टीन एजर्स आणि एस टी डी

Submitted by स्वाती२ on 29 December, 2011 - 08:05

नमस्कार मंडळी.
गेल्या महिन्यात माझ्या मुलाच्या टीमने टीन एजर्स आणि एसटीडी या विषयावर वाय प्रेस साठी स्टोरी केली. इंडियानापोलिस स्टार या न्युज पेपरच्या ब्लॉग मधे ही स्टोरी उपलब्ध आहे
http://blogs.indystar.com/ypress/2011/12/17/in-battle-against-stds-denia...

तसेच वाय प्रेस च्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. http://www.ypress.org/news/in_battle_against_stds_denial_is_the_enemy

इथे शाळेत सेक्स एज्युकेशन अगदी सुरुवातीपासून आहे तरीही एकंदरीत समज गैरसमज थक्क करणारे! आकडेवारीही काळजी करायला लावणारी. भारतातही मॉर्निंग आफ्टर पिल्सचा वाढता वापर बघता एस टी डी चा धोका लक्षात घेतलाच जात नाहिये असे वाटले. या विषयावर सतत संवाद असणे खूप गरजेचे. म्हणून टीन एजर्सनी टीन एजर्ससाठी केलेल्या या स्टोरी बद्दल इथे सांगावेसे वाटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

बापरे स्वातीताई, लेखात लिहिलंय की अमेरिकेतली चारातली एक तेरविशी (टीनेज) मुलगी लैंगिक रोगाने बाधित आहे....! खरंच? हा प्रश्न केवळ लैंगिक ज्ञान देण्याचा नाहीये. पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना अंगी संयम बाळगायला शिकवलं पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

वाचले.
महत्वाचा विषय आहे. टीनेजर्स मुलांच्या पालकांनी अन सर्व विवाहेतर 'फ्री' शारिरिक संबंध ठेवण्यार्‍या तरूणांनीही वाचण्यायोग्य. पण इथे अभ्यास करायची गरज/वेळ आहे कुणाला?
असो.
चांगल्या धाग्याबद्दल आभार.

स्वाती, चांगली माहिती. धन्यवाद.
इतक्या महत्वाच्या विषयावर अभ्यास करुन लिहिल्याबद्दल तुझ्या मुलाचं अभिनंदन.

सर्व प्रतिसाद कर्त्यांना धन्यवाद.

>> हा प्रश्न केवळ लैंगिक ज्ञान देण्याचा नाहीये. पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना अंगी संयम बाळगायला शिकवलं पाहिजे.>>
आमच्या स्कूल डिस्ट्रिक्ट मधे सेक्स एज्युकेशन अंतर्गत भर अ‍ॅबस्टिनन्सवर आहे. मात्र बरेचदा लो सेल्फ एस्टिम आणि पिअर प्रेशर या गोष्टींमुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. तसेच सगळा फोकस अ‍ॅबस्टिनन्सवर असेल तर बंडखोरी म्हणूनही उलटा परीणाम होतो.