पंचकर्म

Submitted by जाईजुई on 15 November, 2011 - 10:56

मला गेल्या वर्षपासून शरीरातले टॉक्सिन्स फार वाढल्याचे जाणवत आहे.

ह्या भारत मुक्कामात पंचकर्म करून बघायचे मनात आहे.

त्याबद्दल कोणाला माहिती आणि स्वानुभव आहेत का? माझ्या (बाळबोध) शंका पुढिलप्रमाणे -
१. पंचकर्म करण्यापूर्वी नाडीपरिक्षा करावी काय?
२. वेगवेगळ्या समस्या असल्यास वेगळ्या प्रकारची कर्मे/तेल्/औषधे असे काही असते का?
३. (आधीपासूनच सरभटलेल्या) हार्मोन्सवर पंचकर्माने परिणाम होतो काय?
४. इतर स्वाथ्य चाचण्या (साखर्/रक्त/लघवी/रक्तदाब तत्सम)पंचकर्माच्या पूर्वी केल्यास व नंतर केल्यास येणार्‍या रिझल्ट्समध्ये काही फरक असतो का?
५. पंचकर्मांनी टॉक्सिन्स कमी झाली असतील (तर), त्यांची पातळी योग्य आहारविहाराने राखता येऊ शकते की पुन्हा पुन्हा पंचकर्म करीत रहाणे?
६. जर पुन्हा पुन्हा पंचकर्म कोणी करत असेलच तर त्याच्यात किती अंतर असावे?
७. आणि महत्त्वाचे, वैद्यांनी न सांगताही कोणत्याही केंद्रात पंचकर्म होते काय? (प्रिस्क्रीप्शन शिवाय)

ठाण्याच्या आजूबाजूला असलेल्या केंद्रांचे व तिथल्या स्टाफचे काही अनुभव असले तरी कृपया इथे लिहाल काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाईजुई, माझ्या नवर्‍याने आत्ताच घंटाळि मंदिराजवळ असलेल्या उदय कुलकर्णी यांच्या कडे वमन, विरेचन घेतले. बहुदा अजुन काही आहे पुढे त्यात. त्याने हे शुगल लेव्हल वाढली म्हणुन सुरु केले (त्यांच्याच सांगण्यावरुन) (हाय शुगर आत्ताच १-२ महिन्यात डीटेक्ट झाली आहे)

वमनानंतर मस्त त्याचे पोट आत गेले Happy कित्तीकाळाची घाण ती निघाली तोच जाणे Proud

त्याचे अनुभव नंतर शेअर करते Happy

ईथे विचारावेसे वाटते आहे - या व अशा उपायांनी डायबेटीस कंट्रोल होतो का? की अ‍ॅलोपथीच घ्यावे? / व ईतरही काही असे आजर असतील तर त्यात अशी शरीर शुद्धी किती फायदेशिर ठरते?

माझी अजून एक शंका,

पंचकर्माला लागणारा वेळ प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो का? माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांच २.५ वर्षे पंचकर्म चालू होतं. तेही आता एकदम शिडशिडीत झालेत.

सहज सुचल म्हणा वा आठवल म्हणा, म्हणून.....
माझ्या मित्राला मी खूप पूर्वी विचारले होते की बाबारे हे पन्चकर्म फिर्म काय अस्ते? का अस्ते?
त्याने मला सान्गितले, की अरे साधी बाथरुममधली कालची बादली देखिल आपण विसळून घेतो, घरातिल पाण्याचि भान्डी नीट आत हात फिरवुन विसळून घेतो, हात आत जात नसेल तर खन्गाळून घेतो. शरिराचे तसे काही करतो का? रोजच्या रोज, वेळेस सकाळ सन्ध्याकाळ निरनिराळे शाम्पू/साबण्/उटणी/तेले लावुन शरिर बाहेरुन स्व:च्छ करता, आतल्या सफाईचे काय?
त्यातुन तुमचे बैठे काम, मेहनतीची सवय लाम्ब, एखादे देखिल काम करत नाही, मग तुमचे शरिर हिन्दकाळून, खन्गाळून, पिळून्-पिळवटून अन्तर्भाग साफ कसा रहाणार? पंचकर्मात ही बाब बरीचशी साध्य केलि जाते.
तो म्हणला, मलाही ते पटले.
पण मी आजवर पंचकर्म केले नाहीये. Happy
यावर जाणकारान्नीच भाष्य करुदे!

