तो, ती आणि मैत्री...भाग३

Submitted by प्रज्ञासा on 21 November, 2011 - 01:48

" तू....तू खोटं बोललीस माझ्याशी..अमु...का...?? " अजयने रागाने हाताची मूठ अमुच्या डेस्क वर आपटली..

" अजय, कूल डाउन.. बाहेर common area मधे जाऊन कॉफी घेऊ या? चालेल का इकडे तमाशा नाही केला तर..?" अमु हळूच म्हणाली, आणि संगणक लॉक करुन निघाली..

around the coffee table -

" अजय, प्लिज गैरसमज करुन घेऊ नकोस.. मी खोटं कधीच नाही बोलत्...तुला माहीत आहे.. ! "
" अगं पण मग काल्..का म्हणालीस नाही येणार ऑफीसला असं?"
" अजय त्या मुलाने नकार दिला.. माझं पहिलं लग्न मोडलंय असं समजल्यावर.."
"बुल् शिट्"
"जाऊ दे ना.. जे होतं ते चांगल्यासाठीच.. नाहीतरी असल्या मागासलेल्या मुलाशी गाठ पडण्यापेक्षा तशीच राहिले जन्मभर तरी चालेल.."

" बरं जाऊ दे..संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे तुझा.. मला थोडी मदत करशील..शॉपिंग करायचीये फ्रेंड साठी..वेडींग गीफ्ट घ्यायचंय.. येशील?? " अजयने अमुच्या डोळ्यांत पहात विचारलं.. त्याला नकारच अपेक्षित होता..

"मी थोडी लवकर निघणार आहे आज.. काही विशेष काम नाहीये.. "

" मला पण नाहिये.. जाऊ यात ना लवकर.. Happy " अजय उद्गारला.
" अजय तू मॅनेजर आहेस ना रे... काम कसं नाही तुला?? " अमुने डोक्याला आठ्या देत विचारलंच..
" अगं, एक गम्मत सांगु का, मॅनेजर्स ना काही काम नसतंच मुळी.. आमचं काम फक्त इतकंच की बाकीच्यांनी कामं केलीत की नाही हे बघणं.. " अजय डोळे मिचकावत म्हणाला..
"ठरलं तर, ठीक ४ वाजता पार्किंगमधे वाट बघतोय मी तुझी.."

अमु फक्त हसली.. ती जाणुन चुकली होती की शॉपिंग हा तीचा वीक पॉइंट आहे आणि अजयलाही हे माहित आहे नाहीतरी रोजच्या कंटाळवाण्या शेड्युलमधुन तिला पण चेंज हवा होताच..

४ वाजता ...

सुबह होने ना दे शाम खोने ना दे
एक दुसरे को हम सोने ना दे
मै तेरा हीरो ओ ओ ओ ओ

" काहीही म्हण हं अमु..एक वेळ गाडीत पेट्रोल नसेल ना..तरी चालतं पण गाणी हवीतच बघ.. " अजय गालातल्या गालात हसत होता..
" अजय, असली टुकार आणि डबल मीनींग गाणी ऐकवलीस ना तर कोणी मुलगी जवळ सुद्धा भटकणार नाही रे..एक मैत्रीण म्हणुन सल्ला देते आपला.." अमुने सहजच बोलत खांदे उडवले.

अजयने एफ एम बंद केला . त्याच्या पथ्यावरच पडलं ते - कारण तीला बोलकं करण्याची एक तरी संधी त्याला हवीच होती.

"जाऊ दे गं.. मी वेडपट मुलींच्या मागे लागणार्‍यांपैकी नाहीये.. तुला माहितिये.. कोणि निंदा , कोणि वंदा , आमुचा आपला स्वहिताचा धंदा.. ... आणि कोणि नाही तर तू आहेस ना.. " अजयने अमुकडे पाहिलं

"ईईईईईई ..मी?? वेडा आहेस का.. " अमू वैतागत म्हणाली..

" ' ई' काय त्यात.. तू पण तशी बरी आहेस.. अगदी वाईट नाही दिसायचिस माझ्याबरोबर.. थोडी बुट्की दिसशिल, जाऊ दे आपण तुला उंच टाचांच्या चपला घेऊ.. "

" गप्प बस अजय मला असली मस्करी नाही आवडत." ती कशीबशी म्हणाली. " मॉल आलाय्..इकडेच करू या पार्किंग?"

अमूने अजयला पाहिजे तशी खरेदी करुन दिली.. तिने स्वतासाठी काहीच कसे घेतले नाही, ह्याचाच विचार अजय करत राहिला पूर्ण वेळ.

" अमू तुला घे ना काहीतरी.. मला नंतर पैसे दे हवे तर.. " अजय प्रामाणिकपणे म्हणाला. अमू शॉपिंगला आली आणि एकही ड्रेस नाही घेत हे काही त्याच्या पचनी पडे ना.

" नको अरे.. पैश्याचा प्रश्न नाहीये.. मला काही नकोच आहे मुळी."

" अमू तू ना... खरंच खूप बदलली आहेस. जाऊ दे.. चला जाऊ या."

" अमू चल ना काहीतरी खाऊ या.. भूक लागलिये गं.. कॉफी तरी पाज ह्या गरीबाला.."

"भूक नाहीये मला..आणि मूड पण.. घरीच जाऊ यात ना.. चल आमच्या घरी..मस्त कॉफी बनवते.."

"अमू तू च घरी चल ना माझ्या... ती फ्रेम घेतलीस गणपतीची ती दे ना लावून व्यवस्थीत दिसेल अशी? प्लिज? " अजय सहज म्हणाला. "मीच बनवतो काहीतरी खायला.. तुला भूक लागली आहे हे मला माहीत आहे.."

"मला? छे रे... मी लन्च घेतलाय व्यवस्थीत.. काकू डबा देते मला.."

" आणि कितीतरी दिवस झाले तू तो डबा खात नाहीयेस.. ऑफीसच्या रस्त्यापलीकडच्या त्या भिकारणिला देतियेस.. मी आज पाहिलं तुम्हाला अमूबाई.. " अजय म्हणाला. " अमू, माणसांचा राग जेवणावर नये काढू बाळ.. उद्यापासून माझ्यासोबत यायचंस तू दुपारी.. नाहीतर घरी सांगतो तुझ्या फोन करून.. काय समजलीस? " अजय गाडी पार्किंगमधे घालता घालता म्हणाला.

क्रमशः

गुलमोहर: