घोळ घातला गेला

Submitted by विनायक.रानडे on 7 December, 2011 - 00:21

धर्म, समाज, जातपात ह्या लेखाचा हा पुढील भाग विचार पूर्वक नियोजन करून सनातन धर्माने घडवलेल्या समाजात घोळ घातला गेला त्याचेच दुष्परिणाम जन संख्या वाढी बरोबरीने वाढताना अनुभवतो आहोत. ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे. हे माझे मत मला मिळालेल्या अनुभांनी तयार झालेले आहे.

सत्तेचे विकेंद्रीकरण हे समाज बांधणी करण्या करता वेदकाळा पासून झालेले असावे. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे हा सल्ला आज सुचवण्याचा प्रयत्न होतो आहे पण प्रत्यक्षात घडत नाही, जर झाले तर अमाप संपत्ती लुटणे शक्य होणार नाही ही भिती आहे. ती भिती जनतेला समजू नये म्हणून अनाकलनीय मुद्दे पुढे आणून मुख्य मुद्दा बाजूला ठेवण्याचे सगळे प्रयत्न सुरु आहेत.

ह्या मानव समाजाचे दैनंदिन जीवन निरोगी व सुरळीत राहावे म्हणून कूळ व कुळाचाराची बांधणी झाली अ॑सावी हे ओघाने आलेच. दैनंदिन कामाची यादी तयार झाली, ती प्रत्येक कामे करणारा समूह म्हणजे कूळ असे मी समजलो आहे ज्याला आडनाव दिले गेले असावे. जसे कुळांच्या कामाचे संचालन करणारे कुळकर्णी झाले, राजे हे आडनाव समूहाचे नियंत्रण कारणार्‍या कुळाचे असावे. जमिनीचे मोजमाप करण्यात येणार्‍या माप दंडाला पांड म्हटले जात असे त्याचा उपयोग करणारे पांडे, गावाचे मोजमाप करणारे देशपांडे तर त्यांचे मुख्य सरदेशपांडे झाले. यज्ञ = प्रोजेक्ट त्याला लागणारी जागा, योग्य जागेचे संशोधन, त्या जागेला यज्ञस्थान बनवण्याकरता आवश्यक प्रक्रिया वगैरे काम करणारे रानडे असावेत. चौधरी, पाटील, चव्हाण वगैरे आडनाव कार्य संबंधित तयार झाले असावे. प्रत्येक व्यक्तीची ओळख दर्शक त्या गावात राहणार्‍या व्यक्तीला त्या गावातील वास्तव्य कर = हात ह्या अर्थाने भडकमकर, भांडारकर, चिपळूणकर, करंदीकर, गोवेकर, लळिंगकर, नागपूरकर, नगरकर, बडोदेकर अशा बर्‍याच हातांना आडनावे मिळाली असावीत. हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे, मी माझ्या क्षमतेनुसार हे समजलो आहे. अशा कुळांचे कुळाचार निश्चित झाले. अशा कुळात वावरणार्‍या व्यक्तीची कर्तव्ये व नियम निश्चित झाले.

चार वर्ण हे वैचारिक, शारीरिक पातळी व क्षमते ने ठरले असावे, तसे तर्काने जाणवते. हे आज आवश्यक आहेत की नाही ह्यात मला जायचे नाही तो माझा इथे विषय नाही. एका कुळात जन्माला येणे महत्त्वाचे नसून तो कुळाचार पाळणार्‍या व्यक्तीचा समावेश योग्य वर्णात करणे आवश्यक असावे. जातीचा ह्यात कोठेही संबंध नसावा, म्हणूनच त्या काळात जातीचे आरक्षण नसावे. आज झालेला घोळ हा वर्ण व्यवस्थेत मुद्दाम गोंधळ घातल्याने झाला आहे, लायकी नसताना फक्त प्रमाणपत्राच्या, आरक्षणाच्या आधारावर राज्य कारभारात, संरक्षण, अर्थ, आरोग्य, शिक्षण व्यवस्थेत व नोकरीत प्रवेश सुरु झाले. व्यवस्थेत असणार्‍या अनुभवी योग्य व्यक्तींना त्रास देणे, काढून टाकणे व त्या जागा भ्रष्ट व्यवस्थेतून आलेल्यांना देणे सुरु झाले व सुरु आहे. हा माझा अनुभव आहे.

