फेसबुक : अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वयंनियंत्रण

Submitted by असो on 8 December, 2011 - 00:41

सध्या चर्चा चालू आहे ती कपिल सिब्बल यांनी गूगल आणि फेसबुक या कंपन्यांना स्वयंनियंत्रणाबाबत केलेल्या सूचनेची. नेमकं काय झालंय ?

१. आताच अशी गरज का भासावी ?
२. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक होतो का ?
३. अभिव्यक्तिस्वातंत्र्याबरोबर काही जबाबदा-या येतात का ?
४. आपण मतप्रदर्शन करणे आणि दुस-याच्या मताचा आदर करणे याबाबतीत पुरेसे प्रगल्भ आहोत का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्पणा, +१ अनुमोदन.

ह्याला म्हणतात राजकारण. गुगल इंडियाच्या ऑफिसला इन्कमटॅक्स डीपार्टमेंट कडून नोटीस.

http://economictimes.indiatimes.com/tech/internet/google-india-gets-i-t-...

भारत सरकारचे अभिनव "tweet license "

भड़काऊ संदेश सामाजिक नेटवर्किंग साइटवर प्रदर्शित होण्याचे ठाम्बावान्याठी, भारतीय कैबिनेट ने एक नविन "tweet लीसिन्से" सुरु करण्याचे ठरवले आहे. श्री कपिल सिब्बल यांनी "tweet license" हे एक सामाजिक नेटवर्किंग साइट वरील भडकवणारे संदेश थांबवण्यासाठीचे अभिनव साधान आहे असे सांगितले. ते असेही म्हणाले कि भारतीय भूमीवरील आतंकवादी हल्ले हि यामुळे थांबतील. त्यांनी "tweet license" ची साधारण तीन ताप्यातली प्रक्रिया स्पष्ट करून सांगितली आहे.

1) भारतीय नागरिकाला सामाजिक नेटवर्किंग साइट वर "tweet / comment / संदेश / टिप्पणी" लिहिण्यासाठी जिल्हा मजिस्ट्रेट कडे एक आवेदन द्यावे लागेल. आवेदनामध्ये तुमचा पूर्ण संदेश आणि संदेशामधील चित्रे स्पष्ट पणे लिहावे लागतील. ते असेही म्हणाले सामाजिक नेटवर्किंग साइटवरील अधिकाधिक उपयोगकर्ता अलीकडे जास्त चित्रे वापरताना आढळत आहेत. त्यामुळे चित्रांचाही आवेदानामध्ये समावेश करावा लागला. आवेदानाबारोबर आधार पत्र हि जोद्दवे लागेल. श्री कपिल सिब्बल असेही म्हणाले कि आधार पत्रांचा किमान एवढातरी उपयोग होईल.
2) आवेदन दिल्यानंतर जिल्हा मजिस्ट्रेट तीन महिन्यात त्यावर निर्णय घेतील. जर प्रस्तावित टिप्पणी चे अधिक विश्लेषण आवश्यक वाटले तर, सूचना मंत्रालय च्या अनुमतिसाठी ते पाठवले जाईल. त्यासाठी आणखी तीन महिने दिले जातील. हा कालावधी कारणाशिवाय कितीही वाढविता येण्याची सूचना मंत्रालयास परवानगी दिली आहे.
3) एकदा जिल्हा मजिस्ट्रेट ने आवेदानाला मंजूरी दिली की नागरिकाला प्रस्तावित टिप्पणी साठी एक सीरियल नंबर मिळेल. सामाजिक नेटवर्किंग साइट वर, नागरिक लॉग इन करून हा सीरियल नंबर देउन हि टिप्पणी लिहू शकतील. टिप्पणी चा खरेपणा पडताळून पाहण्यासाठी सामाजिक नेटवर्किंग साइट सूचना मंत्रालयाच्या संगणकाशी जोडून टिप्पणी आणि चित्रांची खात्री करतील.

प्रत्येक नागरिक एकावेळी एकच प्रलंबित किंवा न वापरलेले "tweet license" बाळगू शकतो. जेंव्हा "हा कायदा केवळ भारतीय नागरिकाना का" असा प्रश्न विचारल्यावर श्री कपिल जी म्हणाले कि "इस कानून केवल भारतीय नागरिकों के लिए है, भारत सरकार को गैर नागरिकों के लिए कानून बनाने का अधिकार नहीं है. बेकायदा नागरिक अथवा पहचान गये आतंकवादियों को भी वो अप्रवासियों के रूप में होणे कारण ये कायदा लागू किया नहि जा सकता." श्री कपिल सिब्बल असेही म्हणाले कि "नागरिकों को किसी भी सामाजिक नेटवर्किंग साइट को चुनने की स्वतंत्रता देने के लिए सभी लोगोने सरकार का शुक्रिया अदा करना चाहिए."

