संशोधनक्षेत्रातील मायबोलीकरांची यादी

Submitted by वरदा on 11 November, 2011 - 02:19

आत्तापर्यंत जेवढ्यांचे उल्लेख झालेत त्या त्या माबोकरांची नावं आणि कार्यक्षेत्र याची यादी करतेय. बाकीच्यांनी भर घालावी. जसजसे लेख लिहिले जातील तसे त्यांचे दुवे इथे टाकत राहीनच!
सगळ्या माबोकरांना यादीत भर टाकण्यासाठी आणि संशोधनाविषयी लेख लिहिण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचं बोलावणं करतेय, अ‍ॅडमिनच्या वतीने Happy

ज्यांची डॉक्टरेट अजून पूर्ण व्हायची आहे त्यांना इथे फार विस्ताराने/ निष्कर्षांसकट लिहिता येणार नाही याची जाणीव आहे. तरीपण निदान काय काम चालू आहे याचा गोषवारा देऊ शकलात तर फार छान होईल!

१. चारुलता - Experimental Condensed Matter Physics
http://www.maayboli.com/node/30377

२. वरदा - Archaeology
http://www.maayboli.com/node/30478
http://www.maayboli.com/node/30479

३.रूनी - Meteorology/ Atmospheric Physics
४. भाग्या - ??
५. अनिता - ??
६. नलिनी - Chemoinformatics
७. लाजो - environmental design
८. संपदा - Medical Informatics
९. अस्चिग - Astrophysics
१०. चिनूक्स - nanotechnology
११. निवांत पाटिल - Chemical Engineering

१२. पेशवा - Electrical/Computer Engineering
http://www.maayboli.com/node/30923

१३. सखिप्रिया - Electrical/Computer Engineering/Chip Design

१४. सई केसकर - Biofuels
http://www.maayboli.com/node/30645

१५. भास्कराचार्य - mathematics
http://www.maayboli.com/node/41358
http://www.maayboli.com/node/45632
http://www.maayboli.com/node/45918
http://www.maayboli.com/node/46221

१६. रार - Medical/ Stem cell Research
१७. रार चा नवरा - material science
१८. रार ची आई - हिंदी साहित्य
१९. वैशाली अरुण - Solar energy

२०. राजकाशाना - Physics - Probe Microscopy
http://www.maayboli.com/node/30614
http://www.maayboli.com/node/30616
http://www.maayboli.com/node/30633

२१. विजय देशमुख - Photonics
http://www.maayboli.com/node/44626
http://www.maayboli.com/node/44731

२२. अवल - History
२३. ज्ञाती - Neuro-Bio Chemistry
२४. ज्ञातीचा नवरा - thermal/mechanical engineering/nanotechnology research
२५. कानडा - information security by combining biometrics with cryptography
२६. पळस - Spin Physics/ Structural Biology/ Chemistry (का आणखी काहीतरी?? :फिदी:)
२७. निलेश - Environmental Engg
२८. ऋचा - Environmental Engg
२९. अरभाट - Physics
३०. ganeshbehere - Insect Molecular Biology, Evolutionary Biology and Population Genetics of Insects
३१. नलिनीचा नवरा - organic chemistry
३२. चारुलताचा नवरा - Theoretical condensed matter physics
३३. मृदुला - उत्तराची वाट पहात आहे
३४. मृण्मयी - Agrobacterium mediated plant transformation

३५. चंपक - Organic chemistry - Asymmetric synthesis
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/87169.html?1182049301

३६. ललिता-प्रीतिचा नवरा - Chemical Reaction Engineering - Microemulsion Systems and Micellar Catalysis
३७. Bagz - Computer Science - Compilers
३८. कल्पु - Organic Chemisty-New Methods in Asymmetric Synthesis

३९. उदय - Physics
http://www.maayboli.com/node/30906

४०. किंकर - Management - Banking and Finance

४१. शांतीसुधा - Education Technology (Mathematics Education)

४२. अंबरीष फडणवीस - Metabolic Engineering and Biofuels

चूक भूल देणे घेणे, गाळलेल्या जागा भरणे आणि यादी वाढवणे Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूनी, मी यांना लिहितेच, पण तूही तुला माहित असलेल्या संशोधक माबोकरांना सांग ना या उपक्रमाबद्दल. प्लीज. Happy

वरदा, हे लई ब्येस केलंस. धन्यवाद.
वरची यादी वाचूनच चाट.

