शरद पवार यांच्यावर हल्ला

Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2011 - 03:48

आत्ताच टीव्हीवर स्टार माझा या वाहिनीने एका शीख तरुणाने केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांना एक थप्पड लावल्याचे व एक लहानसे शस्त्र काढून धमकी दिल्याचे दृष्य पाहायला मिळाले. प्रमोद देव काका यांनी हे प्रथम पाहिल्यानंतर हे समजले व टीव्हीवर पाहिले.

हवालदिल झालेले पवारसाहेब निघून चालले होते व त्या प्रकारावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते याचे आश्चर्य वाटले. अर्थातच, ते तरी अचानक काय करणार म्हणा!

१. सुरक्षा व्यवस्था बोंबलल्याचे लक्षण

२. शरद पवार यांच्याबद्दल रोष आहे.

३. सामान्य नागरीक या पातळीला उतरत आहेत. (हे त्याने वाढत्या महागाईमुळे केले असे समजते)

४. त्या शीख तरुणाला काबूत आणणार्‍यांपैकी एक जण किंचित हासत होता आणि इतर जण जरा कॅज्युअलच वाटत होते.

याच तरुणाने पुर्वीही एका मंत्र्यावर असाच हल्ला केला होता.

वरील चार मुद्यांबाबत आपल्याला काय वाटते? धक्कादायक प्रकार म्हणून धागा काढावासा वाटला. असा धागा चुकीचा असल्यास अप्रकाशित करेन.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी हो ग. वादातीत म्हणजे अजिबात कुठलेही वाद-प्रवाद नाहीत असे. >>> हाच मला अपेक्षित अर्थ. आठव कुठे तरी वाचलेय का - की पवार साहेब, यांचे नाव अमुक तमुक घोटाळ्यात आले? अम्म्म्म्म्म्म्ह. कुठेहि नाही ना.

म्हणुन म्हटले हिच तर खासियत आहे. Happy

पवार साहेबांचे नांव घोटाळ्यात नाही आले? >>>> Sad
मला तरी नाही आठवत हो. म्हणुन जास्तच वाईट वाटते :प

रच्याकने, सर्व बंद होत आहे असे कळते. राष्ट्रवादी वाले फिरत आहेत. पण ऑफिसवाले आजाबात फिरु देत नाहीयेत. सोडायचे नाव नाही. Sad

>>>> पण पवारांची कारकिर्द कधीही वादातीत नव्हती. <<<<
दिनेशभाऊन्चे हे वाक्य अचूक आहे.
वादातीत नव्हती याचाच अर्थ वादग्रस्त होती.
वादग्रस्त होती असे डायरेक्ट म्हणण्याऐवजी वादातित नव्हती असे सौम्यपणे म्हणणे सोईचे जाते.
असो.

अण्णा हजर्‍यांच्या उपोषणाच्या वेळेस पवार कुटुंबियांना कोणीही विचारत नव्हते. तेव्हापासून प्रसिद्धीची उपासमार चालू आहे. आता अगदी सहन होईनाशी झालेली दिसतेय. अन्यथा एका माजी मंत्र्याला मारणारा माणूस परत दुसर्‍या आजी मंत्र्याजवळ पोहोचतोच कसा? वाहिनीवंतांनी कोणाच्या स्तुतीची कवने गावयास सुरुवात केलीये त्यावरून सहज अंदाज बांधता येतो, नाही?

हे.मा.वै. म.

आ.न.,
-गा.पै.

म्हणण्याऐवजी वादातित नव्हती असे सौम्यपणे म्हणणे सोईचे जाते.>>> मला वाटते आता मी पण गोंधळणार. असो.

अण्णा हजर्‍यांच्या उपोषणाच्या वेळेस पवार कुटुंबियांना कोणीही विचारत नव्हते. तेव्हापासून प्रसिद्धीची उपासमार चालू आहे. आता अगदी सहन होईनाशी झालेली दिसतेय. अन्यथा एका माजी मंत्र्याला मारणारा माणूस परत दुसर्‍या आजी मंत्र्याजवळ पोहोचतोच कसा? वाहिनीवंतांनी कोणाच्या स्तुतीची कवने गावयास सुरुवात केलीये त्यावरून सहज अंदाज बांधता येतो, नाही?>>> तथ्य आहे. हे लोक व यांचे विरोधिही काय करतील भरवसा नाही.

