काका आणि राजेशाही लगीन

Submitted by प्रतिमध्यम on 13 November, 2011 - 08:15

पोंक्षे काका आज जरा गडबडीत होते. सकाळी सकाळी लुना काढून मार्केटात फिरत होते. पोंक्ष्यांची ठेवण जरा कोकणीच होती.

आज रविवार होता. रस्त्यावर फिरताना मासळीच्या दुकानात फलटणकर दिसला आणि पोंक्ष्यांच्या आतला राक्षस जागा झाला. पोंक्षे-फलटणकर, जुने वैर. फलटणकर यांनी फलटण सोडून मिरजे मध्ये पोंक्ष्यांच्या घरासमोर जागा घेतली होती. गेली पाच वर्षे रोज रविवारी माश्याचे डोळे आणि माश्याच्या छातीची हाडे पोंक्ष्यांच्या घरासमोर टाकण्यात फलटणकर आघाडीवर होते. आज पोंक्षे ठरवून आले होते कि आज या फलटणकराला सोडायचा नाही. एका विटेवर लुनाचा stand लावून पोंक्षे उतरले. "काय रे ए देवमाश्या, आज किती किलो डोळे टाकणार आमच्या घर समोर?". "का हो, तुम्ही काय त्याची माळ करून घालणार कि काय?" इति फलटणकर. काखेतल्या पिशवीतून एक कागदाची सुरळी काढली. पोंक्ष्याना ब्रिटेनच्या राणीने विलियम आणि केट च्या लग्नाला बोलावले होते. निमंत्रण दाखवत काका म्हणाले "तू बस मिरजेत मासे खात. मी चाललो लग्नाला."

दिवस आला. पोंक्षे (४०), सौ. पोंक्षे (३८) आणि चि. पोंक्षे (१८) मुंबई वरून ग्रेट ब्रिटेनला पोचले. बरोबर फक्त २ पिशव्या.

पोंक्षे कुटुंब इंग्लंडला पोचले. एका खाकी पिशवीमध्ये गोरे भडंग पुडा, एक पंचा, धोतर आणि काही सामान घेऊन काका पुढे. मागे सौ हातामध्ये मार्केटातल्या कुठल्याश्या कपड्याच्या दुकानाची प्लास्टिकची पिशवी. त्यात हळद कुंकू लागलेले आहेराचे पाकीट, नारळ, blouse पीस, विड्याची पाने, सुपारी, एक छोटा डबा भरून केलेला फोडणीचा भात आणि कपडे. त्यांच्या मागे चिरंजीव. स्वारी लंडनला पोचली.

खाली येऊन काका आपल्या पिशवीची वाट पाहत होते. एक पिशवी चेक इन केली नव्हती. सगळेजण आपापले सामान उचलत होते. पिशवी आली. पिशवीवर पत्ता होताच: "श्री नारायण वामन पोंक्षे, पोतनीस-वाघ कुस्ती मैदानं शेजारी, मिरज. पिशवी हातात आल्यावर दिसले कि काकांची मिस्वाक ची ट्यूब फुटून इच-गार्ड बरोबर मिक्स झाली होती. काकूंच्या कवळीचा बॉक्स फुटून या दोन्ही क्रीमचा लेप चढला होता. मुळव्याधीच्या गोळ्यांचे पाकीट आधीच मोकळे होऊन सगळीकडे पसरले होते. सौंच्या कुंकवाची डबी आणि क्रीमचा लेप मिक्स होऊन काकांच्या बंडीचा आणि कवळीचा रंग बदलत होता. "त्यात काय एवढ.. नवीन घेऊ".. इति काका. हे वाक्य चिरंजीवाना जरा धास्तीचे होते. ४ वर्षापूर्वी एकदा चिरंजीवानी टीवीचा रिमोट मोडला होता. तेव्हा पण काका असाच म्हणाले होते "त्यात काय एवढ . नवीन घेऊ".. आज पर्यंत कुटुंब हातानी टीवीची बटण दाबत channel बदलतात, नवीन रिमोट आला नाही. सौंच्या कपाळावर आठ्या. कारण त्यांची कवळी खराब झाली. एकदा काकू कवळी घालून शौचालयात प्रात:विधी करत बसल्या होत्या. शिंक आली आणि कवळी सटकली ती सरळ (त्या) भांड्यात. तशीच बाहेर काढून काकांनी ती कवळी पोलिश करून घेतली होती. आता इच-गार्ड वाली कवळी तोंडात बसणार होती.. काकुना जरा धसकाच बसला याचा.

लग्न स्थळावर कुटुंब पोचले. सगळ्यात मागच्या रांगेत परिवार उभा होता. काकू मुद्दामून कारपेटच्या जवळ उभ्या होत्या. जरा नीट पहिले तर दिसले कि काकू हातात कात्री घेऊन उभ्या होत्या . कारण असे कि कुणी एका भिशी मंडळातल्या गृहिणीने सांगिले होते कि राणी च्या सुने चा पदर मोठा असतो आणि जमिनीवर लोळत येतो . काकुना त्या पदर मधला ४ x ४ सेमी चा पीस आणायला सांगितला होता - लग्नाला गेले होते त्याचे proof म्हणून !

चिरंजीव इकडे तिकडे मुलीकडच्या करवलीना शोधात होते . शेजारी कुणी एक उभी होती . चिं. ना वाटले कि हीच संधी आहे . थोड्या थुंकीने केस वळवून चिं सरस्वले . "मी पुरुषोत्तम पोंक्षे .. वालचंद इंजिनीरिंग .. सिविल डिप्लोमा . 2nd ईअर, फ्री सीट , ओपन मधून . तू काय करतीस ग ?".. नको तिथे खड्डे खणायची परंपराच या पोन्क्ष्यांची . हे चिरंजीव कुणालाही आपल्या admission बद्दल सांगायला मागे पुढे पाहत नाहीत .यांना इंजिनीरिंगला admission काय मिळाले ओपन मधून की मोठा बाण मारल्या सारखे वाटते . ९०% जागा राखीव . १०% मध्ये हजारो ओपन वाले येतात , कदाचित म्हणून एवढे वाटत असेल .... एकदा dentist कडे गेल्यावर डॉक्टरांनी सहज विचारले .. "बाळा काय करतोस ?".. "मी वालचंद सिविल डिप्लोमा . 2nd ईअर, फ्री सीट , ओपेन मधून , ९८ टक्के होते दहावीला , सहाव्या round मध्ये admission मिळाले , हे साले reservation वाले सगळ्या सीट खातात ..." डॉक्टर SC निघाला ... चिरंजीवांचा दात काही बरा झाला नाही .. शेवटी उपसून काढायला लागला ... असो .

सून आली . तिच्या बरोबर तिचा बाप . काका खिशात हात घालून कुणाच्यातरी लग्नात गोळा केलेय अक्षदा शोधत होते. आणि चिरंजीव - डिप्लोमा फ्री सीट मध्ये पोरगी शोधत होते.

लग्न घडी आली .. "i do i do " वगैरे झाले .. चुंबनाच्या वेळेस काकुनी चिरंजीवांच्या डोळ्यावर पदर धरला होता . "i pronounce you man and wife", टाळ्या , संगीत .. राणी हसत होती आणि अचानक कुठून तरी तांदूळ उडत आले .. आणि सरळ राणीच्या डोळ्यात . त्यातले कुंकू झोंबले असणार . त्या तांदळाबरोबर चुकून शिंकणीची डबी पण गेली होती .. काकांची कृपा .. त्यांना वाटले की टाळ्या वाजल्या म्हणजे लगीन लागले ..

लग्न झाले ... कुटुंबाने आपला राजघराण्या बरोबर photo काढून घेतला .. काकुनी खणा-नारळाची ओटी आणि आहेराचे पाकीट दिले .. चिं. नी मुलीचा email id घेतला ..

कुटुंब मिरजेला पोचले ... फलटणकरनी ४ दिवसात माश्यांचे शे - दीडशे डोळे घरासमोर टाकले होते ...

घरी आल्यावर काकांनी पिशवी उघडली .. हळू हळू समान बाहेर येत होते. खंत एवढीच की राणीची कवळी मात्र हाताला लागली नाही .. .

दुसऱ्या दिवशी लोकमत मध्ये बातमी ... "ओपेरेशन नंतर राणीच्या डोळ्यातून शेवटचा तांदूळ निघाला ".. पेपर वाचताना खुश होऊन काका सौ ना म्हणाले .. "अहो ऐकलात का , जोश्यांचा लग्नातल्या अक्षदा लंडनला पोचल्या हो ..."

गुलमोहर: 

डॉक्टर SC निघाला ... चिरंजीवांचा दात काही बरा झाला नाही .. शेवटी उपसून काढायला लागला ... असो .

उपसायच्या वेळी तरी बामण डॉक्टर बघायचा ना, उगाच तुकडा रहायला नको.

असो ..