Submitted by जयन्ता५२ on 17 December, 2011 - 09:32
काळ कडवा होत गेला
शब्द हळवा होत गेला
कालचा तो धृवतारा
आज चकवा होत गेला
रांग वाढे मंदिरी अन्
काळ बडवा होत गेला
हात दोन्ही सारखे पण
एक उजवा होत गेला
अंगठया, दोरे, विभूती
संत फसवा होत गेला
बोल त्याचे,मौन त्याचे
एक फतवा होत गेला
---------------------------------जयन्ता५२
* आधी इतरत्र प्रकाशित
गुलमोहर:
शेअर करा
हात दोन्ही सारखे पण एक उजवा
हात दोन्ही सारखे पण
एक उजवा होत गेला.......व्वा!!
छोट्या बहरातील सुंदर रचना.
हात दोन्ही सारखे पण एक उजवा
हात दोन्ही सारखे पण
एक उजवा होत गेला>> व्वा व्वा!!
आवडली
आवडली
मस्त
मस्त
हात दोन्ही सारखे पण एक उजवा
हात दोन्ही सारखे पण
एक उजवा होत गेला
काय सुंदर शेर आहे ! फार आवडला.
बोल त्याचे,मौन त्याचे
एक फतवा होत गेला
सुरेख.
आवडली गझल.
हात दोन्ही सारखे पण एक उजवा
हात दोन्ही सारखे पण
एक उजवा होत गेला
>>>> व्व्व्वाह!!
हात दोन्ही सारखे पण एक उजवा
हात दोन्ही सारखे पण
एक उजवा होत गेला
>>>
Mast
कालचा तो ध्रुवतारा
आज चकवा होत गेला>>>
dhrOOvataaraa ase paahije naa?
फारच खास.........
फारच खास.........
मस्त.आवडली. पुलेशु.
मस्त.आवडली. पुलेशु.
अ प्र ति म!!!/____/\____
अ प्र ति म!!!/____/\____
____/\____ छोट्या बहरातील
____/\____ छोट्या बहरातील सुंदर रचना.
dhrOOvataaraa ase paahije naa?......सहमत पण आग्रही नाही..!!
बहोत खुब..!!
बहोत खुब..!!
खासच!
खासच!
धृ हेही र्हस्वच असते मला
धृ हेही र्हस्वच असते मला वाटते.
सुंदर.
सुंदर.
सर्व
सर्व प्रतिसादींना
धन्यवाद!
--जयन्ता५२
मस्त गझल जयंतराव उजवा, फतवा
मस्त गझल जयंतराव
उजवा, फतवा सुरेख...
चकवा पण आवडला मला
क्या बात है.... अप्रतीम !
क्या बात है.... अप्रतीम !