खुप चांगला प्रकार आहे...
कमीत कमी आता तरी सगळ्या राजकारण्यांना जाग येईल की सामान्य मानसाची प्रतीक्रीया काय असते ती....
मध्यमवर्गीय पार भरडुन गेला आहे महागाई आणी भ्रष्टाचारामुळे
मी म्हणतो सगळ्याच राजकीय नेत्यांना अस एकदा तरी व्हायला पाहीजे

मला तरी एकूण सगळेच लोक...सामान्य आणि राजकारणीही... खुश झालेले दिसताहेत..कॅमेर्‍यासमोर प्रतिक्रिया काहीही देवोत...कृषीमंत्री म्हणून पवारांनी काय दिवे लावलेत हे सगळ्यांनाच..विशेषत: महाराष्ट्रातल्या (आत्महत्त्या केलेल्या शेतकर्‍यांसहित) शेतकर्‍यांना पूर्णपणे माहीत आहेच...मारण्याचं जरी समर्थन होत नसलं तरी सामान्य माणूस शेवटी अगतिकतेने असं काही अतिरेकी कृत्त्य नक्कीच करू शकतो..निदान ह्याची भिती बाळगून तरी नेत्यांनी आता आपलं राजकारण आणि पैसा खाणं बंद करून थोडंफार समाजकारण केल्यास ते त्यांनाच फायदेशीर ठरू शकेल...एरवी असेच वागत राहिले तर मग ह्या भडकलेल्या माथ्यांना कुणी रोखू शकणार नाहीये >>>

सहमत देवकाका.

त्या पवारांना मारल्यामुळे आता महाराष्ट्रभर बंद म्हणे. का काय कारण? राष्ट्रवादी टोक गाठतेय. सामान्य लोकांवर दुकाने बंद करा, घरीच बसा असे म्हणणारे हे कोण?

त्या मारण्यापेक्षाही ह्या कृतीचा निषेध.

अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया होती ...
(अण्णाजी , शरद पवारको दिल्लीमे किसीने चांटा मारा..)

अण्णा:- एकही मारा क्या?
(पहा- आज तक.)

नन्तर आपले धोतर जागेवर राहणार नाही असे लक्षात आल्याने नेहमीचे गांधीवादाचे दळण त्यानी चालू केले. कारण कालच दारू पिणार्‍याना विजेच्या खाम्बाला बांधून बदडले पाहिजे या त्यांच्या वाक्यावर त्याना सर्वच स्तरातून 'झाडण्यात' आले होते. टीम अण्णाच काय पण खुद्द अण्णाही बालीश वक्तव्ये कर्ण्यात मागे नाहीत आणि हे म्हणे राष्ट्राला नवे नेतृत्व देणार....

1) hallaa karaNaaryaachaa nishesh

2) mahagaI vaaDhavaNaaryaaMchaa nishedh

3) aaNi varil don pratikriyaaMchaa joradaar nishedh !!

मला तर चूक वाटत नाही काहीच त्यात. देशात अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे काही वर्षानी. लोकांचा असंतोष अशा पद्धतीने बाहेर येतो आहे.

पण दिल्ली पवारांना सरदार तरुणाने मारलं त्यात महाराष्ट्रातील जनतेचा काय दोष?
मग इथे तोडफोड का?
महाराष्ट्रातील नेत्याला मारुन परत महाराष्ट्राच नुकसान का?

वादातीत नव्हती, म्हणजेच वादग्रस्त होती.
आपण सगळे लहानपणापासून त्यांना बघतोय, फार काही मोठी कामगिरी केल्याचे आठवतेय का ?
एका ठराविक पातळीवरच रेंगाळत राहिले. देशपातळीवर भरीव असे काही नाही.

पवारांवरील हल्ला हे काही योग्य नाही..ते चुकीचेच आहे पण.. त्यामुळे मला वाईट वगैरे वाटले नाही.
आणि त्यामुळे पवाराना काही फरक पडणार नाही. फरक पडणार आहे ते उद्या होणार्‍या बंदमुळे ज्याना रोजची कमाई दिवसाला मिळते त्याना..किंवा दुकाने उघडी राहिल्याने ज्यांच्या दुकानाची मोडतोड होणार आहे त्याना..