समाज ज्या भूपटलावर जिवंत आहे त्या भूमीचा योग्य उपयोग करताना कदाचीत भूमीची नीती = भूमिती ह्या शस्त्राचे / अवजाराचे शास्त्र विकसित झाले.( भुमिती = भु मापन हा प्रचिलीत आहे.) त्यातून शेत त्या शेताची निती = शेती, शिवार = शेती करणार्‍या व्यक्तीच्या वहिवाटीला आवश्यक जागा. बर्‍याच शेत जमिनीचे एक खेडे, त्या खेड्यातील अनुभवी व्यक्तीला पंच = मॉनिटर, पंच समूहाचा सरपंच = अंपायर, विविध कामे करणा्र्‍या कुळांना राहण्याची जागा = एक गाव. अनेक गावांचा एक तालुका, अनेक तालुके एक जिल्हा, अनेक जिल्हे एक प्रदेश अशी व्यवस्था निश्चित झाली. ह्या प्रदेशाची सर्व प्रकारची जबाबदारी सांभाळणार्‍याला राजा ठरवले गेले. राजा हे पद सांभाळणारा सक्षम, नियम पाळणारा व मानव गुणधर्माचे पालन करणारा असावा असे निश्चित झाले. त्या राजाचे वैयक्तिक संस्कार, मानसिक संतुलन व मानव धर्म पालन करण्याच्या क्षमतेनुसार त्या प्रदेशाचे जन जीवन समृद्ध होत असे. आज प्रत्येक प्रदेशाचे मुख्यमंत्री हा तोच प्रकार आहे. त्यांचे कर्तृत्व हे त्यांच्या संस्कारांशी व मानसिकतेशी संबंधीत आहे. म्हणूनच काही प्रदेशांचे इतर प्रदेशांच्या तुलनेत कार्यक्रम जनतेच्या हिताचे झालेले / होत आहेत. राज्याच्या अहंकारी, आक्रमक मनोवृत्तीने दुसर्‍या प्रदेशावर आक्रमण घडत होते. दोन राज्यातील चढाओढ, अकार्यक्षम राज्य कारभार अशी पण कारणे होती. पण तरीही मानव धर्म पालनाचे संस्कार फार खोल रुजल्याने दोन राज्यात घडणारे युद्ध मानव धर्माचे नियम सांभाळून केलेले युद्ध होते. दोन धर्मातील युद्ध नव्हते.

