हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. तेच. मलादेखील असेच वातते आहे की हॅरीलाच चेम्बरमध्ये हे प्रथम समजते. मग तो वर येऊन बाकी लोकाना सांगतो.

> पुस्तकात आहे, त्याला काढा दिला म्हणून..

अरेच्चा, जामोप्याने पुस्तक वाचले? या मुळे वॉल्डेमॉर्टच्या पिंडाला फिनीक्स न शिवो म्हणजे झाले.

Tom Riddle mhanjech Voldemort aahe he purwi jari common knowledge asala tari Harry aani tyaach barober wachakanna suddha chamber madhech pahilyanda kalta.
Pustaka wachun kharach majaa aali. Cinema baghaychi majaa wegli aahe pan khupse tapshil raahun jaatat cinema madhye.

बेसिलिकला पाहिल्यावर सर निकोलस बेशुद्ध होतो.. तो शेवटी परत जागा कसा होतो? पुस्तकात आहे, त्याला काढा दिला म्हणून.. पण सर निकोलस भूत असल्याने काही खात नसतो. ५०० वर्षे त्याने काही खाल्लेले नसते. मग त्याला काढा कसा पाजतात?>>>>>>>>>>>>>>>> हे कधी होतं????????????? मला तरी वाचलेलं आठवत नाहिये....

इतरांप्रमाणे सर निकोसलही बेशुद्ध होतो... शेवटी सर्वाना काढा पाजून जिवंत (!) करतात. म्हणजे निकोलस आणि फिल्तचे मांजर यानाही दिला असणार.

hp.JPG

जिल्लेइलाही | 9 December, 2011 - 10:02
सेड्रिक डिगरीची गर्ल फ्रेंड कोण? नाव विसरलो.. हॅरी तिचा ऑऑफि मध्ये किस घेतो ती.

चँग ?

बरोबर चो चँग.

सर निकलस बेशुद्ध पडण्याचा तपशील मलाही वाचल्याचा आठवत नाही. फक्त तो भूत असल्यामुळे त्याचा आरपार बघता येत असल्यामुळे मागे उभे असलेल्या मर्टलची आणि बॅसिलिस्कची नजरानजर होते असं काहीसं आठवतय मला.

चेंबर ऑफ सिक्रेट्स मध्ये आहे. ड्युएलिंग क्लब्मध्ये मॉल्फॉयने निर्माण केलेल्या सापाला जस्टिन फ्लिंचवर हल्ला करण्यापासून हॅरी पार्सलटंग वापरून थांबवतो. सगळ्यांना मात्र उलट वाटते. यानंतर थोड्याच वेळात एका कॉरिडोरमध्ये हॅरीला जस्टिन बेशुद्ध पडलेला मिळतो. तिथेच निअरली हेडलेस निक- सर निकोलसही असतो. काळा पडलेला, जमिनीपासून काही अंतरावर. जस्टिनने बॅसिलिस्कला निकोलसमधून आरपार पाहिलेले असते.

जस्टिनने बॅसिलिस्कला निकोलसमधून आरपार पाहिलेले असते. आणि निकोलसने डायरेक्ट पाहिलेले असते. पण तो भूत असल्याने मरत नाही.

अरे, एक गंमत सांगायची राहिली. माझ्या एका मित्राने हॅरीचे सातही भाग गिफ्ट म्हणून दिले. (माझ्याकडे आधीच होते पण त्याला कुणीतरी दिले होते आणी त्याला वाचनाची भरपूर आवड अस्ल्याने ते त्याने अजिब्बात वाचले नाहीत.) त्यामधे सात पुस्तकाबरोबर बीडल द बार्डचे एक पुस्तक, फँटस्टिक बीस्ट अशी दोन पुस्तके आहेत. बीडल च्या पुस्तकात पाच कथा आहेत. पाचही मस्त आहेत. जरूर वाचा.

बीडल द बार्ड कोण होता? रोलिंग्बाईनी पुस्तकाला त्याचे नाव का दिले आहे?

जिल्लेइलाही, सातवा भाग नाय का वाचला तुम्ही? बीडल द बार्ड पंधराव्या शतकातला कथालेखक होता. त्याच्या कथांच्या पुस्तकामधेच डेथली हॅलोजची गोष्ट आहे.

हो. पण हा बीडल द बार्ड खरोखरच पंधराव्या शतकातील लेखक होता, की तोही हॅरी पॉटर कथानकातील एक काल्पनिक पात्र आहे? हे मलादेखील नक्की समजले नाही.

हॅरी पॉटर सातव्या भागात बीडल द बार्डचा उल्लेख आहे.

सातवा भाग पूर्ण झाल्यानंतर रोलिंगबाईनी द टेल्स ऑफ बीडल द बार्ड हे नवीन पुस्तक लिहिले. तेही हस्तलिखित स्वरुपात. त्याच्या सात कॉपी काढल्या हाताने लिहून. एक आपल्याकडे ठेवली, पाच मित्राना दिल्या आणि सातव्या कॉपीचा लिलाव केला, त्याला एक लाख अमेरिकन डॉलर म्हंजे ४५ लाख रुपये मिळाले! Proud अबबबबाबब्ब्ब ! त्यानंतर त्या पुस्तकाची पुस्तकी प्रिंटेड आवृत्ती आली.

http://hindi.oneindia.in/news/2007/11/02/2007110290732100.html

http://www.amazon.com/gp/feature.html?ie=UTF8&docId=1000179911 या पुस्तकातील सगळी चित्रेही रोलिंग्बाईनीच काढली आहेत.. ही चित्रेच नव्हे तर हॅरी पॉटरमधील व्यक्तीरेखा, हॉगवर्त, .. अशी अनेक चित्रेही बाईनी काढली होती, त्याचा षिणेमाला वापर झाला म्हणे! Proud धन्य ती रोलिंगबाई !

btb.JPG

हा रोलिंगबाईनी काढलेला स्नेप.. Happy

sn.JPG

बीडल द बार्ड हाही १५ व्या शताकातील, पण हॅरी पॉटरच्या दुनियेतल्या १५ व्या शतकातील लेखक वाटतो. प्रत्यक्षात असा कुणी माणूस नसावा, या पुस्तकातल्या पाचही कथादेखील रोलिंग बाईच्याच आहेत असे वाटते... हॅरी पॉटर म्हणजे महाभारत धरले तर बीडलचे पुस्तक म्हणजे गीता किंवा भागवत होईल ! Proud

बीडल द बार्ड हाही १५ व्या शताकातील, पण हॅरी पॉटरच्या दुनियेतल्या १५ व्या शतकातील लेखक वाटतो. प्रत्यक्षात असा कुणी माणूस नसावा, या पुस्तकातल्या पाचही कथादेखील रोलिंग बाईच्याच आहेत असे वाटते... >>> व्हय. पाच कथामधे बॅबीटी रॅबिटी आणि हॉपिन्ग पॉट कथा मस्त आहेत. अनुवाद करू का? Happy

लेकीला लळा लावणार आहे आता हॅरीच्या पुस्तकांचा. १ महिन्याला १ पुस्तक आता विकत घेइन. Happy मी सगळी पुस्तकं लायब्ररी मधुन घेउन वाचल्येत आत्ता पर्यंत.

नंदिनी, रीतसर परवानगी घेऊन मगच अनुवाद कर.
रोलिंगबाई अथवा तिचे प्रकाशक- कोणाशीच पंगा घेणे इष्ट नव्हे Wink Happy

सध्या पाचवा भाग वाचत आहे. आधी एकदाच वाचलाय त्यामुळे अनेक भाग नव्याने वाचल्यासारखे वाटत आहेत.

संपूर्ण अनुवाद जसाच्या तसा करु नका.. रोलिंग बाईंच्या कथांचा सारांश असा म्हणून लिहा. पण सारांश शाळेच्या परिक्षेसारखा १/३ च असला पाहिजे असा कुठे नियम आहे? Proud चांगला घळघळीत ९० % सारांश लिहा. त्यात अधून मधून तुमचीही टिप्पणी लिहा.. उदा. बघा रोलिंबाईंची कमाल इथे! किती सुंदर वर्णन आहे नै? असे अधून मधून लिहा. म्हणजे कथा विस्तारही होईल, वेगळीही होईल आणि तरीही मूळचीच राहील Proud नावं बदलून संपूर्ण कथा लिहिलीत तर जास्त प्रॉब्लेम येऊ शकतील.

इन्व्हिजिबिलिटी क्लोक्स किती असतात? मला वाटलं होतं, एकच असतो- जो हॅरीकडे असतो तो. पण चौथ्या भागात मॅड आयकडे एक असतो आणि पाचव्या भागातही ऑर्डरमधल्या एकाकडे एक असतो असे वाचले Uhoh

मेहता सध्या अनुवादित पुस्तकांचंच काम करतात. त्यामुळे अर्थातच त्यांच्याकडे रीतसर परवानगी असणारच. बाकी अनुवाद करायचा, की 'आधारित' ठेवायचं, काय पळवाटा शोधायच्या, हे प्रत्येकावर अवलंबून Happy

Pages