२७. निलेश Environmental Engg मध्ये संशोधन.
२८. अरभाट भौतिकशास्त्र. पूर्वी त्याचे क्षेत्र संशोधन असे होते.
२९. ऋचा Environmental Engg मध्ये संशोधन

सई, राजकाशाना, पळस, भास्कर आणि सगळेच, लिहा लवकर. वाट पाहतेय.
अरभाटाला आणि आशिषना विशेष विनंती

रैना, तू नुसतीच चाट पडलीस? मला तर प्रत्येक विषय लिहिताना गरगरत होतं. कित्येक विषयांची नावं पहिल्यांदाच ऐकतेय. नुसत्या फिजिक्समधे इतके प्रकार असतात (मग उपप्रकार किती असतील? एक भा. प्र. :फिदी:) हे सुद्धा आजच कळतंय. इतके दिवस झाकली मूठ होती माझी...

रच्याकने, नक्की कुठला निलेश तुला अभिप्रेत आहे? या नावाचे बरेच सदस्य दिसताहेत मला सूचीत. Uhoh आणि ऋचा एकच दिसली, तिला तुझा रेफरन्स देऊन लिहिलंय..

यादी जोरदार आहे की !
मी मास्टर्सची सुरूवात केली टेली-कम्युनिकेशन [सेलफोन टेक्नॉलॉजी] आणि त्यात व्हीएलएस्आयचा उपयोग या क्षेत्रात जाण्यासाठी. मास्टर्स करताना लक्षात आले की या विषयात नोकरीचा अनुभव असण्याची गरज इतकी आहे की गणिती संज्ञा आणि प्रमेये यांचा वापर कुठे आणि कसा होतो हे त्याशिवाय कळणार नाही. त्याच सुमारास आलेल्या मंदीमुळे मला जी नोकरी मिळाली त्यात या विषयाचा अनुभव मुळीच नाही. त्यामुळे मी सध्या या विषयावर थिअरीव्यतीरिक्त फारसे लिहू शकत नाही.

अरे माझे नाव नका घेऊ. मी पीएचडी नाहीये, आणि प्रत्यक्ष संशोधन क्षेत्रात कामही करीत नाही. मला मास्टर्सच्या वेळी फक्त दोन वर्षे संशोधन प्रकल्पावर काम करायची संधी मिळाली होती. एवढ्याशा अनुभवावर त्या क्षेत्राविषयी अधिकारवाणीने लिहिता येणार नाही.

मला लिहायला काही प्रॉब्लेम नाही. पण वरच्या लिस्टमध्ये अनेक डॉक्टर मंडळी आहेत. फिजिक्सवालेही भरपूर आहेत. ते जास्त योग्य प्रकारे लिहू शकतील. त्यांनी आधी लिहावे. एवढं वाचून झाल्यावर जनतेचा मेंदू थकला नाही तर मग मी 'विषयाची तोंडओळख' यास्वरूपाची भर घालू शकेन.

धन्यवाद.

अरे माझे नाव नका घेऊ. मी पीएचडी नाहीये,
---- फचिन (असे समविचारी आणखी असावेत...)... हा बाफ संशोधन क्षेत्रामधे काम करणार्‍यांचे अनुभव वाटण्या साठी आहे. आता डिग्री मिळणे वा न मिळवणे हे खुप महत्वाचे नाही आहे.

संशोधन हे केवळ Ph.D. मिळवणारेच करतात असे नाही. तुम्ही तुमचे संशोधन करतांनाचे अनुभव लिहावे असे वाटते....