सनातन धर्म पालन करणार्‍या भरत राजाच्या कार्यपद्धतीला सनातन धर्म पालन करणार्‍या इतर राज्यांनी मान्य केले व त्या प्रदेशांना भारतभूमी म्हणजेच भारत अशी मान्यता मिळाली असावी. सनातन धर्म संस्कारांमुळे भारत ही मातृभूमी ही संकल्पना मान्य झाली असावी. पृथ्वी वरील इतर प्रदेशांच्या राज्यांनी मानव धर्माचे नियम स्वार्थ साधण्या करता बदलले. त्यातून सनातन धर्मापासून वेगळे पंथ निर्माण झाले. ते प्रत्येक पंथ निर्माण करणार्‍या व्यक्तीला एक निर्माता, देवाचा दूत म्हणून मान्यता मिळाली. अशा नवनिर्माण पंथाचा सत्ता टिकवण्या करता उपयोग झाला व आज केला जात आहे. भोळ्या भाबड्या मानसिकतेचा फार चांगला उपयोग करून पंथचा व्यवसाय करण्यात बरेच यशस्वी झाले, होत आहेत. आहार व संस्कारांचा मानसिकतेवर परिणाम झाल्याने मोगल व अरब राज्यकर्ते आक्रमक झाले. वाळवंटातून तंबूत राहणारे त्या प्रदेशातील अमीर, सुलतान मंडळींनी भोवतालच्या प्रदेशात आक्रमण करणे सुरु केले. इराणी जनतेवर झालेले अत्याचार, त्या संस्कृतीची चिरफाड, आदरणीय स्थानांना उध्वस्त करणे व कतलेआम ही एक सुरुवात होती. तोच प्रकार अफगाणिस्थानातून भारतात शिरताना ह्या अरबी / इराणी - मुसलमानांनी हिंदू कुश, हिंदूंची कतलेआम झालेल्या पर्वताला नाव दिले. भारतात असलेली अमाप निसर्ग व भौतिक संपत्ती लुटण्या करता अगणित प्रयत्न झाले. भारतातील सत्ता विकेंद्रित असल्याने संघटित ताकदीने विरोध झाला नाही. त्यातूनच ते आमचे राज्यकर्ते व आम्ही भारतीय त्यांचे गुलाम झालो. पण ह्या आक्रमकांना फक्त ऐशो-आराम व संपत्ती एवढेच महत्त्वाचे असल्याने त्यांनी सनातन धर्मव्यवस्था व समाज रचनेत फारसा गोंधळ घातला नाही. त्यांच्यातलाच अकबर सनातन धर्माचे महत्त्व समजू शकला. ह्या इराणी - मुसलमान आक्रमकांनी भारताचा हिंदुस्थान केला. गुलाम विरोध करण्यात असमर्थ ठरले. सनातन धर्म मान्यतेचे महत्त्व कमी होण्याला सुरुवात झाली.

पाश्चात्य देशातून येणार्‍या पर्यटक व व्यापार्‍यांनी ह्या नव्या घटनांचा फायदा घेत भारताचे इंडिया हे नाव व्यवहारात घुसवले. महाराष्ट्र, गुजराथ व दाक्षिणात्य बंदरातून ह्या पर्यटक व्यापार्‍यांना महत्त्व मिळण्यात व स्थानिक होण्यात बराच विरोध झाला. पण बंगाल मधून इंडियात ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने इंग्रज स्थायिक झाले. इंडियाच्या गुळाच्या ढेपीला फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज मुंगळ्यांनी पोखरणे सुरु झाले. त्यां तिघांत इंग्रज जास्त यशस्वी झाले. मान्य झालेल्या हिंदू व मुसलमान (महाराजे व सुलतान) यांच्यातील द्वेषाला खतपाणी देत इंग्रजी सत्तेत वाढ झाली. इंडियातील इंग्रजी सत्तेचा व्यवहार सांभाळायला इंग्रजी मनुष्यबळ फार कमी होते, ते कसे वाढवता येईल ह्या करता थॉमस मॅकॉलेने इंडियातील समाज रचनेचे बरेच संशोधन केले व त्यावर उपाय सुचवले, त्यामुळे तो पदवी धारक लॉर्ड थॉमस मॅकॉले झाला. सनातन धर्माच्या समाज रचनेत बदल घडवणारा हा घोळकर होता. हा घोळ घालण्या करता त्याने शिक्षण क्षेत्रालाच बदलून टाकले. इंग्रज सत्तेला मान्य असलेल्याच पद्धतीने शिकवलेल्या व्यक्तीला मान्यता मिळावी, नोकरी मिळावी असे नियम तयार केले ह्याचा हा पुरावा.

http://india_resource.tripod.com/britishedu.htm

Gandhi wrote in the "Harijan" that Indian education made Indian students foreigners in their own country. The Radhakrishnan Commission said in their Report (1950); "one of the serious complaints against the system of education which has prevailed in this country for over a century is that it neglected India's past, that it did not provide the Indian students with a knowledge of their own culture. It had produced in some cases the feeling that we are without roots, and what is worse, that our roots bind us to a world very different from that which surrounds us".

