मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप खुप वर्षापुर्वी कॉलेजात असताना एका पुस्तक विक्री प्रदर्शनात, ते प्रदर्शन ज्यांनी योजले होते त्या मुलांना विनंती करुन 'सुहास शिरवळकरांशी' (जे उद्घाटन करायला आले होते) २-४ मिनिटे बोलायची संधी मिळाली होती.

अगदी साधी व्यक्ती. आमचे ते आवडते लेखक आहेत हे सांगुन झाल्यावर, त्यांनी आमची नावे विचारली व बोलले, 'तुम्ही पत्र नाही पाठवलत मला कधी'. आम्ही गार.

मग ती मुलेच म्हणाली, 'काय विचारायचे आहे तर विचारा'. मग मी घाबरत घाबरत विचारले, 'किती वर्षे झाली तुम्हाला लिहुन?'. तेव्हा लेखक म्हणाले, ' म्हणजे मी अजुन पण लिहितोच की'!!! काय हसले होते सर्व तिथे हजर असणारे. आमचा धीर संपला .. मग लेखकांनी सांगितले, 'अमुकअमुक वर्षापासुन लिहितोय'. बास संपली मुलाखत व आम्ही 'निघतो' म्हणुन तिथुन पळ काढला. Happy ..

तुम्ही किती वर्षे लिहित आहात?, असा प्रश्न विचारायला हवा होता. शिरवळकर माझेही आवडते लेखक आहेत.

धाग्याचा विषय चान्गलाच आहे Happy अहो पण अ‍ॅण्टीम्याटर, (की आण्टी म्याटर्स? Proud ) तुम्हाला भेटलेल्या थोर व्यक्तिन्बद्दलही कळू द्याकी.

limbutimbu ,धागा काढला आहे म्हणजे मी लिहीणारच आहे त्यात. धाग्याचा वॉर्मअप होऊ देत. बाकी आपण कोणा प्रसिद्ध व्यक्तीला भेटला असाल तर त्याचे अनुभव माबोकरांना सांगुन उपकृत करावे.

लिंबु(ईडलिंबु का साधं लिंबु?:-P)'आण्टी म्याटर्स' असे सारखे लिहणे गैर आहे, अश्लील वाटत आहे.महिला माबोकर काय विचार करतील.:-):-@

--

किस्से लिहायचे आहेत का नुसती नावे,

१. जॉन अब्राहम (याला दोन तीनदा भेटले)
२. सोनू निगम
३. सलमान खान
४. सलिम खान
५. करीना कपूर
६. पं रविशंकर शर्मा
७. अयान आणि अमान अलि बंगश
८. बाबुल सुप्रियो
९. शंकर एहसान लॉय
१०. दुर्गा जसराज
११. डेव्हिड धवन.

यांच्या मुलाखती घेतल्या. सलिम खान आनि डेविड धवन कॉलेजात शिकवायला होते. महेश भट्टने पण एकदा लेक्चर घेतले होते.

त्यानंतर पी आरमधे असताना मीडीया ब्रिफिंग दिले ते लोक.

१. सचिन तेंडुलकर (मराठी बोलण्याची लाज न वाटणारा माणूस)
२. राहुल द्रविड (कानडी आणि मराठी दोन्ही बोलण्याची लाज न वाटणारा माणूस) कॉलेजमधे असताना एकदा बंगलोरला त्याच्या घरीपण गेलो होते. लई धमाल किस्सा आहे तो.
३. हरभजन सिंग (श्रीशांतला रडवल्यानंतरची प्रेस कॉन्फरन्स. Happy )
४. प्रीटी झिंटा (जे सान्गू ते निमूट ऐकून घ्यायची )
५. शारूख खान (याला काय सांगणार? कप्पाळ)
६. ऐश्वर्या राय बच्चन (ही प्रत्यक्षात खूप छान दिसते. पडद्यावर कधीच आवडली नाही)
७. शान (नाशिकला एका कॉन्सर्टला आम्ही सर्व जण एकत्र गेलो होतो. मस्त मिमिक्री वगैरे करत होता)
८. अभिषेक बच्चन (हा मला "टिंगू" म्हणून हाक मारायचा.)
९. दीपिका पादुकोण. (ही बाई अत्यंत मूर्ख आहे.)
१०. रणबीर कपूर. (एकदम बेष्ट माणूस. सकाळी नवाच्या फोटोसेशनला दुपारी अकरा वाजता तयार होणारा)

अजून आठवले तर लिहिन. बाकी विजय माल्ल्या, मॉरिन वाडिया, अनुज साहनी, रोनित रॉय, वगैरे चिल्लर नावे लिहत नाही.

