मायबोली शीर्षकगीत-माझा अनुभव (स्मिता गद्रे)

Submitted by स्मितागद्रे on 20 January, 2012 - 23:39

IMG_1258.jpg

शिर्षकगीताचा धागा माबोवर झळकत होता खरा. वेळे अभावी बघण झाल नव्हतं. मेलबॉक्स मधे लिंक येऊन पडली होती.

मायबोली शिर्षकगीताची कल्पना तर अफलातूनच होती, पण त्यात आपल्या सारख्या हौशागौशांना सहभागी होता येणारे ह्या कल्पनेनेच खुप मस्त वाटत होतं. मनाशी नक्की केलं काहीही झाल तरी आपला सहभाग नक्की नोंदवायचाच.

प्रत्यक्ष कोण कोण सहभागी होणारेत, काय स्वरुप असणार, कुठे रेकॉर्डिंग होणार, वेगवेगळ्या ठिकाणी रेकॉर्डिंग करुन ते सगळ कस एकत्रीत करणार ह्याची काहीच कल्पना नव्हती. रितसर योग आणि रुनी ला मेला मेली झाली. योगने सतत संपर्कात राहून, रिहर्सल च्या वगरे तारखा,कळवल्या होत्याच.त्यामुळे सगळ एकदम टाईमशीर होत.

सर्वप्रथम पुण्याला विवेक देसाईंच्या घरी पहिली रिहर्सल झाली.घरुन पेटी घेऊन निघाले तेव्हा लेकी सकट घरचे सगळेच जण विचारत होते, नक्की कसल शिर्षकगीत गाणारात? कितीजण म्हणणार तुम्ही ? इ इ . हेच प्रश्ण माझ्याही मनात होतेच. पण मायबोली साठी गाणारोत म्हणजे नक्कीच काहीतरी सुंदर अनुभवायला मिळणार ह्याची खात्री होती.

तिथे पहिल्यांदाच योग, सई, पद्मजाची भेट झाली. खरोखर पहिल्यांदाच सगळ्यांना भेटत असून देखिल बरीच जुनी ओळख आहे अस वाटत होत. ही सुद्धा मायबोलीचीच किमया नाही का ?

शिर्षकगित वाचल्या नंतर जाणवलं ह्या पेक्षा अजुन काही वेगळ वर्णन मायबोली बद्दल असुच शकत नाही, इतक तंतोतंत वर्णन आणि चपखल शब्द. हॅटस ऑफ टू भिडेकाका :स्मित:

आधी योगेश ने वेगवेगळ्या पट्टीतले ट्रॅक पाठवले होतेच.सुरवातीला चाल आणि शब्द डोक्यात ठेवण्यासाठी बरेचदा ऐकून झाल. मधल्या जागा, म्युझिक पिसेस इतके अप्रतिम आहेत, प्रॅक्टीस करताना जेव्हा जेव्हा ऐकायचे तेव्हा बरेचदा पुढे आपल्या म्हणायचय हेच विसरायला व्ह्यायच.

योगेशने पहिले आमच्या सगळ्यांकडून एकत्र चाल गाऊन घेतली आणी नंतर स्वतंत्रपणे.
त्यासाठी योगेश च्या पेशन्स ला खरोखरच सलाम. त्याने चाल अगदी अप्रतिम दिली आहे. अगदी शिर्षकगीताच्या तोडीसतोड. त्यातले काही काही शब्द जे कदाचित चालीत बसवायला, गायला अवघड वाटतील तेही योग ने अगदी चपखल पणे चालीत बसवलेत.

घरी रेकॉर्डिंग पूर्व रिहर्सल झाली, रेकॉर्डिंग करताना पाळायच्या सर्व सूचना योग ने अगदी व्यवस्थीत दिल्या होत्या. अगदी माईक समोर कस उभ रहायच इथ पासून. फक्त रेकॉर्डिंगच्या दिवशी सुट्टी घेणं जमणार नव्हतं त्यामुळे ऑफिस करुन संध्याकाळी घरी रिहर्सला हजर राहिले. सगळ्यांची तयारी बघून माझा कॉन्फिडन्स मात्र डळमळीत झाला होता. शिवाय काळी ५ मधे आवाज चढेल की नाही ही भिती वाटतच होती. (नंतर सराव केला तर वरच्या पट्टीत देखिल आपण गाऊ शकतो ह्याचा साक्षात्कार झाला.)