"In 1835, Thomas Macaulay articulated the goals of British colonial imperialism most succinctly: "We must do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern, a class of persons Indian in blood and colour, but English in taste, in opinions, words and intellect." As the architect of Colonial Britain's Educational Policy in India, Thomas Macaulay was to set the tone for what educated Indians were going to learn about themselves, their civilization, and their view of Britain and the world around them. An arch-racist, Thomas Macaulay had nothing but scornful disdain for Indian history and civilization."

गांधींनी "हरिजन" ह्या पुस्तकात लिहिले आहे, इंडियन विद्यार्थ्यांना इंडियन शिक्षण पद्धतीने परदेशीय बनवले आहे. डॉ. राधाकृष्णन कमेटिने सादर केलेल्या अहवालात (१९५०) सांगितले; "गेल्या शंभर वर्षात ह्या देशात मान्य असलेल्या शिक्षण पद्धती विरोधात सगळ्यात गंभीर तक्रार अशी आहे की, त्या शिक्षणाने भारतीय परंपरेला दुर्लक्षीत केले आहे, ह्या शिक्षण पद्धतीने इंडियन विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे ज्ञान उपलब्ध करून दिलेले नाही. ह्या शिक्षण पद्धतीने काही प्रमाणात असे समज निर्माण केले आहेत की, आपण बिन बुडाचे, मूळ नसलेले आहोत, आणि सगळ्यात जास्त वाईट काय आहे तर, आपल्या परंपरेने आपल्याला जगाशी जसे जोडले आहे त्यात फार परक आहे जसे भोवतालच्या जगाने आपल्याला जोडले आहे."

१८८५ सालात थॉमस मॅकॉलेने ब्रिटिश राजवटीचे इंडियात राज्य करण्याचे काय ध्येय असावे हे शब्दरूप केले होते, " आम्ही इंडियात एक प्रचारक जात निर्माण करण्याचे आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत, ही जात आपण राज्य करतो आहोत त्या समाजात आपली प्रचारक ठरेल, ह्या जातीच्या व्यक्ती रंगाने व रक्ताने इंडियन असाव्यात, पण आवड, मतप्रदर्शन, लिखाण व हुशारी ब्रिटिश असावी." इंडियातल्या ब्रिटिश राजवटीच्या शिक्षण पद्धतीचा थॉमस मॅकॉले शिल्पकार होता. शिकवलेले इंडियन म्हणून स्वत: विषयी काय शिकावे, त्यांच्या संस्कृती विषयी त्यांनी काय शिकावे, त्यांचे ब्रिटन व भोवतालच्या जगाविषयी काय विचार असावेत अशा शिक्षणाची सुरुवात थॉमस मॅकॉलेने केली. तो मुळातच कट्टर जातीयवादी होता, तो भारतीय इतिहास व संस्कृतीला अतिशय तुच्छ मानीत होता."

मी हे मला समजलेल्या मराठी भाषेतून लिहिले आहे. हे आजच्या पिढीचे दुर्भाग्य, त्यांना आजही ब्रिटिश गुलामगिरीत मान्य झालेले शिक्षण घ्यावे लागते आहे तरच त्यांना नोकरी मिळते. मुसलमानी राजवटीमुळे, आक्रमक, अमानुष अत्याचार ह्या प्रकारांनी नव्याने तयार झालेल्या व मान्य झालेल्या हिंदू धर्माचे जितके घाण प्रदर्शन जगा पुढे मांडता येईल त्याचा प्रयत्न ह्या मॅकॉले शिक्षण पद्धतीतून केला गेला व होत आहे.