धन्स मोनालिप..

लिंबूकाका प्रोसेस माहिती आहे साधारण.. पण तेलाचे भांडे नि वरणाचे भांडे एकाच पद्धतीने धुतात का असा प्रश्ण आहे! Wink

माझी नंणद आता सध्या पंचकर्म घेत आहे.. २ महिने झाले....तिला खुप फरक पडला.. त्याने.. ति ..ठाण्याला चेंदणी ला जे दत्त मंदिर आहे.. तिथे घेते... हवा असल्यास नंबर पाठवेन...

मी पण मागच्या डिसेबर मध्ये पंचकर्म करुन घेतले. वरती सांगितल्या॑ प्रमाणे शरीरतील घाण निघुन जाते.
तुमच्या प्रक्रुतिवर अवलंबुन डॉक्टर वमन(उलटया), विरेचन(जुलाब), बस्ति(एनेमा), किंवा नस्य सांगतात. मसाज तर असतोच सगळ्यांना, रोज १ तास ते ४५ मिन. मला बस्ति आणि विरेचन होते. त्वचेला लकाकि तर येतेच, वजन पण कमी होते. केस चमकदार होतात. एकुणात सगळे चांगले परिणाम दिसतात. मी करुन घेतले कारण गर्भसंस्कार चा तो एक भाग आहे. खर तर ती गर्भसंस्कारची पहिलि पायरी आहे.

२. वेगवेगळ्या समस्या असल्यास वेगळ्या प्रकारची कर्मे/तेल्/औषधे असे काही असते का?>> होय.

५. पंचकर्मांनी टॉक्सिन्स कमी झाली असतील (तर), त्यांची पातळी योग्य आहारविहाराने राखता येऊ शकते की पुन्हा पुन्हा पंचकर्म करीत रहाणे? >> मला तरी डॉक्टरने वर्शातुन एकदा सांगितले करायला.

७. आणि महत्त्वाचे, वैद्यांनी न सांगताही कोणत्याही केंद्रात पंचकर्म होते काय? (प्रिस्क्रीप्शन शिवाय)>>
कोणत्याही केंद्रात पंचकर्म होवु शकते, पण नावजलेले डॉक्टर बघुन जा. ते तुमचि पार्श्वभुमी समजुन, तुमचि प्रक्रुति बघून मगच कुठले कर्म करायचे ते सांगतात. (अर्थात बाला़जी तांब्यांचे खुप महाग आहे)

मी पुण्यात प्रभात रोड वरच्या डॉक्टर ठाकुर त्यांच्यकडे केले.
http://www.maitraayurveda.com/Panchakarma.htm हि त्यांची माहिति.

माझ्या एका मैत्रिणिला arthritis आहे, तिने आयुर्वेदिक डॉक्टरकडुन बस्ति करुन घेतलि, भरपुर फरक पडला आहे तिला.
अजुन एकिने अंगातली उश्णता कमी करयला पंचकर्म करुन घेतले, तिलाहि भरपुर फरक पडला आहे.

