हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला इथे हे टाईम टर्नरचं वाचून जरा गोंधळ झाला. शंका रास्त असली तरी मला वाटतं सगळं स्पष्ट दिलेलय.
बकबीक तेव्हा मरत नाही आणि फक्त भोपळा फुटतो. पण ती क्रिया खरी होण्याकरता हरमायनी आणि हॅरीच्या फ्युचर सेल्फ ला तिथे असण्याची गरज असते.
जागोप्यांचे बरोबर आहे. हॅग्रिड आणि डंबलडोअरची स्मृती बदलायची काहीच गरज नाही. त्यांच्या समोर घडलेलं काहीच बदलत नाही. ह्यात गंमत अशी आहे की जेव्हा डंबलडोअर आणि मिनीस्टर झोपडी बाहेर येतात आणि बकबीक नसतोच तेव्हाच डंबलडोअरला कळलेलं असणार की हॅरी आणि हरमायनी बकबीक ला पळवून नेण्यात यशस्वी झाले आहेत ते. (हे पुस्तकात दिलेलं नाही अर्थातच पण ऑब्वियस आहे).

काल रात्री गॉबलेट ऑफ फायर वाचून संपवलं. अप्रतिम! स्मशाणातला शेवट काय जबरदस्त रेखाटलाय! इतका तुफान पेस आहे सगळ्यामधे. शेवटचे दोन चॅप्टर तर एकदम सगळी लय बदलून टाकतात. सेड्रिक च्या घटनेनंतर हा सगळा पोरखेळ नाहीये ह्याची आपल्याला जास्त जाणीव होते.

**********स्पॉयलर अलर्ट**********
हर्मायनीने टाइमटर्नर वापरला केव्हा? वेळ मागे फिरवली केव्हा? तर बकबीकला मारायला आलेले लोक बकबीक असलेल्या जागेशी येऊन गेल्यावर. तिथे नक्की काय घडले हे दृष्टीआडच ठेवले आहे. लॉजिकली बकबीक मारला जायला हवा होता.
बकबीकच्या भोवती असलेल्यांना तसे दिसायला हवे होते.
आता टाइमटर्नर वापरून हर्मायनी-हॅरी यांनी भूतकाळात जाऊन मारेकरी बकबीकपाशी पोचण्याआधीच त्याची सुटका केली.
आधी नक्की काय घडलं हे हर्मायनी व हॅरीने प्रत्यक्ष पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी घटना बदलली नाही. पण हॅग्रिड, मारेकरी, डंबलडोर यांच्यासाठी बदललेली असायला हवी....तशाच त्यांच्या स्मृतीही.
>>>>
नाही भरत. आधी जेव्हा घटना घडते, तेव्हा हे कुठेच स्पष्ट केलं जात नाही की कोयत्याचा घाव बकबीकवर बसला की भोपळ्यावर. आपण बकबीक मेला अशीच अपेक्षा करत अस्तो त्यामुळे आपल्याला हर्मायनीच्या वाक्यांवरुन तसंच वाटतं. नंतर कळतं की तो भोपळ्यावर बसला. त्यामुळे हॅग्रिड, मारेकरी असं समजतात की बकबीक पळून गेला. शेवटी हॅग्रिड हॅरीला सांगतोही तसं. त्यामुळे हॅग्रिड्/मारेकरी यांच्या स्मृती बदलण्याचं प्रयोजनच नाही. फक्त त्यांच्यामते बकबीक पळाला असतो तर नंतर आपल्याला कळतं की त्याला सिरियस घेऊन गेलाय.

<< टर्नर वापरताना एक काळजी घ्यायची असते ती म्हणजे जो माणुस भुतकाळात जातो त्याला इतरांनी बघता कामा नये>>

टर्नर वापरताना जो माणुस भुतकाळात जातो त्याला इतरांनी बघता कामा नये तसेच त्या व्यक्तीच्या त्या काळातल्या रुपानेही बघता कामा नये.