This article is meant to be consumed for fun purpose only.
Note - I personally feel that there is some merit in having minor laws around comments on social networking sites.

अजुन एक लेख "द हिंदू:" मधील.

http://www.thehindu.com/opinion/editorial/article2698888.ece#.TuGTJOd25l...

In fact, the report published in The Hindu on December 8, “India wanted 358 items removed,” reveals that 255 of these requests made to Google fell in the “government criticism category,” with the biggest chunk accounted for by a single request from “a local law enforcement agency to remove 236 communities and profiles” from the Google-owned social networking site, Orkut, which were “critical of” an unnamed “local politician.” This strengthens widespread suspicion that the inflammatory content argument is really a cover for censoring political attacks and uninhibited criticism circulating in the social media.

सध्याच्या खाजगी मिडीयामधील "द हिंदू" हे एकच वृत्तपत्र कोणत्याही राजकीय पक्षाला विकलं गेलेलं नाहीये आणि खरी पत्रकारीता करतं आहे.

शेंडी!! इतकी सारी नाटकं आणि रडारड करण्यापेक्षा म्हणावं सोशल नेटवर्किंग साईट्स ना भारताच्या ''लोकशाही''त पूर्ण बंदीच घाला ना! (:वैताग:) मग अंडर ग्राऊंड नेटवर्किंग तरी चालू करू म्हणावं! Wink

>>नागरिकों को किसी भी सामाजिक नेटवर्किंग साइट को चुनने की स्वतंत्रता देने के लिए सभी लोगोने सरकार का शुक्रिया अदा करना चाहिए.>>> नानाची टांग त्यांची !!
तर मग उद्या मायबोलीवर लिहायला ही लायसन्स लागेल Uhoh

ही बघा आजची बातमी http://starmajha.newsbullet.in/india/34-more/10876-2011-12-09-10-23-48
कोणी पाकिस्तानी वगैरे नाही हा नक्की कुणी भारतीयच असेल.

एकूणात कॉग्रेसचे पुढच्या निवडणुकीत काही खरं नाही.

शांतिसुधा +१

२. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक होतो का ?
उत्तर: नाही
अतिरेक होणे असे एखाद्याला वाटणे म्हणजे काय. तर आपल्याला विरोध इतका आहे की आपण अल्पमतात आहोत हा डोक्यात प्रकाश पडणे.

३. अभिव्यक्तिस्वातंत्र्याबरोबर काही जबाबदा-या येतात का ?
उत्तर: हो आणि नाही.
सामान्य माणसाची वैयक्तिक बदनामी (internet bullying) करु नये ही एक जबाबदारी आहे.
राजकीय क्षेत्रात उतरणार्या माणसांनी मात्र वैयक्तिक चाचणीला तयार राहिले पाहिजे, अशी चाचणी
नाहितरी व्रुत्तपत्र वा इतर माध्यमांतुन होतेच. राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रात करियर करु इच्छिणार्यांनी आपली कातडी निबर करणे हे पुर्वापार समाजमान्यच आहे.

४. आपण मतप्रदर्शन करणे आणि दुस-याच्या मताचा आदर करणे याबाबतीत पुरेसे प्रगल्भ आहोत का ?
उत्तर: आवश्यकता नाही.
दुस-याच्या मताचा आदर करणे हे संसदेत सामाजिक व्यासपीठावर आवश्यक असेल तरी "मुक्तपीठावर" नाही. मुक्तपीठाचा उपयोग मताची क्वालिटी नाही तर जोर अजमावण्या करताच होतो.
उदा. जनलोकपाल बिल कोणी फेसबुकवर बनवणार नाही. फक्त किती जणांना हवे आणि कितींना नाही हेच ठरवणार. केवळ हेच जाणुन सध्याच्या सरकारने सामान्य जनतेला हे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी पावले उचललीत ($४५ टॅब्लेट) ही पॉलिटिकल मुव्ह असली तरी स्तुत्यच आहे. जर सरकारला वाटत असेल की आपल्या बाजुचे मत केवळ साधन नसल्याने व्यक्त होत नाही तर ते साधन सरकारने जरुर सामान्य जनतेला उपलब्ध करावे पण विचारांना सेन्सॉर करणे अयोग्यच, कारण मग कोणता विचार योग्य आणि कोणता अयोग्य याचा विचार करणारे तथाकथित प्रगल्भ आपणच आहोत आणि दुसरे नाहित हा विचारच अप्रगल्भ नाही काय?