आज सांगायला फार सोपे आहे की हे काम ब्राह्मणांनी केले. इंग्रजांना कमी वेळात इंडियन हस्तकांचा ताफा उभा करायचा होता त्यात चार ही वर्णातील व्यक्ती होत्या पण मुळातच अभ्यासू वृत्तीमुळे ब्राह्मण कुळातील तरुणांची संख्या जास्त असावी असे वाटते. तसेच इंग्रज राजवटीच्या विरोधात ब्राह्मण कुळातील तरुणांची संख्या पण जास्त असावी. कारण त्याच ब्राह्मण कुळातील तरुणांना त्या शिक्षण पद्धतीचा खरा डाव लवकर लक्षात आला होता. हे शिक्षण कसे होते ते पुढील भागात - शिक्षणाचा घोळ बघू या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तसेच इंग्रज राजवटीच्या विरोधात ब्राह्मण कुळातील तरुणांची संख्या पण जास्त असावी.

किती घोळ हो! बामनांची संख्या फक्त ३ %.. ते सगळेच्या सगळे जरी इंग्रजांच्या विरोधात होते असे म्हटले तरी ते भारताच्या एकून क्रांतीकारकांपेक्षा कमीच भरतील ना?

ह्या इराणी - मुसलमान आक्रमकांनी भारताचा हिंदुस्थान केला.

हेच आम्ही म्हटले तर भविष्यपुराणातला कुठला हिंदुस्तानम प्रवक्ष्यते का कुठला तरी श्लोक देऊन हिंदुस्तान हे नाव मुसलमानांपेक्षा जुने आहे, असे हिंदुत्ववादी कोकलत होते!

जागो मोहन प्यारे, जागो !!!

त्यांच्या लेखाचा उद्देश काय आहे, त्याचा अर्थ काय आहे (किंवा तो किती अर्थहीन आहे) हे समजून घे आणि त्यानुसार प्रतिक्रिया दे ना भावा.
उगाच लेखात 'ब्राम्हण' शब्द शोधायचा आणि बामन, बामन म्हणून ओरडत बसायचे याला काय अर्थ आहे?
तुझ्या ह्या आचरटपणामुळे प्रत्येक लेखावर सविस्तर चर्चा न होता फक्त जातीय वाद निर्माण होत आहेत. (किंबहुना तोच तुझा उद्देश असावा असे वाटते. तसेच 'भावा' म्हणाल्यामुळे तुझा एकेरी उल्लेख केला आहे, खटकल्यास बदलून टाकेन.)

बाकी रानडे साहेबांच्या लेखनाशी संपूर्ण असहमत, वेळेच्या कमतरतेमुळे संध्याकाळी सविस्तर प्रतिक्रिया देईन. माफी असावी.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रबोधनकार हे केवळ उपनाम असून थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरेंशी सार्धम्य दाखवण्याचा कोणताही हेतू नाही.

एक गोष्ट चांगली आहे की लेखक स्वतःच स्पष्ट करत आहेत की 'असे मला वाटते' त्यामुळे ती त्यांची वैयक्तिक विचारप्रणाली असू शकते, परंतु ती एका संस्थळावर प्रसिद्ध झाल्यामुळे त्याचा नवोदित वाचकावर विपरीत परिणाम होऊ शकतो .
तो टाळण्यासाठी त्यातील काही मुद्द्यांचा समाचार घेणे आवश्यक वाटते.

