पुणे गटग - रविवार १८ डिसेंबर २०११ स. ९ वा.

Submitted by फारएण्ड on 15 December, 2011 - 23:51
ठिकाण/पत्ता: 
"गंधर्व" रेस्टॉरंट, बालगंधर्व रंगमंदिर्/पुलासमोर. शिवाजीनगर. रेस्टॉ. चा फोन नं. २५५३३४२३. ज्यांना कसे यायचे माहीत नाही त्यांनी मला संपर्क करा.

लोकहो,

नीधप या वीकेण्डला पुण्यात आहे. त्या निमित्ताने पुण्यातील लोकांचे एक गटग या रविवारी (१८ डिसेंबर) सकाळी करायचे ठरवत आहोत. वेळ सकाळी ९ वाजता.

ठिकाण - "गंधर्व" रेस्टॉ.

तर जरूर या. शक्यतो आधी येथे कळवलेत तर रिझर्वेशन करायला बरे पडेल. सध्या पुण्यात काही बाहेरगावाहून आणि परदेशातूनही आलेले लोक आहेत, त्यांनीही जरूर यावे.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, December 17, 2011 - 22:30 to रविवार, December 18, 2011 - 01:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज सक्काळिच (०६:४५ ते ०७:००) 'गंधर्व' समोर उभा राहून आलो (ऑफिस मधे...)

फारएण्ड... मी येऊन गेलो, असं जाहीर करा... Proud ...

वरच्या ७ नावनोंदणीपैकी
फारेण्ड, नीधप, अरूण, हिम्सकूल आणि अरभाट हजर.
२ टांगारू. चिनूक्स आणि मेघा.
कदाचित येईन पैकी मंजात्ये, केदार आणि राम यांची हजेरी.
देसाई मास्तरांची हजेरी फाउल म्हणून धरली आहे.

अ‍ॅक्टिव्हिटी - गप्पा आणि खादाडी.
काय गप्पा झाल्या ते सांगण्यात येणार नाही विच्रू ने!!

---------अशी आम्ही मजा केली आणि अखेर जड अंतःकरणाने तिथून काढता पाय घेतला----------
वृत्तांत संपला. Proud

अर्रे.........काय राव(खास नगरी प्रतिक्रीया!).....गटगच्या प्लॅनिंगातच इतकी धमाल तर भेटल्यावर फारेंड म्हणतो तसं "बहुतेक" वाल्यांना चुटपुटच लागणार असं दिसतं!

पुणेरी पाटी : "जे गटगला आले नाहीत त्यांनी वृत्तांताची चौकशी करू नये."

अरे अरे, वृत्तांतात असा पुणेरी बाणा दाखवू नका बुवा. सविस्तर वृत्तांत येऊ द्यात. Proud

अरे वा ...मस्त धम्माल केलेली दिसतिये आम्हाला टुक टुक करुन .....असो .......७ जाने नतर गटग ठरवता आले तर पहा ना ...आपण भेटु परत्....हव तर मि स्पोन्सर करते ....... कोणीतरी 'पुणे' कर नी पुढाकार घ्यावा ....:) Happy Happy

मला नाहीच जमलं यायला Sad आता निदान वृ तरी टाका कोणीतरी सविस्तर, व्हर्च्युअल उपस्थिती होती असं तरी वाटेल Wink

गंधर्व मधे काही लोक जमल्यावर काही खायला मागवायच्या आधीच चहा/कॉफी मागवल्याने नंतर आलेल्यांना प्रत्येकाला ते खूप उशीरा आले आणि गटग संपत आले असे वाटले. तेव्हा पुण्यातील गटगांचा मोठा प्रोटोकॉल आपण तोडला असे माझ्या लक्षात आले. आमच्या हातातील कप बघून काही लोक बाहेरच्या बाहेर गेले असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस खबरदारी घेण्यात येइल.

बर्‍याच लोकांनी टांग मारली. पहाटे येउन गेलेल्यांना हजर धरावे की नाही हा प्रश्न पुढच्या गटगला वेळेवर आलेल्यांसमोर ठेवण्यात येइल.

