मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसं सेलेब्ज म्हणायचं तर गठ्ठ्याने नावं सांगता येतील. बहुतेक लोक वेगवेगळ्या प्रोजेक्टसच्या संदर्भात भेटलेले आहेत आणि अनेक लोक मित्रमंडळींच्यात आहेत. व्यवसायाचा भाग आहे तो. नथिंग टू बिग.

झहिर खान - आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो. आता त्याने नोकरी सोडली.
अनिल कुंबळे - अ‍ॅड कँपेनसाठी आला होता
वासिम जाफर - एकाच ऑफिसमध्ये होतो. हल्ली दिसत नाही. बहुतेक ट्रान्स्फर असेल किंवा नोकरी सोडली असेल.
अमित दाणी - रणजी प्लेअर - एकाच ऑफिसमध्ये आहोत.
पुल्लेला गोपीचंद - एकाच कंपनीत पण वेगळ्या ऑफिसमध्ये. कुठल्याश्या प्रोग्रॅमसाठी ऑफिसमध्ये आले होते तेव्हा पाहिलं (याला भेट म्हणता येणार नाही).
अपर्णा पोपट - एकाच ऑफिसमध्ये - कँटिनमध्ये दिसते
माला सिन्हा - ऑफिसमध्ये काही कामासाठी आल्या होत्या
वैशाली सामंत - गायिका - नातलग
निलेश मोहरीर - संगीतकार - नातलग
नीरजा पटवर्धन - कॉश्चुम डिझायनर - मैत्रिण
संदिप सावंत - सिनेदिग्दर्शक - मैत्रिणीचा नवरा
निशिगंधा वाड - नात्यातल्या लग्नात भेटली होती. नातलग
अजय गल्लेवाले - माबोवरचे नाते - गटग
समीर सरवटे - माबोवरचे नाते - गटग
आशालता वाबगावकर - सत्संगात भेटतात
फाल्गुनी पाठक - सत्संगात भेटतात व एका प्रोजेक्टसाठी आमच्या ग्रूपला रेकॉर्डिंग वगैरेसाठी खूप मदत केली.
डॉ विजया वाड - नातलग
मंजिरी देव (क्लासिकल डान्सर) - उपासना केंद्रात
रुपाली देसाई (क्लासिकल डान्सर) - फॅमिली फ्रेंड
श्रीकांत देसाई (मराठी सिरियलमधला कलाकार) - फॅमिली फ्रेंड
अवधुत गुप्ते - सारेगमपच्या वेळेस
पल्लवी जोशी - सारेगमपच्या वेळेस
मुक्ता बर्वे - सारेगमपच्या वेळेस
विनय आपटे - सारेगमपच्या वेळेस
"देऊळ" प्रिमियरच्यावेळेस बघितलेले कलाकार

नीधप
सहमत. सेलेब्जना भेटण्याचा जास्त बाउ केला जाऊ नये. प्रसिद्धी हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. त्यांच्याशी भेट होणं हे नक्कीच अप्रूप आहे, पण अभिमानानं सांगावं असं काही नसावं त्यात..

झहिर खान - आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो. आता त्याने नोकरी सोडली>> Lol

अश्विनी अभिनंदन, लिस्ट आवडली Happy

.

बेफी , तुम्ही विबासं प्रकाशित/प्रसिध्द करत आहातच तुमच्या लिस्ट मधे किमान २४ नावे तरी असायला हवीतच Biggrin

दीपिका पादुकोण. (ही बाई अत्यंत मूर्ख आहे.) >> नंदिनी काय हवं ते घे तुला. दुर्दैवाने ती तोंडावरूनच मुर्ख वाटते, वेगळं काय ते सांगायचं? तुझ्याकडून खातरजमा झाली. Happy

परवा जनगणमनच्या निमित्ताने बर्‍याच प्रसिद्ध लोकांना भेटता आलं. त्यापैकी काहींशी नुसतंच फोटोसेशन झालं. पण नंदुमाधव यांच्या बरोबर पहिला फोटो काढला त्यावेळी त्यांनी खूप मोकळेपणाने तो काढू दिला. चित्रपट संपल्यावर त्यांना भेटायला गेले आणि काम सुंदर झाल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनी आवर्जुन माझं नाव वगैरे विचारलं.