बुवा, माझंही ३-४ दिवसापूर्वी गॉब्लेट ऑफ फायर संपलं. सेड्रिकच्या हकनाक मृत्युचं फारच वाईट वाटलं.
आता ऑर्डर ऑफ फिनिक्स चालू केलंय. अजून हॅरीच कन्फ्युज्ड आहे, त्यामुळे मीही Happy

बकबीक मरत नाही.
तो पळून गेला आहे हे लक्षात येताच तो मॅकनेयर संतापाने त्याचा परशू हॅग्रीडच्या मोठ्ठ्या भोपळ्याच्या बागेच्या कुंपणावर आपटतो. त्याचा आवाज तो आहे. हॅरी अन हर्मायनीला बकबिकला न्यायला वेळ लागतो आहे हे लक्षात घेऊन डंबलडोर मॅकनेयर ला थांबवतो..
"One moment please, Macnair," came Dumbledore's voice. "You need to sign too."
The footsteps stopped. Harry heaved on the rope....
मग सगळे बाहेर येतात तोपर्यंत बकबीक गायब.
मग,
There was a swishing noice, and the thud of an axe. The executioner seemed to have swung it into the fence in anger.And then came the howling, and this time they could hear hagrid's words through his sobs.
"Gone! Gone! Bless his little beak, he's gone! Musta pulled himself free! Beaky, yeh clever boy!"

पुस्तक वाचा हो! पिच्चर पाहून शेण्खा काढू नका Sad

ते इतरांनी बघू नये ह्याच साधं कारण लोकांना ताळमेळ न लागून लोकं फ्रिक आऊट होतील म्हणून आहे. रॉन नाही का हॉस्पिटल विंग मध्ये असताना फ्रिक आऊट होतो जेव्हा हॅरी आणि हरमायनी डंबलडोअरनी दरवाजा लावून गेल्यावर त्याच दरवाज्यातून आता येतात तेव्हा.

नताशा Happy

***************** इशारा : रहस्यभेद *****************

बुवा आणि नताशा यांच्या पोस्टींवरून असे अनुमान निघतेय की -

  1. बकबीकचा जीव आधीच वाचलेला होता. तो येनकेन प्रकारे आधीच पळून गेला होता. म्हणजे भूतकाळात पुन्हा शिरलेले हॅरी आणि हर्मायनी काही कारणांनी हॅग्रीडच्या झोपडीपर्यंत पोचू शकले नसते तरी बकबीन जिवंतच राहता.
  2. आणि डंबलडोर यांनी 'बकबीनचा जीव आधीच वाचलाय' या घटनेचा उपयोग चातुर्याने ब्लॅकला वाचवण्यासाठी केला आहे.

पण -
मग टर्नर फिरवण्यापूर्वी डंबलडोर या दोघांना म्हणतात - तुम्ही निरागस प्राण वाचवू शकाल.
जर बकबीनचे प्राण आधीच वाचले आहेत तर या विधानातला निरागस कोण? ब्लॅक?

तळटीप : मी हॅरीचा एकही चित्रपट पाहिलेला नाही.

पिक्चरमध्ये तर कई मासूमों की जान बचेव्गी असे आहे.. म्हणजे सिरियस आणि बकबीक.

तो येनकेन प्रकारे आधीच पळून गेला होता.

येन्केन नाही... टाइम टर्नरचं सगळं रामायण त्याला आणि ब्लॅकला वाचवायालाच तर होते.

नुस्तं पुस्तक वाचून शंका काढू नका.. पिक्चरही बघा... Light 1 Biggrin

तो म्हणतो, more than one innocent life could be saved.
हॅरीच्या पॉवरफुल पट्रोनस मुळे सिरियस वाचतो (मुख्य उद्दिष्ट) आणि मारायच्या आधी पळवल्यामुळे बकबीक वाचतो. पुढे जर हॅरी आणि हरमायनी बकबीकला पळवण्यात यशस्वी झाले नसते तर बकबीक मेला असता. तिकडे भोपळा फुटायच्या ऐवेजी बकबीक असता येवढाच काय तो फरक झाला असता. म्हणूनच मी म्हंटलय आधीच्या पोस्टीत. डंबलडोअर बाहेर आल्यावर बकबीक गायब झाला आणि म्हणूनच पुढे डंबलडोअर हे वाक्य म्हणतो कारण घटना तर घडली पण ती घडायला कारणीभुत असलेले हॅरी आणि हरमायनी ह्यांना भुतकाळात धाडायला हवं.

