माझं टी शर्ट

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

देवनागरी सुलेखन केलेले सुंदर टी शर्टस हल्ली उपलब्ध आहेत. मला ही माझ्या साठी येक टी शर्ट बनवावासा वाटला. सुलेखन हा माझा प्रांत नाही त्यामुळे त्यात फारसं काही नाविन्य किंवा सौंदर्य नाहिये पण मी स्वतः लिहुन काढल्याने येक पर्सनल ट्च आलाय. आत्ता मी हे इथे का लिहतोय तर मला मायबोली करांची मदत हवीय. ती देवनागरी सोडुन बाकिची स्क्रिप्ट मी baraha च्या मदतीने फोटोशॉप ने अ‍ॅड केलित. जर कुणाला ही स्क्रिप्ट समजत असतील तर त्यात काहि चुका नाहियेत ना हे मला सांगा म्हणजे मला हे टि शर्ट प्रींट करुन घेता येईल.

विषय: 
प्रकार: 

मी देवनागरी स्क्रीप्ट चेक केलय. काही चूका नाहीत Happy छान आहे.
मला स्वतःला हे उभ्यापेक्षा आडव्या पट्टीवर लिहीलेले टी-शर्ट आवडले असते.

गुजराती, तेलगू अन कानडी तिन्ही बरोबर आहेत

runi Happy फोटोशॉप मधे आणि काहि काँबिनेशन्स करुन बघतो
गौरी, shonoo मदतीसाठी धन्यवाद

अजय, बंगाली पण बरोबर आहे.. सही कल्पना आहे एकदम...
आणि हे असे उभेच मस्त दिसेल.. आडवे केले तर त्यातले वेगळ्या लिपीमध्ये लिहीलेले उभे करावे लागेल आणि ते समजायला कदाचित अजून जड जाईल..
टी-शर्ट प्रिंट कसा करणार आहेस?...
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

himscool - धन्यवाद,बहुतेक मॉल्स मधे टी शर्ट प्रीन्ट करुन मिळतात