वर्ण, कुळ आणि जात हे शब्द अत्यंत फसवे आहेत, त्यांचे प्रत्यक्ष अर्थ काहीही निघत असले तरी त्यातून एकच अर्थ ध्वनित होतो, तो म्हणजे समाजात जन्माच्या आधारावर किंवा व्यवसायाच्या आधारावर वर्गीकरण करणे.
ह्या वर्गीकरणापर्यंत देखील समजू शकतो, त्याहीपुढे जाऊन एक वर्ण श्रेष्ठ आणि दुसरे त्याहून कनिष्ठ हा घोळ कुणी घातला ?
आताच्या राज्यकर्त्यांनी तरी नक्कीच नाही !
हा घोळ तत्कालीन शिक्षित समाज जो प्रामुख्याने जन्माने शिक्षणाचा (वेद, शस्त्र इ.) अधिकार मिळालेल्या वर्णातील होता ( उदा. ब्राम्हण, क्षत्रिय ) यांनीच घातला आणि वर्षानुवर्षे तो चालूच राहिला कारण उर्वरित जनता शिक्षण, सामाजिक हक्क, स्वातंत्र्य याबाबत पूर्णपणे अज्ञानी व उदासीन होती.
हे चित्र फक्त आणि फक्त इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळेच बदलले. त्यामुळे इंग्रजी शिक्षणपद्धतीचे आपल्यावरती उपकारच आहेत.
विचार करा, या देशातील ८५ % जनता अजूनही अशिक्षित असती तर आपण आज जिथे आहोत तिथे पोहोचायला आपल्याला किती वेळ लागला असता ?

"इंडियन म्हणून स्वत: विषयी काय शिकावे, त्यांच्या संस्कृती विषयी त्यांनी काय शिकावे, त्यांचे ब्रिटन व भोवतालच्या जगाविषयी काय विचार असावेत अशा शिक्षणाची सुरुवात थॉमस मॅकॉलेने केली. तो मुळातच कट्टर जातीयवादी होता"

हेच वाक्य 'थॉमस मॅकॉले' च्या ऐवजी 'आदी शंकराचार्य' आणि 'ब्रिटन' च्या ऐवजी 'सनातन धर्म' असे टाकले तरी अर्थ तोच राहतो. निदान मॅकॉलेने 'सर्व' एतद्देशीय लोकांच्या शिक्षणाची सुरवात तरी केली.

"पण तरीही मानव धर्म पालनाचे संस्कार फार खोल रुजल्याने दोन राज्यात घडणारे युद्ध मानव धर्माचे नियम सांभाळून केलेले युद्ध होते."
म्हणजे काय हो ? उशांनी मारामारी करायचे का हे लोक ?
युद्ध हे युद्धच असते आणि मनुष्य हत्या ही अनिर्वाय असते, तेव्हा ही मनुष्य हत्या मानव धर्माला अनुसरून झाली असे म्हणायचे काय ?

"मुसलमानी राजवटीमुळे, आक्रमक, अमानुष अत्याचार ह्या प्रकारांनी नव्याने तयार झालेल्या व मान्य झालेल्या हिंदू धर्माचे जितके घाण प्रदर्शन जगा पुढे मांडता येईल त्याचा प्रयत्न ह्या मॅकॉले शिक्षण पद्धतीतून केला गेला व होत आहे."

बिल्कुल नाही !!!
हिंदू धर्म व त्यातील वाईट मान्यता मुसलमानी अत्याचारातून निर्माण झाला आणि त्याचे प्रदर्शन ब्रिटीशांनी केल्यामुळेच हिंदू बदनाम झाले असे म्हणणे म्हणजे वाईट मार्गाला लागलेल्या पोराला आणखी खड्ड्यात ढकलण्यासारखे आहे.

आज सांगायला फार सोपे आहे की हे काम ब्राह्मणांनी केले.
याच्याशी सहमत आहे, आणि असे सांगण्यारांचा धिक्कारच केला पाहिजे.

परंतु पुढच्याच वाक्यावर तुम्ही गोत्यात आलात
त्यात चार ही वर्णातील व्यक्ती होत्या पण मुळातच अभ्यासू वृत्तीमुळे ब्राह्मण कुळातील तरुणांची संख्या जास्त असावी असे वाटते.

फक्त ब्राम्हण तरुणांचीच वृत्ती मुळातून अभ्यासू होती असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?
तशी ती असेल तर त्याचा उपयोग निव्वळ पाठांतर आणि द्वैत, अद्वैत यापलीकडे काही शास्त्रीय संशोधनासाठी का नाही झाला?
जागतिक स्तरावरचे सर्व ख्यातनाम भारतीय शास्त्रज्ञ (गणिततज्ञ नव्हे, पदार्थविज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन वगैरे शाखांमध्ये संशोधन करणारे ) हे इंग्रजी शिक्षण पद्धतीतूनच निर्माण झाले आहेत, वेद पाठ करून नाही.

