशन ' चे ब्याक स्टेज म्यानेजर होते . नाटका संबंधी सगळ्या गोष्टी ते सांभाळत .
१) आता नाटकाच्या तालमी झाल्या आणि पहिल्या प्रयोगाची पहिली तारीख ठरली कि थेटर बुकिंग करणे.
२) पुढच्या प्रयोगांच्या तारखा ठरवणे.आणि त्याप्रमाणे बुकिंग करणे. कलाकारांना कळवणे. म्हणजे ते त्याच्या डायरीत नोंद करत असत.
३) बी. बाय पाध्ये पब्लिसिटी कडे प्रयोगाचा ताखेच्या आधी तीनचार दिवस जाहिरात टाकणे. जाहिरात किती लहान /मोठी पाहिजे ते ठरवणे. दिवाळी/नाताळ असेल तर रसिक प्रेक्षकांना जाहिरातीत शुभेच्या देणे.
४) प्रयोगाच्या आधी नेपथ्य व्यवस्थित बसते आहे कि नाही ते बघणे
५) प्रवेशाची प्रोपरटी सांभाळणे. एखादा प्रवेश संपवून नट/नटी विंग मध्ये आला/आली कि पुढच्या प्रवेशात काही त्याला ड्रेस बदलायचा असेल तर लगेच तयार ठेवणे. वर्तमान पत्र स्टेज वर घेऊन जायचे असेल तर ते तयार ठेवणे इत्यादी इत्यादी
६) आणि सगळ्यात शेवटी कलाकारांची मानधनाची पाकीट देणे .
असा सगळा त्यांना जबरदस्त एक्स्पीरियंस होता
या सगळ्या त्यांच्या एक्स्पीरियंस चा फायदा घ्यायचा अस आम्ही ठरवल. आणि एक नाटक कंपनी स्थापन करायची आणि नाटक करायची अस ठरल .
या सगळ्यात मी, नवरा आणि सासरे यांचा पुढाकार कारण आम्हाला तिघांना नाटकाची प्रचंड आवड. लगेच सासर्यांनी कंपनी रजिस्टर करून टाकली आणि आम्ही नाटकाच्या निवडीला सुरवात केली.
ज्यात नेपथ्य कमीत कमी असेल आणि कलाकार पण अस नाटक निवडायच ठरवलं आणि मी शाळेत असताना बघितलेलं . सई परांजपे च " नांदा सौख्यभरे " नाटक मी सुचवलं ( ज्यात नवर्याचा सख्खा मामा काम करत होता ) आणि आमचं तिघांच्या मते शिक्का मोर्तब झालं. आत्ता कलाकार कसे निवडायचे ? त्या बद्दल डिस्कशन सुरु झालं . टोटल चार कलाकार नाटकात होते .दोन नावाजलेले आणि दोन कमी नावाजलेले निवडायचे अस ठरलं . मी लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी यांच नाव सुचवलं आणि सासर्यांना फिमेल कलाकार तुम्ही ठरवा अस सांगितलं. त्यांनी शोभा प्रधान आणि जुईली देऊस्कर च नाव सुचवलं . माझी शंका थोड विजोड दिसणार नाही ना?. सासरे म्हणाले . स्टेज वर काही कळत नाही. सई परांजपे चा नवरा "अरुण जोगळेकर" यांना नाटकाच दिग्दर्शन करायची विनंती केली आणि मुहूर्ताचा नारळ अरुण जोगळेकर यांच्या घरात फोडून तालमी सुरु केल्या. आत्ता नाटकातल्या कलाकारांचा घरगुती अनुभव नंतर Happy

नीधपना अनुमोदन!

वलयांकित व्यक्तींनाही सामान्य माणसाप्रमाणेच भावना असतात याचा आपल्याला विसर पडलेला दिसतो.

मात्र अनेक नामांकितांनी लोकांबरोबर मिसळायचे धोरण ठरवलेले नसते. अश्या वेळी त्यांचा जो असेल तो चेहरा (बरावाईट) लगेच उघडा पडलेला दिसून येतो.

त्यामुळे वाटतं की जनसंपर्ककलेचा समावेश शिक्षणात केला पाहिजे. लबाचा चित्रपटात झफरखानच्या (भूमिका : हृतिक रोशन) तोंडी एक वाक्य आहे : "झफरखान एक प्रतिमा असून मी तिच्यासाठी काम करतो."