जर फेसबुकसारख्या संस्थळावर विश्वास नसेल तर चीन प्रमाणे मायबोली सारख्या संस्थळांना प्रमोट करावे.

देवदेवतांचे आक्षेपार्ह चित्रण, श्रद्धास्थानांबद्दल टवाळकीच्या उद्देशाने किंवा जाणूनबुजून तेढ वाढावी या उद्दिष्टाने टाकलेला मजकूर याला वेसण घालता यावी.

मध्यंतरी बाळासाहेब ठाकरे, छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाला होता तेव्हां ऑर्कूटने सहकार्य केलं होतं.

इथं पुन्हा एखाद्याने मत व्यक्त केलं असेल तर त्याला ते व्यक्त करण्याचा अधिकार असावा. माझ्या मताच्या विरोधी मत मांडण्याचा अधिकार जर मी मान्य करीत असेन तर माझ्याही मताचा आदर व्हायला हवा. अभिव्यक्तीस्वातंत्र्य इथपर्यंतच असावं. पण शिवराळ भाषेत केलेले उल्लेख, कट पेस्ट करून विकृत केलेली चित्रं यांना कुणी अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणत असतील तर वाचणारे, ठरवणारे लोक मूक असले तरी त्यांना काहीच कळत नाही असं समजू नये.

>>>>> सिब्बल यांन्नी आधी दिग्गुच्या तोंडाला लगाम घालावा ....मग फेसबूक वर गरळ ओकणार्‍यांच्या <<<<< Lol Lol Lol
लाख पते की बात

इतका विरोध उभा राहिल्यावर (कारण बहुधा याआधी काँग्रेसवाल्यांना वाटलं असेल की आपण वाट्टेल ते करू शकतो आणि मुकी बिचारी जनता काहीही बोलणार नाही आणि निमूटपणे सगळं ऐकून घेईल, बहुधा सगळीच जनता त्यांच्यासारखी म्याडमची चाकर आहे) मानभावी सिब्बल आपल्याच लोकांच्या माध्यमांतून (बरखा दत्त व्हाया एनडीटीव्ही) मी असं म्हणालोच नव्हतो, माझ्या नावावर ह्या गोष्टी खपवल्या गेल्या आहेत. डॉग्विजय शिंग असता तर म्हणाला असता "हे तर आर एस एस ने घडवून आणलंय. अगदी गुगल, फेसबुक, याहू या कंपन्यांना यासाठी मी बोलावलंच नाही माझा मुखवटा लावून कोणी आर एस एस ची व्यक्ती त्या मिटींगला गेली असणार. मी तर म्याडमच्या घराबाहेर इमाने इतबारे चाकरी करत होतो. " Happy

इंटरनेट एक माध्यम आहे, पण तेथे असणार्‍या माहिती बद्दल कुणिच जबाबदार नाही हे हास्यास्पद वाटते. no one is responsible for nothing असे कसे? या मुलाखती मधे सिब्बलांच्या अनेक गोष्टी खटकल्या... , पैकी दोन प्रकर्षाने जाणावल्या.

सिब्बल- "They (google, facebook) are saying that they are only carriers - so we can not sue the carriers. They will not tell us who the source is - so we can not sue the source."

सिब्बल- "They refused to remove the images, they said we are not responsible for the content/ images."

>>>.इंटरनेट एक माध्यम आहे, पण तेथे असणार्‍या माहिती बद्दल कुणिच जबाबदार नाही हे हास्यास्पद वाटते. no one is responsible for nothing असे कसे?