मागे चार/पाच वर्षान्पूर्वी मला मायबोलीचे संस्थापक (सध्याचे वेमा) श्री अजय भेटले होते Happy [म्हणजे आम्ही दोघही एकमेकान्ना भेटायला एकत्र आलो होतो Happy Proud ]
मग मी त्यान्चेसोबत सम्भाजी पार्कमधे बसुन भेळ खाल्ल्ली होती! Happy (भेळीचे बील कुणी दिले होते आठवत नाही, पण मी नक्की नव्हते दिले)
[आता मी फक्त हातात बाजोच्या पेंगुंची शिमटी घेऊन वाटच बघतोय, की "ते प्रसिद्ध आहेत का?" असे कोण बरे पचकतय? Proud ]

नंदिनीजी

वाह ! इतक्या प्रसिद्ध लोकांशी तुमची भेट झाली. ग्रेट !

किस्से लिहीणे मस्ट आहे का ?
( कुठल्या संदर्भात भेट झाली हे कारण इथं देणं मला प्रशस्त वाटत नाही )

हो हो मी पण वेबमास्तर अजय गल्लेवाले यांना २-३ वेळा वेगवेगळ्या गटगमधे भेटले आहे.

बाकी मी मला नेहमीच भेटत असते. किती किस्से सांगायचे आता.. Proud

नीरजे, मागे कधीतरी एकदा ज्ञानेश्वरपादुका चौकातल्या अड्ड्यावर तू "मलापण" भेटली होतीस, किस्सा सान्गायला कशी काय विसरलीस? Wink

.

वेबमास्टरांनी एकदा भारतात आल्यावर झालेल्या गटगला कोणातर्फेतरीमला बोलावणे धाडले होते. अर्थ सरळ आहे की मी वर त्यांना भेटल्याचा उल्लेख करणार्‍या सर्व सदस्यांपेक्षा प्रसिद्ध व्यक्ती असणार Lol (दिवा)

फक्त प्रसिद्ध असणे हा क्रायटेरिया असेल तर

१. बंडगार्डनचा भेळवाला
२. हिंदुस्थान बेकरीचा पॅटीस विक्रेता
३. अली हसन (ओझरते दर्शन - संबंध नाही Proud )

लिस्ट मोठी आहे. लिहायला वेळ लागेल Lol

Lol

मी एकदा माधुरीला अगदी व्यवस्थित भेटलो होतो. कोहिनूर मंगल कार्यालयात. आणि 'मी पाहिलेल्या व्यक्ती' असे सदर असल्यास दिलीप कुमार, सायरा बानू, कबीर बेदी, शरद तळवलकर आणि सदाशिव अमरापूरकर

मित्राच्या आग्रहाखातर "तो मी नव्हेच" बघायला बालगंधर्वला गेलो. आग्रह म्हणजे, त्याआधी दोनदा बघितले होते नाटक. तर नाटक सुरू व्हायला २०-३० मिनीटे अवकाश होता म्हणुन समोरच्या गंधर्व हॉटेलमधे चहा प्यायला गेलो. तर समोर चक्क प्रभाकर पणशीकर. Happy मग त्यांची सही मागितली. त्यावर ते म्हणाले, "सही देतो, पण माहिताय का, मी कोण ते?" Proud
खिशातले नाटकाचे तिकीटच काढुन दाखवले, तर ते मिस्कीलपणे हसले. Happy
मध्यंतरात रंगपटात भेटायला पण बोलावले. पण नाही हिम्मत झाली.

>>>> मी 'तुला' भेटले नसेन लिंब्या तू 'मला' भेटला असशील. <<<<
असेल तसही असेल नीरजे, पण जर मी तुला भेटलो असेन, तर तू नक्कीच "वाकड्याला" भेटली असशील Wink Proud

प्रसिद्ध नसलेल्या पण आपल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींबद्दल चालेल का लिहीलेलं ?

शेफलर डिश या नावाने प्रसिद्ध असलेल्या सोलर पॅराबोलिक रिफ्लेक्टरचा जनक डॉ शेफलर आणि भारतातील त्यांचे सहकारी डॉ दीपक गाधिया यांना मी भेटलो. आजवर भेटलेल्या अनेक महत्वाच्या व्यक्तींमधे ही भेट खूप वेगळी वाटली.

..

Pages