शरद पवार यांच्यावर हल्ला

Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2011 - 03:48

आत्ताच टीव्हीवर स्टार माझा या वाहिनीने एका शीख तरुणाने केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांना एक थप्पड लावल्याचे व एक लहानसे शस्त्र काढून धमकी दिल्याचे दृष्य पाहायला मिळाले. प्रमोद देव काका यांनी हे प्रथम पाहिल्यानंतर हे समजले व टीव्हीवर पाहिले.

हवालदिल झालेले पवारसाहेब निघून चालले होते व त्या प्रकारावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते याचे आश्चर्य वाटले. अर्थातच, ते तरी अचानक काय करणार म्हणा!

१. सुरक्षा व्यवस्था बोंबलल्याचे लक्षण

२. शरद पवार यांच्याबद्दल रोष आहे.

३. सामान्य नागरीक या पातळीला उतरत आहेत. (हे त्याने वाढत्या महागाईमुळे केले असे समजते)

४. त्या शीख तरुणाला काबूत आणणार्‍यांपैकी एक जण किंचित हासत होता आणि इतर जण जरा कॅज्युअलच वाटत होते.

याच तरुणाने पुर्वीही एका मंत्र्यावर असाच हल्ला केला होता.

वरील चार मुद्यांबाबत आपल्याला काय वाटते? धक्कादायक प्रकार म्हणून धागा काढावासा वाटला. असा धागा चुकीचा असल्यास अप्रकाशित करेन.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरद पवार यांना आज दिल्ली महापालिकेच्या आवारात एका शीखाने तोंडावर फटका मारल्याची चित्रे वारंवार दाखवत आहेत. याच व्यक्तीने मागील आठवड्यात सुखरामलाही मारले होते. शरद पवारांना मारल्याचे बघून वाईट वाटले. त्यांची व त्यांच्या पक्षाची धोरणे फारशी पटत नसली तरी कोणत्याही परिस्थितीत हे कृत्य समर्थनीय नाही. या हल्ल्याचा व या व्यक्तीचा निषेध.

पवारसाहेबांची प्रतिक्रीया व्यकत करण्याची पद्धत त्या बिचार्‍या तरूणाला ठाऊक नसावी बहुधा Wink

तेलगी वगैरे प्रकरणे त्याला माहित नाहीत असे दिसते Lol

faar chuki che aahe...

काय? त्या तरुणाचे वागणे की पवारांचे वागणे?

बेफिकीर ह्यांची ही पोस्ट वाचल्यावर मी जाऊन बातम्या पाहिल्या.
खरोखरच हा अतिशय निंदनीय प्रकार आहे.

faar chuki che aahe...?
दोन्ही.. Happy

हम्म्म्म्म्म चुकिचे आहे पण, चुकिचे असले तरी मला वाटते हे असे होणे -

१तर आता अपेक्षित असायला हवे ईतका सर्वच नेत्यांचा नालायकपणा वाढला आहे.

दुसरे म्हणजे या अशा प्रसंगातुन तरी त्यांना कळेल की असे अनपेक्षीत हल्ले होतात. नाहितर सामान्य जनता जी मरते त्याला हे व यांचे मित्र पक्ष चक्क - बडे बडे देशो मे असे म्हणुन मोकळे होतात.

नुसतंच निंदनीय आहे ते काय? त्या तरूणाचं त्यांना असं मारणं की पवारांचं वागणं?
माझ्यामते, त्या तरूणाला समाजाचं प्रतिकात्मक रूप मानलं तर... या घटनेतून पवारांनी योग्य तो बोध घेऊन आपला राजकारणातला अवतार संपवावा. कारण त्या समाजाला या पातळीपर्यंत नेण्यास सर्वस्वी ते स्वत: कारणीभूत आहेत.

मी काही हा थप्पड वगैरे प्रकार पाहिलेला नाही. लज्जास्पद आहे यात वाद नाही.. पण जनतेला दाद दिली नाही तर जनता कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते हे सर्व राजकारण्यांनी ध्यानात घ्यायला हरकत नाही.

मी त्या तरूणाच्या वागण्याचं समर्थन करत नाही, इतक्या वयस्कर आणी अनुभवसमृद्ध माणसाला हजारो लोकांसमोर श्रीमुखात भडकवणं हे योग्य नव्हेच. कारण त्यांनी सर्वच गोष्टी वाईट केल्या असं नाही. पण ज्या चांगल्या केल्या त्या फक्त जनतेपर्यंत पोचल्या नाहीत फार.. Sad

मास्तुरे व विजय यान्ना अनुमोदन
ज्येष्ठ, अनुभवसम्पन्न शरद पवार यान्ना झालेल्या मारहाणीचा मी नि:सन्देह निषेध करतो.