या वाक्यावर
तुमची ही पोस्ट आहे की काय असे पहिल्यान्दा वाटून गेले ना भौ
>>> मी आहे आणि वाचतोय Proud

टीव्हीवर लाय आणि लॉयल्टी डीटेक्टर असण्याची गरजच नाहीये. कोण बोलतंय यावरूनच समजू शकतं त्यातील सत्यासत्यता. बरखा दत्त एक नं खोटारडी आणि टीव्हीवर दाबून धादांत खोट्या गोष्टी स्वतःच्या भाषिक अभिनयाने त्या कशा खर्या आहेत हे दाखवणारी आहे. याचं प्रत्यंतर सगळ्यांनीच घेतलेलं आहे (गोध्रा आणि नंतरच्या गुजरात दंगलींच्या संदर्भात........ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या गोष्टी घडल्याचं रंगवून आणि ठासून एन डी टीव्ही वर बरखा दत्त ने दाखवलं. दोन मुलींवर अमानुष बलात्कार झाल्याचं रंगवून सांगण्यात आलं आणि चौकशीत त्यांच्या सख्या भावानेच सांगीतलं की माझी एक बहिण कर्करोगाने २००० आधीच मरण पावली आहे आणि दुसरी बहिण परदेशात रहाते.) कपिल सिब्बल सारखे वकीली लोक त्यांच्या बायकोशी तरी घरी खरं बोलत असतील की नाही याविषयी शंका येते. माणसाची देहबोलीच सगळं सांगते.ह्या बातम्या आर एस एस च्या पांचजन्य मधे आलेल्या नसून न्यु यॉर्क टाईम्स, द हिंदू या वृत्तपत्रांमधे आलेल्या आहेत. स्वतःला सोयीचं तेव्हा खरं आणि गैरसोयीचं तेव्हा खोटं का?

लिंबूटींबू Biggrin

या वाक्यावर तुमची ही पोस्ट आहे की काय असे पहिल्यान्दा वाटून गेले ना भौ
---- सिब्बल जे बोल्ले ते " --- " मधे लिहीले होते ना, असो.

हा झरदारी जोक मी विनोद या धाग्यावर ही टाकला होता पण त्याची खरी जागा या धाग्यावर आहे म्हणून इथे पुन्हा टाकतो.
काही काल आधी पाक राष्ट्राध्यक्ष झरदारी यांच्या बद्दल इतके जोक एस एम एस व नेट वर फिरत होते की पाक सरकारने एक आदेश काढला की जो कोणी असे जोक्स पाठवेल त्याला अटक केली जाईल. या आदेशा नंतर एक नवा जोक एस एम एस व नेट वर फिरु लागला. तो असा...

जनाब झरदारी एक बडीही महान शक्सियत है......

उनके जितना महान आदमी पाक मे आजतक पैदाही नही हुआ न आगे होगा....

जनाब झरदारी जितना इमानदार आदमी तो पूरे दुनिया मे नही है....

पुढे असे भरपूर गुणवर्णन आहे....
.
.
.
हमे अल्लाह का शुक्रगुजार होना चाहिये कि उसने जनाब झरदारी को पाक मे पैदा किया....
.
.
.
आपको समज मे तो आ रहा है ना ? मै क्या कहना चाह रहा हूं?

मला वाटते कपिल सिब्बल याना हा जोक माहित नसावा. आणिबाणी च्या काळावर लोकांनी केलीली मात ते विसरले बहुतेक.
( जाता जाता: त्यांचं नाव आजकाल जालावरचे लोक " ल " सायलेण्ट करून घेतात म्हणे(म्हणजे लिहितांना ल लिहितात पण कंसात!! , इंग्रजी भाषेतून मराठीत येउ पहाणार्‍या या अक्षर सायलेण्ट करण्याच्या प्रकारास मराठी व्याकरणात काय नाव द्याव? हा विचार करतो आहे.)

Noise is measured in decibel
Nonsense is measured in the-Sibbal

मग अशी स्वतःच्या सोयीनुसार वागणारी माणसं राज्य करण्यास आणि भरवसा ठेवण्यास अयोग्यच असतात. तसंही ते कॉंग्रेस वाल्यांनी सिद्ध केलेलंच आहे. असो!

श्रीकांतजी, झरदारी विनोद भारी आहे. आणि सायलेंट उच्चाराला आपण मराठीत मौनातील उच्चार असे म्हणायचं का?

आणखी काही प्रश्न राहीले

अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी विषय समजलेला असणे आवश्यक आहे का ?
वरील प्रश्नाचा उपप्रश्न

विषय समजलेला असल्यास त्यातील ज्ञान (किमान माहिती) असणे आवश्यक आहे का ?