>> या व अशा उपायांनी डायबेटीस कंट्रोल होतो का? की अ‍ॅलोपथीच घ्यावे? / व ईतरही काही असे आजर असतील तर त्यात अशी शरीर शुद्धी किती फायदेशिर ठरते? <<

नेटावर अन तेपण फुकट कन्सल्टेशन देणे हा एक मूर्खपणा आहे. मायबोलीवर प्रचलित वैज्ञानिक कसोट्यांवर घासून खरे उतरलेले सांगितले, तरी त्याची खिल्ली उडविणारेही आहेत. तरीही लिहीतो. कदाचित काही थोड्या डायबेटिक्सना त्यांचे डोळे/किडन्या/पाय इ. वाचवता आले तर माझे टायपिंगचे कष्ट सुफल होतील.
तर,
@ मोनलिप.
आपण ५ रुपये किमतीचा हातरुमाल खरेदी करतांना चिकित्सा करता, ती कशी करता? फक्त मित्र/मैत्रिणींची मते विचारून की प्रत्यक्ष रुमालाचा पोत, रंग, घाम इ. शोषून घ्यायची त्याची क्षमता इ. बाबींचा विचार करून?

डायबेटीस या 'आजाराची' ट्रीटमेंट तुम्हाला करून घ्यायची आहे. आजार तुमच्या शरीराला झालेला आहे.

तुमची कार / स्कूटर नादुरुस्त झाली. कुठे नेऊन रिपेअर कराल? की मॅन्युअल वाचून घरी प्रयत्न कराल?

आता एक पाऊल पुढे चलू या. रुमाल - गाडी - शरीर.

तुमच्या लेखाच्या निमित्ताने आयुर्वेद विरुद्ध मॉडर्न मेडिसिन असा वाद सुरु करण्याची इच्छा नाही. (मॉडर्न मेडिसिन: ज्याला चुकीने अ‍ॅलोपथी म्हणतात. Allos म्हणजे इतर. path मार्ग. Pathy:suffering. Let the other suffer. हा मध्ययुग संपताना युरोपात प्रचलित होता, ज्यात रक्त मोक्षण, डाग देणे इ. "उपचार" प्रचलित होते, अन त्याला उत्तर म्हणून होमिओ = इक्वल Like cures like. असा नवा मार्ग आला होता. असो. हे सगळे मुळात आयुर्वेदातून उगम पावलेत. इथून युनान मधे जाऊन युनानी, अन तिकडे युरोपात जाऊन मग अ‍ॅलोपथी हे झालं आहे. पण तरीही हे 'आऊटडेटेड' आहे.)

तर.

आयुर्वेद्/अ‍ॅलोपथी/युनानी/होमिओपथी/अ‍ॅरोमाथेरपी/वै वै.. विसरा.
इथे आयुर्वेदिक पंचकर्माबद्दल सुरू आहे.
आयुर्वेदात मधुमेह ओळखला गेला आहे.(Defined & Described) अन तो 'असाध्य' आहे. (कुणाही खर्‍या आयुर्वेद तज्ज्ञास विचारा, माझी साडेतीन रुपयांची पैज. असाध्य असे लिहीलेले आहे.) मॉडर्न मेडिसिनही याला "असाध्य"च म्हणते. म्हणजे "बरा होत नाही."(मलेरिया, टाय्फॉईड सारखा). तर, "आटोक्यात ठेवता येतो."

मुद्दा हा आहे, की तो आटोक्यात ठेवण्यासाठी आयुर्वेदात जे लिहीलं आहे, त्यात फक्त "कन्जक्चर्स" आहेत. मॉडर्न मेडिसिन देखिल व्यायाम आदि वापरतात, पण ती पूर्ण ट्रीटमेंट नव्हे. ओरल हायपोग्लाय्सेमिक एजंट्स, वा इन्शुलिन हे उपचार आहेत. पंचकर्म हे डायबेटीससाठी कुठेच लिहिलेले नाही. जे सांगतात ते मार्केटींग करीत आहेत.