तुमच्या पुढच्या लिखाणाची वाट पाहत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रबोधनकार हे केवळ उपनाम असून थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरेंशी सार्धम्य दाखवण्याचा कोणताही हेतू नाही.

थॉमस मॅकॉलेने केली. तो मुळातच कट्टर जातीयवादी होता"

सगळ्या जाती धर्मांसाठी ज्याने शिक्षण चालू केले तो मेकॉले जातीयवादी कसा? आणि जन्म, कर्म, गुणकर्म सगळे घोळ घालून चार वर्ण पाडून सर्वाणा शिक्षन न देनारे बामण मात्र सोज्ज्वळ कसे?

इंग्रजानी भारतीय संस्कृतीचे पालन केले नाही म्हणे! मग ते काय इंग्लंडचा भुगोल, इंग्ल्डाच्या राणीची वंशावळ इतिहासात शिकवत होते का? संस्कृत, भाषा, गणित, भुमिती, विज्ञान याच्याऐवजी वैदिक गणित, उपनिषद आणि रामायण शिकवायला हवे होते का? ग्रँट मेडिकल कॉलेज इंग्रजानी १९३८ साली प्लॅन केले आणि १९४५ साली सुरु केले. भारतात येणार्‍या साथींविरुद्ध भारतात अ‍ॅलोपथीची सोय व्हावी म्हणून.

<strong>आज सांगायला फार सोपे आहे की हे काम ब्राह्मणांनी केले.
याच्याशी सहमत आहे, आणि असे सांगण्यारांचा धिक्कारच केला पाहिजे.

मला मुळातच 'हे काम ब्राह्मणांनी केले.' यात कुठले काम केले असे म्हणायचे आहे, तेच कळले नाही? कारण बर्‍याच कुणि कुणि बरेच काही काही केले असे लेखात लिहीले आहे, त्यातले फक्त मेकॉले ने काय केले ते समजले.

'हे काम ब्राह्मणांनी केले' असे सांगणार्‍यांचा धि:कार की ब्राह्मणांनी जे काय केले त्याचा धि:कार?
का आपला एक जनरल धि:कार? म्हणजे कळायला नको आपले मत नक्की काय आहे!!

आता मला कळले नाही तरी उगाच काहीच्या काही लिहीता आले असते मला, पुष्कळ लोक इथे तसेच करतात. मी पण तसाच.

माझ्या मते भारत देश, हिंदू धर्म, भारतीय समाज हा सगळा एक प्रचंड घोळ आहे.
कारण मला त्यातले काही कळत नाही!
अमेरिकेत बरे - पैसा, फक्त पैसा. बाकी काही नाही!

जन्माने कोणीही काहीही असो, शेवटी स्वार्थ हेच जातींचे सर्व काळामध्ये एकसमयावेच्छेदक लक्षण आहे. मागच्या चुका मान्य करूनही आपण सध्या त्याच चुका तर परत नाही करत आहोत?

For India's Lowest Castes, Path Forward Is 'Backward'

http://online.wsj.com/article/SB1000142405297020490380457708070000668451...

यज्ञ = प्रोजेक्ट त्याला लागणारी जागा, योग्य जागेचे संशोधन, त्या जागेला यज्ञस्थान बनवण्याकरता आवश्यक प्रक्रिया वगैरे काम करणारे रानडे असावेत

रा-न-डे... आणि य-ज्ञ-भू-मी... कसा काय संबंध जोडलात हो? Proud

ज्या काळात यज्ञ होते त्या काळात रानडे, लेले असली आडनावं नव्हती..

आणि ज्या काळात असली आडनावं आली त्या काळात यज्ञ पद्धती संपलेली होती. Proud