पिक्चरमध्ये तर कई मासूमों की जान बचेव्गी असे आहे.. म्हणजे सिरियस आणि बकबीक. << हो, मान्य. पुस्तकातही तसंच आहे. मी सुधारतो.

नुस्तं पुस्तक वाचून शंका काढू नका.. पिक्चरही बघा... >>>>> Lol

पुस्तक वाचा हो! पिच्चर पाहून शेण्खा काढू नका >>>>>>इथे हॅरी पॉटर बाफं वर शंका नाही विचारायच्या तर मग काय करायचं?

बुवा, तुम्ही म्हणताय -

  • पुढे जर हॅरी आणि हरमायनी बकबीकला पळवण्यात यशस्वी झाले नसते तर बकबीक मेला असतातिकडे भोपळा फुटायच्या ऐवेजी बकबीक असता येवढाच काय तो फरक झाला असता.

आणि पुढे म्हणताय -

  • म्हणूनच मी म्हंटलय आधीच्या पोस्टीत. डंबलडोअर बाहेर आल्यावर बकबीक गायब झाला आणि म्हणूनच पुढे डंबलडोअर हे वाक्य म्हणतो कारण <<माझी अ‍ॅडीशनः बकबीकचे प्राण वाचायची>> घटना तर घडली पण ती घडायला कारणीभुत असलेले हॅरी आणि हरमायनी ह्यांना भुतकाळात धाडायला हवं.

म्हणजेच ते दोघे भूतकाळात जाण्याआधीच त्याचे प्राण वाचले होते, असा अर्थ मला यातून निघतोय. जो तुमच्या आधीच्या म्हणजे 'तिकडे भोपळा फुटायच्या ऐवेजी बकबीक असता येवढाच काय तो फरक झाला असता' विधानाला काटछेद देतोय.

असो, शक्य झाल्यास मी तो चित्रपटही पाहीन.
(म्हणजे सहन करीन. :फिदी:)

म्हणजेच ते दोघे भूतकाळात जाण्याआधीच त्याचे प्राण वाचले होते, असा अर्थ मला यातून निघतोय. जो तुमच्या आधीच्या म्हणजे 'तिकडे भोपळा फुटायच्या ऐवेजी बकबीक असता येवढाच काय तो फरक झाला असता' विधानाला काटछेद देतोय.

>> 'तिकडे भोपळा फुटायच्या ऐवेजी बकबीक असता येवढाच काय तो फरक झाला असता' हे जरतरचे लॉजिक झाले, उदाहरण म्हणून दिलेले. खरं म्हणजे त्याचे प्राण आधीच वाचतात कारण भविश्यातले हॅरी-हर्मायनी येऊन त्याला वाचवणार असतात. (त्याक्षणी तिथे त्याकाळचे हॅरी-हर्मायनी आणि त्यांची भविष्यातली रुपं, दोन्ही उपस्थित असतात.) आलं का लक्षात? Happy

टर्मिनेटर -१ मध्ये जसा कायल (आपल्यासाठीच्या) भविष्यकाळातून (त्याच्या भूतकाळात) येऊन (आपल्या) वर्तमानकाळात घडणार्‍या गोष्टी बदलतो तेच लॉजिक आहे, इथे फक्त भविष्यकाळातून आलेला असाल तर वर्तमानकाळातल्या लोकांना तुम्ही दिसू नये अशी खबरदारी घ्यायची आहे आणि दोन्ही काळातल्या वेळा एकमेकांच्या समप्रमाणात आहेत.