संशोधन हे केवळ Ph.D. मिळवणारेच करतात असे नाही. तुम्ही तुमचे संशोधन करतांनाचे अनुभव लिहावे असे वाटते.... >>> उदय + १ , फचिन नक्की लिही.
डोण्ट वरी आमचा मेंदु किमान ह्याबाबतीत तरी थकणार नाही. Proud

बापरे किती नावं झालीत! किमान वर्षभर तरी वाचायची कमी नाही Happy
इतके हुषार लोक माबोवर आहेत हे भाग्यच आमच्यासारख्यांचे Happy

मस्तच होणारे हा प्रकल्प.. लवकर लिहायला लागा सगळ्यांनी. खूप दिवसांनी इंटरेस्टींग वाचायला मिळतंय!!

लई भारी वाटतंय ही लिस्ट बघूनच. स्वतःच पी.एच्.डी. असल्यासारखा आनंद झालाय इतके माबोकर्स बघून Happy

या यादीत उदय हेही नाव घाला.

शाळेतही विज्ञान हा आवडीचा विषय कधी नव्हता. आता इथे हे समजून घेऊन त्यावरच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची सक्ती नाही आहे, तर वाचायचा प्रयत्न करीन. सामाजिकशास्त्रांत संशोधन करणारे कुणीच नाही का? या विषयाबद्दल वाचायला (जास्त) आवडेल.

वरदा, वरच्या यादीतील लोकांच्या ह्या प्रोफाईल : - (हे हेडरला घेशील का प्लिज?)

१. चारुलता - http://www.maayboli.com/user/132
२. वरदा - http://www.maayboli.com/user/23822
३.रूनी - http://www.maayboli.com/user/115
४. भाग्या -
५. अनिता -
६. नलिनी - http://www.maayboli.com/user/109
७. लाजो - http://www.maayboli.com/user/436
८. संपदा - http://www.maayboli.com/user/221
९. अस्चिग - http://www.maayboli.com/user/245
१०. चिनूक्स - http://www.maayboli.com/user/4614
११. निवांत पाटिल - http://www.maayboli.com/user/12494
१२. पेशवा - http://www.maayboli.com/user/374
१३. सखिप्रिया -
१४. सई केसकर - http://www.maayboli.com/user/29332
१५. भास्कराचार्य - http://www.maayboli.com/user/35100
१६. रार - http://www.maayboli.com/user/567
१७. रार चा नवरा -
१८. रार ची आई -
१९. वैशाली अरुण - http://www.maayboli.com/user/33852
२०. राजकाशाना - http://www.maayboli.com/user/9808
२१. विजय देशमुख - http://www.maayboli.com/user/30527
२२. अवल - http://www.maayboli.com/user/10778
२३. ज्ञाती - http://www.maayboli.com/user/895
२४. ज्ञातीचा नवरा -
२५. कानडा - http://www.maayboli.com/user/32103
२६. पळस - http://www.maayboli.com/user/26909
२७. निलेश -
२८. ऋचा -
२९. अरभाट - http://www.maayboli.com/user/524

जेवढ्या मिळाल्या तेवढ्या लिंक लिहिल्या आहेत.

माझ्या नवर्‍याने टेलिकम्युनिकेशन्स इंजिनियरिंग मध्ये पीएचडी केली आहे. त्याच्या पीएचडी थिसिस ला IISc चे त्यावर्षीचे 'Best Thesis of all Engineering Departments' चे गोल्ड मेडल (आता बक्षिसाचे नक्की नाव आठवत नाही, बघून लिहीन.) पण मिळाले होते.
त्याला विचारुन बघते लिहायला जमेल का. वेळ नसल्याने लिहीलच याची गॅरेंटी नाही त्यामुळे कृपया यादीत नाव टाकू नये.

मस्त आहे हा प्रकल्प.
माझे पीएचडीच्या काळातले संशोधन क्षेत्र chemoinformatics. सध्या काही महीने entrepreneurship च्या कोर्सवर्कस मध्ये व्यस्त आहे त्यामुळे जरा सवडीने लिहिते.

नवरा अजूनही संशोधन क्षेत्रात आहे. त्याचं क्षेत्र organic chemistry.

वरदा, ग्रेट.
आता सगळ्या लिंक्स एकाच जागी मिळतील. माझ्या लेखाच्या शिर्षकात मी थोडा बदल केला आहे. इथेही करशील का? Happy

तसेच माझ्या नवर्‍याच्या विषयाबद्दलही लिहीते आहे, त्याचा विषय आहे, Theoretical condensed matter physics.