तेंव्हा तुमच्या डायबेटीसच्या उपचारासाठी "अ‍ॅलोपथी" वाल्याकडे जा. आधी, तो डॉक्टर चोर नाहीये, याची खातरजमा त्याच्या जुन्या पेशंटांकडून करा. पण, इतर उपचार करू नका. मधुमेहात सुरुवातीला फक्त 'कागदावर आजार' दिसतो. रिपोर्टमधे साखर! अन मला त्रास नाही. म्हणून इतर उपचार होतात, अन त्या क्वॅक्सचे फावते.. ज्या दिवशी रेटीना खराब झाला, तो डोळ्याचा डॉक्टर तुमच्या डोळ्याचा सगळ्यात नाजुक भाग जाळून टाकणार लेझरने. किडनी गेली, की डायलिसिस सांगणार किंवा ट्रान्स्प्लान्ट. शोधा, कोण किडनी देणार तुम्हाला. पायाला गँगरीन झाला, आम्ही तो कापून टाकणार. असं बरंच काही. डायबेटीस म्हणजे साखर नाही हो.
it is a microvsacular angiopathy. काहीही कळत नसतं त्यातलं अन हे तथाकथीत वैदू(द्य) पंचकर्म करतात...

IF and WHEN u get physical symptoms, there is NO positive treatment. म्हणून दोन्ही हात जोडून विनंती करतो, की हौसे खातर काय वाट्टेल ते करा.
पंचकर्म करा
जांभळाचं पाणी प्या
वैदूच्या पुड्या घ्या
साबुदाण्याच्या गोळ्या घ्या.
पण, व्यायाम अन तुमचा डायबेटॉलॉजिस्ट सोडू नका.

इब्लिस, तुमच्या सांगण्यातली कळकळ पोचली. पण डायबेटीस अन किडनी फेल्युअर, रेटिनाचे प्रॉब्लेम यांचा संबंध नीट विषद करून सांगितला तर जास्त परिणामकारक ठरेल तुमचे पोस्ट.

झालं! इब्लिसला चान्स मिळाला! Proud

>>>>>>तेलाचे भांडे नि वरणाचे भांडे एकाच पद्धतीने धुतात का असा प्रश्ण आहे! >>
जाईजुई Lol

उतरलेले सांगितले, तरी त्याची खिल्ली उडविणारेही आहेत. तरीही लिहीतो. >>>> लिहाच कारण असे शुद्ध सल्ले देणारे कमी झालेत हल्ली.

प्रतिसाद उत्तम. सरळ व कळकळीने लिहिलेला आहे. जरा कोणाला खरमरीत वाटू शकतो पण तो तसा हवाच Happy

तुम्ही सांगितल्याप्रमाणे काहि गोष्टी सुरु केल्या (करायला लावल्या) आहेत व बाकीवरही लक्ष दिले जाईल Happy

धन्स.

तुमच्या लेखाच्या निमित्ताने आयुर्वेद विरुद्ध मॉडर्न मेडिसिन असा वाद सुरु करण्याची इच्छा नाही. >>> माझीहि अशी ईच्छा नाही व नव्हती. तसा सुरु झाल्यास वा सुरु होत असल्यास क्षमस्व. पण या निमिताने योग्य मार्गदर्शन होत असेल योग्य सुर सापडत असेल तर काय हरकते?

इब्लिस, उत्तम पोस्ट Happy

डायबेटिसचा परिणाम म्हणून मेंदूची अ‍ॅट्रोफी होऊ शकते का? माझ्या आईला साधारण ५५ वयाला डायबेटीस डिटेक्ट झाला. नंतर तिला विस्मरणाचा त्रास होऊ लागला. आता तर अ‍ॅट्रोफी आहे. काही वर्षं तिला पथ्य व गोळ्या होत्या. नंतर तिने पथ्य नीट पाळल्यामुळे गोळ्या न घेताही पथ्यावरच तिची शुगर व्यवस्थित रहात होती. पण ४ वर्षांपुर्वी ती सकाळी उठल्या उठल्या धाडकन कोसळली. तिला साखरेचे पाणी दिल्यावर नॉर्मल झाली. असं २ दा झाल्यावर व रँडमली शुगर तपासल्यावर कळलं की तिची शुगर खाली येतेय मधुनच. आता तिला ना गोळी ना पथ्य. तिने दिवसभरात कितीही गोड खाल्लं तरी कधीही शुगर तपासल्यास ती नॉर्मल रेंजमध्येच येते.

