टि-शर्ट आणि कॅप (ववि २०११) !!!

Submitted by ववि_संयोजक on 22 June, 2011 - 04:17

कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.

ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.

आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०

(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)

धन्यवाद !

"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का Angry ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... Blush जा तिकडे..."
"हँ..... "

तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .

टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-

Green T copy.jpgMaayboli_Tshirt_2011.jpg

वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-

लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"

मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-

३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL

आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप

Maayboli_Cap_2011.jpg

क्याप ६० + २५** = ८५रु/-

** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.

यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.

टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.

पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००

ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.

ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?

१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-

चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.

अधिक माहीतीसाठी संपर्क :-

पुणे -

मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५

मुंबई -

आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९

* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.

मी १०.४० ला पोचले.
१०.४० ला तु पोहचलीस ते सांग. Proud नाहि तर लोक समजतील कि संयोजकच १०.४० ला पोहचले.

असो,
पुण्यातले संयोजक १०.१५ ते ११.४० बालगंधर्व इथे टोप्या वाटपासाठी जमलेले. ३ उत्सुक माबोकरांनी येउन आपापल्या टोप्या / टि शर्ट्स घेउन गेल्याबद्दल समिती त्यांचे आभार मानत आहे.

धन्यवाद.

टोप्या मिळाल्या. धन्यवाद संयोजक. इतर कोणी माबोकर भेटतील म्हणुन मी ११.४० पर्यंत होते तिथे पण कोणीच आले नाही. पूनम आपली भेट बहुदा पुढच्या टोपीवाटपालाच Lol

मुंबई मधे मला पण १ टी-शर्ट मिळाला नाही. आनंदा तु दिलेली १० दिवसाची मुदत संपत आली रे बाबा

टीशर्ट समिती >> मंजूडी >> सायो >>रूनी असा लांबचा प्रवास करत करत फायनली आज टीशर्ट माझ्याकडे आले. धन्यवाद. रंग, मायबोली कॅलीग्राफी खूप आवडले.
लेडीज साईझचा शर्ट चुकीच्या मापाचा पाठवला गेला (Small ऐवजी Medium) पुढच्यावेळी प्रत्येक टीशर्टच्या पाकीटावर सदस्यांची नावे घालून ठेवली तर असा गोंधळ होणार नाही.
घालुन बघितल्यावर कळले की शर्ट US Small साइझचाच आहे. तेव्हा चुकून पाठवलेल्या मिडीयम टीशर्टने फायदाच झाला.
धुतल्यावर टीशर्ट आटतात असे वर लिहीलेय तसे आटले तर मग जरा मापाला लहान होईल असे वाटतय.
जेन्ट्समध्ये लार्ज साइझचा शर्ट मागवला होता आणि तोच आला (US size - large आणि medium च्या मधला साइझ आलाय). नवर्‍याने घातल्यावर तो साइझपण योग्य निघाला.

बरं झालं हा बाफ वर आला.
दोन महिन्यांपूर्वा टीशर्ट्स पोचले. साईज फारच हुकलेले आहेत त्यामुळे घालता येणार नाहीत.
टी शर्टचा रंग आणि कॅलिग्राफी छान आहे.

काल शेवटी एकदाचे टीशर्ट मिळाले पण एकही घालता येणार नाहिये. Sad
लेडीज टीशर्ट मिडियम साईझचा सांगितलेला तो स्मॉल आहे. मुलीसाठी मागवलेल्या टीशर्ट सुद्धा त्याच मापाचा आहे.

आतली चिठ्ठी वाचुन टॅग इग्नोर केला तरी साईझ मोठी नाही ना होत.

जेन्ट्साचा लार्ज साईज फारच लार्ज आहे शिवाय त्याचा रंगही बाकी २ टीशर्ट पेक्षा वेगळा आहे. रंग एकवेळ ठिक पण कापडही कमी दर्जाचं वाटतय.

शेवटी १ लार्ज जेन्ट्स, २ स्मॉल लेडीज(जो खरतर लेडीज स्मॉल साईज अस्ते त्याहुन लहान आहे) जो मला होणं शक्य नाही आणि लेकीला पण मोठा होइल असे ३ टीशर्ट्स आता कुणाला होउ शकतील ह्याचा शोध घेणं चालू करावं लागेल.

Pages