आयत्या वेळेस आवाज नेमका लागणार नाही ही भिती होतीच. पण योगेश ने व्यवस्थीत रिहर्सल करुन घेतली. योगेश च "एकदम कुल" "जमून जाईल" वेळोवेळी धीर देत होत.

स्टुडिओत गेल्यावर मात्र आधी (उगीचच) वाटणारा कॉन्फीडन्स हलायला लागला होता. खर तर काहीच कारण नव्हतं.

पण योगेश ने भरपूर पेशन्स ठेऊन वेळोवेळी धीर दिला. आमची टिम मस्त होती, सई, पद्मजा, विवेक देसाई, भुंगा, आणि देवकाका. श्री.उल्हास भिडे पण पुण्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळेला येणारेत अस कळल होत. त्यामुळे त्यांना भेटायची ही उत्सुकता होती. पण काही कारणाने ते आले नव्हते. त्यामुळे शिर्षकगिताच्या निर्मात्याला भेटायची इच्छा अपूर्ण राहिली. फिर कभी...

बरेच वर्षांपूर्वी रेडीओ स्टेशन वर युवावाणी साठी रेकॉर्डिंग केल्याच आठवतं होत पण ते मुलाखत घेणे, वाचन ई.साठी. गाण्याचं रेकॉर्डिंग करायची पहिलीच वेळ होती. हे प्रकरण बर्‍यापैकी सोप्प असु शकेल अस वाटत होतं. ते वाटण उगीचच हे नंतर कळलच ,कारण गाण्याच्या रेकॉर्डिंग चा पुर्वानुभव शून्य होता. कित्येकदा मधल्या जागा समजाऊन सांगून सुद्धा आम्ही त्याच त्याच चुका परत करत होतो. बरेचदा ट्रॅक पुढे पळायचा आणि आम्ही मागे. तेव्हा जाणवलं ट्रॅकवर म्हणणं अतिशय अवघड काम आहे. तुमच्या तालात आणि सुरात जराही चूक करुन चालत नाही. इथे तबला किंवा पेटी तुमचा ताल किंवा सुर अ‍ॅडजेस्ट करून घेत नाही. त्यामुळे संगीतकारासाठी ही गायकाच्या गळ्यातून सही सही उतरवणं त्याहून कठिण होतं. कुठलीही हरकत न घेता सरळ गाणं म्हणणं किती अवघड असत तेही कळलं. शिवाय स्टुडीओतल्या एसी मुळे मुळ गीतात नसलेल्या बर्‍याच हरकती माझ्याकडून नकळत गायल्या जात होत्या त्या वेगळ्याच :फिदी:

आम्ही तिघीजणी एकत्रीत म्हणत होतो तेव्हा मधेच कोणाचा तरी सुर कमी लागायचा, एखादा स्वर बेसुर व्हायचा , कोणी एखादी ओळ आधी संपवायचो तर कोणी नंतर. ते पुन्हा एकत्रीत ऐकताना प्रकर्षाने जाणवायचं. की योगेश पुन्हा तेवढ्याच शांतपणे, थोड देखील न वैतागता समजाऊन सांगून ,एकेकी कडून गाऊन घेऊन पुन्हा एकत्रीत रेकॉर्डिंग करत होता. एकंदरीत हे रेकॉर्डिंग प्रकरण बरच भानगडीच होतं ते लवकरच लक्षात आलं. योगेश चा पेशन्स बघून मी "माझा पेशन्स दांडगा आहे" असा दावा करणं तेव्हा पासून सोडून दिलय.

