मी तुझ्याशी काय बोलू सांग ना
केवढी वर्षे मधे डोकावली
ठीक की होतो बरोबर पण तरी
एकमेकांचे कुठे होतो म्हणा
शोधला मी मार्ग माझा वेगळा
काढली होतीस त्यावर भांडणे
ऐकले नाही तुझे काहीच मी
केवढी आसावली होतीस तू
भीक मागितलीस मी परतायची
मी तुला नाही म्हणालो त्याक्षणी
मान्यही केलेस माझे वागणे
आणि तू बसलीस त्या वाटेवरी
मी परत येईन या आशेमधे
मग तुलाही छंद जडला शेवटी
एकटी जगणे सुखाचे मानुनी
राहिली होतीस त्या वाटेवरी
मात्र मी म्हातारपण झेलायला
सज्ज नव्हतो एकटा तुझियाविना
मग परतलो त्याच वाटेने पुन्हा
आणि तू दिसलीसही तेथे मला
आणि ओळखलेसही झटक्यात तू
आणि कवटाळून तू रडलीसही
आणखी हसलीसही ओथंबुनी
आणि मीही हासलो लाचारसा
आणि चर्चा जाहली स्वप्नांवरी
जी कधी पाहायचो मी आणि तू
आणि चर्चा जाहली शपथांवरी
घेतल्या होत्या कधी मी आणि तू
पूर्तता होणारही त्यांची कशी
यत्न जर पन्नास टक्के व्हायचे
सोडले मी पाहणे केव्हाच ते
स्वप्न ना सत्यामधे उतरायचे
पण मला आता हवी आहेस तू
हे मला बोलायचे आहे जरा
पण तुझे हे प्रश्न संपेनात ना
उत्तरे कोठून आणू सांग ना
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
केवढी वर्षे मधे डोकावली
मी तुझ्याशी काय बोलू सांग ना
====================
-'बेफिकीर'!
सिंधुताई सपकाळ सिनेमाचा
सिंधुताई सपकाळ सिनेमाचा शेवटचा शॉट आठवला एकदम... मस्त .. आवडले
. . . . .बरेच मिनिट वाचत
.
.
.
.
.बरेच मिनिट वाचत आहे.
..
.
.
...संपली,
आवडली.
आवडली
आवडली
व्वा व्वा कथानक असलेली कविता
व्वा व्वा
कथानक असलेली कविता
दो ओळीत योग्य अंतर ठेवून
दो ओळीत योग्य अंतर ठेवून अपेक्षित परिणाम छान साधला आहात ! ही स्टाईल ओरीजनल आणि खूप सुखावह आहे; बेफिजी
कविता पण तश्शीच......अभिनंदन !!
साध्या, छोट्या, व कमी शब्दांत
साध्या, छोट्या, व कमी शब्दांत भावनांचे नेटके आविष्करण फार सुंदर.
तुम्ही आता "कॉलमिस्ट" पण
तुम्ही आता "कॉलमिस्ट" पण झालात
'यात्रा' नावाचा सिनेमा आहे;
'यात्रा' नावाचा सिनेमा आहे; तामिळ...अप्रतिम..तो उभा राहिला डोळ्यांपुढे... क्लास!
शेवटच्या दोन ओळींनी तर
शेवटच्या दोन ओळींनी तर कवितेला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिलीय.
भन्नाट.!
simply gr8........
simply gr8........
खुप खुप खुप छान.
खुप खुप खुप छान.
म्स्त्च
म्स्त्च
मस्तच...
मस्तच...
भन्नाट
भन्नाट
सहि
सहि
मस्त .. आवडले.......सत्यं
मस्त .. आवडले.......सत्यं घटनेवर आधारीत वाटतेयं......
बरेच दिवसांन्नी ...कविता
बरेच दिवसांन्नी ...कविता वाचुन .....डोळ्यात पाणी आलं
प्रतिसाददात्यांचे मनापासून
प्रतिसाददात्यांचे मनापासून आभार मानतो
सुंदर. 'आणि' ची पुनरुक्ती
सुंदर. 'आणि' ची पुनरुक्ती थोडी कमी करता आली तर रसभंग होणार नाही असे वाटते.
आवडली.
आवडली.
धन्यवाद कर्णिक व नन्ना
धन्यवाद कर्णिक व नन्ना
khupch chan.............
khupch chan............. savpnana kahi maryada astat hech shevti khar.....
पण तुझे हे प्रश्न संपेनात
पण तुझे हे प्रश्न संपेनात ना
उत्तरे कोठून आणू सांग ना >>>> छानच.
उत्तरे कोठून आणू या प्रश्नातच उत्तरं आली.
छान कथा!!! सुंदर
छान कथा!!! सुंदर शेवट.
धन्यवाद!*
खुप छान
खुप छान
धन्यवाद
धन्यवाद
(No subject)
छान
छान
पण मला आता हवी आहेस तू हे मला
पण मला आता हवी आहेस तू
हे मला बोलायचे आहे जरा
पण तुझे हे प्रश्न संपेनात ना
उत्तरे कोठून आणू सांग ना
आर्त ओळी...कविता आतून आल्यासारखी वाटली.. खुप आवडली.