हे वाक्य आजच्या अनेक नामांकितांना चपखलपणे लागू पडतं. ज्यांना जनसंपर्काची व्यवस्थित मशागत करायची आहे त्यांनी ते अगदी मनावर कोरून ठेवायला हवं.

असं आपलं माझं मत. नीधप नक्कीच अधिक समतोल युक्तिवाद करू शकतील.

-गा.पै.

मी बर्‍याच लोकाना भेटलो पण आठवणीत राहील अशी भेट म्हणजे शिवसेनेचे नेते सुधीर जोशी आणी मनोहर जोशी... ही भेट एवढी मनात घर करुन आहे की यावर एक लेखच लिहावा लागेल...पण थोडक्यात सांगायचे तर ९२ सालच्या त्या कु/सुप्रसिद्ध प्रसंगानंतर परतीच्या वाटेवर महाराष्ट्रातील आम्ही ३५ जण झाशीच्या जेलमध्ये सडत पडलो होतो.. झाशी जेल ची कपॅसिटी १२० ची होती आणी सर्व देशातील मिळुन आम्ही जवळपास ८५० लोक होतो.. ज्या नेत्यांच्या नादाला लागुन आम्ही जेल मध्ये गेलो त्यानी आम्हाला वार्‍यावर सोडले होते.. त्यावेळी सुधीर जोशी आणी नंतर मनोहर जोशी यानी १५ दिवस आमच्या म्हणजे महाराष्ट्रातील पोरांच्या जेवणाची सोय केली होती.. एवढेच न्हवे तर ते जवळपास ३ दिवस रोज येउन आम्हाला भेटुन जायचे, विचारपुस करायचे.. आम्ही सगळे तिथुन सुटल्यावर त्यांच्या सागण्याप्रमाणे मुंबईमध्ये पोहोचलो तेंव्हा दंगल सुरु होती , खुप प्रयत्न करुन आम्ही शेवटी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला तर सुधीरभाउ स्वत: आम्हाला पोलिस संरक्षणात मनोहर जोशींकडे घेउन गेले..मनोहर जोशीनी आम्हाला बाळासाहेबांच्या पायावर घातले.आणी नारायण राणेंशी ओळख करुन दिली.. राणेसाहेबानी मग आम्हाला त्यांच्या घाटकोपरच्या दोन तीन मित्रांच्या घरी दंगल संपे पर्यंत रहायची व्यवस्था करुन दिली.. Happy

सुजा, भारीच की Happy सान्गा ते अनुभव Happy
रामभौ, भारीच की Happy (म्हणजे तुम्ही तिकडे गेला होतात ते भारी म्हण्तोय मी! त्याबद्दल तुम्हाला एक कड्डक सॅल्युट! Happy )
[>>>ज्या नेत्यांच्या नादाला लागुन आम्ही जेल मध्ये गेलो त्यानी आम्हाला वार्‍यावर सोडले होत <<< हे मात्र अमान्य, तरीही इथे जाहिर फोरमवर मी त्यावर एकही अक्षर उच्चारणार नाही, या धाग्याचा तो विषयही नाही, असो.]

आयला ... मोठमोठे लोक आहेत कि मायबोलीवर !!
वा !! वा !!!!

मी सुद्धा काही लोकांना भेटलोय. पण ते लोक पब्लीकली फेमस नाहीत. एका सर्कल मधले साले रॉकस्टार आहेत.
ज्यांना भेटायचे आहे अजून त्याची यादी देतो.

Tavis Ormandy
Mati Aharoni
HD Moore
Kevin Mitnick

माझ्या यादीतल्या प्रसिद्ध व्यक्ती ज्यांना मी वैयक्तीक ओळखते
१) अंकुश चौधरी, दीपा परब चौधरी- फॅमिली फ्रेन्ड

२) डॉ. श्री. बालाजी तांबे - फॅमिली डॉक्टर, गुरु (घरी २ दिवस राहून गेले)

३) डॉ. राजा व रेणू दांडेकर - काका, काकू (लोकमान्य न्यास दापोली)

४) प्रसाद ओक - मित्र

५) कवि ग्रेस - सासर्‍यांचे मित्र

७) सुधीर मुनगंटीवार (भाजपा प्रदेशाध्यक्ष) - कुटुंब सदस्य

८) प्रा. वसंत पुरके - फॅमिली फ्रेन्ड

खुप मोठी यादी आहे, सवडीने लिहीन.. Happy

चित्रपटांच्या सेटवर पाहिलेल्या सेलीब्रेटीज
अक्षयकुमार, मिलिंद गुणाजी, गोविंदा अजय देवगण. मराठीतील संजय नार्वेकर , मकरंद अनासपुरे, श्रिराम लागू निळु फुले.