अरूण व मी आमचे एक जुने कनेक्शन निघाल्याने आमच्या गप्पांवरून त्या ५-स्टारच्या "रमेश....सुरेश" अ‍ॅडसारखा अनुभव इतरांना आला असावा. तर अरूण व मंजिरी यांनी एकमेकांना न ओळखल्याने आम्हाला उलटा अनुभव - म्हणजे मनमोहन देसाईंच्या पिक्चर मधे मधले दोन तास वाटते तसे: आपण प्रत्येकाला ओळखतो, त्यांनी एकमेकांना ओळ्खले पाहिजे हे आपल्याला वाटते पण प्रत्यक्षात तसे होत नाही असा Happy

तेवढ्यात हिम्याने गहुंजेचे स्टेडियम तयार झाले आहे अशी बातमी दिली. तेथून चर्चा फुटली - एक धागा आयपीएल-मुंबईचे खेळाडू-ग्रेसफुल फलंदाज ई. वर गेला, तर दुसरा हायवे-बायपास-रिअल इस्टेट यावर. यापैकी क्रिकेटधागा नीरजाने इडन गार्डन्स च्या प्रेक्षकांप्रमाणे बंद पाडला (तेव्हा "कटलेट खाताना लेट कटची चर्चा करू नये" असा नवीन वाक्प्रचार रूढ करायला हरकत नाही). रिअल इस्टेट धागा "आता इन्वेस्ट केले तर पुढे चांगली संधी आहे" या सार्वमतावर व काही लोक घड्याळात वेळ बघू लागल्याने थांबला.

केदार ज्या गटगला असतो ते प्रत्येक गटग तो नुकताच परदेशातून आल्यावर किंवा लगेच फ्लाईटला बसायचे आहे अशा स्थितीतच होते हे पुन्हा सिद्ध झाले. त्याची ओळख करून देताना "मूळ केदार" ही पदवी त्यालाच मिळेल हे नक्की झाले. त्यानंतर मराठी चित्रपट काढायला १५ लाख पुरेसे आहेत की दीड कोटी यावर एक चर्चा झाली. सुमारे ६-८ महिन्यानंतर काही अगम्य मराठी पिक्चर रिलीज झाले तर त्याची मुळे येथे दडलेली असतील.

गंधर्वचे कटलेट मात्र चांगले आहे. टेबलवर डोसा, उत्तप्पा व कटलेट एवढेच खाद्यपदार्थ होते. फक्त केदारचाच डोसा एवढा लेट का आला यावर विचार करणे गरजेचे आहे.

श्री. अरभाट आपल्या मूळ आयडीने आले होते. त्यामुळे बंडलदास, साउण्डमास्टर साजन, लून्ड्री ई. आयडींच्या आयडिया कुठून आल्या यावर त्यांनी "कॉफी विथ माहिती" दिली. रामही आला होता. त्याला आयटीवाल्यांबद्दल असलेल्या कळवळ्याने सर्व उपस्थित (म्हणजे आमच्या टेबलांवरचे) सद्गदित झाले.

मग सरांनी प्रमुख पाहुण्यांना "तुम्हाला मुक्ता बर्वे वगैरेंबरोबर काम करायला मिळते..." विषय काढला. त्यापुढची चर्चा येथे लिहीण्यासारखी नाही Proud

Lol

ह्या शिवाय काही ठराव पास करण्यात आले. जसे
१. औंध अनेक्सला वेगळा टाईमझोन मिळायला पाहिजे (पुण्यापेक्षा १ तास मागे) .
२. सगळे गाव "अनेक्स" मुळे जोडले जातील. उदा कोल्हापुर अनेक्स सांगली इ इ.

आता निदान वृ तरी टाका कोणीतरी सविस्तर, <<<
यावर 'माझा वृत्तांत सविस्तरच आहे' असं म्हणून पु ३० ची चुणूक दाखवणार होते तेवढ्यात फारेण्डाने निबंध लिहून माझा पचका केला Proud

Pages