यात काही धक्कादायक वगैरे मात्र वाटले नाही, निदान तोन्डाला काळे डाम्बर/शाई वगैरे फासण्यापेक्षा बरे.
पूर्वीही असन्ख्य सरकारी अधिकार्‍यान्च्या तोन्डाला काळे फासले गेले आहे, मारझोड झाली आहे, पण त्यातुन काही फारसे नि:ष्पन्न झाले नाहीये. आताही काही होईल असे नाही.
मारणारी व्यक्ती कुणाच्या "पेरोल" वर आहे का, यावरही बरेच अवलम्बुन आहे.
मात्र या घटनेने एक अधोरेखित होतय, की दिल्लीच्या दळभद्री घाणेरड्या राजकारणात, (महाराष्ट्रीय) साहेबान्ना बळीचा बकरा बनविले जातय, मग तो शेतीमालाच्या भावाचा प्रश्न असो की कर्जमाफिचा. केन्द्रातील सत्तेची सूत्रे ज्यान्च्या हाती आहेत ते साहेबान्विरुद्धचे वातावरण सूप्तपणे पेटविण्यात यशस्वी ठरले आहेत, अगदी विरोधी आघाडीपेक्षाही कितीतरी जास्त, हे नक्की होते. आता ज्या कारणाने आपली वेगळी चूल मान्डली ते कारण बाजुला ठेऊन त्यान्च्या मान्डीला मान्डि लावुन बसणे किती काळ योग्य मानतात साहेब, त्यावर त्यान्च्या पक्षाची गत काय ते निश्चित होईल.
वर "महाराष्ट्रीय" हा शब्द मुद्दामच कंसात लिहीला, कारण नुस्ते आम्ही महाराष्ट्रीय म्हणून उपयोग नाहीये हो. कारण यांच्या पक्षाचे महाराष्ट्रीयपण केवळ अन केवळ, याला नैतर त्याला हाताशी धरुन, येनेकेनप्रकारेण "बामणे" झोडपण्यात वाया चालले आहे.
दूसरा प्रश्न असा की राज ठाकरेला त्याच्या परप्रान्तियान्बद्दलच्या धोरणाबद्दल नावे ठेवताना, हे परप्रान्तिय त्यान्ना मतान्करता भरघोस थोमाळून देखिल प्रत्यक्षात काय करताहेत / करु इच्छितात, त्याचा ठोस पुरावाच समोर आलाय. निदान या घटनेने तरी साहेब अन त्यान्च्या अनुयायान्ना थोडेफार शहाणपण वेळीच सुचले तर महाराष्ट्रियान्वर उपकार होतिल.
मिडिया मात्र "अन्गात संचारल्याप्रमाणे" आज दिवसभर तेच ते दळण दळत बसेल. खरतर या मिडियाच्या कानाखाली कोणीतरी चढवली पाहिजे.

एका वयोवृद्ध माणसाला असे मारणे, हे चूकच आहे.
पण पवारांची कारकिर्द कधीही वादातीत नव्हती. आणि वर जसे अनेक जण म्हणताहेत, नेत्यांची करतूद बघता, असे होणे आता अपरिहार्य आहे.

बहुधा राजसाहेब आता खालील स्टॅन्ड घेतील.

'यात राजकारणाचा काही एक संबंध नाही. महाराष्ट्राच्या या नेत्यावर झालेला हा हल्ला टीकेस पात्र व लांच्छनास्पदच आहे. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो'

मला वाटते हल्ला चूक होताच, पण कोणतेच राजकारणी आता सामान्य माणसाला पटत नाहीत असेही वाटते.

एक व्यक्ती नेत्याला मारते त्याचा सार्वत्रिक निषेध होतो आणि सरकार न्याय्य मार्गाने आंदोलन करणार्‍या लोकांना बदडते... त्याचे समर्थन करते...हा कोणता न्याय आहे?...इति बाबा रामदेव
मुलायमसिंग म्हणताहेत...लोक भुके मरताहेत..त्यामुळे अशा घटना घडणारच..सरकारने महागाई नियंत्रणात आणायलाच हवी. Happy

मला तरी एकूण सगळेच लोक...सामान्य आणि राजकारणीही... खुश झालेले दिसताहेत..कॅमेर्‍यासमोर प्रतिक्रिया काहीही देवोत...कृषीमंत्री म्हणून पवारांनी काय दिवे लावलेत हे सगळ्यांनाच..विशेषत: महाराष्ट्रातल्या (आत्महत्त्या केलेल्या शेतकर्‍यांसहित) शेतकर्‍यांना पूर्णपणे माहीत आहेच...मारण्याचं जरी समर्थन होत नसलं तरी सामान्य माणूस शेवटी अगतिकतेने असं काही अतिरेकी कृत्त्य नक्कीच करू शकतो..निदान ह्याची भिती बाळगून तरी नेत्यांनी आता आपलं राजकारण आणि पैसा खाणं बंद करून थोडंफार समाजकारण केल्यास ते त्यांनाच फायदेशीर ठरू शकेल...एरवी असेच वागत राहिले तर मग ह्या भडकलेल्या माथ्यांना कुणी रोखू शकणार नाहीये.