मागे एकदा मी आणि माझी मैत्रिण 'भावसरगम' पहायला गेलो होतो. लोक फर्माईश करत होते. हृदयनाथजींना त्यातली ऑलमोस्ट सर्व गाणी पाठ होती. मी आणि माझ्या मैत्रिणीने एक गाणं सांगितलं. (ते मीरेचं भजन होतं बहुतेक, आता आठवत नाही.) ते त्यांना पाठ नव्हतं. आम्हाला लिहून द्या असं सांगितलं, शिवाय वर आमची नावं ही लिहायला सांगितली होती. मग आम्ही कागद मिळवून ते पुर्ण गाणं लिहून त्यांच्यापर्यंत पोहोचवलं.. तेव्हा त्यांनी माझ्या मैत्रिणीचं नाव योग्य घेतलं.. (सीमा) माझं नाव प्रिती असं घेतलं.. असू दे.. हरकत नाही.. मग कागद डोळ्याखालून घातला... आणि म्हणाले आत्ता गातो मी, पण तुम्ही दोघी नंतर येऊन भेटा.. हे सगळं स्टेजवर माईकवरून सांगत होते. मला जाम आनंद झाला होता. कार्यक्रम रात्री खूप लेट संपला, आम्ही स्टेजवरच जाऊन भेटलो... तेव्हा त्यांनी आमचं कौतुक केलं ते गाणं निवडल्याबद्दल, कारण नेहमी पब्लिक तीच ती गाणी गायला सांगतं.. मग पुढे गाण्याच्या लिखाणात झालेली चूक निदर्शनास आणून दिली.. आम्ही पाया पडलो आणि निघालो. फार गप्पा वगैरे झाल्या नाहीत पण गाण्यातल्या ज्ञानी माणसाला भेटल्याची प्रचिती आली. Happy

सिद्धार्थ जाधव.-गडकरी रंगायतन ला भेट झाली.

अभिजित चव्हाण.- गडकरी रंगायतन ला भेट झाली.
.
आदेश बांदेकर (सकुसप) - आत्येबहिणीच्या लग्नात.

शर्मिला ठाकरे- मनसे च्या निवडणूक रॅलीत.

इशा कोप्पीकर- एका कॉन्सर्ट साठी कल्याण ला आलेली.

विनय आपटे- गडकरी रंगायतन ला भेट झाली.

बेफिंनी नुकतंच एकट्याने गटग केलं त्या वेळी पडद्यावरून ऋत्विक रोशन, संजय दत्त, प्रियांका चोप्रा, कतरिका कैफ डोळे विस्फारून त्यांच्याकडे पहात होते..
( मायबोलीचं हिंदी वर्जन आहे का ? चेक केलं पाहीजे. तिकडं कुणी लिहीलं असल्यास )

आयडीयाच्या एका इव्हेन्टला सोनू निगम आलेला, त्यावेळेला मी कोणत्या तरी गाण्याची एक ओळ म्हणले होते. फार पुर्वी.. ८-९ वर्ष झाली असतील त्याला.

मिरवण्याचा दोष माथी घेऊनही अशी काही नावं... ज्यांना भेटल्याचं, ज्यांच्या मैत्रीचं, ज्यांच्याकडून शिकल्याचं मला खरंच अप्रूप आहे अश्यांपैकी काही नावे.
कै. विजय तेंडुलकर - आयुष्यातले दोन-तीन तास अक्षरशः सोन्याचे होते त्यांच्याशी गप्पा मारल्या ते. नंतर माझ्या नाटकाच्या प्रयोगाला दोन-दोन वेळा आले होते.
कै. सत्यदेव दुबे - काय बोलणार.. एक दिवस नाही असा जात ज्यादिवशी त्यांचा आवाज कानात घुमत नाही.
कै. चेतन दातार - शहाणं व्हायला शिकवणारा मित्र.
कै. रसिका जोशी - जवळची मैत्रिण.

सतीश आळेकर - गुरू. आयुष्य घडायला मदत झालीये.
डॉ. मोहन आगाशे - इन्फॉर्मल प्रकारचा गुरूच म्हणायला हवा हा.
विक्रम गायकवाड - मित्र आणि गुरू

आयडीयाच्या एका इव्हेन्टला सोनू निगम आलेला, त्यावेळेला मी कोणत्या तरी गाण्याची एक ओळ म्हणले होते. फार पुर्वी.. ८-९ वर्ष झाली असतील त्याला<>>> नंतर तीन वर्षे त्या एव्हेंटसाठी मी शान आणि सुनिधी चौहान (ही राहिली लिस्टमधे) घेऊन भारतातल्या २७ शहरामधे गेले होते. अर्थात ते गाणी वगैरे म्हणणारे. आम्ही मीडीया संभाळणारे. Happy लोकल मीडीया हा एक अत्यंत त्रासदायक प्रकार असतो.

नीधप

आत्ताच्या पोष्टीतल्या सर्व नावांबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !!
या व्यक्ती नसून संस्था आहेत. सेलेब्जमधेही अमिताभ, दिलीपकुमार, राजकपूर असे माईल स्टोन आहेतच. नाहीतर विवेक मुश्रनला मी ही भेटलो होतो.. ( आठवण पण नको वाटते )

बर, पण सिरीयसली आठवावच अशी नावे....

