"जन गण मन" प्रिमिअर - मुंबई

Submitted by भुंगा on 26 January, 2012 - 06:41

"जन गण मन" या चित्रपटाच्या मुंबई प्रिमिअरला जायचा योग अ‍ॅडमिन कृपेने आला आणि मी, देवकाका, शर्मिला फडके, अनिताताई आणि ईंद्रधनुष्य असे ५ मायबोलीकर ईंफिनिटी मॉलला या निमित्ताने भेटलो.
मी, अनिताताई, देवकाका आणि शर्मिलाजी अगदी ६.१५ पासूनच तिथे हजर होतो... मालगुडी डेजमध्ये चहा कॉफी घेऊन अगदी ७.३० पर्यंत वाट पाहिली तरी कार्यक्रम सुरू व्हायचा पत्ताच नाही. नाही म्हणायला काही तुरळक मराठमोळे चेहरे हळूहळू जमत होते. ईंद्रा प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकला होता.

तोपर्यंत अचानक अमित अभ्यंकर (चित्रपटाचा दिग्दर्शक) आणि नंदू माधव (रामचंद्र सोनटक्के) हजर झाले. ते येताच देवकाकांनी सरळ त्यांच्याकडे मोर्चा वळवला. आम्ही मायबोलीकर आहोत म्हटल्यावर लगेच अमितने आमचे स्वागत केले. नंदू माधव यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही झाल्याच. अगदी दिलखुलास व्यकित्मत्व. औरंगाबादपासूनचा त्यांचा इथपर्यंतचा प्रवास त्यांनी थोडक्यात सांगितला. देवकाकांनी मोजक्या प्रश्नात त्यांना बोलकं केलं. मग अमितकडे मोर्चा वळवला. काही काळ ठरवून फिल्म एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचे काम करून आता अमितने ही आपली पहिलीच फिल्म केलेली होती. पण अजूनही बरेच काही करता आलं असतं हे आधीच प्रांजळपणे मान्य करून आणि काही दिवस मिळाले असते तर बरंच काही करता आलं असतं हेही तो थेट सांगून मोकळा झाला. मुळचा पूणेकर अमित एकदमच मोकळा वाटला.

आता हळूहळू ओळखीचे चेहरे येऊ लागले होते. प्रदीप वेलणकर, शिल्पा नवलकर, राजीव पाटील, चित्रपटातली बच्चे कंपनी, गुंतता फेम संदीप कुलकर्णी (माबोकरांच्या भाषेत संकु) सगळे जमले. कथालेखक समीर जोशी याच्याशीही बातचित झाली. त्याचा अनुभव आणि सध्या तो करत असलेल्या काही सिरिअलवर (सास बिना ससुराल आणि साम वरची एक सिरिअल) याबद्दलही देवकाकांनीच त्याला बोलता केला. संदीप कुलकर्णीचा गुंतता मधला शेवटशेवटच्या खुरट्या दाढील्या लूकमागचे गूढ उकललंच मी..... नव्या चित्रपटात एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत तो असल्याने तसा लूक घेतला आहे त्याने. आता दोन वर्षे नो डेली सोप असं स्पष्ट सांगितलं त्याने.
इंद्रा आल्यावर वरती कॅमेरे अलाऊड नसल्याने ते तसेच गाडीत ठेऊन आम्ही तिसर्‍या मजल्यावर पोचलो. तिथे तर थोड्याच वेळात सगळे मराठी कलाकार जमले. जयंत वाडकर, ऋजुता देशमु़ख, मधुरा वेलणकर, अभिजीत साटम.....