अ‍ॅट्रोफी रिव्हर्सिबल नसल्याने तशीच आहे पण तिचा डायबेटीस गेला(?). काय कारण असेल?

प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी पंचकर्म रेकमेंड करतात...याने कितपत फायदा होतो? कोणाला काही अनुभव?

इब्लिस, तुला १०००००००० मोदक. खूपच सुंदर पोस्ट. अतिशय संयमित आणि प्रचंड खरी. धन्यवाद या साठी कि हे सगळं जवळून पाहिलं आणि अनुभवलं आहे. डायबेटिस कधीही बरा न होणारा रोग आहे हे लोक कधीही समजूनच घेत नाही आणि मग त्या तांबे बाबाजीच्या नादी लागून नको नको ते उपाय आणि पैसा खर्च करत बसतात. आयुर्वेदाला विरोध नाही. कुणालाच विरोध नाही पण खोटेपणा मात्र खुपतो. हे सगळे वैदूबाबा खरच फसवत आहेत जगाला.
आता पंचकर्मा बाबत - मी कधी केल नाहीये पण एक मैत्रीण २ महिने उरळी कांचन ला जाऊन राहिली होती. तिला एकावर एक अनेक आजार झाल्याने २-३ वर्षे सतत ऑषधांचा मारा चालू होता. त्यामुळे तिचं वजन पण खूप उतरल तेव्हा शरीरशुद्धीकरण या कारणाने तिने हे केल आणि आज ती बरी आहे. वजन अजून पुर्ववत नाही पण निदान तिच नॉर्मल आयुष्य मूळ्पदावर येतयं.

प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी पंचकर्म रेकमेंड करतात...याने कितपत फायदा होतो? कोणाला काही अनुभव?>>> मला ही हाच प्रश्न विचाराय्चा आहे..

आयुर्वेदातल्या डॉक्टरांनी रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार सांगितलेल्या पंचकर्म उपायांचे हल्ली बाजारीकरण होताना दिसते आहे. सध्याच्या सगळ्यात जास्त "रिटर्न् ऑन इन्वेस्टमेंट" असलेला धंदा झाला आहे हा. त्यामुळे ह्यामधे तर्-तम भाव वापरणे, व विश्वासू डॉ. च्या सल्ल्यानुसारच ही चिकित्सा करणे. नाहीतर आजकाल लग्न-मुंज, दिवाळी, दसरा कशासाठीही पंचकर्म चिकित्सा करताना पहाते आहे बर्‍याच बायकांना.

सर्वांचे आभार. माझ्या लिहीण्याचा उपयोग चांगला झाला हे वाचून आनंद झाला.

रेटिनोपथी, अन डायबेटीसचा संबंध सांगण्यासाठी, मेधाजी, फार वेळ लागेल. अन अती टेक्निकल आहे. तेव्हा इथे अप्रस्तुत.

सुमेधाजी,
>>नाहीतर आजकाल लग्न-मुंज, दिवाळी, दसरा कशासाठीही पंचकर्म चिकित्सा करताना पहाते आहे बर्‍याच बायकांना.

हा अल्टिमेट् प्रकार आहे.

पण, व्यायाम अन तुमचा डायबेटॉलॉजिस्ट सोडू नका.>> अजून एक अ‍ॅड करते - डाएटिशिअन ने लिहून दिलेला आहार/डाएट.

पण पचक्रमामधे तुपाला पर्याय नसतोच ना....किती प्याव लागत ते तुप....??माझ्या माहितीनुसार वमन आणी विरेचन ला तर तुप प्यावच लागत.....