ज्या चित्रांमुळे सिब्बलला संताप अनावर झाला व त्याचबरोबर मॅडमच्या नजरेत भरण्यासाठी उत्कृष्ट संधी मिळाली तीच ही आंतरजालावरील चित्रे

Sibal_20111219.jpg

ह्यांना सारा पेलिन माहित नसावी. तिच्यावरून तर काय काय मजेशीर झाले इथे. जरा गुगल करून बघा.

हेच जर नरेंद्र मोदी, इतर विरोधी पार्टीच्या बाबतीत असले असते तर कपिल सिब्बलने (अन त्या ढ दिग्गीने) विरोध केला असता का? अण्णाचा छोबीपछाड मस्त आहे. आणि तो मनमोहनसिंगांचा सिंघम मला अफाट आवडला होता. मनमोह्न भ्रष्ट नेत्यांविरुद्ध तसे वागले तर काय मजा येईल. त्यांना ११ वा अवतार करायला माझा विरोध नाही. Proud

नग्न छायाचित्रे असली असती तर मी ही विरोध केला असता पण मिमिक्री की काय ह्यालाच म्हणतात ना रे भाऊ?

अभिव्यक्ती स्वतंत्र वगैरे मुळात मुद्दा नाहीच... मुद्दा स्पष्ट आहे. ज्या बैठीकीबाबत बोलले जात आहे, त्या बैठकीत सिबल साहेबांनी सोनिया गांधींचा कुठलातरी आक्षेपार्ह्य फोटो दाखवला आणि असे फोटो / वक्तव्य काढण्याची मागणी केली. त्यासोबतच सिबल - चिदंबरम - तिवारी - दिग्विजय या कॉंग्रेस प्रभूतींची फेसबुक / ओर्कुट / ट्विटर वर बरीच टिंगल टवाळी झाली आहे (अण्णांच्या आंदोलनानंतर). 'High Command ' आणि वैयक्तिक बदला घेणे चालू आहे...
ह्याच सिबलांना इतर कोणीही व्यक्ती किंवा आदरस्थाने दिसली नाहीत, आक्षेपार्ह्य फोटोच दाखवायचे होते तर सोनिया गांधींचाच फोटो कसा आठवतो.. आता उगाच धार्मिक, नैतिक करणे पुढे केली जात आहेत.. याच संदर्भातला माझा ब्लोग --

http://abhishekchaudhari.blogspot.com/2011/12/chinese-sibal.हटमल

आयटी कायद्या संदर्भातील माहिती वाचण्याची उत्सुकता आहे.

शांतीसुधा, पूर्ण अनुमोदन.

कपिल सिब्बल मागे मॅडमच्या सांगण्यावरून टूजी स्कॅममध्ये झिरो लॉस झाला आहे असे म्हणाले होते. तेव्हा नेटवर लोकांनी त्यांची मस्त टिंगल केली होती. मग आता नेटच सेन्सॉर करूयात ही मड्ड्मची आयडिया यंदा त्यांनी बोलून दाखविली. त्यावर तर नेटवर लोकांनी त्यांची न भूतो न भविष्यति अशी टिंगल केली. ट्विटरवर तर लोक अक्षरशः पेटले होते. हा ट्विट चांगलाच प्रसिद्ध झाला होता - Kapil Sibbal's censorship bill to be called SOcial Networking Inspection Act(SONIA) Biggrin

एम जे अकबर ह्यांचा ह्या विषयावरील लेख - http://www.sunday-guardian.com/analysis/how-do-you-censor-a-teashop

सध्या कॉंग्रेसचे वाईट दिवस चालू आहेत. कोणी स्कॅमसाठी जेलची हवा खातोय, कोणी थपडा खातोय, कोणाची कार्टून्स नेटवर फिरतायेत, कोणाच्या बिन्डोक बोलण्यावर यथेच्छ टिंगल होत आहे..

वरची सगळी कार्टून्स लई भारी आहेत. Proud

भाजपा आणि काँग्रेस या पलिकडे जे कुणी असतील त्यांचा दृष्टीकोण काय आहे ?
>>
सॉरी, पण राजकीय हेतूने प्रणित असलेला हा निर्णय असल्याने प्रतिसादांमध्ये हेच येणार. त्याला इलाज नाही. तसेही ह्या विषयावर ह्या पलीकडे प्रतिसाद देण्यासारखे मायबोलीवर किंवा इतरत्रही काही घडलेले नाहीये. त्यामुळे ह्या विषयावर चर्चा होण्यासाठी ही योग्य वेळ नसावी.

Pages