DSC07817.JPG

नंदू माधव यांच्यासोबत अनिताताई, शर्मिला फडके आणि भुंगा

DSC07818.JPG

अमित अभ्यंकर (दिग्दर्शक) याच्याशी गप्पा मारताना देवकाका

DSC07820.JPG

कथालेखक समीर जोशी, देवकाका, अनिताताई आणि शर्मिला

DSC07822.JPG

संदीप कुलकर्णीसोबत भुंगा आणि शर्मिला

DSC07823.JPG

संदीप कुलकर्णी सोबत शर्मिला, अनिताताई आणि देवकाका

*************************************************************************************************************
आडगावात येऊन पडलेल्या बदलीसाठी खटपट करणार्‍या रामचंद्र सोनटक्के आणि कथेच्या ओघात काही घटनांमुळे एक स्वप्न ऊराशी बाळगणारा "काटू" या मुलाची ही सहज सुंदर कथा.....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वातावरण निर्मिती. आता चित्रपटाबद्दलही लिही. काय आवडलं, काय नाही आवडलं असं बैजवार येऊदेत.

ही काय नुसती सुंदर वातावरणनिर्मिती झाली... गिफ्टबॉक्सच्या आत गिफ्टच नाही? सिनेमाबद्दल लिहा की..

आशुडी.... अहो ते प्रिमिअर होतं.. जरा चित्रपट रिलीज होऊ द्या.. मग सविस्तर लिहितो चित्रपटाबद्दल. Happy

शैलजा Biggrin

आडगावी नोकरी करत असलेल्या एका प्राथमिक शिक्षकाची ही कथा आहे...आपल्या गावाजवळ लवकरात लवकर बदली व्हावी ह्यासाठी त्याला काय काय लटपटी खटपटी कराव्या लागतात....त्याबद्दल थोडे विनोदी,थोडे करूण आणि बरेचसे गंभीर स्वरूपाचे प्रसंग ह्यात पेरण्यात आलेत...बाकी भुंगा म्हणाल्याप्रमाणे चर्चा पुढे सुरुच राहील. Happy

भुंगा, लिही की. मात्र 'संपूर्ण कथा' लिहिली तर इतरांचा सिनेम्यातला रस जाऊ शकतो. 'चित्रपटाबद्दल लिहिणे' म्हणजे संपूर्ण कथा लिहिणे नव्हे. Happy
प्रिमियरला गेलेल्या सर्वांनी एकूणच चित्रपटाबद्दल काय वाटलं ते लिहा ही विनंती.

'सर्व शिक्षा अभियान' या उपक्रमाचा सर्वच स्तरावर वाजलेला बोजवारा म्हणजे 'जन गण मन'.

आदिवासी पाल्यातील जेमतेम दहा मुलांची शाळा. कुटुंबा पासून दूर, शिक्षणात रस नसलेले विद्यार्थी, एकाकीपणा आदी गोष्टींमुळे आदिवासी मुलांना शिकविण्यास निरुत्साही असलेला मास्तर म्हणजे 'रामचंद्र सोनटक्के'. जेथे गळ्यातील शिट्टीसुद्धा चोरीला जाऊ शकते अश्या आदिवसी शाळेत शिकवण्या परिस, तेथून लवकरात लवकर बदली होऊन आपल्या लेवलच्या शाळेत जाऊन शिकवण्याची मनिषा बाळगणारा मास्तर नंदू माधव यांनी छानच साकारला आहे.

१५ ऑगस्ट कार्यक्रच्या निमिताने शिक्षण अधिकार्‍यांचे शाळेला भेट देण्याचे वचन... त्यांच्यावर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडावी म्हणून विद्यार्थांकडून करून घेतलेल्या विविध तालमी... आणि त्या तालमीतून उडणारे विनोदाचे तुषार... एकदम धम्माल. याच तालमीतून फुलणारा अंगार 'कट्या' ने तितकाच चांगला साकारला आहे. बाकीचे पात्रं निमित्त मात्र वाटतात.

चित्रपटाची तांत्रिक बाजू थोडी कमजोर राहिली आहे. चित्रपट पाहताना दिग्दर्शकाच हा पहिलाच प्रयत्न असल्याचे सतत जाणवत रहाते.