१) चित्रकार एस एम पन्डीत (१९८०-८५ दरम्यान कधीतरी, पुण्यातील त्यान्चे प्रदर्शनानिमित्ते त्यान्चा मुक्काम चार/पाच दिवस श्री वाड यांचेकडे होता)
२) चित्रकार बाळ वाड (यांचेकडे मी काही वर्षे काम केले)
३) ज्योतिषी काकासाहेब अवचट (यांचे महाविद्यालयात मी ज्योतिष विद्यार्थी होतो, यान्नी माझी कुन्डली बघुन विशिष्ट बाबी वर्तविल्या, त्या जशाच्या तशा उतरल्या, काही अजुन होणे बाकि आहेत, त्यान्चे स्वतःचे मृत्युबाबतही त्यान्नी त्याच वेळेस भाष्य केले होते, व ते देखिल तसेच खरे उतरले)
४) मेदिनीय ज्योतिषी श्री के केळकर (यांचेकडे सल्ला घेण्यासाठी गेलो होतो)
५) राजा दिनकर केळकर सन्ग्रहालयाचे संस्थापक पद्मश्री डॉ. दिनकर केळकर (यांचेकडे मी जवळपास वर्षभर काम केले - रात्रीचा सोबतीला झोपायलाही जायचो)
६) तत्कालिन कायदामन्त्री (नन्तरचे माजी मुख्यमन्त्री) बाबासाहेब भोसले (यांचे हस्ते बक्षिस शाल-श्रीफळ स्विकारले)
७) सुलभा ब्रह्मे (ख्यातनाम अर्थतज्ञ धनन्जयराव गाडगीळ यान्ची कन्या, गाडगीळान्चा मी बनविलेला पुतळा बघण्यास वेळ काढून माझे चाळीतील भाड्याचे घरी आल्या होत्या)
८) नरेन्द्र मोदी (सावरकरसदनाचे उद्घाटन प्रसन्गी, उद्घाटनाचे शीलावरण काढण्याची दोरी यान्नी माझे हस्ते घेतली Proud - मी सुरक्षाव्यवस्थेत होतो Wink )
९) सुधीर फडके (स्वा. सावरकर दर्शन प्रतिष्ठानकरता यान्चे गायनाचा कार्यक्रम एच ए मधे होता, मी सचिव होतो सबब बरेचदा भेटलो)
१०) बिंदुमाधव जोशी (स्वा. सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे कामा निमित्ताने अनेकदा भेटलो, त्यान्नी सावरकरांचा एक पुतळा मला भेट दिला)
११) प्रथम मराठी-इन्ग्रजी बृहत शब्दकोष रचणारे वीरकर सर (प्राथमिक शाळेत असताना माझ्या शाळेचेच हे मुख्याध्यापक होते)
१२) विघ्नहरी महाराज देव (यांच्या पाया पडलो)
१३) धर्मचैतन्यचे कोल्हटकर बुवा (आईने भर रस्त्यात यान्च्या पाया पडवुन घेतले, यांची किर्तने खुन्या मुरलीधराचे देवळात ऐकायला जायचो)
१४) प्रशान्त दामले (हा मंडळाचे एका कार्यक्रमानिमित्ताने आला होता, मस्त लहानमुलान्मधेही रमला होता, निर्गर्वी वाटला)
१५) (रि.) एअर चीफ मार्शल हृषिकेश मूळगावकर - याचे शेजारील बन्गल्यात मी कामास होतो, यान्चे बन्गल्यातील साप मी काठीने मारला होता, तर आमचे येथे आलेल्या सापास यान्नी बन्दुकीने मारले होते. कडक शिस्तीचा, ताठ कण्याचा माणूस, मला जीवे मारण्याची धमकी देणार्‍या सुपारीबहाद्दर गुन्डाला यान्नी "त्यान्च्या भाषेत" चान्गल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. प्रत्यक्ष बोलणे फारच कमी झाले, पण यांचे शेजारी म्हणून नुसते असणे/दिसणेच वा येताजाता नमस्कार अतिशय परिणामकारक होते. यांचेच बन्गल्यातून साफसफाईनन्तर आणलेली कढीपत्याची रोपे आजही इतक्या वर्षानन्तर माझे इथे नान्दताहेत.
१६) गो नी दान्डेकर - विहिंप ची क्यालेन्डर्स विकायला लिम्बीच्या काकाबरोबर चिन्चवड ते पार लोणावळ्यापर्यन्त घरोघरि फिरताना यांचेही घरी गेलो होतो, काकाला (व लिम्बीचे घराण्याला) ते नावाने ओळखत होते, त्यान्ना नमस्कार केला! पण आज जितकी त्यान्ची योग्यता/श्रेष्ठपण जाणवते, तितके ते त्यावेळेस, त्या अवखळ वयात जाणवत नव्हते, त्यामुळे त्यान्चेकडून काही बौद्धिक घेण्याचा योग आला नाही, दुर्दैव माझे.
१७) बाबासाहेब पुरंदरे - यांचेशी पुन्हापुन्हा संपर्क स्थापित होण्याच्या सन्धी येऊनही मी दरवेळेस गमावल्या. बर्‍याच वर्षान्नी शेवटी लिम्बीबरोबर यान्ना एकदा विश्रामबागवाड्यात भेटलो होतो. पण (पोटार्थी परिस्थितीमुळे) पुन्हा तिकडे जाणे झाले नाही. मात्र यांचे जाणता राजा/शिवकल्याणराजा या क्यासेट्स ऐकुन, त्यातिल निवडक भागाचा पोवाड्यात्मक कार्यक्रम काही वर्षे गणपतीमधे सादर करायचो. आमचा गृप होता, ग्रुपलिडर अर्थातच जाणताराजामधे सुरवातीच्या पन्नासएक कार्यक्रमात काम केलेला होता.
१८) चित्तरंजन कोल्हटकर - संस्कारभारतीचे शिबिराचे आयोजन करताना यांना भेटणे/बोलणे झाले.
१९) विजयाराजे शिंदे - मंडळाचे कामानिमित्ताने कॅ.कदम यान्चे घरीच आलेल्या असताना वयाने सर्वात लहान कार्यकर्ता म्हणून भेटणे झाले होते, फक्त त्यान्चे सोबत फोटो काढून घेतला गेला नाही
२०) मुक्तान्गणचे अवचट - यांचेशी बोलणे झाले नाही, पण साप्ताहिक सभेमधे लेक्चर देताना/प्रार्थनेवेळेस बघितले/ऐकले, बासरी छान वाजवतात.
२१) स्वा. सावरकर मण्डलातर्फेच्या व्याख्यानमालेनिमित्त अनेक वक्ते (शेसव्वाशे) जवळून बघितले/ऐकले. पैकी अर्थातच प्रा. शिवाजीराव भोसले, सावरकरान्चे अन्गरक्षक श्री अप्पा कासार इत्यादी थोर मण्डळींशी भेटणे/बोलाचाली झाली.

या सर्वच लोकान्मुळे माझे जीवन समृद्ध झाले असे मला वाटते Happy

पुण्यात राहूनही भेटण्याचे (किमान भेटून पाया पडण्याचे) राहून गेलेल्या व्यक्ति
१) दामू धोत्रे
२) जादुगार रघुवीर
३) पु ल देशपाण्डे
४) महादेवशास्त्री जोशी
५) किर्तनकार आफळेबुवा
६) भीमसेन जोशी
७) ग दि माडगुळकर
आणि अनेक..... Sad

Pages