मिडिया मात्र "अन्गात संचारल्याप्रमाणे" आज दिवसभर तेच ते दळण दळत बसेल. खरतर या मिडियाच्या कानाखाली कोणीतरी चढवली पाहिजे.>>> लिंबूदांना प्रचंड अनुमोदन... पण माझ्यामते हे दृकश्राव्य मिडीयावाल्यांना लागू पडेल. मुद्रण माध्यमवाले अजून इतके भैसाटले नाहीयेत.

>>>> पण माझ्यामते हे दृकश्राव्य मिडीयावाल्यांना लागू पडेल. मुद्रण माध्यमवाले अजून इतके भैसाटले नाहीयेत. <<<<< अगदी बरोबर.

पण पवारांची कारकिर्द कधीही वादातीत नव्हती>>> हिच तर त्यांची खासियत आहे.

पण पवारांची कारकिर्द कधीही वादातीत नव्हती>>> तरिही स्विस अकाउंट आहे.

मला तरी एकूण सगळेच लोक...सामान्य आणि राजकारणीही... खुश झालेले दिसताहेत.>>> सहमत आहे.

भिती बाळगून तरी नेत्यांनी आता आपलं राजकारण आणि पैसा खाणं बंद करून थोडंफार समाजकारण केल्यास ते त्यांनाच फायदेशीर ठरू शकेल...एरवी असेच वागत राहिले तर मग ह्या भडकलेल्या माथ्यांना कुणी रोखू शकणार नाहीये....>>>>अगदी बरोबर....लवकरच ती वेळ येऊ शकते......

लिंबूपंत आणि दक्षिणा यांना अनुमोदन. झाले ते खूप वाईट झाले. पण लोकांची सहनशक्ती आता संपायला लागली आहे हे सर्वच राजकारण्यांनी लक्षात घेतले पाहिजे. नाहीतर असे प्रकार वाढीस लागतील. स्वतः लोकांच्या कराच्या पैशातून मिळवलेल्या बुलेटप्रूफ, वातानूकूलित गाडीतून हिंडताना काळी काच खाली करून, "अजून किती दिवस महाराष्ट्रात, पंजाबमध्ये जाऊन भीक मागणार?" असे प्रश्न विचारण्याचा व स्वतःची प्रसिद्धी करून घेण्याचा भंपकपणा थांबायला हवा.

मला तरी एकूण सगळेच लोक...सामान्य आणि राजकारणीही... खुश झालेले दिसताहे

अगदी खुश ! अफजलनं संसदेवर हल्ला केला तेंव्हाही पाच पन्नास नेते मरायला हवे होते, असंही अगदी अवर्जून वाटतं...

चला एक बरं की खुण तरं नाही केलाना>>>>>>>>> अहो त्याने स्टेट्मेंट दिली की त्याच्या कडे क्रिपन नव्हते....म्हणुन वाचला....... Happy

आम्ही गेला कित्येक वेळ तेच चावत आहोत हापिसात.... आत्ता मा.बो. वर आले तर इथेही तेच.
मला तर हे गोडसे -गांधि सारखेच वाटते.....
असंतोष आहे ह, फक्त तो प्रकट कसा करावा हे कळत नाही आहे लोकांना...
एकट्या पवारांना मारुन काय होणार.........
भुंगा, देश उबल रहा है..... !!>> १०० % मोदक

वादातीत म्हणजे अजिबात कुठलेही वाद-प्रवाद नाहीत असे. वादाच्या पलिकडे. उदाहरणार्थ पंडीत भीमसेन जोशी हे आपल्या शास्त्रीय गायनासाठी सुप्रसिद्ध होते.
याच्या विरूद्ध.
वादग्रस्त म्हणजे जिथे बरेच प्रश्न उपस्थित राहतात आणि बरेच वाद निर्माण होऊ शकतात ते. उदाहरणार्थ कुठलाही नेता घ्या.

दिनेश, तुम्हाला नक्की कुठला शब्द अपेक्षित आहे? वादातीत नव्हती म्हणजे वादग्रस्त होती असेच म्हणायचे आहे ना? हल्ली अनेकदा अनेक ठिकाणी वादातीत हा शब्दच वादग्रस्त या अर्थाने वापरताना वाचून अनेकदा नक्की काय म्हणायचंय ते मला कळेनासं झालंय म्हणून विचारलं. मोनालीप यांच्या प्रतिक्रियेनंतर माझा गोंधळ अजून वाढलाय म्हणून विचारतेय. बाकी काही नाही.

देशात वाढता वाढता वाढत चाललेल्या महागाईनं हवालदिल झालेल्या एका तरुणाच्या संतापाचा आज उद्रेक झाला आणि त्यानं राजधानी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या श्रीमुखात भडकवली>>>>>>

काही दिवसांपुर्वी यशवंत सिन्हांनी असेच काही वक्तव्य केलेले........ हा निव्वळ योगायोग की अजुन काही ????

वादातीत म्हणजे अजिबात कुठलेही वाद-प्रवाद नाहीत असे>>

यक्झॅक्टली

लय्यळा सहमत

वादातीत = ज्याबाबत काहीही वाद असू शकत नाहीत ते!

Happy

Pages