बुवा बुवा, रागावू नका!
"पुस्तक न वाचता" हे म्हटलं मी. नुस्तं पिच्चर पाहून सगळी ष्टोरी कळत नाही ना! हा मतितार्थ.

मी वर दिलेल्या परिच्छेदावरून असं दिसतं की डंबलडोर त्या मॅक्नेअर ला बाहेर जाताना अडवून हॅरीला जास्त वेळ मिळेल असं पहातो. म्हणजे, तो एकमेव माणूस असतो (दुसर्‍या रॉलिंग बाई. त्यांनाही आधीच ठाऊक होतं.) ज्याला ठाऊक असतं की टाईमटर्नर वापरून बकबीक व सिरियस दोघांना वाचवता येईल, अन तेही कुणावरच संशय येऊ न देता. कारण दोघेही मिनिस्ट्रीने गुन्हेगार म्हणून घोषित केलेले आहेत. त्यांना वाचवणार्‍यांवर कारवाई होईल. टाईमटर्नर वापरून होणार्‍या सर्व घटनांची अतिशय सुसंगत अशी संगती बाईंनी लावली आहे.

म्हणजेच ते दोघे भूतकाळात जाण्याआधीच त्याचे प्राण वाचले होते, असा अर्थ मला यातून निघतोय. जो तुमच्या आधीच्या म्हणजे 'तिकडे भोपळा फुटायच्या ऐवेजी बकबीक असता येवढाच काय तो फरक झाला असता' विधानाला काटछेद देतोय.>>>>> हे म्हणजे बेसिक मध्येच लोचा करत आहात तुम्ही. जाऊ द्या. हळू हळू येइल लक्षात. Happy

इब्लिस Happy

बाय द वे. हा मॅकनेअर पण बहुतेक डेथ इटर आहे.

अगदीच आहे. 'जड भेजां'पैकी आहे तो मॅक्नेयर. क्रॅब, गोयल इ. च्या लायनीतला. वॉल्डेमॉर्ट हॅरिचं रक्त घेऊन शरीरधारी होतो, तेव्हा जमलेल्यांत तो आहे. अन शेवटच्या युद्धातही.

@ चमन | 25 October, 2011 - 20:33

>>टर्मिनेटर -१ मध्ये जसा कायल (आपल्यासाठीच्या) भविष्यकाळातून (त्याच्या भूतकाळात) येऊन (आपल्या) वर्तमानकाळात घडणार्‍या गोष्टी बदलतो तेच लॉजिक आहे,<<

टाईमटर्नरने भूतकालात गेल्यावर तिथे ढवळाढवळ करायची नाही हे हर्मायनी सांगते. हॅरीचा विचार असतो त्या उंदराला - वर्मटेल ला - पकडून सिरियसचे निरपराधित्व सिद्ध करण्याचा. ती सांगते की असे प्रयत्न करणार्‍या जादूगारांचे फार हाल होतात. असे करण्याचा विचारही करू नकोस. तीच (भूतकाळात बदल करण्याचा प्रयत्न न करण्याची) अट तिच्या हाती ते यंत्र देताना घालण्यात आलेली असते.

मी पुस्तक पुन्हा वाचलेच पण त्याबरोबरच हॅरी पॉटर मधल्या टर्नरच्या या तीन तासांवर नेटवर झालेल्या इतर अनेक चर्चा वाचून काढल्या. (तुम्हीही शक्य असल्यास वाचा. खूप रोचक आहेत.)

सगळे वाचल्यावर आणि पुन्हा इथली सगळी चर्चा वाचल्यावर आता थोडे स्पष्ट झाल्यासारखे वाटतेय.