नुसतं पाहिलय अशा लिस्ट मध्ये सन्जय दत्त (कसला सांड आहे हा), अब्दुल कलाम , छगन भुजबळ, आनंद अभ्यंकर ही नावं आहेत.
भेटलोय बोललोय अशा व्यक्ती फारच कमी. संदिप सावंत आणि नीरजा याना भेटलोय.

११ वी किंवा १२ वीत असताना कै. शांता शेळके यांची भेट झाली होती. जवळ जवळ अर्धातास त्यांच्याशी बोलणेही झाले होते. माझ्या एका कवितेवर त्यांनी स्वाक्षरीही दिली होती.
IMG00492-20120229-1236.jpg

त्यानंतर सोलापूरातच एकदा डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या घरी डॉ. यु. म. पठाण सर आणि कविवर्य श्री. दत्ता हलसगीकर यांना भेटण्याचा योग आला होता. त्यावेळी मात्र जवळ जवळ तीन तास त्यांच्या बरोबर होतो. दत्ता हलसगीकर सरांना मात्र त्यानंतर खुप वेळा भेटणे झाले.

दहावीत असताना एकदा कै. सुहास शिरवळकर यांची भेट झाली होती. सोलापूर दै. तरुण भारतने घेतलेल्या एका कथास्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस आणि सुशिंकडून मिळालेली पाठेवरची शाबासकीची थाप हि त्या भेटीची भरघोस कमाई आहे.

सुप्रसिद्ध चित्रकार श्री. अरुण दाभोळकर. हे माझ्या मावशीकडे आले होते एकदा. माझा मावसभाऊ त्यांचा शिष्य होता. त्यावेळी भाऊच्या नादाने मीही दाभोळकरांच्या शैलीत वॉटरप्रुफ इंकने पेंटींग्स, ग्रिटींग्स करायला शिकलो होतो.

एका काव्य संमेलनात अनाहुतपणे घुसून आपली मलाच भन्नाट ( Wink ) वाटलेली कविता ऐकवल्यानंतर कै. बाबा उर्फ विठ्ठल उमप यांच्याकडून मिळालेली शाबासकी तसेच सल्ला खुप मोलाचा होता.

एका कार्यक्रमात भेटलेले बंग दांपत्य, प्रकाशदादा आमटेंची दोन मिनीटांची चुटपुटती भेट.....

चित्रपट कलावंत खुप पाहीले. भेटले म्हणाल तर परवा पाऊलवाटच्या प्रिमीयरच्या वेळी त्या चित्रपटाचे कलावंत. पण इतर कलावंतांपेक्षा चित्रपट संपल्यावर, चित्रपट पाहायला आलेल्या श्री. श्रीकांत मोघे यांच्याबरोबर गप्पा खुप आनंद देवून गेल्यात.

नीरजा पटवर्धन यांना शिवाजी पार्कवरच्या एका गटगमध्ये बघीतले होते. (बोलणे काही झाले नाही, कारण त्यावेळी आमची खास मैत्री होती :P)
त्यानंतर त्या अधुन मधुन फेसबुकवर (चॅटमध्ये) भेटत असतात Happy

श्री. कौतुक शिरोडकर गेल्या आठवड्यात आमच्या घरी पायधूळ झाडून गेले.. तसेच मायबोली सदस्य असलेले रायगड किल्ले अभ्यासक निलेश वेदक हे देखील दर्शन देऊन गेले.. Happy

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे विद्यामान सरसंघचालक श्री.मोहनजी भागवत यांची भेट कायम चिरस्मरणात राहील.

रोज सकाळी आरशात तर पहावेच लागते.. कंटाळा आलाय सेलेब्रिटी ला भेटून भेटून भेटून भेटून भेटून भेटून भेटून..

हेहेहेहे..काय करणार मनीतै! अहो सेलेब्रिटी म्हटलं की इमेज बनवावी अन टिकवावी अन जपावीपण लागते ना! Happy

Pages