ऋणं कृत्वा .....नाही कळ्ल...घृतं पीबेत्....म्हणजे तुप पिणे एवडच कळल....नक्कि माहित नाही...

नताशा -एक फूल | 20 November, 2011 - 00:56

>>पण, व्यायाम अन तुमचा डायबेटॉलॉजिस्ट सोडू नका.>> अजून एक अ‍ॅड करते - डाएटिशिअन ने लिहून दिलेला >>आहार/डाएट.

अनुमोदन. (डायबेटॉलॉजिस्ट मधे डाएट अन मेडिसिन असा टोटल कंट्रोल गृहित धरला होता.)

हा ह्या बाफचा विषय आहे व संबधित आहे म्हणून ही चर्चा. कुठेही पंचकर्म करण्यापुर्वी तिथील सेंटर ही तपासून पहा. कारण आजकाल पंचकर्म सारख्याची क्रेझ(हो क्रेझ) इतकी झालीय व एखाद्या दुकानांसारखी ठिकाणं उघडलीत पुण्या/मुंबईत तरी.

इथे सेंटरचे नाव घेणे उचित नाही पण तरी लोकांनी अश्या अ‍ॅड पासून वाचावे म्हणून देतेय, एका ओळखीतल्या काकूचा नव्या मुंबईतील एका आयुर्वेदिक ठिकाणाचा अनुभव भयानक होता.

नवी मुंबईत (वाशीतच बहुधा) इथे एका मराठी डॉ़क्टरांने(डॉ पाटील) महाराष्ट्रात उघडलेल्या सतरा-पंधरा सेंटर पैकी हे एक सेंटर. त्याची(डॉक्टरची) म्हणे टीवीवर मुलाखत होते. प्रॉड्क्ट्स पण आहेत व त्याची जाहीरात ही एक मराठी नायिका करते.

तर काकूचा हा अनुभव,

१)त्या सेंटरमध्ये अतिशय अस्वच्छता असते, आरोग्यासाठी पहिली स्वच्छता जरूरी आहे हेच कुणाला कळत नाही. वर अस्वच्छतेची तक्रार केल्यावर, बाकीच्या पेशंटना त्रास होत नाही मग तुम्हाला कसा काय होतो असे विचारणारी उर्मट डॉक्टर जी सेंटर हेड म्हणून आहे.
२) शिरोधराच्या उपचाराचे टेबल अस्वच्छ व त्याची टेबल सीट कुजलेल्या, शिरोधरा करणार्‍या बायका अतिशय बेशिश्तपणे बोलत असतात.
३) कोणीही मसाज करणार्‍या बायका ह्या मसाजचे शास्त्रोक्त शिक्षण घेतलेल्या नसून तिथेच कसे तरी इतर बायकांचे पाहून शिकलेल्या आहेत हे जाणवते ,
४) अतिशय उर्मट अशी ब्रँचची डॉक्टर
५) येणार्‍या पेशंट वर्ग हा मध्यमवर्गीय असल्याने आम्ही त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे( ?) असलेल्या सुवीधा देतो, स्पा सारखी सुविधा नाही देवू शकत. हे असे उत्तर डॉक्टरने दिले जेव्हा शिरोधरा टेबल स्वच्छ का नाही असे ह्या काकूनीं विचारल्यावर.
(पेशंटची लायकी हे कोण ठरवणार??? व लायकीचा व सेंटरच्या अस्वच्छतेचा कसा काय सबंध?)

६) एनिमा साठी वापरण्यात येणारी भांडी व नळी ही नीट धुतली सुद्धा जात नाही व सर्व पेशंटना एकच वापरली जाते.
७) असे असूनही फीया अवाच्या सवा आकारल्या जातात. त्याचा हिशोब नाही. म्हणजे सगळ्यांना एकच सांगतात की तुम्हाला PCOD आहे व ही त्याची फी आहे.

