स्वराज्य

Submitted by संदीप आहेर on 22 November, 2011 - 02:13

स्वराज्य घडविताना छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले ... तशाच काहिश्या प्रसंगातून आजच्या युगातील राम पाठारे ही व्यक्तिरेखा प्रवास करते.

swarajya 101.jpg

राम पाठारे हा लोन मागण्यासाठी बॆंकेत जातो. तेथे बॆंकेचा गुजराथी मैनेजर मराठी माणसाने लोन घेऊन, धंदा करून, काय काय भोगलय याचा पाढा वाचतो. त्याला राम अतिशय फिल्मी पद्धतीने जी उत्तरं देतो. तेथेच सुजाण प्रेक्षक समजून जातो कि एक चांगला विषय आपण अतिशय फिल्मी ढंगात पाहणार आहोत. तर हेच संवाद सिंगल स्क्रिन थियेटर मध्ये टाळ्या मिळवताना दिसतात.

पुढे पावलोपावली इतर प्रांतियाकडून मराठी माणसावर होणारे अन्याय बघून राम अस्वस्थ होत जातो. कम्युटर मध्ये काही बि़झनेस करायलेला निघालेला राम आईच्या सांगण्यावरुन .... आपल्याच चाळीतील माणसांना बरोबर घेऊन फूड इंडस्र्टीत जम बसवतो. आता स्वामी त्याच्यावर त्याहून मोठी जबाबदारी सोपावतात. ती म्हणजे ह्या कोणीही वाली उरलेला नाही अशा मराठी समाजाच्या उत्कर्षाची. त्यासाठी रामला राजकारणात उतरावेच लागते.

स्वराज्याची वाटचालीत शिवाजी महाराजां प्रमाणेच राम सुद्धा मुस्लिमांनाही बरोबर घेणे, पण त्याच बरोबार अफजलखानाचा खात्मा, बाजीप्रभूने खिंड लढविणे, शाहिस्तेखानाची बोटे कापणे ह्या गोष्टी करताना पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात सरदार मोरेंनी केलेली फितुरी ईथेही घडते मात्र इतिहास बदलला जातो का? राम पाठारे आमदारकीची निवडणुक लढवतो, त्यात तो विजयी होतो का? ह्या संपूर्ण प्रवासात येणारी विघ्न जिवावर बेतणारे प्रसंग यातून राम सुखरुप राह्तो का? त्याला साथ देणार्‍या मावळ्यांचे काय होते? हे सिनेमा बघितल्यावर कळेलच.

फसलेल्या गोष्टी :
स्वराज्याच्या उभारणीत महाराजांना सामना करावा लागलेल्या गोष्टी... सिनेमाच्या कथानकात चपलखपणे बसविण्यात लेखक / दिग्दर्शक अयशस्वी ठरतो.

कथेला वेग आणण्याच्या धडपडीत समोर उभं राहिलेलं विश्व हे तितकसं विश्वसनिय ठरत नाही.

(ह्या पूर्वीच येऊन गेलेल्या रंग दे बंसतीची आठवण हमखास होते... त्यातही इतिहास नि वर्तमान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला गेला होता... पण त्या कथानकाने फिल्मी न होता वास्तवाशी जवळिक साधल्याने विश्वसनिय झाले आणि त्या सिनेमाला अभूतपूर्व यश लाभले... ईथे मात्र स्वराज्य कमी पडते.)

बहारदार गोष्टी :

आजपर्यंत मराठी सिनेमात कधिही न बघितलेली बलाढ्य माणसे. हिरो, साईड हिरो, व्हिलन सगळेच पिळदार शरीरयष्ठीचे...

सुंदर फ्रेम्स् ... छानसं म्युजिक ... वास्तवाशी फारकत घेतलेली असली तरीही सुंदर वेशभुषा.

राजेश श्रुगांरपुरेने साकारलेला बलदंड, रुबाबदार नि दमदार मर्द मराठा.

हे खरचं मराठी सिनेमासाठी दुर्मिळ आहे. म्हणुनच हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

गुलमोहर: 

मला वाटतं, मराठी अस्मिता हा विषय घेवून तिकीट खिडकीवर गल्ला भरण्याचा निर्मात्यांचा मानस असावा. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आला ना...! आता किती चघळायचा तोच विषय?