Time_Turner.jpg

मी काढलेल्या सोबतच्या चित्रात -

  1. निळी रेषा : हॅरी, रॉन आणि हर्मायनी यांचा "हॅग्रीडला भेटायला जाणे--त्याला भेटून परत येणे--येताना कुत्र्यामांजराशी झटापट होणे--वोंपिंग विलो च्या आत जाणे--तिथून सगळे बाहेर येणे--ल्युपिनचे रुपांतर--हॅरी,रॉन,हर्मायनी,डंबलडोर हे इस्पितळातल्या कक्षात उपस्थित असणे इथपर्यंतचा प्रवास.
  2. हिरवी रेषा : टर्नर चालू झाल्यापासूनचा परत इस्पितळात पोहचून तिथून पुढचा प्रवास.
  3. बिंदू "अ" : टर्नर चालू झाला तो क्षण (पहिल्यांदा जेंव्हा हॅरी, रॉन आणि हर्मायनी हॅग्रीडला भेटायला निधून आणि हॉलमध्ये पोचतात त्याच क्षणी भविष्यातले हॅरी आणि हर्मायनी यांचा टाईम-टर्नर चालू होऊन झाडूच्या कपाटात उपस्थित असतात तो क्षण.)
  4. बिंदू "ब" : टर्नर बंद झाला तो क्षण (भविष्यातले आणि वर्तमानातले हॅरी-हर्मायनी एकाच रेषेवर येतात तो क्षण)
  5. म्हणजे 'अ' ते 'ब' म्हणजे 'ते' तीन तास.

म्हणजे खरंतर ते पुढे जाऊन परत मागे आले असे नाही तर "अ" बिंदूजवळ दुसरी एक खरीखुरी जिवंत हॅरी-हर्मायनी जोडी एनी हाऊ प्रकट झाली आणि त्यांचा प्रवास समांतरच सुरू झाला. असे गृहीत धरले समजणे सोपे होईल. ('खरीखुरी' जोडी म्हटले आहे, कारण या दोन हॅरी आणि दोन हर्मयांनी अशा चार जणांना एकमेकांना स्पर्श करणे, संवाद साधणे सहज शक्य आहे. किंबहुना अनवधानाने तसे होऊ नये म्हणून नव्या जोडीला पराकोटीची काळजी घ्यावी लागते! समांतर हा शब्द 'तो प्रवास एकरेषीय नाही' या अर्थाने वापरला आहे. 'ते एकमेकांत मिसळू शकत नाहीत' या अर्थाने नाही.)

दोन प्रवाहांत फरक इतकाच की निळ्या रेषेवरील हॅरी-हर्मायनीला या नव्या जोडीविषयी अजिबात कल्पना नाही पण हिरव्या प्रवाहातील हॅरी-हर्मायनीला निळ्या रेषेवरच्या हॅरी-हर्मायनीच्या आयुष्यात काय काय 'घडणार आहे' याची स्पष्ट कल्पना आहे.

मग -
ती जोडी "एनी हाऊ" प्रकटत असेल तर 'टाईम-टर्नर'चे काम काय?
- तर हा संमातर प्रवास कोठून सुरू होऊन कोठे संपायला पाहिजे आणि तो प्रवास कोणासाठी सुरू ठेवायचा हे(च) टाईम-टर्नरचे काम.

(तो प्रवास नियतीने आधीच आखलाय, टर्नर केवळ त्याची दृश्यमर्यादा ठरवण्याचे काम करतो असा विचार केला तर समजणे सोपे होते. नाहीतर गोल गोल प्रश्नांनी डोके फिरते.

यातून असा अदृश्य समांतर प्रवास नेहमी चालूच असतो असे रॉलींगबाईना सांगायचे आहे?)

Lol
Khupach kashta ghetlet you know who! tumcha naav baghun waatla nahi tumhala itake kashta laagtil samjayla.

Aaho yewdha seriously naka ghewu mi aapala general tp marat hoto.
Hota asa kadhi kadhi, ekhaadi goshta nahi ter nahi lakshat yet aani ek diwashi ekdam dokyaat ekdam lakhh prakash padato. Happy

> किंबहुना अनवधानाने तसे होऊ नये म्हणून नव्या जोडीला पराकोटीची काळजी घ्यावी लागते!