आपली एखादी छोटीशी चुकदेखील रेकॉर्डिंग करताना प्रकर्षाने जाणवते. प्रत्यक्ष गाण्यात काही(च) वेळा खपून जाते. ह्या शिर्षकगीताच्या निमित्ताने कळल. सगळ्यांनीच जीव ओतुन, अगदी आपल घरच कार्य समजून शिर्षकगीता साठी आपल योगदान दिलय.

देव काकांच रेकॉर्डिंग सगळ्यात जास्त लक्षात राहिल. त्यांनी अगदी सहजपणे आणि नेमकेपणे शिर्षकगीत गायलय, त्यांच्या उत्साहाला तोड नाही. आम्ही तर दर वेळेस काहीतरी नविन नविन जागा निर्माण करत होतो.
खरच संगीत देणं आणी ते गायकाच्या गळ्यातून हव तस उतरवण म्हणजे साधी, सोपी गोष्ट नाही. बरेचदा मधले सुंदर म्युझिक पिसेस ऐकुन ,योगेशला आम्ही ही इतकी सुंदर जागा कशी काय सुचलीय ? असले बाळबोध प्रश्ण विचारून हैराण करत होतो. :फिदी:

योग ने चाल खरोखर अतिशय सुंदर दिलीय. मधल्या जागा,वेगवेळ्या वाद्यांचा अप्रतिम वापर, नंतर सुचलेली हार्मनी. तो पुर्णपणे त्यात बुडलेला होता. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं म्हणजे काय ते त्याच्या कडूनच शिकाव. शिर्षकगीताचे विचार सतत त्याच्या डोक्यात चाललेले होते हे अगदी कळत होत. रात्री बारा वाजता सुद्धा शेवटच्या दोन ओळींच रेकॉर्डिंग, भुंग्याच्या आलापाच रेकॉर्डिंग तो तेवढ्याच पेशन्सने करत होता आणि ते हवं तसं येण्यासाठी तेवढाच आग्रही होता .त्यामुळेच इतक सुंदर शिर्षकगीत आकाराला येऊ शकल.

माझा हा अनुभव अतिशय संस्मरणिय होता. त्या साठी सर्वांचेच आभार. मायबोलीच्या ह्या सुरेल वाटचालीत मलाही सहभागी होता आलं त्याचा आनंद अवर्णनीय आहे.
धन्यवाद योग, तुझ्यामुळे इतक सुंदर गाणं "अनुभवायला" मिळाल. मायबोलीच्या अशाच अजुनही उपक्रमात सहभागी व्हायला निश्चितच आवडेल.
आता मात्र उत्सुकता लागलीय ती पूर्ण शिर्षकगीत ऐकायची :स्मित:

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिता.......छान वाटलं तुझं मनोगत वाचून !!
मायबोलीमुळे सगळ्या मायबोलीकरांना इतके सुखद अनुभव आलेत आणि अजूनही खूप मिळतील Happy
मायबोलीकर असल्याचा म्हणूनच फार फार अभिमान वाटतो ..... हो ना Happy

चांगलं लिहील आहे.
अरे पण रोज एकाने लिहीण्यापेक्षा सर्वांनी मिळून एकच लेख लिहीला असता तर भारी काम झाल असत. वै. म.

मस्त उमटलंय मनोगत!
स्मिता,अभिनंदन!

स्मिता,
छान लिहीलस.. तुझ्या आवाजाने एक मस्तच टेक्स्चर आलं आहे पुणे कोरस ला.

खरे आहे स्टूडियो रेकॉर्डींग हा प्रकार वेगळाच आहे. अगदी सूक्ष्मात सूक्ष्म गोष्टि देखिल लक्षात येतात!
त्यातही पुणेकरांना ac ची सवय नसल्याने स्टुडियो म्हणजे अगदी काश्मिर झालं होतं.. पुढील खेपेला सर्वांनी मायबोली स्वेटर्स घालून येणे! Happy

मस्त Happy

मस्त.

ज्या कोणाच्या धाग्यावर प्रतिक्रिया नसतील त्यांनी पण या वाचाव्यात. सर्व वाचलय हे नक्की Happy

Pages