फिल्म फोटोग्राफिचा अंत ?

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

http://www.bloomberg.com/news/2012-01-19/kodak-photography-pioneer-files...

फोटोग्राफि फिल्म आणि फिल्म p&s मधल्या इतक्या मोठ्या नावावर ही वेळ यावी याचे वाईट नाकीच वातते पण शेवटी only one who is responsive to change survives.

विषय: 
प्रकार: 

अरे फक्त चाप्टर ११ फाईल केलाय. फिल्म आता जाणार हे २००२ पासूनच लोक म्हणत होते. तरी दशकभर तग धरला शिवाय त्यांचे डिजिटल कॅमेरे तुलनेने फारच साधारण आहेत / होते.

अमेरिकन, युनायटेड, डेल्टा ही सर्व उदा. आधी चाप्टर ११ फाईल करून नंतर फायद्यात आल्याची. Happy कदाचित ते पण येतील.

महाराष्ट्र टाईम्स :-

आपल्या ब्रँडद्वारे जगभराला 'कोडॅक मोमेंट' हा नवा शब्द देणाऱ्या अमेरिकास्थित कोडॅक कंपनीला लवकरच टाळे लागण्याची चिन्हे आहेत. छायाचित्रणाच्या व्यवसायात सुमारे १०० वर्षे कार्यरत असलेल्या या कंपनीने अमेरिकेत दिवाळखोर जाहीर करण्यासाठी अर्ज केला आहे.

काळाच्या ओघात कॅमेऱ्यातील रोलफिल्म लावण्याची गरजच न उरल्याने कंपनी अस्थंगताला लागली. एकेकाळी दीड लाख कर्मचारी असलेल्या या कंपनीत आजघडीला अवघे १९ हजार कर्मचारी उरले आहेत. २००७पासून कंपनी सातत्याने तोट्यात आहे. त्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाने दिवाळखोरीत जाण्याचा निर्णय घेतला.

'या माध्यमातून आमचे भागधारक, कर्मचारी, देणेकरी, निवृत्ती वेतनधारक यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,' असे कंपनीचे सीईओ अँटोनिओ पेरेझ म्हणाले