जादुच्या पुस्तकांमधे वैज्ञानीक तर्कसंगती पाहु नये पण ...
काळप्रवासात भूतकाळात काय व किती ढवळाढवळ करता येते याबद्दल लेखक आपल्या सोयीनुसार ठरवतात.
याबाबत मला *न* आवडलेले पुस्तक म्हणजे 'time travelers wife'

या प्रकारातील सर्वोत्तम हाताळणी निर्विवादपणे आसिमोव्हच्या 'The End of Eternity' मधे आहे.
http://en.wikipedia.org/wiki/The_End_of_Eternity
वाचले नसल्यास जरुर वाचा

आणि 'नियम' कसे धाब्यावर बसवायचे व नसलेल्या नियमांचा कसा फायदा घ्यायचा याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे इतक्यातील (2009) स्टारट्रेक सिनेमा (अर्थातच फायदा घेतला आहे थोरल्या तर्कशहा स्पॉकने):

************* spolier ******************
I am not our father.

http://www.imdb.com/title/tt0796366/quotes

[Spock notices an elder Vulcan walking in the docking bay]
Spock: Father!
[the elder Vulcan turns and is revealed as Spock Prime]
Spock Prime: I am not our father.
[Young Spock, now recognizing who he is, approaches]
Spock Prime: There are so few Vulcans left. We cannot afford to ignore each other.
Spock: Then why did you send Kirk aboard, when you alone could have explained the truth?
Spock Prime: Because you needed each other. I could not deprive you of the revelation of all that you could accomplish together, of a friendship that will define you both in ways you cannot yet realize.
Spock: How did you persuade him to keep your secret?
Spock Prime: He inferred that universe-ending paradoxes would ensue should he break his promise.
Spock: You lied.
Spock Prime: I... I implied.
....

याबाबत मला *न* आवडलेले पुस्तक म्हणजे 'time travelers wife' <<< मला चित्रपण पण नाही आवडला. Happy

यु नो हूनी एवढे कष्ट घेतल्याबद्दल त्याचे अभिनंदन, Happy हा सीन खरंतर पिक्चरमधे व्यवस्थित समजतो. पुस्तकात वाचताना थोडा गोंधळ होतोच.

मला हॅरीच्या पिक्चरमधली अजिबात न पटलेली संकल्पना म्हणजे टाईम टर्नर Happy नशिबाने, पाचव्या भागात रोलिंग्बाईनी सगळे टाईमटर्नरच फोडून टाकले. Happy

टाइमटर्नरबद्दल आणखी माहिती इथे मिळेल.
http://harrypotter.wikia.com/wiki/Time-Turner

>>या प्रकारातील सर्वोत्तम हाताळणी निर्विवादपणे आसिमोव्हच्या 'The End of Eternity' मधे आहे.>>
+१. अझिमॉव्हच्या मस्ट रीड पुस्तकांमध्ये हे नक्कीच येईल.

वेगवेगळे स्पेल्स, पोशन्स इत्यादी कसे काय काम करत असतील? बहुधा इथली माहिती तर वापरत नसतील ना? Wink

http://wakeup-world.com/2011/07/12/scientist-prove-dna-can-be-reprogramm...

ती जोडी "एनी हाऊ" प्रकटत असेल तर 'टाईम-टर्नर'चे काम काय?

तुम्ही आलेख छान काढला आहे..

काळ हा अखंड आहे.. भूत, वर्तमान, भविष्य सगळे मानवी मनाचे खेळ आहेत.

मानवी मनाला प्रश्न पडेल की बिंदु अ येथेच नवीन हॅरी कुठून आला? अजून बिण्दु ब पर्यंत निळ्या रेघेने पोहोचून हर्मायनीने ताइम टर्नर फिरवलेलाही नाही.... पण हा मानवी प्रश्न आहे.. काळाच्या दृष्टीने ब येथील भविष्यातील हर्मायनीने टाइम टर्नर फिरवून अ येथे भूतकाळात प्रकटणे अशक्य नाही. कारण 'काळा'च्या दृष्टीने सगळाच ग्राफ अख्म्ड आहे.. त्यात भूत, वर्तमान, भविष्य असे तुकडे नाहीत.

Pages