आता माझा स्वतःच्या काकीचा अनुभव,

कोट्टकलचा अनुभव घेवून ती आली.
डॉक्टरचे उपचार पद्धती आवडली. पुण्यात त्यांचे उपचाराचे सेंटर नाही म्हणून मुंबईला जावून सेंटर मधून औषधे घेवून आली.
स्लो उपचार आहेत पण मदत झाली नक्की असे ती म्हणते.

(इथे कुठल्याही सेंटरचे मार्केटींग करण्याचा उद्देश नाही पण चर्चा चाललीय म्हणून लिहिले. आजकाल बर्‍याच अश्या सेंटरची अ‍ॅड पेपरात रोज असते व लोकं त्याला बळी पडताना दिसताहेत. माझी एक मैत्रीण पण पुण्याच्या एका आयुर्वेदिक सेंटरचा अनुभव घेवून पश्चतावली होती. )
इथे अमेरीकेत नरम म्हणून एक डॉ़क्टरचा अनुभव सुद्धा चांगला नाही असा एकला होता.

तेव्हा कुठल्याही शाखेत जाण्याआधी नीट तपासून पहा. आयुर्वेदीक औषधे ही केस टू केस( case to case) प्रमाणे निकाल दाखवतात. जर तुमच्या शरीराचा नीट अभ्यास न करता वैद्याने औषधे दिली तर परीणाम होवु शकतात. आजकालची उघडलेली सेंटरं ह्यांचा कल असाच दिसतो.

नमूद करते की,
१) मी तिथे गेले न्हवते.
२) काकू गेली होते कारण त्यांच्या कोणीतरी सर्कल मध्ये बरीच पंचकर्माची तारीफ केलेली व कुठल्यातरी पेपरात येणार्‍या ह्या डॉ पाटील च्या रोज अ‍ॅड पाहून बळी झालेली की सांधे दुखी बरी होईल म्हणून
कोर्टाच्या पायर्‍या शहाणा माणूस चढायला मागत नाही सहसा... ह्या वयात एकट्या रहाणार्‍याला काकूला ते करण्याची ताकद व मानसिक बळ नह्वते.
उरलेली ट्रीटमेंट न घेताही ह्या सेंटरने फी परत केली नाही कारन त्यांच्या ऑफीसमध्ये जिकडे तिकडे "फी" परत केली जाणार नाही असे लिहिलेय.
आश्चर्य म्हणजे औषधे मात्र परत मागितली गेली. एकदमच टुकार असे सेंटर आहे हे असे काकूचे म्हणणे.

बहुतेक बर्‍याच ब्रॅच मध्ये तशीच अस्वच्छता आहे हे नंतर कळले.

३) काकी कोट्टकलचे नाव एकून गेलेली व तसेही तिचे केरळीय मैत्रीणीकडून तारीफ एकलेली.

जाईजुई, साक्षी,
पंचकर्माची मला माहिती नाही, मी डॉक्टर पण नाही.
पण जितके मेडिकल जर्नल्स मधले लेख वाचलेत त्या सर्वांमधे गर्भधारणा होण्या अगोदर आईची व वडिलांची तब्येत एकदम व्यवस्थित असावी असे रेकमेंडेशन आहे. किमान ३ महिने आधी स्मोकिंग , अल्कॉहॉल, इतर ड्रग्ज बंद करावे. चहा, कॉफी, कॅफिन अगदी कमी करावे. फोलिक अ‍ॅसिड, आयर्न, मल्टिव्हिटामिन घ्यायला सुरुवात करावी, वजन प्रमाणात असावे, जेवणात ताजी फळे, भाज्या, नटस यांचे प्रमाण वाढवावे इत्यादी सूचना असतात.

कसला अभ्यास वाढवा? Wink

रीस्पोन्स काय जमले नाहीत. ते अनुभव आहेत. त्यात जमण्यासारखे काय आहेत. नाही पटले तर सोडून द्या.

Pages