यादीतले विषयच एकसे एक भन्नाट आहेत. सगळ्यांचा संशोधनक्षेत्रातील प्रवेश, शक्य झाल तर मास्टर्स स्टडी याबद्दल वाचायला नक्की आवडेल. Happy

लोकहो, अस्चिगच्या सूचनेला मान देऊन जितक्यांची जमतील त्यांची प्रोफाईल्स इथे नावाशी जोडली आहेत. मंजूडीमुळे हे काम फारच सोप्पं झालं. धन्स गं मंजू..
काल माबोवर डॉक्टरेट आणि संशोधन या दोन शब्दांना सर्च मारून ज्यांची म्हणून नावं दिसली त्यांच्या विपूत जाऊन निरोप ठेवून आलेय Proud त्यात चंपकचंही नाव आहे..
मला सध्या वेळेची चणचण आहे, तरीही दिवसातून एकदा मी इथे चक्कर मारायचा प्रयत्न करेनच. पण तुम्हा सर्वांकडूनच थोडी थोडी जमेल तेवढी मदतीची अपेक्षा आहे! मी खूप लोकांना ओळखत नाही, तेव्हा तुम्हाला माहिती असलेल्या संशोधक माबोकरांना तुम्ही आवर्जून सांगा. Happy

भरत,
हो, सामाजिकशास्त्रांमधे संशोधन करणार्‍यांची संख्या अपेक्षेप्रमाणेच कमी आहे. अजूनही आपल्याकडे अशा विषयात संशोधन करणे हा बहुतांशी मध्यमवर्गीय मराठी लोकांच्या दृष्टीने valid career option नसतो असं माझं निरीक्षण आहे. मुळातच शालेय हुशारी आणि शास्त्रशाखा यांचं अतूट नातं आहे. शिवाय बरेच वेळा सामाजिकशास्त्रांच्या करिअर मधील उपलब्ध संधी तसंच मुळात या मार्गाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ज्याची नितांत गरज असते तो फॅकल्टीचा दर्जा हाही एक चिंतनीय घटक आहे. Uhoh

बाप रे, हे सगळे शब्द असतात हे माहीतसुध्धा नव्हते. किती अवघड कामे करताय लोक तुम्ही.
वरदा,मंजुडी - धन्यवाद यादी बनवल्याबद्दल. आम्हाला खुप सोपे कळायला.

बाप रे! ग्रेट! लिहा,लिहा, सर्वांनी लिहा Happy
माझ्या नवर्‍याचा पी.एच.डी.चा विषय - Microemulsion Systems and Micellar Catalysis (सर्व शब्द बहुतेक नीट लिहिले आहेत :फिदी:) हे नाव वाचूनच मी दमले होते. आता ही यादी वाचून दमले गुणिले ३५ !!

ललिताच्या नवर्‍याचं नाव पण टाकलंय यादीत. रोज शब्दसंग्रहात भर पडतेय Happy
बादवे, लले, तुझ्या नवर्‍याचा विषय नक्की कुठल्या शाखेत येतो गं?

वरदा आणि ललिता-प्रीति यांच्या विनंतीस मान देऊन इथला संदेश उडवला आहे.

तसदीबद्दल क्षमा असावी!

या बाफचा मूळ उद्देश परत लक्षात आणून दिल्याबद्दल आभार! Happy

आ.न.,
-गा.पै.

झक्की आणि गामा पैलवान,
दोघांनाही अत्यंत नम्र विनंती.
हा बाफ फक्त आणि फक्त संशोधक माबोकरांची नावं आणि त्यांच्या कार्यक्षेत्रांची यादी यासाठी केलेला आहे. प्रत्येकाच्या संशोधनाच्या स्वरूपावर स्वतंत्र लेख लिहिले जाणार आहेत तिथे आपण आपापली त्या त्या विषयावरची मते व्यक्त करावीत. किंवा सरळ याची चर्चा करण्यासाठी वेगळा बाफ उघडावा. कृपया इथे कळत नकळतही विषयांतर होऊ देऊ नका... सूज्ञास अधिक सांगणे न लगे!

Pages