कांद्याची चटणी

Submitted by सायो on 20 March, 2009 - 13:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१, २ कांदे, ४,५ लसणीच्या पा़कळ्या, धणे-जिरे १/२ टीस्पून प्रत्येकी, ३,४ लाल सुक्या मिरच्या, थोडी चिंच, गूळ, मीठ.

क्रमवार पाककृती: 

कांदे सालं काढून गॅसवर भाजून घ्यावेत. धणे-जिरे व सुक्या मिरच्या कोरड्या भाजून घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. कांदा गार झाल्यावर मिक्सरमधे वाटून घ्यावा. त्याचबरोबर लसणीच्या पाकळ्या, चिंच, गूळ, मीठही काढावे. नंतर सर्व एकत्र करावे.

अधिक टिपा: 

ही चटणी भाकरीबरोबर छान लागते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा कधी ऐकली पण नव्हती कांद्याची चटणी. मी तुझ्याकडे येइन तेव्हा कर हां कारण माझ्याकडे कांदा भाजायला सोय नाहीये Sad

बेसीक प्रश्न, ओव्हनमधे भाजुन होईल का? कारण गॅस नाहीये Sad आणि बार्बेक्यु करायला ऊन नाहिये

छानच लागते ही चटणी. मी केलीये. Happy
झुणका, गरम गरम भाकरी अन कांद्याची चटणी... आSहाहाS

जुन्या माबोवर टाकली होती ही रेसिपी. ओव्हनमध्ये मी कधी केली नाहीये.

सिंडे, नक्की Happy

माझा प्रश्न आधीच बर्‍याच लोकांनी विचारलाय त्यामुळे मी फक्त 'मम' म्हणते.
गॅसला पर्याय सुचवा.

गॅसला पर्याय :
इलेट्रिक कॉईल वर पापड/फुलके भाजायची जी जाळी मिळते ती ठेवायची. कांदयात लांब दांड्याची सुरी किंवा काहीतरी टोकदार टोचून कांदा त्या जाळीच्या लगत धरायचा. हळूहळू फिरवत सगळ्या बाजूने चांगला भाजला जातोय नं हे बघायचे.

हा का ना का Happy

गॅस टॉप असेल तर ? मी रस्सा करायचा असेल तर कांद्याच्या फोडी अगदी थेंबभर तेलावर कढईत परतुन घेते. पण भाजल्याची चव ती नाहीच लागत.

पन्ना काकु, आहो ते कॉईलच्या रेंजवर जमते ओ. मी वांगी तशीच भाजायचे आधी. पण आता माझ्याकडे ग्लासटॉप रेंज आहे Sad

ओवन मधे करुन बघ. ब्रॉईल कर, बेक नको. जरा लक्ष ठेवावं लागेल.

यो सायो! क्या चटनी हैं!

आता पंचचटणीचं व्रत घेतल्यासारखं कारल्यानंतर हीच चटणी करून बघते. (मग पुढे दोडक्याची, गिलक्यांची, तोंडल्याची आणि कर्ट्युल्याची Proud )

मिनोती ग्लासटॉपवर सुध्दा फुलक्यांची जाळी ठेवून पापडापासून कांद्यापर्यंत काय वाट्टेल ते भाजता येतं.

मी कांदे / वांगे काहीही भाजायचे असले तर त्याला अ‍ॅल्युमिनियम फॉईल गुंडाळून , माझ्या सिरॅमिक च्या रेंजवर भाजते . अगदी गॅसवर भाजल्यासारखे लागते .
सायो, ही चटणी जुन्या मायबोलीवर वाचून मी अनेकदा केलीये . क्लास लागते , रेसिपीसाठी थँक्स .

कांदा साले न काढता भाजला तर जास्त चांगले ना ? नाहीतरी वरची साल जळूनच जाते. असा भाजलेला कांदा नूसता खायलाही खूप छान लागतो.

करेक्ट दिनेशदा . मी खरं तर कांदा साल न काढताच भाजते . वर सायो ने साल काढून भाजायचे लिहिलेय , हे मी वाचले नाही .

सायो मस्त झाली ही चटणी. माझी पण आई करते, मी नव्हती केली कधी. तुझी रेसीपी वाचून बरेच दिवस मनात होतं करायची...आज केली...अहाहा..मन तृप्त झालं अगदी.

फक्त एक बदल म्हणजे आई सुकं खोबर पण असच गॅसवर भाजून टाकते.

मिती, गेल्या आठवड्यातल्या गटगला केलेली ही चटणी. माझी आई गॅसवर कांदा अगदी खरपूर भाजत नाही त्यामुळे तिच्या चटणीचा रंग लालसर येतो. माझ्या चटणीचा काळसर आलेला. तो बदल ज्याने त्याने अवडीनुसार करावा. खोबरं घालून केली नाहीये कधी. पुढच्या वेळी करेन.

सायो, आईने सांगितलं मला की सुकं खोबरं भाजून घातलं की खमंग होते आणखीन म्हणून. पुढच्यावेळेस मी ही अ‍ॅडिशन करणार आहे ही.

सावली, स्टेप बाय स्टेप जा बघू. आधी तांदळाची भाकरी या बीबीवर जावं लागतं त्यासाठी, त्यानंतर एखादी पालेभाजीची रेसिपी शोध आणि मग ह्या बीबीवर ये.

पालेभाजी = पालक ग इथे.
भाकरिची जरा मारामारिच होते माझि.
हि चटणि सोपी वाटतेय ना. चुकल तर लग्गेच सायोला विचारता येईल Happy

सावली अमृताच्या रेसिपीने तांदळाची भाकरी करून बघ..एकदम सोपी.
पालेभाजी पालक तर छान लागेलच पण कांद्याच्या पातीची पिठ पेरून पण छान लागेल. किंवा पिठले/भरीत.आणि ही चटणी.दोन घास अंमळ जास्तच जातात मग. Wink
रच्याकने:या चटणी ला खमंग फोडणी दिली तरी मस्त लागते एकदम.