ब्रेड पुडिंग

Submitted by स्वाती_आंबोळे on 16 January, 2012 - 09:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप (१६ औंस) दूध (म्हणजे साधारण अर्धा लिटर)
२ अंडी
*७-८ ब्रेड स्लाइसेस (भारतातल्या छोट्या स्लाइसेस १०सुद्धा लागतील)
*पाऊण कप साखर
व्हॅनिला इसेन्स

क्रमवार पाककृती: 

अंडी फेटून घ्या.
त्यात दूध, साखर आणि इसेन्स मिसळून घ्या.
आता यात ब्रेड कुस्करून मिसळा.
ग्रीज्ड बेकिंग पॅनमधे हे मिश्रण ओता. (या प्रमाणात घेतलेले मिश्रण साधारणपणे ८इंचX८इंच पॅनमधे मावेल.)
३५० डिग्रीजना ३० ते ३५ मिनिटे बेक करा.

अधिक टिपा: 

ब्रेडच्या या प्रमाणाने वडी पडण्याइतके घट्ट पुडिंग होते. तुम्हांला त्याहून सॉफ्ट (थलथलीत) पुडिंग आवडत असेल तर त्यानुसार ब्रेड कमी वापरा.
साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त करा.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात आहे का चक्कर?

डायरेक्ट तयार पदार्थ खायला मिळाला की अधिक बरे वाटते असा स्वानुभव!

फोटो टाकू नका, अधिक त्रास होतो.

-'बेफिकीर'!

खरेच सोपी आहे. माझी मैत्रीण लॉरेन्स लवडेल उटी मध्ये होस्टेल मध्ये शिकत होती. हे पुडिंग तिथे नेहमी केले जात असे. बरोबर फ्रेश क्रीम व फ्रेश फ्रूट्स. करको देखेंगा.