आणि या घटनेमुळे राजकारण्याना काही बोध वगैरे होइल अशी आशा करणार्‍यांसाठी:
राजकारणात असलेल्या व्यक्तींची कातडी गेंड्याची असते.. या एका हलक्या थपडेने काही होते का? Happy

सुजा Lol

शरद पवारंवरील हल्ल्याचे समर्थ होऊ शकत नाही. मला स्वतःला वाईटच वाटलं. आता या घटनेचं राजकिय भांडवल होईल यात शंका नाही.

मूळ मुद्दे महागाई, भ्रष्टाचार आणि लोकपाल हे मुद्दे झाकले जातील. शरद पवार केंद्रात मंत्री आहेत. केंद्रात आणि दिल्लीत काँग्रेसचं सरकार आहे तेव्हा कारवाई होईलच. त्यावर जरूरीपेक्षा जास्त चर्चा झाल्याने संसदेतला गोंधळ, सरकारचं अपयश आणि विरोधी पक्षांचा बेजबाबदारपणा यावरचा फोकस एका क्षुल्लक घटनेवर केंद्रीत होतो आहे हे मेडीयाला कळत नसेल असं कसं होईल ?

अर्थात ३२ रू मिळवणारा मनुष्य दरिद्री असू शकत नाही असा निष्कर्ष काढणारे नियोजनकर्ते असल्यावर त्यांचे इश्युज आणि जनतेचे इश्युज यांत महदांतर असणारच यात शंका नाही.

राजकारणात असलेल्या व्यक्तींची कातडी गेंड्याची असते.. या एका हलक्या थपडेने काही होते का?
----- चिदंबरम यांच्या कडे भिरकावलेल्या बुटामुळेच सज्जन कुमार आणि टयटलर यांना लोकसभेचे तिकीट देण्याचा बेत रद्द करण्यात आला होता.

http://election.rediff.com/report/2009/apr/09/loksabhapoll-i-am-victimis...

टायटलर, सज्जन कुमार, आणि भगत आदींनी, १९८४ मधे गुंड लोकांचे नेतृत्व करत हजारो निरपराध शिखांची दिल्ली मधे हत्या केली होती. त्याकार्याबद्दल त्यांना अनेकवेळा केंद्रात मंत्रीपदे, खासदार पदे बक्षीसे म्हणुन मिळाली होती. जे काम अनेक विनवण्या, लेख, वर्तमान पत्राचे रकाने भरुनही २५ वर्षात झाले नाही, ते काम केवळ (चिदंबरमना) एक जोडा मारल्याने झाले... काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी १९८४ च्या त्यांच्या कामाची २००९ मधे दखल घेतली आणि त्यांना खासदारपदा साठी उमेदवारी नाकारली.

निषेध !

लोकप्रतिनिधींवर हात उचलणार्‍या त्या माथेफिरूचा निषेध.
आपले म्हणणे मांडण्याची ही पद्धत अतिशय सवंग आणि घृणास्पद आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नसते, पण काळ सोकावतो अशाने. उद्या अशा घटनांनाही शहाणेसुरते लोक कौतुकाच्या नजरेने पाहू लागले (जसे इथे काही पाहात आहेत) तर देशात अराजक यायला वेळ लागणार नाही. उद्याची महासत्ता म्हणून जिच्याकडे आशेने पाहिले जाते, अशा देशाला हे प्रकार शोभा देत नाहीत.

(यानिमित्ताने बंद, जाळपोळ, तोडफोड करून वातावरण तापवणार्‍या समाजकंटकांचाही निषेध !)

शहाणेसुरते लोक कौतुकाच्या नजरेने पाहू लागले (जसे इथे काही पाहात आहेत)

>>>>
इथे शहाणे सुरते लोक आहेत? हाहाहा...

हल्ल्याचा निषेध!

खुद्द शरद पवारांनीच "लोकांना त्रास होईल असे काही करू नका, रस्ता रोको, बंद वगैरे करू नका" ई. सांगितले तरी सर्व गावांत आणि शहरांत बंद घोषित करायची स्पर्धा लागली आहे. पुण्यात तर महापौरांनीच आवाहन केले आहे

शरद पवारांचे राजकारण आणि एकूण व्यक्तिमत्व याबाबत मतमतांतरे असली तरीही त्यांच्यावरील हल्ल्याचे समर्थन होउ शकत नाही.... एकूणच त्यांचे वय बघता टिव्हीवरील ते दृश्य बघताना वाईट नक्कीच वाटले Sad
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया मात्र अतिशय संयत होती!

Pages