लिही की. मात्र 'संपूर्ण कथा' लिहिली तर इतरांचा सिनेम्यातला रस जाऊ शकतो. 'चित्रपटाबद्दल लिहिणे' म्हणजे संपूर्ण कथा लिहिणे नव्हे.
>>>>>>>>>>>>>>>>

बरोबर साजिरा... पण काही खटकलेले प्रसंग डिटेल लिहिल्याशिवाय आपलं म्हणणं मांडणं शक्य नाही...... तेंव्हा अजून काही काळ थांबून चित्रपट रिलीज होऊन काही लोकांनी पाहिल्यावरच त्यावर लिहीन म्हणतो......
म्हणायचं आहे पण म्हणायचं ही नाही.. हे कसे जमावे Wink

चित्रपटाची तांत्रिक बाजू थोडी कमजोर राहिली आहे. चित्रपट पाहताना दिग्दर्शकाच हा पहिलाच प्रयत्न असल्याचे सतत जाणवत रहाते.
>>>>>>>>>>>>>>>>

प्रचंड अनुमोदन.

कालच पाहीला सिनेमा लय भारी आहे

कुणीतरी बोलल हे वाचा तु बघून आला त्या सिनेमाच आहे म्हणून वाचल पण लेख टुकार वाटला.
शुद्धलेखनाच्या चुका तर आहेतच पण बाकी बरेच घोळ आहेत.

<<तोपर्यंत अचानक अमित अभ्यंक (चित्रपटाचा दिग्दर्शक) आणि नंदू माधव (रामचंद्र सोनटक्के) हजर झाले. >>

<< मालगुडी डुजमध्ये चहा कॉफी घेऊन >>

<<संदीप कुलकर्णीचा गुंतता मधला शेवटशेवटच्या खुरट्या दाढील्या लूकमागचे गूढ उकललंच मी....>>
जबरा "अचिव्हमेंट" तुमची Biggrin त्याचा या चलतचित्राचा काय संबंध?

<<नव्या चित्रपटात एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत तो असल्याने तसा लूक घेतला आहे त्याने. आता दोन वर्षे नो डेली सोप असं स्पष्ट सांगितलं त्याने. म्हणजे २ वर्षांनी पुन्हा एक विबासंवरची सिरिअल नक्की.... संकु आणि मृकु... फेव्ह जोडी पुन्हा Wink >>

बाप रे! संकु फक्त विबासंवरच्याच मालिका करतात असा यातून समज होऊ शकतो........किंवा प्रस्तुत लेखकाचा तरी तसा समज दिसतो......कृपया असे गैरसमज पसरवु नका.

<<..... काही नवे चेहरे ज्यांचे अगदी छोटे छोटे पेहराव पाहून हे चुकून "अग्नीपथ"ला जायच्या ऐवजी इथे आले की काय असे वाटून गेले..... पण आपणच आपल्या मराठी कलाकारांना असे कमी का लेखायचे असा विचार करून त्यांना प्रत्येकी एक एक स्माईल देण्यसत आले >>

छोटे छोटे पेहराव? काय संबंध? आपणच आपल्या मराठी कलाकारांबद्दल असे लिहून त्यांना कमी लेखू नये. खाजगी चकाट्यांत बोललात तर ठीक पण मायबोलीसारख्या मराठमोळ्या पण खाजगी संकेतस्थळाने माध्यम प्रायोजनाच्या माध्यमातून सुरु केलेल्या उपक्रमाच्या लेखात अस उल्लेख येऊ नयेत.

<< अगदी ७.३० पर्यंत वाट पाहिली तरी कार्यक्रम सुरू व्हायचा पत्ताच नाही >>
मराठी कलाकारांनाच नव्हे तर कार्यक्रमांनाही कमी लेखू नये.......आमच्या फ्यामिलीने पण काही प्रिमियर बघितले आहेत ते पण हिंदी......अगदी उशीरानेच सुरू होतात.

>>चित्रपटाची तांत्रिक बाजू थोडी कमजोर राहिली आहे. चित्रपट पाहताना दिग्दर्शकाच हा पहिलाच प्रयत्न असल्याचे सतत जाणवत रहाते.

यावर अधिक स्पष्टीकरण मिळेल का.......आम्हाला तर लई मजा आली राव. तसे काही पण जाणवले नाही.

सिनेमा पाहण्याची उत्सुकता कायम राहिल अशाप्रकारे, पण तुला काय वाटले सिनेमाविषयी ते तुझ्या खास श्टाईलीत येऊ दे लवकर!!
माबोच्या कृपेमुळे आपल्याला प्रिमिअरला जाण्याचा योग आला!! काय धम्माल आली. फोटो पाहून आठवणी ताज्या झाल्या!:स्मित:

भुंग्या सिनेमाबद्दल अजून लिहून नाही का झालं? इंद्रा छान, योग्य लिहिलं आहेस. आवडलं.

बाप रे आणि मला इतका का उत्साह आलेला फोटोंमधे घुसायचा आठवत नाही Uhoh कायच्याकाय एम्बरॅसिंग होतय आता चारी फोटोंमधे बघून. भुंगा मी तुझ्या कॅमेर्‍यातून कढलेले फोटो तरी टाकायचेस. की ते फुकट गेलेत सगळे? Proud

गो शर्मिला
Lol होना Lol आई गं काय हसले. बरं झालं तूच म्हणालीस. हेच आवडतं बघ मला तुझं. तुला स्वत:वर हसता येते.

उगीच गंमत. फोटो सगळेच छान आहेत.

संदिप कुलकर्णी किती म्हातारा दिसावा याला काही सीमा? दचकले त्याला पाहुन. श्या !!! किती छान (म्हणजे तसा ठिक) दिसायचा तो.. काय हे...

इतक्या घाऊक संख्येनी एकाच कारेक्रमातल्या ग्रूप फोटोंमधे माझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच आहे मी Proud मुलींना दाखवले आत्ता तर त्याही खदाखदा हसताहेत. भुंग्याला मारलं पाहीजे Proud

हो विचित्रच लूक होता हा त्याचा. आणि तरी मी शेवटच्या फोटोत त्याच्याकडे चोरुन वगैरे बघतेय असं वाटतय :प Proud

लिहावं की नाही याचा विचार करतोय... त्या दिवशी अतिउत्साहात सगळंच उत्स्फूर्त लिहून मोकळा झालो होतो... आता पुन्हा तेच तितक्याच पोटतिडिकेने लिहिणे जरा जीवावर आलय... Sad

शर्मिला, बहुतेक तू काढलेले फोटोज आलेच नसावेत.. हे इतकेच फोटो होते माझ्याकडे आणि दोन होते त्यात मीच होतो.... उगाच आपला भडिमार नको लोकांवर म्हणून इतर फोटो टाकले .. त्यात सगळीकडे तू आहेसच.....

तसेही आपल्या पाच जणात जरा तूच "सेलिब्रिटी" वाटत होतीस..... किंवा एखादी "टॅरो कार्ड रिडर" Biggrin Rofl

खरं आहे मिलिंदा..शर्मिलाच आपल्यातली नामांकित व्यक्ती आहे...तेव्हा तिच्याबरोबर आपण दिसणं आवडलं मला. Happy

तुझा लूक पण एखाद्या सेलिब्रिटीसारखाच होता.... झी मराठी चॅनल फोटो बघून सकाळी ९ च्या स्लॉटला "राशीभविष्य"साठी तुझा विचार नक्की करू शकते.... Wink

शर्मिला फडके नाव पण भारदस्त आहे एकदम...... राशीभविष्यकार Rofl

हे पण मुलींना सांग आम्ही सगळे ऑनलाईन हसतो... Biggrin Rofl

देवकाका... का जखमेवर मीठ चोळताय हो तुम्ही... Sad

अ‍ॅडमिनने मला बॅन केले नसेल तर अजूनही एखाद्या प्रिमिअरला मी जाईन आणि तिथे एक ना एक दिवस ती भेटेलच हो Wink

आपण १००% आशावादी माणूस आहे......

धर्मेंद्र ईस्टाईल....

देवकाका.... वो आयेगी और जरूर आयेगी.... और हमारा फोटू आपही खिचोगे.... माकसम... Rofl Proud Biggrin Light 1

Pages